चला 'मनुस्मृती दहन दिन' साजरा करू या !!
२५ डिसेंबर १८७३ साली राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी ब्राम्हन भटजीला नं बोलावता सीताराम जबाजी आल्हाड, मंजुबाई धानोबा निम्ह्नणकर यांचा आजच्याचं दिवशी राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी पहिले सत्यशोधक लग्न पुण्यामध्ये लावले होते आणि 'मनुस्मृती' नाकारली होती... व आजच्याच दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडच्या पायथ्याशी महाड मध्ये 'मनुस्मृती' दहन केली होती...
तरी पण आज हि आपल्या सर्वांच्या आयुष्यात 'मनुस्मृतीचा अंमल' संपलेला नाही. त्याची सुरवात आपल्या सर्वांच्या जीवनात आपल्या नकळत 'जन्मकुंडली' या विषयापासून होतो... माणसाची 'जन्मकुंडली' आज हि आपल्या जीवनात 'मनुस्मृतीचा अंमल' असल्याचा पुरावा आहे... मी बरेच दिवस 'मनुस्मृती दहन दिन' कसा साजरा करावा या विचारात होतो... मला वाटते हा दिवस आपण सर्वांनी आप-आपल्या गावात/शहरात छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता जोतीराव फुले किंवा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पैकी ज्यांचा पुतळा उपलब्ध असेल तेथे सामुहिक 'जन्मकुंडली दहन' कार्यक्रम आयोजित करावा.... आणि आजची मनुस्मृती असणार्या जन्मकुंडली पासून आपली नाळ तोडावी... व प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष आपल्या जीवनावर असणारा 'मनुस्मृतीचा अंमल' झुगारून द्यावा... व आपल्या महापुरुषांनी दाखवलेल्या वाटेची 'वहिवाट' करावी !!
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!