नाशिक जिल्ह्यात शेवगेडांग (ता. इगतपुरी) येथील बौध्द वस्तीवर झालेला जातीयवादी हल्ला म्हणजे दुसरी खैरलांजी !!

नाशिक जिल्ह्यात शेवगेडांग (ता. इगतपुरी) येथील बौध्द वस्तीवर झालेला जातीयवादी हल्ला म्हणजे दुसरी खैरलांजी !!






नाशिक जिल्ह्यात शेवगेडांग (ता. इगतपुरी) ह्या  गावात २० ऑक्टोबरला बुद्ध बांधवांच्या वस्तीवर जातीयवादी हल्ला झाला. अर्थातच खेळाडू आणि नटनट्यांच्या हागल्या मुतल्याच्या न्यूज करुन दलाली करणाऱ्या प्रसारमाध्यमांनी याची दखल घेतली नाहीच, केवळ सम्राट या दैनिकात याची छोटेखानी बातमी होती. या गावात गेल्या अनेक वर्षांपासून असे जाती वर्चस्वाचे खटके उडताहेत. तीनेक वर्षांपूर्वी या गावातील स्वतःला उच्चवर्णीय समजणाऱ्या जातीयवादी काही मराठा समाजातील तरुणांनी निळ्या झेंड्याची विटंबना केल्यापासून या घटनांना जास्त पेव फुटला आहे. सध्या या प्रकरणाला सुरुवात झाली ती एका किरकोळ भांडणातून. एक जीप कलंडल्याने जखमी झालेल्या एका स्त्रीच्या व मुलाच्या औषधोपचाराचा अर्धा खर्च जीप ड्रायव्हरने उचलावा या मागणीचे पर्यवसन भांडणात झाले जे पोलिसांनी मिटवले. 




यानंतर रविवारी २० तारखेंला जातीयवादी काही मराठा समाजातील १९ तरुणांनी दुपारी चारच्या सुमारास गाव बेसावध गाठून गावातील बुद्ध बांधवांच्या घरावर जोरदार दगडफेक केली. ट्रॅक्टर भरुन दगड आणल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. बेसावध तरुण जबरी जखमी झाले, गाड्या फोडण्यात आल्या. दगडाच्या मार्याने घाबरलेल्या स्त्रिया व लहान मुलं लपून बसले. बुद्ध वस्तीतील १० जखमी तरुणांना नाशिक सिव्हील येथे नेण्यात आले, त्यातील एका तरुणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याला न्युरोसर्जरीसाठी केईएम येथे नेण्यात आले. या घटनेत अनेक घरातील वस्तू दरवाजे दरवाजांच्या चौकटी कवले सिमेंटचे पत्रे दुचाक्या इ.ची प्रचंड हानी झाली. बाबासाहेबांच्या फोटोंची विटंबना केली गेली.






नाशिक जिल्ह्यात शेवगेडांग (ता. इगतपुरी) ह्या खेडे गावात जातीयवादातून बौद्ध वस्तीवर हल्ला करून तेथील तरुणांना सळ्यांनी आणि गजीने चोप दिला. तेथील आपल्या आया-बहिणी सध्या भयभीत अवस्थेत आहेत. हा हल्ला इतका भयंकर होता कि जातीयवाद्यांनी लहान मुले, स्त्रिया, वायोवृद्धांना देखील सोडले नाही. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात शेवगेडांग गावी गावातीलच काही जातीयवादी गुंडांनी बौद्ध वस्तीवर शसस्त्र हल्ला केला. या हल्यामध्ये दहा बांधव गंभीर रित्या जखमी आहेत. नीच गावगुंडानी केलेला हल्ला अतिशय भयानक होता, दगड, विटा,कोयते, तलवारी,लाठ्याकाठ्या,­लोखंडी गज आदि प्राणघातक शस्त्रांचा वापर करण्यात आला होता. 





गावगुंडांनी बौद्धवस्तीत आपल्या घरासमोर असलेल्या दुचाकी, टीव्ही, संसारपयोगी साहित्य तसेच तथागत बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची ही मोडतोड केलेली आहे. 






या गावातील भयग्रस्त बौद्ध बांधवांची तसेच महिलांची समक्ष भेट घेतली असता गावातील सर्वच कुटुंबीय भयग्रस्त अवस्थेत आढळून आले व त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे दडपणदेखील जाणवत होते. जातीयवादी गावगुंडांवर शासनाने कठोर कारवाई करावी, तसेच बौद्ध बांधवांच्या मालमत्तेची नुकसानीची शासनाने त्वरित भरपाई द्यावी अशी अशा आहे. अटक असलेल्या १८ जातीयवाद्यावर अट्रोसिटी कलम लावले आहेत, परंतु त्याची कठोर अंमंलबजावणी व्हावी. आमचा भारतीय संविधानावर प्रामाणिकपाने खूप विश्वास आहे. आम्हाला न्याय मिळेल यात शंकाच नाही.

 


या गावात अनेक वर्षांपासून असे जातीवादाचे चटके बौद्ध बांधव सहन करत आहे. इथल्या बौद्धांची प्रगती, त्यांची आर्थिक परिस्थिती इथल्या सवर्णांना बघितल्या जात नाही हे या हल्ल्यावरून व टार्गेट करण्यात आलेल्या घरांवरून मला प्रखरतेने जाणवले. तीन वर्षांपूर्वी या गावातील जातीयवाद्यांनी निळ्या झेंड्याची विटंबना केली होती. तेव्हापासून येथील जातीयवादी मानसिकता अजूनच वाढीस लागली होती. या घटनेचे गांभीर्य वाचकांना आता जरी जाणवत नसले तरी त्या ठिकाणी गेल्यावर तेथील परिस्थिती पाहून, विशेष करून भारतीय घटनाकाराच्या व विश्वाला शांती देणाऱ्या युगप्रवर्तकाच्या प्रतिमांची केलेली मोडतोड पाहून तळपायाची आग मस्तकाला जाते.


 



एकूण १९  जणांवर खटले भरले असून १७ जणांना अटक झालेय २ जण फरार झालेत. अॅट्रोसिटी कलम लावले गेलेय मात्र हल्लेखोरांनीच उलट चाप्टर केस टाकलेय. अतिशय कठिण परिस्थितीए. ग्रामस्थ संतप्त आणि भयभीत आहेत. गावातील तरणी मुलं पहारे देतायत. दोन तीन पोलीस दिमतीला दिलेयत. या घटनेचे पडसाद अतिशय थंडपणे उमटतायत. दिनांक ६ नोव्हेंबरला संपूर्ण गावातून तालुका कचेरीपर्यंत निषेध रॅली काढली जाणार आहे.

 



आपल्या भारतीय बांधवाना  धीर देण्यासाठी तसेच आपली एकी दर्शवण्यासाठी आपल्याला त्याच गावात महामोर्चा काढायचा आहे. पक्ष, गट आणि तट विसरून आपल्या समाजासाठी प्रत्येक तरुणांनी एकत्र यावे हीच अपेक्षा. कारण जी गुलामाची बेडी आपण घातली आहे तिला आता तोडण्याची वेळ आली आहे. बांधवांनो आता तरी संघटीत व्हा. दिनांक ६ नोव्हेंबरला संपूर्ण गावातून निषेध रॅली काढली जाणार आहे. विनंती करून प्रत्येकाने आपले राजकीय गट-तट बाजूला ठेऊन समाजासाठी या रॅलीत जास्तीत जास्त सहभागी व्हावे. आणि प्रत्येकाने आपापल्या परिने जातीयतेच्या वर्चस्ववादा विरोधात बंड पुकारावे.. शक्य असेल त्या प्रत्येकाने आपले राजकीय हेवेदावे बाजूला ठेऊन समाजासाठी या रॅलीत जास्तीत जास्त सहभागी व्हावे. आणि प्रत्येकाने आपापल्या परिने जातीयतेच्या वर्चस्ववादाविरोधात ग्राऊंड लेव्हलवर समाजाचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न करावा. सर्व परिवर्तनवादी भारतीयांनी या निषेध मोर्चात दाखील व्हावे. जो जातीयवाद करेल तो माणुसकीचा दुश्मन आहे या आपल्या देशाचा दुश्मन आहे.

 




एक गोष्ट सर्व जातीयवादी मंडळीनी लक्षात घ्यावी तुम्ही जरी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करत असलां तरी त्यांनी अथवा त्यांच्या अनुयायांनी तुमचां द्वेष केलां नाही. बाबासाहेबांनी नेहमी देशाला प्रथम आणी अंती: स्थान दिले आहे. त्यांनी जगातले सर्वोच्च घटना(संविधान) लिहूण आपल्या मातांना समानतेचे स्थान दिले. आपल्या सर्वाना मतस्वातंत्र्याचा अधिकार दिला. त्यांनी कधी कुणाचा द्वेष केला नाही. तथागत बुद्धांनी कधी कुणाला जात बघून जवड केले नाही. महापुरुष फक्त माणुस बघतात. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या माता राजमाता आई जिजाऊ यांनी कधी जातीभेद केलां नाही. त्यांचीच प्रेरणा घेवून राजश्री शाहू महाराजांनी डॉ.आंबेडकरांना शिक्षणासाठी सहकार्य केले. या सर्वानी बंधुभाव जपला यांनी माणुसकी जपली या आपल्या मातृभूमीला सर्वोच्च स्थान दिले आणि स्वतःला शिवरायाचे वारस म्हणवणांरे आपण खरचं त्यांचे अनुयायी शोभतो का?? फक्त जय शिवराय म्हटलं म्हणजे संपले का?? आपण शिवराय आई जिजाऊ... राजश्री शाहू महाराज यांचे विचार मनात कधी घालणारं... त्यांच्या विचारांवर कधी जगणार... माझ्या भावनो एकदां विचार करा अरे आता भारतीय म्हणून आपल्या भारतीय राष्ट्र्ध्वजाखाली एक व्हा दाखवून दया भारतावर वाकडी नजर टाकणाऱ्या आपल्या दुश्मनांना होय आम्ही भारतीय आहोत फक्त भारतीय !!




लेखं संकलन- निलेश रजनी भास्कर कळसकर(सोबत प्रबोधन टीम)




संदर्भ- दै सम्राट.


धन्यवाद- अतुल खरात, डॉ आशिष तांबे, निलेश ठेगे आणी F.A.M

9 comments:

  1. कायदेशीर मदत घेऊन अशा प्रकारच्या आरोपींना कमीत कमी दहा वर्षाची शिक्षा केली जावी

    ReplyDelete
  2. कायदेशीर मदत घेऊन अशा प्रकारच्या आरोपींना कमीत कमी दहा वर्षाची शिक्षा केली जावी

    ReplyDelete
  3. अशा दुष्ट वृत्ति च्या लोकांना त्यांच्या जीवनभर पुरेल अशी अद्दल घडविण्याची वेळ आली आहे

    ReplyDelete
  4. भ्याड हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करण्यात आले पण त्यांच्यावर कोणते कलम लावण्यात आले ते तपासले पाहीजे आवश्यकता भासल्यास कायदेतज्ञांची कलम बदलली पाहीजे तसेच हल्ल्यात जखमींना वआर्थिक नुकसान झालेल्रांना शासनाने तात्काळ मदत द्यावी दंगेखोरांकरुन झालेल्या नुकसानीच भरपाइ नवीन कायदेशीर तरतुदीनुसार वसुल करावी

    ReplyDelete
  5. He lol shivaji maharajani dileli shikawnuk visarlet watate asha lokana kathor shashan whayala pahije ashi ghatna parat hou naye yasathi atidakshata policani ghyayala pahije.no ya ghatnecha kadak shabdat nishedh kerto asla maaj khapwoon ghetla janar NAHI .jai shivrai jai bhim

    ReplyDelete
  6. He lol shivaji maharajani dileli shikawnuk visarlet watate asha lokana kathor shashan whayala pahije ashi ghatna parat hou naye yasathi atidakshata policani ghyayala pahije.no ya ghatnecha kadak shabdat nishedh kerto asla maaj khapwoon ghetla janar NAHI .jai shivrai jai bhim

    ReplyDelete
  7. Strongly condemned. Government should take right action against culprit.

    ReplyDelete
  8. Shame on those peoples who did this such act. They should be punished. Maharashtra government should take right action against culprit. Jay Bheem, Namo Buddhay...

    ReplyDelete

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...