दाभोळकरांची हत्या करणारा केवळ हाथच नव्हे तर त्यामागील मेंदू सुद्धा गजा आड होईल अशी अपेक्षा बाळगूया !!

दाभोळकरांची हत्या करणारा केवळ हाथच नव्हे तर त्यामागील मेंदू सुद्धा गजा आड होईल अशी अपेक्षा बाळगूया !!




मानवी  मेदूत १० बिंदू असे असतात कि जे माणसाचा विचार स्वभाव, भाव, भावना नियंत्रित करत असतात. त्या बिंदू पैकी जे बिंदू जास्त उद्दीपित होतात त्या बिंदूशी निगडीत भावना त्या माणसाच्या मनामध्ये प्रबळ होते. उदा . राग, लोभ, प्रेम, संशय, आस्था, श्रद्धा इ... जवळ जवळ प्रत्येक माणूस हा कमी अधिक प्रमाणत संमोहित होऊ शकतो (अशाप्रकाराचे संमोहन संमोहन तज्ञ, वक्ते, धार्मिक बाबा गुरु उपदेशक ... इ. करू शकतात)  त्यापैकी ३५ % लोक हे डि-ट्रान्स अवस्थेत जाऊ शकतात. ह्या अवस्थेमध्ये जो संमोहित झालेला असतो तो संमोहन कर्त्यानेच दिलेल्या सूचनांचे पालन करत असतो. त्या अवस्थेत संमोहित झालेल्या माणसाला जे काही सांगितले जाते त्याची अनुभूती त्या व्यक्तीला येत असते. त्याला ते सर्व सत्य वाटू लागते. तेच सत्य आहे असे ते मानतात अशा अवस्थेत त्यांना सांगितले कि तुम्ही स्वर्गात आहात तुम्हाला साक्षात इंद्रदेव दिसत आहे तर खरच त्या संमोहित माणसाला इंद्र देव दिसू लागतो. त्या संमोहित व्यक्तीला पुढे जाऊन सांगितले कि तू स्वर्गातल्या अप्सारांबरोबर प्रणय करत आहेस तरी त्याला ते खरे वाटू लागते इतके कि त्याचे बसल्या जागेवर वीर्यपतन होते. अशा संमोहित होणार्या व्यक्तीला वारंवार काही सूचना (suggetions) देऊन त्याच्या कडून एखादे कार्य घडवून आणता येऊ शकते. अशा व्यक्ती त्या कार्यासाठी आत्म बलिदान सुद्धा देऊ शकतात . संमोहन शास्त्रातील ह्या अभ्यासाचा फायदा घेऊन त्याचा विकृतीसाठी केलेल्या वापराचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे अतिरेकी (धार्मिक दहशतवादी). अतिरेकी सुद्धा अशाच पद्धतीने तयार केले जातात . वारंवार त्यांना धार्मिक कार्यासाठी प्रेरित करून त्यांचा ब्रेन वॉश केला जातो व त्यांना बलिदानासाठी तयार केले जाते .




ह्यातील पुढचा टप्पा म्हणजे अशा प्रकारे तयार केलेल्या व्यक्तीला एक प्रोग्राम दिला जातो त्या प्रोग्राम ची तयारी करून घेतली जाते . व त्याच्या कडून ते कार्य करून घेतले जाते .



आता तर संमोहन शास्त्राचा ह्याच्यापुढे जाऊन वापर केला जातो. अशा प्रकारे संमोहन करून वैचारिक दृष्ट्या अंध केलेल्या व्यक्तीला तो कार्यक्रम देऊन पुन्हा त्याला सूचना दिल्या जातात कि हा कार्यक्रम तू पार पाडलास कि तुझ्या मेंदूतून ( स्मरण शक्तीतून ) तू पार पडलेला कार्यक्रम , कृती पूर्णपणे डिलीट होऊन जाईल म्हणजे तू जे काही केलेस त्यापैकी एकही गोष्ट तुला आठवणार नाही . तुला ह्या विषयी कोणी सूचना व मार्गदर्शन केले ते सुद्धा तुला काही आठवणार नाही . आणि खरोखर त्या अंध व्यक्तीच्या स्मरण शक्तीतून त्याने तो प्रोग्राम पूर्ण केल्या नंतर त्याला सूचना देणाऱ्या व्यक्तीने सांगितलेल्या एका विशिष्ट वेळे नंतर किंवा एका विशिष्ट ठिकाणी आल्यानंतर तो प्रोग्राम पूर्णपणे डिलीट होऊन जातो . त्याला काहीच आठवत नाही . त्याला नुकतेच झोपेतून उठल्या सारखे वाटते.




तुम्हाला हे पटत नसले तरी संमोहन शास्त्रात हे शक्य आहे व याचा वापर अतिरेकी संघटना, गुप्तचर संघटना, सैन्य खाते, कमांडो प्रशिक्षणात केला जातो. आणि अशा प्रकारे सैन्यात प्रशिक्षण देणारा एक अधिकारी "कर्नल पुरोहित" होता.



प्रज्ञा सिंग च्या बाबतीत पण असाच संमोहन शास्त्राचा वापर करण्यात आला होता . त्यामुळे सर्व पुरावे तिच्या विरुध्द दाखवत असताना सुद्धा तिच्या केलेल्या दोन्ही नारको टेस्ट मध्ये करकरेंना काही सापडले नव्हते . अर्थात करकरेंना या संदर्भात बरेचशे ज्ञान माहित असल्यामुळे ते ठाम राहिले . पण सरकार व गृह खात्याला ह्याची काही माहिती नसल्यामुळे त्यांना हा सुरुवातीला हा विनोदच वाटला पण मानव सरांच्या प्रयत्नांमुळे ह्या विषयातील गांभीर्य शरद पवारांना कळले व त्यामुळे गृह खात्याने करकरेंना पाठबळ दिले. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते कि सनातन चा आठवले सुद्धा संमोहन शास्त्रात पारंगत आहे. त्याने तर इंग्लंड मध्ये याविषयाशी संबधित ९ वर्ष नोकरी सुद्धा केलेली आहे.



 

आता दाभोळकरांच्या हत्ये संदर्भातसुद्धा अशाच प्रकारे संमोहन शास्त्राचा वापर करण्यात आलेला असावा अशी एक शक्यता आहे . त्यामुळे हजारो लोकांची चौकशी करून सुद्धा पोलिसांच्या हाती काही फारसे लागलेले नाही. दुसरी एक शक्यता असू शकते कि खून करणार्यांचा चेहरा अगोदरच किंवा दाभोलकरांची हत्येनंतर बदलण्यात आलेला असावा . त्यामुळे रेखाचित्रांचा काही उपयोग होत नसावा. तूर्तास पोलिसांवर रोष प्रकट करणे जर घाईचे होईल. निश्चितच पोलिसांवर दबाव असला पाहिजे पण ते करत असलेल्या प्रयत्नांचा सुद्धा विचार केला पाहिजे. आपण सर्वांनी सकारात्मक मानसिकतेने लवकरात लवकर दाभोळकरांची हत्या करणारा केवळ हाथच नव्हे तर त्यामागील मेंदू सुद्धा गजा आड होईल अशी अपेक्षा बाळगूया व दाभोळकर व मानव सरांनी चालू केलेले काम पुढे चालू ठेवलं पाहिजे .




लेखं- Rahul AJ

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...