स्त्री-पुरुष समानता - सत्य की स्वप्न ?

भारतीय संविधानाने स्त्री-पुरुष समतेचे तत्त्व मान्य केले, तरी सामाजिक कौटुंबिक व आर्थिक जीवनात स्त्रीयपुरुष विषमता कायमच राहीली. संविधानाच्या कलमानुसार धर्म, जात वंश – लिंग या कारणास्तवव भेदभाव करण्यातस मनाई केली. पण एकूण सामाजिक परिस्थिती लक्षात घेता स्त्रियांकरिता विशेष तरतूद करणारे कायदे अगर योजना आखण्यायची राज्यांणना संमती देण्यावत आली. ही योजना स्त्री पुरुष समतेसाठी आवश्यवक होती. तरीही पुरुषप्रधानतेपोटी आलेली स्त्रींपुरुष विषमता संगळयांनाच समजून घेता येत नाही. स्त्री पुरुष समतेबाबत विचार करत असताना स्त्री-ला प्रत्यमक्षात समता उपभोगता येईल व तिच्याह अधिकारांसाठी समाजजीवनात व्यावस्थाण होऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण करणे आवश्यमक होते. संविधान १९५० साली जन्मााला आले. त्या‍नंतरही बरेच कायदे झाले. तरी स्त्रीणयांची परिस्थिती फारशी बदलली नाही.
पूर्वी स्त्रीन फक्ती मुलगी पत्नीा, माता होती. आता तिला मतदानाचा अधिकार मिळाला आहे. स्त्रीी आता पंतप्रधान, मुख्यीमंत्री, सरपंच, सरन्यातयाधीश, डॉक्टीर, पायलट, वकील, इंजिनिअर होऊ शकते. परंतु अजूनही मुलीचा जन्मह झाला तर आईवडिलांना वाईट वाटते. एवढेच नव्हेि तर गर्भलिंगपरीक्षा करुन घेऊन स्त्रीलचा जन्महच होऊ नये म्हाणून गर्भपात करण्याईत येतो. मात्र पुत्रजन्म हा स्वा्गतार्ह वाटतो. संविधानाने मान्यन केलेली स्त्रीेपुरुष समानता भारतीय लोकांनी मनाने स्वीयकारलेली नाही. दुर्दैव असे आहे की स्त्री्याही याला अपवाद नाहीत. आपापल्या‍ला घरातील आपण मुलगे आणि मुली यांना कसे वाढवितो हे या संदर्भात आपण स्वततः तपासून बघायला हवे. मुलाला एक स्वीतंत्र, जबाबदार, कर्तृत्विवान व्यतक्तीं होण्यारसाठी जपले जाते. मुलीला मात्र ती कितीही गुणवान असली तरी तिचे लग्नव करुन द्यावयाचे या दृष्टीयने वाढवतात. तिला अनुगामी, प्रेमळ, सोशिक, मर्यादशील, स्वा.र्थत्यारगी व कुणाची तरी होणारी पत्नीत म्ह्णूनच वाढवली जाते. लहानपणापासून मुलगा व मुलीच्याल कामाच्याथ आणि कार्यक्षेत्राच्यार ठरीव वाटण्याभ करण्या्त आल्या् आहेत. पुरुष श्रेष्ठह आणि स्त्रीा कनिष्ठी ही भावना शेकडो वर्षाची परंपरा असल्या्मुळे, आपल्याी रक्ताात भिनली आहे. नोकरी पुरुषाने करायची, त्या‍चे शिक्षण महत्त्वाचे, नोकरीतल्याग पैश्या्मुळे पुरुषाचा अधिकार महत्त्वाचा. पण आपण कधीतरी विचार करतो का की बाईने घरदार, मुले ही जबाबदारी संभाळली नाही तर, पुरुष नोकरी करुन पैसा कमवील का? बाईच्याो कष्टााचे, कामाचे मोलच करीत नाही. म्हेणून स्त्रीीया घरची संपूर्ण जबाबदारी सांभाळूनही 'मी गृहीणी आहे, काहीच करत नाही, घरीच असते' असे ओशाळवाण्याा भावनेने सांगत असतात. खरं पाहिलं तर लग्न' पुरुष व स्त्रील दोघं करतात. तरीपण वरपक्ष मोठा व वधुपक्ष कमी लेखला जातो. मुलगी तरी घ्या यची, हुंडाही पुरुषांनी घ्याषयचा तरीही स्त्रीाने पुरुषाच्यान घरी जाऊन सासरचे नाव, गाव रीतीरिवाज आत्मतसात करायचे. स्त्रीीने आई म्हपणून बाळाचा भार नऊ महिने वाहायचा, प्रसववेदना सहन करायच्या , मुलाचे संगोपन करायचे पण मुलाचे कायदेशीर पालकत्वप वडिलांकडे, यातला अन्यावय, विषमता स्त्रीतयांना जाणवत असली तरी पुरुषांना त्यामची कदर नाही. अजुनही पुरुष स्त्रीकला मालमत्ता व उपभोगाची वस्तूा समजतो. स्त्री्पुरुषांच्याय दर्जाचे निकषही असेच पक्षपाती आहेत. पुरुषाचे स्थारन त्यामच्याऊ कर्तृत्वासने ठरते. स्त्रीतचे स्था‍न तिच्याल वैवाहिक दर्जावरुन ठरवले जाते.
जुन्याक जमान्यामपेक्षा काही बाबतीत स्त्रीवयांची परिस्थिती बदलते आणि सुधारते आहे हे खरे आहे. स्त्रीकपुरुषांमध्येस काही प्रमाणात पृष्ठ्भागावरची, बाह्य स्वषरुपातली समता किंवा बरोबरी आपल्याे डोळयांना दिसते. तरीही समाज, कायदा, व्यतक्ती्, धर्म सारे आपल्याु परीने स्त्रींच्यार दुय्यमतेचे समर्थन करताना दिसतात. स्त्रीरयांची निरक्षरता खूप मोठी आहे. स्त्रीरयांना नोकऱ्यात कमी स्था न दिले जाते. निर्णयप्रक्रियेत उच्चसधिकाराच्याा जागी स्त्रीतया नाहीत. राजकारणात स्त्रीपया बोटावर मोजण्या्सारख्या् आहेत. धर्मव्ययवस्थेपत स्त्रीरयांना पुरुषांच्यात बरोबरीने संधी दिली जात नाही. स्त्रीर पुरुषांसाठी नीती अनीतीची वेगळी फूटपट्टी आहे. प्रगतिशील असलेल्या‍ महाराष्ट्रा राज्याकचा हुंडाबळीत नंबर दुसरा लागतो. याच्या्ही मागे स्त्रीटच्या‍ जीवनाला जे गौणत्व् प्राप्तज झाले आहे तेच कारण प्रमुख आहे. देवदासी व वेश्यांतशी संबंधित कायदे हे आजवर दुर्देवाने कागदावरच राहिले आहेत. परित्यकक्तांजचा प्रश्नबही भेडसावत आहे व त्यायबद्दल सरकार काहीच करु इच्छित नाही. अश्‍लील साहित्यड व जाहिरातीतही स्त्रींकडे फक्तद उपभोगाची वस्तूा म्हदणून बघितले जाते. चित्रपटात स्त्रीरला दासी म्हडणूनच दाखवतात. जणू काय मनुस्मृततीत लिहून ठेवलेली मूल्येहच आजही पुढे नेण्यातचा विचार करीत आहेत. मॉडेलिंग व जाहिरातीतही स्त्रींच्या शरीराचा उपयोग अशोभनीय रीतीने केला जातो. आजही बालविवाह सर्रास होतात. कुटूंबामध्ये. स्त्रीययांवर अत्याचचार होत आहेत. स्त्रीेया नोकरी करीत आहेत. तरीही नवऱ्याला विचारल्याबशिवाय आपल्याा कमाईतून स्वरतःकरता काही करु शकत नाहीत. त्यातमुळे स्त्रीीयांचे आर्थिक स्वा़तंत्र्य अस्तित्‍वात येत नाही. सामाजिक अत्याीचाराबाबत सांगायचे तर स्त्रीेच्या. रक्षणासाठी जे रक्षक नेमले आहेत तेच बऱ्याचदा भक्षक झालेले दिसतात. महिला पोलीस पत्नीपवरही घरी आल्याीवर तिचा नवरा तेवढेच अत्याकचार करतो जेवढे सामान्यम स्त्रीसवर होतात. जातीय दंगलीत विरुद्ध जातीच्‍या स्त्रीणवर बलात्काेर केला जातो. स्त्रीमचा असा उपयोग धर्माच्या नावावर किंवा सामाजिक प्रतिष्ठेंच्यात नावावर होत राहिला तर सामाजिक अत्यााचाराचे प्रश्नच वाढतच जाणार. आजही बरेच न्याकयाधीश, कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी पुराणमतवादी आहेत. त्यांाचा स्त्री्विषयक प्रश्नां कडे बघण्यांचा दृष्टीमकोन उदार किंवा आदराचा नसतो.
सामाजिक सुधारणांचा इतिहास पाहिला तर लक्षात येते की संपूर्ण स्त्रीरपुरुष समतेच्या आणि स्त्रीरच्यान स्वाजतंत्र्याच्यात ध्ये यापासून आजही आपण खूप दूर आहोत. जे मिळाले आहे ते खूपच थोडे आहे. आजही कुणी धर्माच्या नावाखाली तर कुणी परंपरेच्याा नावाखाली स्त्रीेचे दुय्यमत्वि दाखवण्या चे काम करतातच. भारतीय विवाह कायदे हे धर्मावर आधारित आहेत. त्याटमुळे खूप तफाव आहे. समान नागरी कायद्याच्याय प्रश्ना्कडे हिंदू विरुद्ध मुसलमान किंबहुना अल्पआसंख्यां क यांच्याल द्वंद्वात्मतक भूमिकेतून पाहिले जाते. त्यायमुळे व्यडक्तिगत कायद्यात दुरुस्या ये करणे कठीण झाले आहे.
कायद्यानेच समाजपरिवर्तन होते असे नाही. परिवर्तनाला पूरक असे अनेक घटक असतात. शिक्षण, नैतिक संस्काार, प्रबोधन, आर्थिक व्यीवहार आणि अर्थव्यीवस्थाो, राजकीय प्रक्रिया यांसारख्याम अनेक घटकांच्याग संयुक्तख कार्यकारणाचा समाजपरिवर्तन हा परिणाम असतो. याला कायद्याची जोड लागते. लोकशाही असणेही जरुरी आहे. भारतात स्त्रीन- पुरुष समानता सध्याजतरी स्वाप्नेच वाटते.

-अॅ ड. शीला हिरेकर (सुगावा‌- १९९८ मध्ये प्रथम प्रकाशित)

रजनीकांतचे दत्तक वडील

स्वत:ला बालपणात वडिलांचे छत्र मिळाले नाही; पण हजारो मुलांच्या डोक्यावर वडिलांचे छत्र धरण्याचे शिवधनुष्य पेलणार्‍या माणसाचे नाव कल्याणसुंदरम्. सामाजिक कार्यकर्ते कल्याणसुंदरम् आयुष्यभर ब्रह्मचारी राहिले आहेत. या ब्रह्मचारी राहण्यामागे कारण होते, की त्यांना आपली सगळी संपत्ती गरीब लोकांसाठी खर्च करायची होती.

शरीराने अगदी किरकोळ, पण चेहर्‍यावरून कायम आनंदी दिसणारे कल्याणसुंदरम् वयाने वृद्ध झाले आहेत. त्यांना स्वत:चे कुटुंब नाही; परंतु त्यांनी हजारो मुलांना आश्रय दिला आहे. त्यांना बोलायला खूप आवडते; परंतु त्यांचा आवाज ऐकताक्षणी असे वाटेल, जणू तुम्ही एखाद्या खूप लहान मुलासोबतच बोलत आहात. त्यांचा आवाज कणखर किंवा भारदस्त अजिबातच नाही. उलट, एखादा लहान मुलगा खूप ओरडून बोलण्याचा प्रयत्न करतो आहे, असेच काहीसे वाटून जाते. इतक्या साधारण व्यक्तीने लक्षावधी रुपये दान करून अनेक मुलांची आयुष्ये साकारली आहेत, ही गोष्ट मात्र थक्क करणारी आहे. त्यांना अनेक मानचिन्हे व बक्षिसे मिळाली. प्रत्येक बक्षिसाची रक्कम त्यांनी लहान मुलांसाठी देऊन टाकली.

तमिळनाडूच्या एका लहानशा खेड्यात जन्मलेल्या कल्याणसुंदरम् यांना अल्प वयातच वडील गमावण्याचे दु:ख पचवावे लागले. आईनेच त्यांचा सांभाळ केला आणि गरिबांसाठी काम करण्याचे संस्कार मनात रुजवले. आज ते सुमारे ७५ वर्षांचे झालेले आहेत. त्यांनी सर्व पगार गरजू मुलांसाठीच आयुष्यभर खर्च करण्याचा संकल्प केला व तो आयुष्यभर जपला.

काही लोक जीवनासाठी अनेक संकल्प करीत असतात. या महामानवाने मात्र जीवनालाच संकल्प बनवले. कल्याणसुंदरम् म्हणतात, ‘‘पैसे मिळविण्याचे तीन मार्ग आहेत. पहिला पैसे स्वत: कमावणे, दुसरा वारसा हक्काने पैसे मिळणे व तिसरा लोकांकडून दानरूपात मिळविणे; पण पैसे मला आकर्षितच करीत नाहीत. मला आनंद मिळतो तो स्वत: कमावलेला पैसा गरजूंसाठी खर्च करण्यातच.’’

कल्याणसुंदरम् यांचा जन्म ज्या खेड्यात झाला, ते अस्सल भारतातलं अठराविश्‍वं दारिद्रय़ानं पुजलेलं खेडं होतं. रस्ते, शाळा तर सोडाच; पण आगपेटी विकत घ्यायला दुकानसुद्धा नव्हतं. शाळा तर दहा मैल लांब. त्यांच्या लहानग्या पावलांना तर ती लांबच लांब वाटे. त्यातून त्यांना एकटे जावे लागे. आपला एकटेपणा दूर व्हावा म्हणून त्यांनी गावातल्या इतर मुलांना शाळेत येण्यास प्रोत्साहित केले. मुलांची फी भरणे, त्यांना पुस्तकं व गणवेश पुरवणे, असे मार्ग त्यांनी शोधून काढले. त्यांची युक्ती काम करू लागली. त्यांना सवंगडी मिळू लागले आणि मुलांना शिक्षण. त्यांची समाजसेवा अशीच नकळत सुरू झाली आणि मुलांसोबत गंमत करताना शाळेची वाटही सुखकर झाली.

याच वाटेने चालताना त्यांनी शिक्षणाची साथ सोडली नाही. ग्रंथालयशास्त्रातही सुवर्णपदक मिळविले व तमिळ साहित्य आणि इतिहासातसुद्धा एम.ए. केले. त्यांची पदवी मिळविण्याची जिद्दसुद्धा आगळीवेगळीच म्हणावी लागेल. त्यांना तमीळ भाषेत एम.ए. करायचे होते. त्यांनी कॉलेज गाठले. तिथल्या संस्थापकांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, की कल्याणसुंदरम् यांनी इतर विषय निवडावेत; पण कल्याणसुंदरम् तमीळचाच आग्रह घेऊन बसले. अखेर एम.टी.टी. कॉलेजच्या संस्थापकांनी त्यांना प्रवेशही दिला आणि कल्याणसुंदरम् यांच्या पुढील शिक्षणाची सोयही लावून दिली.

आयुष्याच्या एका वळणावर ते आपल्या बालीश आवाजाला पार कंटाळून गेले होते. त्या न्यूनगंडातून आत्मघात करण्याच्या विचारात असताना त्यांची भेट झाली थामीझवानन या ‘व्यक्तिमत्त्व घडवा’ अशा आशयाचे पुस्तक लिहिणार्‍या लेखकाशी. या लेखकाने कल्याणसुंदरम् यांना मंत्र दिला, ‘‘तू कसा बोलतो, हे महत्त्वाचे नाही. लोक तुझ्याबद्दल कसे बोलतात, हे महत्त्वाचे.’’ या शिकवणीने गुरुमंत्राचे काम केले आणि कल्याणसुंदरम्नामक चालते-बोलते मंदिर उभे झाले.

अर्थदानाबद्दल कल्याणसुंदरम् सांगतात, की भारत-चीन युद्धाच्या वेळी पं. नेहरूंच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून त्यांनी आपली सोन्याची साखळी मुख्यमंत्री कामराज यांना दिली होती. त्या वेळी ते प्रथम वर्षामध्ये शिकत होते.

ग्रंथपाल म्हणून सेवा करताना कमावलेले सर्व पैसे ते गरजू मुलांसाठी खर्च करीत असत. स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी ते फावल्या वेळेत हॉटेलमध्ये वेटरची नोकरी करून दोन वेळचे जेवत. सेवानवृत्तीनंतर मिळालेली सर्व रक्कमही (सुमारे दहा लक्ष रुपये) त्यांनी गरजू मुलांसाठी देणगी म्हणून देऊन टाकली. संसार थाटला तर समाजसेवेला मुकावे लागणार, या कल्पनेने त्यांनी लहान संसाराऐवजी खूप मोठय़ा संसाराला पसंती दिली. गरिबीची खरी कल्पना यावी म्हणून कल्याणसुंदरम् रेल्वे प्लॅटफॉर्मवर झोपायचे.

मेलकारीवेलामकुलम इथे जन्म झालेल्या माणसाची ही अफलातून कथा. प्रत्येक मावळणारा दिवस त्यांच्या गरजूंसाठी काम करण्याच्या निर्धाराला बळ देत गेला. काही खादीचे शर्ट आणि धोतर जवळ बाळगणारा हा ‘गांधीवादी’ तिरुनलवेलीच्या मेडिकल कॉलेजला देहदानाचा संकल्प करून मोकळा झालेला आहे. हा नश्‍वर देह मृत्यूनंतरही विद्यार्थ्याच्या कामी यावा, असं त्यांना मनापासून वाटतं. त्याच्या सडपातळ देहात निर्धाराची माती कुठं लपली आहे, हे मात्र त्याच्यानंतरही सापडणं अवघडच आहे. त्यांची पायातली प्लॅस्टिकची चप्पल तर इतकी स्वस्त असते, की तिला चिखलसुद्धा चिकटत नाही. नवृत्तीनंतर मिळालेली सर्व रक्कम एका क्षणात दान करून ते मोकळे झाले.

स्वत: दु:ख भोगणार्‍या व्यक्तीला इतरांचे दु:ख कळते; पण कल्याणसुंदरम् यांचे बालपण अशा अभावांनी र्जजर नव्हते मुळी. ते एका श्रीमंत शेतकरी कुटुंबात जन्माला आले. त्यांना मिळणार्‍या खाऊच्या पैशातूनसुद्धा ते इतर मित्रांची मदत करू शकत; पण कनवाळूपणा कुठून आला कुणास ठाऊक? सेंट झेवियर कॉलेजमधील या पदवीधराने झोपडपट्टीतल्या मुलांच्या संगोपनाची कास धरली. आपल्याला समाजसेवेसाठी पुरेशी रक्कम मिळावी, या अपेक्षेने तमिळमध्ये प्रसिद्ध होणार्‍या ‘आनंद विकटन’ या मासिकाच्या संपादकांची भेट घेतली. आपल्या संस्थेला दान मिळण्याच्या उद्देशाने मासिकात लिहावे, हा त्यांचा हेतू होता. मासिकाचे संपादक एस. बालसुब्रह्मण्यम् यांना वाटले, की ते एखाद्या प्रसिद्धीला हपापलेल्या तरुणाशी बोलत आहेत. त्यांनी कल्याणसुंदरम् यांना ‘पहिली पाच वर्षे समाजसेवा करा, मग पाहू!’ असे सांगून बोळवण केली. त्यांच्या बोलण्याचा राग न मानता त्याची चांगली बाजू पाहून कल्याणसुंदरम् तेथून बाहेर पडले.

१९९२मध्ये तमिळनाडूत भयंकर पूर आला. या पुरात अनाथ झालेल्या १0,000 मुलांना कल्याणसुंदरम् यांनी दत्तक घेतले व सर्वार्थाने त्यांचा सांभाळ केला. त्यांच्या या सेवेने थोर शास्त्रीय गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी इतक्या प्रभावित झाल्या, की त्यांनी आपल्या घरी बोलावून कल्याणसुंदरम् यांचा सत्कार केला. पुढे सुब्बलक्ष्मींना एस. बालसुब्रह्यण्यम् यांच्या घरी एका लग्न समारंभात गाण्यासाठी आमंत्रित केले होते. कार्यक्रमासाठी त्यांना बालसुब्रह्मण्यम् यांनी पैसे देऊ केले असता, या गायिकेने त्यांना मिळणारे मानधन कल्याणसुंदरम् यांना द्यावे, अशी विनंती केली. भल्या-भल्यांना मोहिनी घालणार्‍या या माणसाला प्रत्यक्ष भेटण्यास एस. बालसुब्रह्मण्यम् उत्सुक होते. ही काळाची किमयाच होती, की काही वर्षांनी एस. बालसुब्रह्मण्यम् यांच्याच हस्ते कल्याणसुंदरम् यांचा सत्कार समारंभ होत होता. तोपर्यंत एस. बालसुब्रह्मण्यम् हे सर्व काही विसरूनही गेले होते. दोघांची भेट झाल्यावर कल्याणसुंदरम् यांचा आवाज ऐकून बालसुब्रह्मण्यम् यांना तो आवाज पूर्वी ऐकल्यासारखा वाटला. कल्याणसुंदरम् यांनी त्यांना पहिल्या भेटीच्या घटनेचे स्मरण करून दिले व योग्य मार्ग दाखविल्याबद्दल त्यांचे आभारही मानले. बालसुब्रह्मण्यम् अवाक होऊन या व्यक्तिमत्त्वाकडे बघतच राहिले. दोघांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बालसुब्रह्मण्यम् यांनी सांगितलेल्या ‘५ वर्षां’ऐवजी तब्बल २७ वर्षे कुठल्याही प्रसिद्धीशिवाय ते आपले कार्य करीत होते. कमावलेली पै न् पै गरजूंसाठी खर्च करीत होते.

प्रसिद्धीपासून दूर राहण्याचे कारण विचारले असता, त्यांचं लहानसं उत्तर होत, ‘‘मला काम करण्यात आनंद मिळत होता. त्या आनंदात प्रसिद्धी मिळविण्यासारखं काहीच नव्हत!’’ बालसुब्रह्मण्यम् यांनी त्यांच्या मासिकातून ही सेवा जगासमोर आणली. त्यांची सेवा जगजाहीर झाल्यावर विद्यापीठ अनुदान आयोगाने त्यांना १ लक्ष रुपये रोख बक्षीस दिले.

या ‘दिलदार’ माणसाने तेही १ लक्ष रुपये जिल्हाधिकार्‍यांना अनाथांच्या शिक्षणासाठी दान करून टाकले. कल्याणसुंदरम् यांची इच्छा नसताना जिल्हाधिकार्‍यांनी या बातमीला प्रसिद्धी देऊन टाकली. मग तर त्यांच्यावर पुरस्कारांचा पाऊसच पडायला लागला. या दानशूराने एकाही दमडीला हात न लावता परस्परच सर्व पुरस्कार दान करून टाकले. ते म्हणतात, ‘‘वडिलोपार्जित संपत्तीतून दान करताना मला समाधान लाभले नाही. स्वत:ला मिळणारे पैसे असे सत्कारणी लागले, की बरे वाटते!’’ किती सोपे आहे हे तत्त्वज्ञान? पण जगायला किती अवघड? पण ते असे रोज जगतात आहेत. तेही वर्षानुवर्षे.

त्यांची ही सेवा व त्यांचे वाढते वय पाहून सुपरस्टार रजनीकांत याने कल्याणसुंदरम् यांना चक्क वडील म्हणून दत्तक घेतले. रजनीकांतच्या भावनांचा मान ठेवून कल्याणसुंदरम् यांनी दोन आठवडे त्या कुटुंबासोबत घालवले. अखेर ते त्यांना म्हणाले, ‘‘मला या मोहजाळात कैदी झाल्यासारखे वाटते आहे. मला सेवेच्या कामावर जाऊ द्या. गंजण्यापेक्षा झिजणे बरे नाही का?’’ रजनीकांत व लता या दाम्पत्याने त्यांना जड अंत:करणाने निरोप दिला. वडील दत्तक घेण्याची ही घटना बहुतांश लोकांनी पहिल्यांदाच ऐकली असावी.

तिरुनलवेली जिल्ह्यामधील नानगुरारी तालुक्याच्या मेलाकारुवेलांगुलम या लहानशा गावी दिनांक १0 मे १९४0 रोजी जन्म झालेला, वडिलोपार्जित सर्व संपत्ती दान करणारा, सेवेत असताना पूर्ण पगार दान करणारा व सेवानवृत्तीच्या सर्व रकमेसह गरजूंसाठी चेन्नईत ‘पालम’ (तमीळमधे सेतू) सुरू करणारा हाडामांसाचा माणूस या पृथ्वीवरच राहतो. यावर विश्‍वास कसा ठेवावा, हा प्रश्नच आहे.

प्रा. डॉ. शिरीष उर्‍हेकर ( दै. लोकमत )

लोकमान्य - एक युगपुरुष

आवर्जून पहा आणि अभिमान बाळगा. http://youtu.be/UX9UM5cexg4

सोबत दिलेल्या लिंक वर क्लिक करून पहा लोकमान्य टिळकांच्या जीवनावर आधारित सिनेमाचा ट्रेलर...
लोकमान्यांनी १८८० साली विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांसमवेत सुरू केलेले न्यू इंग्लिश स्कूल, आर्यभूषण नावाने सुरू केलेला छापखाना, ‘केसरी आणि मराठा’ सारख्या वृत्तपत्रांची सुरुवात, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची व फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना- या सगळ्याच घटनांमुळे अवघा महाराष्ट्र घडत गेला.

’पारतंत्र्यामुळं आमच्या लोकांची स्थितीच अशी झाली आहे की, राजकीय बाबतीत सुधारणा झाल्याखेरीज, स्वातंत्र्य मिळाल्याखेरीज आमची सामाजिक स्थिती सुधारावयाचीच नाही,’ अशी ठाम भूमिका लोकमान्यांची पर्यायानं केसरीची होती. नेमकी याविरुद्ध भूमिका आगरकरांची होती. त्यांच्या मते आधी सामाजिक सुधारणाच होणे गरजेचे होते. यामुळे केसरीतच नव्हे तर अवघ्या देशात वैचारिक संघर्ष सुरू झाला. याची परिणीती आगरकरांनी केसरी सोडण्यात झाली.

केसरीतून (मराठी) आणि मराठातून (इंग्रजी) होणारे लोकमान्य टिळकांचे लेखन स्‍फूर्तिदायी आणि दिशादर्शक होते. केसरीतून वेळोवेळी प्रसिद्ध होणारे अग्रलेख जनसामान्यांना सामाजिक, राजकीय परिस्थितीबाबत सजग करत राहिले. ’मराठा’सारखे इंग्रजी वृत्तपत्र सुरू करण्यामागे-जो विचार केसरीतून  पोहोचवला जातो, तोच इंग्रजांपर्यंत आणि परप्रांतीय हिंदी लोकांपर्यंत जावा-ही भूमिका होती. रँडच्या खुनानंतर ’सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ या केसरीतल्या अग्रलेखामुळे महाराष्ट्र खडबडून जागा झाला. स्वदेशी चळवळीबाबतचा ’गूळ का साखर’ हा लेख, ‘राष्ट्रीय मनोवृत्ती ज्यातून निर्माण होईल, ते राष्ट्रीय शिक्षण’ अशी केलेली व्यापक व्याख्या, त्यावर लिहिलेले लेख- या सगळ्यांतून समाज प्रगल्भ होत गेला. त्यांच्या जहाल लेखनाचा प्रभाव क्रांतिकारकांवरही पडला. टिळकांच्या विचारांच्या प्रभावातून स्वातंत्र्यवीर सावरकर, न. चि. केळकर, कॉम्रेड डांगे यांसारखी व्यक्तिमत्त्वे घडली.

लोकमान्यांच्या लेखनात बनावट, सजावट, अलंकाराची वेलबुट्टी नसायची, तर ते लेखन रोख-ठोक आणि अभ्यासपूर्ण असायचे. १९०० मध्ये प्रो. मॅक्सम्यूलर यांच्यावरचा त्यांचा अग्रलेख प्रसिद्ध झाला. जर विद्वान मनुष्य असेल, मग तो विलायती असला, तरी त्याचे गुण घ्यावेत ही त्यामागची भावना होती. लेखनाप्रमाणेच लोकमान्यांचे वक्तृत्वही धारदार होते. सामाजिक सहभागाचे महत्त्व जाणणारे ते विलक्षण प्रभावी संघटक होते. समाज एकजूट होण्यासाठी त्यांनी सार्वजनिक शिवजयंती आणि गणेशोत्सवाचा श्रीगणेशा महाराष्ट्रात केला. या उत्सवांची सुरुवात हे खरे तर त्यांच्या असंख्य ‘संघटनात्मक’ कामांपैकी एक काम. पण या एकाच कार्यातून त्यांच्यामधल्या अतिकुशल संघटकाची व द्रष्ट्याची जाणीव आपल्याला होते.

सर्वाधिक शाळाबाह्य़ मुलांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर !!

प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करून ६ ते १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना शाळेची वाट दाखवण्याचे दावे शासनाकडून करण्यात येत असले, तरीही प्रत्यक्षात मात्र शाळाबाह्य़ मुलांच्या संख्येत भारताचा क्रमांक जगात चौथा आहे, तर जगात पौगंडावस्थेतील सर्वाधिक शाळाबाह्य़ मुलेही भारतातच आहेत. युनेस्कोच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

युनेस्कोचा 'द एज्युकेशन फॉर ऑल ग्लोबल मॉनिटरिंग रिपोर्ट २०१३-२०१४' बुधवारी प्रसिद्ध करण्यात आला. मुलांचे पोषण, शिक्षण याबाबतची पाहणी युनेस्कोने केली.

बाल्यावस्थेतील मुलांची काळजी आणि शिक्षण, प्राथमिक शिक्षण, प्रौढ साक्षरता, शिक्षणातील महिला आणि पुरूषांचे प्रमाण आणि शिक्षणाची गुणवत्ता या मुद्दय़ांची पाहणी करण्यात आली. या पाहणीमध्ये भारतातील प्राथमिक शिक्षणाचे वास्तव समोर आले आहे.

गेली अनेक वर्षे शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यासाठी झटणाऱ्या भारतामध्ये आज घडीलाही पौगंडावस्थेतील सर्वाधिक शाळाबाह्य़ मुले आहेत. शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतरही दोन वर्षांनी जगातील सर्वाधिक शाळाबाह्य़ मुले असलेल्या देशांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. सध्या जगात ५ कोटी ३० लाख शाळाबाह्य़ मुले आहेत. त्यातील १ कोटीपेक्षा अधिक मुले भारतात आहेत. मात्र, तरीही २००६ च्या तुलनेमध्ये भारतातील परिस्थितीत सुधारणा झाली असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. २००६ च्या तुलनेत भारतातील शाळाबाह्य़ मुलांचे प्रमाण हे साधारण ७० टक्क्य़ांनी कमी झाले आहे. शाळांचे वाढते शुल्क, शालेय साहित्याच्या वाढत्या किमती, शाळांमधील सुविधा, सामाजिक जनजागृतीचा अभाव अशा काही कारणांमुळे मुलांना शाळेपासून दूर रहावे लागत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

जगातील शाळाबाह्य़ मुलांच्या संख्येत २०१० च्या तुलनेत १० टक्क्य़ांनी घट झाली आहे.
सर्वाधिक शाळाबाह्य़ मुले असलेल्या जगातील पाच देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर नायजेरिया, दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तान, तिसऱ्या क्रमांकावर इथिओपिया, चौथ्या क्रमांकावर भारत, पाचव्या क्रमांकावर फिलिपाईन्स हे देश आहेत. प्रौढ साक्षरतेच्या बाबतीत मात्र भारताची अवस्था चांगली असल्याचे दिसत आहे. पन्नास टक्क्य़ांच्या जवळपास प्रौढ हे साक्षर असल्याचे या अहवालात म्हटले आहे. महिलांच्या शिक्षणाबाबतही जगाच्या तुलनेत भारताची अवस्था चांगली असून प्रौढ महिलांपैकीही साधारण ६० टक्के महिला साक्षर असल्याचे दिसत आहे.
(साभार – लोकसत्ता)

कथा एका जिद्दी महिलेची अन् कर्तुत्वाची

धाडसी, संयमी, मनमिळावू व स्पर्धा परीक्षेच्या जोरावर उत्तुंग भरारी मारणाऱ्या उत्तूर (ता. आजरा) येथील गीतांजली संतोष मुळीक-गरड या धाडसी महिलेने स्त्रियांसमोर वेगळा ठसा निर्माण केला आहे. या कर्तृत्ववान महिलेला ‘लोकमत वुमेन समीट’ या दिमाखदार सोहळ्यात विविध मान्यवरांच्या हस्ते पुणे येथे गौरविण्यात आले. ‘लोकमत’च्या दिमाखदार सोहळ्याचे त्यांनी विशेष कौतुक केले.

बालपणातच खिलाडूवृत्ती जोपासणाऱ्या गीतांजली यांनी एम. एस्सी. अ‍ॅग्री ही कृषी पदविका प्राप्त केली. महाविद्यालयीन जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेचे धडे गिरविल्याने ‘उत्कृष्ट स्वयंसेवक’ म्हणून महाविद्यालयाने त्यांची निवड केली. यावेळी देशाच्या राजधानीत १५ आॅगस्ट, २६ जानेवारीला संचलन करण्यासाठी निवड झाली. ज्युदो खेळात ‘ब्लॅक बेल्ट’ हे पदक मिळाले. कृषी पदविकेनंतर नॅशनल अ‍ॅग्रिकल्चरल रिसर्च सेंटरमध्ये रिसर्च आॅफिसर म्हणून काम करताना डायबेटीस पेशंटच्या आहाराबाबत संशोधन केले.

नोकरी सांभाळत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पोलीस निरीक्षकांची परीक्षा पास झाल्यानंतर भरती प्रक्रियेला स्थगिती आली. पुन्हा न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना फौजदारपदाची परीक्षा दिली. त्यातही यश मिळाले. इकडे पोलीस निरीक्षकपदाचा निकाल लागला.

नाशिक येथील प्रशिक्षणात दहा फूट उंच भितींवरून झेप मारणारी पहिली महिला म्हणून गौरविण्यात आले. प्रशिक्षणात तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या हस्ते चार पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुणे येथे नियुक्ती झाल्यानंतर डॉ. दीपक महाजन यांच्या खुनास वाचा फोडली. अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्धार केला.

पोलिसांची कामाची पद्धत नेहमी व्यस्त असते. अशातून पुन्हा स्पर्धा परीक्षा देऊन नायब तहसीलदार बनल्या. पोलीस निरीक्षकपदाचा राजीनामा देऊन शिरूर येथे कामास रुजू झाल्या. घरची जबाबदारी सांभाळत आणि सासू-सासरे, पती यांच्या पाठबळावर शिरूर येथे त्यांनी उत्कृष्ठ काम सुरू केले आहे.

शिरूर येथील अवैध बाळू उपसावर बंदी घालून शासनास ५० लाखांचा महसूल जमा करून दिला. वाहनचालकांची दादागिरी मोडून काढली. वाळू माफियांना ‘सळो की पळो’ करून सोडले. माझ्या या साऱ्या कामाचे कौतुक ‘लोकमत’ने केले अन् प्रसिद्धीही मिळाल्याने मी अन्यायाविरुद्ध लढण्याचा निर्णय घेतला. सासर अन् माहेरची साथ चांगली मिळाल्याची भावनाही गीतांजली यांनी व्यक्त केली.

गीतांजली यांना सामाजिक कार्यकर्त्या लक्ष्मी नारायण त्रिपाठी, युगांडाच्या उच्चायुक्तएलिझाबेथ नापेथॉक, अभिनेत्री रविना टंडन, ‘लोकमत’ मीडियाचे चेअरमन खासदार विजय दर्डा, पुणेचे संपादक विजय बाविस्कर, महाव्यवस्थापक मीलन दर्डा, आदींसह मान्यवरांच्या हस्ते मानपत्राचे वितरण करण्यात आले.

पोलीस निरीक्षकापासून नायब तहसीलदार पदापर्यंत वैवाहिक जीवनात मजल मारणारी उत्तूरमधील त्या पहिल्या, तर ‘लोकमत’चा पुरस्कार मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.

रविंद्र येसादे - उत्तूर ( दै. लोकमत )

आजची स्त्री !!

गौतम बुद्धांनी स्त्रीमुक्तीचे पहिले क्रांतिकारक पाऊल उचलले. तिच्याकडे मानवतावादी दृष्टीकोनातून ‘एक मानव’ म्हणून बघितले. एकोणिसाव्या शतकात ‘क्रांतिबा जोतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले’ यांनी स्त्रीमुक्तीसाठी आशेचा किरण दाखविला आणि पुढे 'न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति' या मनूच्या वाचनाला हिंदू कोड बिलात मूठमाती देणारे ,महामानव विश्वरत्न डॉ. आंबेडकर यांनी समाजव्यवस्थेत स्त्रियांना समानतेने वागविले जात नाही. म्हणून त्यांना कायदेशीर हक्क व अधिकार मिळावे, यासाठी घटनेच्या तिसर्‍या भागातील मूलभूत अधिकारातील कलम क्र. १४, १५, १६ मार्फत त्यांना समानतेचे अधिकार दिले.
आजची स्त्री हि शिक्षणाच्या प्रभावाने धीट झाली , चार भिंती ओलांडून घराबाहेर पडली. विकासाची नवनवी स्त्री मिळवती झाली, अधिक स्वतंत्र झाली , आर्थिक बाबतीत अधिक स्वावलंबी झाली .'स्त्री' या शब्दांत असणारी शक्ती, निर्भिडता, आत्मविश्वास तिच्यांत आला, स्त्री शिक्षीत झाली तरच ती अन्यायाविरूध्द लढू शकते. शिक्षणामुळे आचार-विचारात प्रचंड परिवर्तन घडून येते विचारांमध्ये क्राती येते अस म्हंटल जात पण,जर आजची शिकलेली , सुदृढ, सक्षम आईच आपल्या मुलींना अंतरिक्षामध्ये कल्पना चावलासारखी झेप घ्यायला शिकविण्याऐवजी वडाला फेरा माराचला शिकवत असेल तर काय म्हणावे ?
उत्तर स्त्रियांचा आता पर्यतचा प्रवासात तिने नेमके काय मिळवले? आणि काय गमावले , काय बदल झालेत किवा काय बदल व्हयला हवेत याचा खालील मुद्द्यांवर खुल्या मनाने चर्चा करुयात स्वयं परीक्षण करुयात.
सासु आणि सुन यांच्या नात्यात आता तरी बदल हवेत का?
"सासू-सून" या नात्याला सुरवातीपासूनच थोडी काळी किनार आहे, पूर्वीपासूनच हे नात दुषित झाले आहे. म्हणूनच 'चार दिवस सासूचे, चार दिवस सुनेचे', ही म्हण प्रचलीत होतीच .एक टक्का अपवाद वगळता ९९ टक्के सासू या कधीच सूनेची आई होवू शकत नाही आणि सून हि कधीच सासूची मुलगी होऊ शकत नाही.सासू आणि सुनेचे नाते हे तर आई आणि मुली सारखे असायला हवे पण असे होणे म्हणजे दिवसा स्वप्नाच म्हणावे लागेल ना? आणि त्यात दुर्देवाची गोष्ट म्हणजे सासू-सून या वादाचा फायदा घेवून आज शेकडोंच्या संख्येने सासू-सून मालिका तयार होताहेत आणि त्या पाहिल्या जात आहेत. हे नक्कीच धोकेदायक आहे.त्यामुळे नकारार्थी विचार मनात येऊन नकारार्थी प्रेरणा मिळून तसा परिणाम होतो. खरतर सासू आणि सून! एका व्यक्तीवर प्रेम करणारे दोन जीव , पण कुणाच ठाऊक हे दोन जीव एकमेकांना इतक्या दुराव्याने का पाहातात ते .शेवटी दोघींना एकाच घरात राहायचे असते. शिवाय हे नाते तुटणारेही नसतेच ना मग उगाच गैरसमजाचे डोंगर उभारून, नात्यात दुरावा निर्माण करून एकमेकांना दूषणे देत बसण्यात काय अर्थ आहे हो ? काय कामाचा असा ढोंगीपणा आणि दुटप्पीपणा?तरीही अजुन वेळ गेलेली नाहीये आपण स्वःताला सांभाळूया, टीव्हीवर उगाचच सासु -सुन अश्या भिकार मालिका बघुन त्यावर विचार करण्यात वेळ वाया न घालवता वास्तविक समाजाने दुषीत केलेले सासू सुनेचे नाते आजच्या सुज्ञ सासू सुनांनी पुन्हा नव्याने प्रज्वलीत करण्याचा प्रयत्न केला पाहिजेल..
"हुंडा पद्धती ".
मानव जातीला लागलेल्या अनेक कलंका पेकी हृदयास पिळ पडणार कलंक म्हणजे "हुंडा पद्धती " णतिओनल Crime Records Bureau च्या देशातील गुन्हेगारी वर्ष २०१० च्या आकडेवारी नुसार या वर्षात हुंडाबळीच्या एकूण ८३९१ घटना होत्या , म्हणजे दर "दीड तासाला एक हुंडा बळी , २००७ मध्ये हि संध्या ८०९३ एवढी होती, असो तर सांगण्याचा उद्देश हा कि "हुंडा बळी " यामध्ये "स्त्रीच स्त्रीची शत्रू आहे " या व्याक्याची प्रचीती आल्या वाचून राहत नाही, केवळ स्त्री जन्म घेतलाय म्हणून हुंड्याच स्वरुपात यानला दंड दयाचाय का ? ? मुळात .कन्यादान करणे ही प्रथाच वाईट आहे .एखादा बाप आपली मुलगी दान करतो म्हणजे ती एखादी भेटवस्तू असल्याप्रमाणे दान करणे म्हणजे स्त्रीच्या मनुष्यत्वाचा अपमान करण्यासारखे नाही का ?? तसेच लग्नकार्यात हुंडा घेऊन पती अप्रत्यक्षपणे आपली बायको सांभाळण्यासाठी दुसऱ्या (सासऱ्या) कडून पैसे घेतो . म्हणजेच ते स्वत:ची पत्नी देखील स्वहिमतीवर सांभाळू शकत नाही असा याचा अर्थ होतो. मग अश्या षंढ व्यक्तीला आपला पती मानायचे ? अश्या व्यक्तीशी लग्न कराचे का ? असे करायला आपण इतक्या हतबल ,लाचार, मूर्ख आहोत का ? याचा विचार आता तरी करायला नको का ?
स्त्री भ्रूणहत्या-
स्त्री-पुरुष समानता अंमलात आली पाहिजे असे म्हणणारेच घरांत मात्र मुलगाच पाहिजे, मुलगी नको असा आग्रह धरतात खरतर पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रारंभ प्रत्येक कुटुंबात आईपासून सुरू होतो. मुलगा वंशाचा दिवा आणि मुलगी परक्याचे धन, ही धारणा निर्माण केली जाते, त्यामुळे त्याचा पुरुषप्रधान कंड घट्ट होतो. तो पुरुषप्रधान संस्कृतीचा वाहक बनतो. आणि हे चक्र अव्याहत सुरू राहते. पण हा आग्रहच मोडून काढायला नको का ? किंबहुना त्यासाठी स्त्रियांनीच प्रयत्न तरी करायला नको का ? कारण सुनेला पण भारतीय संस्कृतीचे अनेक आदर्श, नैतिक मूल्ये यांचा चाललेला ऱ्हास तसेच वंषाला दिवा ’ मुलगा ‘ पाहिजे हा सासुरूपी स्त्रीचाच मुख्य अट्टाहास.कोठे तरी थांबव्याला नको का? कारण मुलगा हवा असा आग्रह धरणारी सासूही एक स्त्रीच असते हे विसरुन चालणार नाही.
समाजकारण आणि राजकारण-
' स्त्री-मुक्ती' च्या नावाखाली आजकाल बरीच महिला मंडळे जन्माला पण मुळात ' स्त्री-मुक्ती म्हणजे स्त्री ची मुक्ती, पण कशाक शातून ?? गुलामगिरीतून ? अत्याचारापासून ? गरीबीतून? लाचारीतून ? दुबळेपणातून ? की पुरुषांच्या मक्तेदारीतून???..का तिनेच स्वत:च स्वत:ला बांधलेल्या बंधनातून ?हेच अजून अनेक श्त्रीयाना कळले नाही. असो तर आजकाल महिलाही भाषणे देऊ लागलीत पण या महिलांचे कार्य सावित्रीमाई इतके क्रांतिकारक नाही. आपला मेक-अप बिघडणार नाही अश्या पद्धतीने त्यांचे सोशलवर्क चालू आता महिलानला बाबासाहीबानी देशाला अर्पण केलेल्या संविधानाच्या कृपेने ५०% आरक्षण मिळाले आहे, पण याचा खरच फायदा त्या करून घेतील का ? कि जस १९ व्या शतकात चुलीवर काय शिजवायच हा घरातील करता पुरुष ठरवत असे अगदी तशीच स्थिथी महिलानला मिळालेल्या ५०% आरक्ष नाच्या बाबतीत होईल का ? खरच,त्या स्वतःच्या इच्छेने राजकारण करतील कि पतीच्या इच्छेने ? त्या स्त्रीयांवरील होणारा अन्याय ,अत्याचार यांच्या विरोधास तसेच महिलांच्या दैनंदिन समस्या सोडव्यासाठी यशस्वी होयील का ? महिला विकास पक्ष दबावाने नष्ट होणार का ?..पक्षाच्या दबावाला किती महिला बळी पडणार ? या आरक्षणाचा लाभ स्त्रियांना कितपत पचनी पाडून घेता येईल ? राजकीय पक्षातही नाड्या पुरुषांच्याच हाती असल्यामुळे स्त्रियांच्याकर्तृत्वाला खरच वाव मिळेल का?
स्त्री : रुढी परंपरा आणि त्यांची भूमिका-
आपली अवस्था “कळतंय पण वळत नाही’ आणि “हम महापुरूषोंको मानते है, पर उनकी कुछ नाही मानते’ अशी झाली आहे. नवरा आंधळा होता म्हणून आयुष्भर डोळ्यावर पट्टी बांधणारी गांधारी त्यांला नको होती तर पतीच्या अंधालेपानावर आपल्या डोळसपनाणे त्यालाही दुष्टी मिळवून देणारी नवी गांधारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यानला अभिप्रेत होती ..स्त्रियांनी ज्ञान संपादन करून एक नवा आदर्श हि निर्माण केला, पण आपल्यातील कांहीची अवस्था मात्र वेगळी आहे, आजही काही महिला बऱ्याच अनिष्ट रूढी, प्रथा व परंपरा यामध्ये गुरफटत चालल्या आहेत ...आणि हे सर्व आपल्या सद्‌सद्‌विवेक बुध्दीला पटते का ? अहो ज्या रूढी, प्रथा व परंपरा यामुळे आपला घात झाला आपलाला माणूस असूनही माणसाप्रमाणे वागणूक मिळत नव्हती मग का ती व्यवस्था पुन्हा रूजविण्यासाठी आपण प्रयत्न का करीत आहोत?? का करतोय हे आपण अनुकरण ? ?याचा विचार आज व्हायलाच हवा आपण हे सर्व फेकून द्यायला हवे. आजही लग्न जुळवताना पत्रिका पाहण्याचा मुर्खपणा आपल्या समाज्यातील स्त्रिया करताना दिसतात. एकवीसाव्या शतकात माणूस चंद्रावर पोहोचला, तरीही आपण शनी, राहू, केतू या पत्रिकेतील ग्रहांवर अवलंबून राहणार आहोत का ? आजच्या युगात मुलामुलींचा रक्तगट तपासणे गरजेचे असताना आपण त्यांची नाडी बघण्यात व्यस्त आहोत. हीच खरी समाजाची शोकांतीका आहे. पण आपण काय करत आहोत कुणाचे विचार अंगीकारत आहोत याचा विचार आपण करायला नको का? ....बोलाचाच भात । जेवूनीया कोण । तृप्त झाले।। बोले तैसा चाले । त्याची वंदावी पाऊले ।। ...फक्त उपदेश करायचे पण स्वत: ते आचरणात आणताना मात्र टाळाटाळ करायची अशा उपटसुंभ लोकांची संख्याही आपलात कमी नाहीये ...ज्या विचारांमुळे आपला विकास होणार आहे ते विचार आपण स्विकारतच नाही. अन्‌ ज्याच्यामुळे आपली अधोगती अध:पतन होणार आहे ते आपण सहज स्विकारतो. असे का घडते ?... कशासाठी ? त्याच्या पासून आपल्याला फायदा की तोटा ? जर आज स्त्रीची हि दशा आहे तर मग दिशा काय असेल ?......हा वर्तमान पण ही परिस्थिती कोठेतरी बदलाल्याला हवी आणि त्याची सुरूवात आत्ताच व्हायला हवी ना? म्हणून या सर्व समस्यांवर एकच उपाय म्हणजे आपण ( स्त्रियांनी ) बदल्यायाल हवे आपण बदललो ,तर परिस्थिती नक्कीच बदलेल आणि या बदलण्याला अर्थ प्राप्त होईल... त्यामुळे प्रत्येकीने स्वयं आत्मपरिक्षण करावे विचारांचे परिवर्तन होणार नाही तो पर्यंत समस्या सुटणार नाहीत. आणि त्याशिवाय खऱ्या अर्थाने भारतीय स्त्री समाजाच्या प्रगतीचा मार्ग खुला होणार नाही ...
लेख -प्रियांका नागेश कांबळे , पुणे

असा प्रेम व असा शोक आम्ही आजपर्यंत कधी बघितला नाही !!

छत्तीस वर्षांपुर्वी टिळक मरण पावले त्यावेळी साऱ्या भारताला दुःख झाले, पण त्या दुःखाचे स्वरुप सामुदायीक होते, वैयक्तीक नव्हते. गांधीच्या मृत्युमुळे हजारो लोक घाव मोकळुन शोक करत आहेत, असा देखावा काहीसा पहावयास मिळाला नाही. पण, डा.आंबेडकरांच्या मृत्युनंतर त्यांचे लक्षावधी अनुयायांचे त्यांच्यावरील अमर्याद प्रेमाचे आणि त्यांच्या आकस्मिक मृत्युने त्यांना झालेल्या अपरंपार शोकाचे जे ह्रदयद्रावक निदर्शन आम्हाला पहावयास मिळत आहे. त्याला खरोखरच तुलना नाही.
आंबेडकरांचा मृत्यु हा प्रत्येक अस्पृश्याला आपल्या जन्मदात्या पित्याच्या मृत्युसारखा वाटतो. आंबेडकरांच्या मृत्युची वार्ता ऐकुण त्यांच्या कित्येक अनुयायांना दुःखतिरेकाने मुर्छा आली. कित्येक भिंतीवर डोके आदळुन शोक करु लागले. आंबेडकरांचे शव जेव्हा सांताक्रुझच्या विमानतळावर आले, तेव्हा जमलेल्या असंख्य अनुयायांनी ''बाबा आम्हाला सोडुन कसे गेलात हो!'' असा हंबरडा फोडला. त्याने दगडाचे काळीज देखील दुभंगली असती. राजगृहात अंत्यदर्शनासाठी त्यांचा पार्थिव देह ठेवला असताना भोवतालच्या एक मैलाच्या परीसरात त्यांच्या लेकरांचा प्रचंड महासागर जमला होता. त्याची कल्पना तो डोळ्यांनी प्रत्यक्ष ज्यांनी पाहिली त्यांच्याखेरीज इतरांना कशी येईल...?
हिंदु कॉलोनीत राहणारे स्पृश्य हिंदु रहिवाशी तो अभुतपुर्व देखावा पाहुन हतबद्ध झाले होते. डॉ. आंबेडकरांना देवाप्रमाणे मानणारे लक्षावधी लोक ह्या मुंबई शहरात आहेत, ह्याची आम्हाला आजपर्यंत कल्पना नव्हती. स्मशानामध्ये अग्नीसंस्काराच्या वेळी तर लोकांच्या शोकाचा महापुर अंतःकरणाचे बांध फोडुन बाहेर पडला, आंबेडकरांच्या आणि कार्याचे आम्ही वर्णन जेव्हा करु लागलो.. तेव्हा लोक टाहो फोडुन एवढ्या मोठमोठ्याने रडु लागले कि, निसर्गालादेखील त्यांचे सांत्वन करता आले नसते. साऱ्या स्मशानात आसवांचा अक्षरशः पाऊस पडला. एका माणसासाठी लक्षावधी लोक अशाप्रकारे अश्रु ढाळताना आणि शोक करताना आम्ही तरी कधी बघितले नव्हते आणि कोणी पाहिले असतील असे वाटत नाही.
लक्षावधी अनुयायांचे आंबेडकरांवर एवढे विलक्षण प्रेम का आहे....?? याच्या स्पृश्य हिंदु समाजातील लोकांनी खरोखरच विचार करायला हवा. आंबेडकर जोपर्यंत जीवंत होते तोपर्यंत अस्पृश्य समाजाला कोणाचे भय नव्हते, सरकारचे ना स्पृश्य हिंदु जनतेचे. आंबेडकर म्हणजे सिंह होते, त्यांच्यापुढे उभे राहण्याची कोणाची प्राज्ञा नव्हती. आंबेडकरांनी एक डरकाळी फोडली कि शत्रुच्या छातीत धडकी भरत त्यांचे विरोधक त्यांना चराचरा कापत असत. कोणी कितीही विद्वान असला किंवा मुत्सुदी दिसला तरी त्याची आंबेडकरांसमोर डाळ शिजत नसे. बुद्धीमता, चरित्र्य ह्यांचे ते हिमालय होते. अस्पृश्य समाजाला केवढा आधार होता त्यांचा आज हिमालय ढासळला म्हणुन ते रडत आहेत. पाच हजार वर्षात असा महान नेता त्यांना लाभला नव्हता, असा महान नेता कोणत्या जन्मी लाभणार ह्या एका विचाराने त्यांची ह्रदये शतदा विदीर्ण होत आहेत !!
-अचार्य अत्रे यांचा लेख

बाबा विनम्र अभिवादन !!

गुरुवार दिनांक 6 डिसेंबर 1956. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीत निधन झालं. सारा देश दु:खात बुडाला. मुंबईत बाबासाहेबांची प्रचंड महायात्रा निघाली. अंत्यविधीच्या वेळी श्रद्धांजलीपर भाषण फक्त एका व्यक्तीचं झालं. ते होते आचार्य अत्रे. अत्र्यांचं ते भाषण इतिहासात अजरामर झालं आहे. त्यानंतर अत्र्यांनी 'मराठा'तून सतत 12 दिवस बाबांच्या जीवनावर आणि तत्त्वज्ञानावर अग्रलेख लिहिले. त्यातील हा 7 डिसेंबरचा पहिला अग्रलेख...

सात कोटी अस्पृश्य आज पोरके झाले. भारतातल्या अस्पृश्याचां आणि अपंगांचा आज आधार गेला. शतकानुशतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळ्या दलितांचा कनवाळू कैवारी गेला. जुलमी आणि ढोंगी विषमेविरुद्ध जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंझार लढवय्या गेला. सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जगभर आकाशपाताळ एक केले असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेला. पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते.
आंबेडकर म्हणजे बंड-मूर्तिमंत बंड. त्यांच्या कणाकणांतून बंड थैमान घालत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुद्ध उगारलेली वज्राची मूठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिद्ध असलेली 'भीमा'ची गदा होय. आंबे़डकर म्हणजे जातिभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारी वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध सदैव पुकारलेले एक यु्द्धच होय. महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुद्ध हे तीन गुरूच मुळी आंबेडकरांनी असे केले, की ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदांचे थोतांड माजविणाऱ्या समाजव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले.
पतित स्त्रियांच्या उद्धाराचा प्रयत्न करणाऱ्या महात्मा फुल्यांवर हिंदू समाजाने मारेकरी घातले. कबिराला हातपाय बांधून पाण्यात टाकण्यात आले. ह्त्तीच्या पायी देण्यात आले आणि मग तो मेल्यानंतर हिंदू-मुसलमानांना त्याच्याबद्दल एवढे प्रेम वाटू लागले की, त्याच्या प्रेताचा ताबा घेण्यासाठी ते एकमेकांचा खून करावयास सिद्ध झाले. बुद्धधर्माचा भारतामधून उच्छेद करण्यासाठी भगवान बुद्धांच्या अनुयायांच्या कत्तली करण्यात आल्या. हालअपेष्टा आणि छळ ह्यांचे हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यानंतरही प्राशन करावे लागले, अशा बंडखोर गुरूंचे आंबेडकर हे सच्चे चेले होते. जुलूम आणि अन्याय म्हटला की, आंबेडकरांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. धमन्याधमन्यांमधून त्यांचे रक्त उसळ्या मारू लागे. म्हणूनच लोकसभेत पंडित नेहरूंनी बोलून दाखविल्याप्रमाणे हिंदू समाजाच्या प्रत्येक जुलुमाविरुद्ध पुकारलेल्या बंडाचे ते प्रतीक बनले.
हिंदू समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरांची जेवढी निंदा केली, जेवढा छळ केला, जेवढा अपमान केला, तेवढा कोणाचाही केला नसेल. पण त्या छळाची आणि विटंबनेची त्यांनी लवमात्र पर्वा केली नाही. धर्माच्या आणि सत्तेच्या जुलुमाला ते कधीही शरण गेले नाहीत. शरणागती हा शब्दच मुळी आंबेडकरांच्या शब्दकोशात नव्हता. मोडेन, मार खाईन, मरेन, पण वाकणार नाही, अशी त्यांची जिद्द होती, आणि त्यांनी ती शेवटपर्यंत खरी करून दाखवली. जो तुमचा धर्म मला कुत्र्यामांजरापेक्षाही हीन रीतीने वागवतो त्या धर्मात मी कधीही राहणार नाही, असे कोट्यवधी हिंदुधर्मीयांना कित्येक वर्षांपासून ते बजावत होते. माणसासारख्या माणसांना 'अस्पृश्य' मानणारी ती तुमची 'मनुस्मृती' मी जाळून टाकणार, असे त्यांनी या सनातनी हिंदूंना छातीवर हात मारून सांगितले होते. ह्यामुळे हिंदुधर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले. त्यांना वाटले आंबेडकर हे गझनीच्या महंमदापेक्षांही हिंदुधर्माचे भयंकर दुष्मन आहेत. धर्मातराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉ. कुर्तकोटी ह्यांच्याकडे गेले होते. तेव्हा डॉ. कुर्तकोटींनी त्यांना सांगितले की, आंबेडकरांना तुम्ही मारलेत तर त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून दहा आंबेडकर बाहेर पडतील!
आंबेडकरांची धर्मांतरांची घोषणा ही हिंदू धर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदू धर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वर्ण्याने हिंदू धर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे, असे आंबेडकरांचे मत होते. म्हणून चातुर्वर्ण्याची चौकट मोडून हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा, असे टाहो फोडून ते सांगत होते. धर्मातराच्या प्रश्नावर आमच्याशी बोलताना एकदा ते म्हणाले की, 'हिंदू धर्मावर मला सूड घ्यायचा असता तर पाच वर्षाच्या आत मी ह्या देशाचे वाटोळे करून टाकले असते. पण ह्या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही!' हिंदू धर्माप्रमाणेच महात्मा गांधी आणि काँग्रेस ह्यांच्यावर आंबेडकर हे नेहमी प्रखर टीका करीत. त्यामुळे जनाब जीनांप्रमाणेच साम्राज्यवाद्यांशी संगनमत करून हिंदी स्वातंत्र्याचा मार्ग ते रोखून धरीत आहेत, अशीच पुष्कळ राष्ट्रवादी लोकांची समजूत झाली. अस्पृश्यता निवारणाकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन हा निव्वळ भूतद्यावादी आणि भावनाप्रधान होता. आंबेडकर त्या प्रश्नाकडे केवळ न्यायाच्या आणि हक्काच्या दृष्टीने पाहत असत. पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध गांधीजींनी जसे बंड पुकारले, तसे अस्पृश्यता नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी स्पृश्य समाजाविरुद्ध का बंड पुकारू नये, असा आंबेडकरांचा त्यांना सवाल होता.
अस्पृश्यता निवारणाबाबत गांधीजी आणि आंबेडकर हयांच्यात अशा तऱ्हेने मतभेद होता. म्हणून साम्राज्यशाहीविरोधी पातळीवर काँग्रेसची आणि आंबेडकरांची एकजूट होऊ शकली नाही. तथापि, गांधीजींबद्दल मनात विरोधाची एवढी भावना असतानाही केवळ त्यांचे प्राण वाचवण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी त्यांनी मागे घेतली आणि 'पुणे करारा'वर सही केली. गोडशासारख्या एका ब्राह्मणाने गांधीजींचा प्राण घ्यावा आणि आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा ह्याचा अर्थ हिंदू समाजाला अद्याप समजू नये याचे आम्हाला दु:ख होते. 'पुणे करारा'वर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचविले, पण स्वत:चे आणि अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबेडकरांनी 'पुणे करारा'वर सही केली, तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा काँग्रेसने मात्र आंबेडकरांना दाखविला नाही. आपल्याला धार्जिण्या असलेल्या महारेतर अस्पृश्यांना हाताशी धरून काँग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सार्वत्रिक निवडणुकीत पराभव केला आणि देशाच्या राजनैतिक जीवनातून त्यांना उठवून लावले. आंबेडकर त्याबद्दल नेहमी विषादाने म्हणत की, स्पृश्य हिंदूंच्या बहुमताच्या आधारावर माझे आणि माझ्या पक्षाचे राजकीय जीवन गांधीजी आणि काँग्रेस ह्यांनी ह्या देशामधून नेस्तनाबूत करून टाकले!
नऊ कोटी मुसलमानांना खूष करण्यासाठी काँग्रेसने ह्या सुवर्णभूमीचे तीन तुकडे करून टाकले. पण सहा कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळवण्यासाठी कागदी कायदे करण्यापलीकडे काँग्रेसने काहीही केले नाही. असे असता देशाला स्वातंत्र्य मिळताच घटना समितीत अखंड हिंदुस्थानची आणि जातीय ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरांनी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले. आंबेडकर म्हणाले, "जगातील कोणतीही सत्ता ह्या देशातील ऐक्याचा भंग करू शकणार नाही आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे, असे आज ना उद्या मुसलमानांना कळून आल्यावाचून राहणार नाही!" आंबेडकरांचे हे उदारपण हा त्यांच्या देदीप्यमान देशभक्तीचा ज्वलंत पुरावा होय. काँग्रेसशी पूर्वीचे असलेले सर्व वैर विसरून आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरूंच्या हातात हात दिला आणि स्वतंत्र भारताची घटना तयार करण्याची सर्व जबाबदारी त्यांनी पत्करली.
'मनुस्मृती जाळा' म्हणून सांगणारे आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार व्हावेत हा काय योगायोग आहे? घटना मंजूर झाल्यानंतर त्यांनी 'हिंदू कोड' तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले. पण काँग्रेसमधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ती आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या. आणि त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळामधून बाहेर पडल्यावाचून आंबेडकरांना गत्यंतरच उरले नाही. आंबेडकरांचे 'हिंदू कोड बिल' जर मान्य झाले असते तर हिंदू समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदू समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कोणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुर्दैव भारताचे! दुर्भाग्य हिंदू समाजाचे! देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वत:चा घात करून घेतला. राज्यकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदू समाजाने लाथाडले, तेव्हा अखेर स्वत:चा आणि आपल्या सात कोटी असहाय नि हीन-दीन अनुयायांचा उद्धार करण्यासाठी त्यांना मानवजातीला समतेचा, दयेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या त्या परम कारुणिक बुद्धाला शरण जाण्यावाचून गत्यंतरच उरले नाही.
आंबेडकरांच्या विव्दत्तेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखील कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुद्धीचा, विव्दत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रात – नव्हे भारतात या क्षणी नव्हता. ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालविणारा महर्षी आज आंबेडकरांवाचून भारतात दुसरा कोण होता? वाचन, चिंतन आणि लेखन ह्यावचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हत. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एखाद्या प्राचीन ऋषीपेक्षांही श्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून तो घटनाशास्त्रापर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता, की ज्यामध्ये त्यांची बुद्धी एखाद्या गरुडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत विहार करू शकत नव्हती. तथापि, आंबेडकरांची धर्मावर आत्यंतिक निष्ठा होती ही गोष्ट फार थोड्या लोकांना माहीत होती. आंबेडकर कितीही तर्क-कर्कश आणि बुद्धिवादी असले तरी त्यांचा पिंड हा धर्मनिष्ठाचा होता. भाविक आणि श्रद्धाळू पित्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता. शुचिर्भूत धार्मिक वातावरणात त्यांचे सारे बालपण गेले होते. सर्व धर्माचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता. आत्म्याच्या उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता आहे, असे त्यांचे ठाम मत होते. धर्मावरील त्यांच्या गाढ श्रद्धेमुळेच त्यांचे नैतिक चारित्र्य निरपवाद राहिले.
त्यांना कोणतेही आणि कसलेही व्यसन नव्हते. त्यामुळेच त्यांच्या अंगात विलक्षण निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते खोटे आहे, असे म्हणण्याची प्रत्यक्ष परमेश्र्वराची देखील प्राज्ञा नाही, असा आवेश आणि आत्मबल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सदैव संचारलेले असे. अनेक वर्षाच्या आध्यात्मिक चिंतनाने आणि परिशीलनाने शेवटी आंबेडकर भगवान बुद्धाच्या चरणापाशी येऊन पोहोचले होते. बुद्धाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृश्यांनाच नव्हे, तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही, असा आंबेडकरांचा ठाम निश्चय झाला होता. म्हणूनच ता. १४ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे तीन लाख अस्पृश्यांना त्यांनी बुद्ध धर्माची जेव्हा दीक्षा दिली तेव्हा 'साऱ्या भारताला मी बौद्ध करीन' अशी गगनभेदी सिंहगर्जना त्यांना केली.
मुंबईतील दहा लाख अस्पृश्यांना थोड्याच दिवसांनी ते बुद्ध धर्माची दिक्षा देणारे होते. पण दृष्टांत काही निराळेच होते. अन्यायाशी आणि जुलुमाशी संबध जगभर झगडून झगडून त्यांचे शरीर जर्जर झाले होते, दुर्बल झाले होते. विश्रांतीसाठी त्यांच्या शरीरातील कणन् कण आसुसला होता. भगवान बुद्धाच्या करुणेचा जेव्हा त्यांना अखेर आसरा मिळाला, तेव्हा त्यांना अंत:करणात जळणारा वन्ही शीत झाला. आपल्या कोट्यवधी अनुयायांना आता आपण उद्धाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे, आता आपले अवतारकार्य संपले, अशी त्यांना जाणीव झाली आणि निद्रामाऊलीच्या मांडीवर डोके ठेवून अत्यंत शांत आणि तृप्त मनाने त्यांनी आपली प्राणज्योती निर्वाणात कधी विलीन करून टाकली त्याची जगाला दुसरे दिवशी सकाळी ते जागे होईपर्यंत गंधवार्तासुद्धा लागली नाही.
'मी हिंदू धर्मात जन्माला आलो त्याला माझा नाईलाज आहे; पण मी हिंदू धर्मात कदापि मरणार नाही!' ही आंबेडकरांची घोषणा हिंदू धर्माविरुद्ध रागाची नव्हती. सुडाची नव्हती. झगडा करून असहाय झालेल्या विनम्र आणि श्रद्धाळू साधकाचे ते तळमळीचे उद्धार होते. आंबेडकरांचे चरित्र ही एका शूर आणि बंडखोर समाजसुधारकाची वीरकथा आहे. शोककथा आहे. गरिबांनी, दीनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ती घ्यावी. आणि आंबेडकरांचा ज्यांनी जन्मभर छळ आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यांनी आणि सनातनी हिंदूंनी त्यांची ही शोककथा वाचून आता अवनतमस्तक व्हावे. आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसजसा अधिक प्रकाश पडेल, तसतसे अलौकिकत्व प्रकट होईल. आणि आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रू नसून उद्धारकर्तेच होते, अशी भारताची खात्री पटेल. भारतीय जीवनात जे जे म्हणून काही उज्ज्वल आणि उदात्त आहे त्यांचे आंबेडकर हे एक ज्वलंत भांडार होते. आंबेडकर हा स्वाभिमानाचा एक जळता ज्वालामुखी होता. भारताच्या ऐक्याचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे ते महान प्रणेते होते.
महाराष्ट्र आणि मुंबई ह्यांचे नाते जे देवाने जोडले आहे ते कोणाच्या बापालाही तोडता येणार नाही, असे ते म्हणत. कोणकोणते गुण आता आठवायचे आणि त्यांच्या कोणकोणत्या उद्धारांचे स्मरण करावयाचे? सात कोटी अस्पृश्यांच्या डोक्यावरचे तर आता आभाळच फाटले आहे. भगवान बुद्धांखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार? आणि त्यांच्या डोळ्यातंले अश्रू तरी कोण पुसणार? त्यांनी ध्यानात धरावे की, भारताच्या इतिहासात आंबेडकर नि त्यांचे कार्य अमर आहे.
त्यांनी जो मार्ग आखला आणि जो प्रकाश दाखवला त्याच्याच अनुरोधाने जाऊन त्यांच्या कोट्यवधी अनुयायांनी आपला उद्धार करून घ्यावा. आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायाचे हृदय हे त्यांचे जिवंत स्मारक आहे. म्हणून आंबेडकरांची विव्दत्ता, त्यांचा त्याग, त्यांचे चारित्र्य आणि त्यांची निर्भयता प्रत्येकाने आपल्या जीवनात निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला तरच आंबेडकरांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण होईल आणि साऱ्या भारताचा उद्धार होईल. तीन कोटी मराठी जनतेच्या वतीने व्याकूळ हृदयाने आणि अश्रूपूर्ण नेत्रांनी आम्ही आंबेडकरांच्या पार्थिव देहाला अखेरचे अभिवादन करतो.
(मराठा : 7-12-1956)
बाबासाहेबांना खरी श्रध्दांजली हीच असेल जेव्हा आपण त्यांच्या आचार विचारांच आपल्या जीवनात पालन करू व प्रसार करू..

विश्वरत्न ङाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५८ व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतिस कोटी कोटी प्रणाम !!

खरा साहित्यिक उजेडाचा पक्ष घेतो !

साहित्यिक आपल्या लेखणीद्वारे सत्याचे प्रकटन करीत असतो. खरं तर हे सत्य सर्वसामान्य मानवी जीवनाच्या सभोवताल असून त्यास ते प्रभावित करीत असते. सामान्य माणसांच्या जीवनाला प्रभावित करणाऱ्या कोणत्याही घटना वा गोष्टी हे त्याच्या लेखणीचे विषय बनतात. जीवनाला प्रभावित करणाऱ्या कारणांच्या शोधत तो असतो आणि या कारणांच्या विरोधात आपली लेखणी उचलतो. वस्तुतः खरा साहित्यिक नेहमी उजेडाच्या शोधात असतो आणि सदैव उजेडाचाच पक्ष घेतो. इतकेच नव्हेतर तो अंधःकाराच्या विरुद्ध संघर्षही पुकारतो आणि सतत नेक मनाने सोद्देश मानवतेसाठी आवाज बुलंद करतो.

जो मुकबधीर समाजाला जावून भिडतो. आपण कितीही प्रयत्न केले तरी उच्चवर्णीयाकडून दलितांचे उत्थान शक्य नाही. मात्र या देशात राहायचं असेल तर सर्व सत्ता आपल्या हाती घ्यावी लागेल याचा बोध दलितांना झालेला आहे. पुढे आंबेडकरी साहित्याला सर्व परिवर्तनवादी साहित्याचे नेतृत्व करावे लागेल. विसावे शतक समाप्तीवर आहे आणि एकविसावे शतक हे आंबेडकरी विचारांचे युग असेल केवळ गरज आहे ती 'चेतना' जागविण्याची. ही चेतना केवळ आंबेडकरी साहित्यच जागवू शकते, आंबेडकरी साहित्य काळाची गरज आहे. परंतु आंबेडकरी विचार आपल्या हृदयाच्या परिघापर्यंत सीमित न ठेवता ते विशाल बनवून प्रामाणिकपणे जनतेपर्यंत पोहचविणे हे साहित्यिकांचे अहम कर्तव्य आहे. यामुळे समस्त दलितांमध्ये नवचेतना जागृत होईल आणि केवळ दलितच नव्हे तर संपूर्ण मानवजात मानवतेसाठी झटेल !

विचार संदर्भ- नानकचंद रत्तू अ. भा. आंबेडकरी साहित्य संमेलन दि. १४ नोव्हेंबर १९९७ यवतमाळ उदघाटकीय भाषणातून अनुवादित.


धन्यवाद- Anand Gaikwad

ध्येय एड्समुक्तीचे

एड्सबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १ ‌डिसेंबर हा दिवस वर्ल्ड एड्स डे म्हणून पाळण्यात येतो. त्यानिमित्त राज्यासह मुंबईतील एचआयव्हीबाधित पेशंटांची परिस्थिती, उपचारांच्या नवीन पद्धती, आखलेल्या योजना यावर यानिमित्ताने टाकलेला हा फोकस.

राज्यासह मुंबईतील एचआयव्हीबाधित पेशंटची संख्या घटत असल्याचे सकृतदर्शनी दिसून आले आहे. येत्या २०३० सालापर्यंत महाराष्ट्र राज्य एड्समुक्त करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून एड्सची चाचणी व उपचार यांच्यातील दरी दूर करण्यासाठी बांधकाम मजूर, स्थलांतरित मजूर, ट्रक ड्रायव्हर, रिक्षा व टॅक्सी चालक आणि मालक यांच्यासोबत संयुक्त मोहीम राबवण्यात येणार आहे.

एड्सबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १ ‌डिसेंबर हा दिवस वर्ल्ड एड्स डे म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीच्या वतीने भविष्यात राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. २०३० सालापर्यंत महाराष्ट्र एड्समुक्त करण्यासाठी समाजातील विविध स्तर व घटकांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. कौन्सिलिंगबरोबर चाचणी, उपचार, जागृती आणि जीवनशैलीशी निवडीत सुविधा देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक खुशालसिंह परदेशी यांनी सांगितले. राज्यात राबवण्या येणाऱ्या या मोहिमेत उसतोडणी कामगार, स्थलांतरित मजूर व विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याचा मुख्य उद्देश आहे. तसेच एसआयव्हीबाधितांची समाजिक स्थिती समजावून घेणे, त्यांची माहिती ठेवणे, त्यांच्या संक्रमणाचा अभ्यास करणे यांचा समावेश आहे.

मध्यंतरी कोल्हापूरमध्ये उसतोडणी व साखर उद्योगातील कामगारांमध्ये प्रायोगित तत्त्वावर एक मोहीम राबवण्यात आली होती. त्यात उसतोडणी कामागारांची एचआयव्ही चाचणी व आवश्यक्ता भासल्यास उपचार देण्यात आले. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचधर्तीवर बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद व राज्यातील इतर जिल्ह्यातही हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

राज्यातील आकडेवारी राज्यात ऑक्टोबर, २०१४मध्ये ११ लाख ७३ हजार ३७३ जणांची एचआयव्ही चाचणी. त्यापैकी १७ हजार ७४४ जण पॉझिटिव्ह २०१३-२०१४मध्ये राज्यात १७ लाख ७७ हजार ९३५ जणांची एचआयव्ही चाचणी. त्यात ३१,०८२ पॉझिटिव्ह मुंबईसह राज्यातील एचआयव्हीचे संशयित पेशंट ३ लाख ७४ हजार ३७५ कायमस्वरूपी एचआयव्हीच्या उपचारांवरील औषधे घेणाऱ्या राज्यातील पेशंटची संख्या - १ लाख ४७ हजार ६९० आणि मुंबईतील संख्या - ३० हजार ४५ एड्सवरील उपचारांसाठी राज्यात सध्या १५५ एआरटी सेंटर. त्यात वाढ करून ७० सेंटर करण्याची योजना

स्थलांतरित मजुरांवर लक्ष केंद्रीतया व्यतिरिक्त स्थलांतरित मजुरांवरही लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. स्थलांतरित मजूर हे एचआयव्ही एड्सची चाचणी करताना मुंबई किंवा हॉस्पिटलच्या जवळपासचा निवासी पत्ता देतो. पण प्रत्यक्षात पेशंट त्या ठिकाणी राहात नाही. त्यामुळे तो पेशंट उपचार घेतो अथवा नाही त्याची माहिती मिळत नाही. मूळ गावी पेशंट गेल्यास त्याला उपचार घेता येतील, यासाठी एड्स जिल्हा नियंत्रण केंद्राला पेशंटची माहिती दिली जाईल. त्याला ट्रॅकिंग सिस्टीम असे नाव देण्यात आले आहे.

आरटीओचीही मदतएचआयव्ही चाचणी व उपचार यांच्यातील दरी दूर करण्यासाठी आरटीओच्या मदतीने रिक्षा व टॅक्सी चालक व मालक यांच्या युनियन, ट्रकचालक यांना सोबत घेऊन एक मोहीम राबवण्यात येईल. पुढील दोन-तीन महिन्यांत हा उपक्रम सुरू होईल, असे मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीच्या संचालक डॉ. श्रीकला आचार्य सांगतात.

तीन एआरटी सेंटरएड्सवरील उपचारांसाठी मुंबई महानगर पालिकेच्या हॉस्पिटलध्ये तीन नवीन एआरटी सेंटर सुरू करण्याची योजना आहे. सध्या पालिकेच्या १२ हॉस्पिटलांमध्ये एआरटी सेंटर आहेत. पालिकेने आता राजावाडी, वांद्रे भाभा व शिवडीच्या टीबी हॉस्पिटलमध्ये नवीन एआरटी सेंटर सुरू करण्यात येणार आहेत.

खलाशांसाठी तपासणी केंद्र

जहाजावर नोकरी करणाऱ्या खलाशांच्या तपासणीसाठी पालिकेने एचआयव्ही तपासणी सेंटर सुरू करण्याची योजना आखली आहे. मुंबई सी फेअरर हॉस्टेल आहे. या ठिकाणी तपासणी केंद्र सुरू करण्याची योजना आहे. जहाजांवर काम करणारे खलाशी अनेक महिने कुटुंबापासून दूर असतात. त्या काळात लैंगिक संबंधांची शक्यता बळावते. त्यामुळे त्यांच्यातील आरोग्यविषयक जनजागृतीसाठी हे केंद्र सुरू होणार आहे.

गर्भवती महिलांसाठी नवीन नियमावली

वैद्यकीय क्षेत्रात अलिकडेच नवीन नियमावली लागू केली आहे. त्यानुसार एखादी गर्भवती एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्यास तिला चौथ्या महिन्यापासून औषधे दिली जातात. ज्यामुळे विषाणूचा संसर्ग कमी होतो. तसेच अर्भकांना जन्मानंतर सहा आठवडे सिरप दिले जाते. दीड महिन्यानंतर अर्भकाची तपासणी केली जाते. यात जर अर्भक एचआयव्हीबाधित आढळून आल्यास त्याच्यावर उपचार केले जातात. पण चौथ्या महिन्यात गर्भवती महिलेला औषध देण्यास सुरुवात केल्यामुळे विषाणूंचा धोका कमी होत आहे.

यंदाची संकल्पना

राज्यासह मुंबईतील एचआयव्हीबाधित पेशंटची संख्या घटत असल्याचे सकृतदर्शनी आढळून आले आहे. त्यामुळे २०१५ साली हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करण्यावर सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे.

- महाराष्ट्र टाईम्स

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/HIV-AIDS/articleshow/45329922.cms

जोतिबांचा मार्ग अनुसरला पाहिजे


जोतिबांचा अनुयायी म्हणवून घेण्यात मला यापूर्वी कधीही लाज वाटली नाही आणि आजही वाटत नाही. मी आत्मविश्वासाने आज असे म्हणू शकतो की मीच जोतिबांचा एकनिष्ठ राहिलो आहे, आणि मला खात्री आहे की या देशात जनतेचे सर्वांगीण हित करणारा असा कोणताही पक्ष पुढे आला त्यांनी कोणतेही नाव धारण केले तरी त्यांना जोतिबांचे धोरण, त्यांचे तत्वज्ञान आणि त्यांचे कार्यक्रम घेऊनच पुढे यावे लागेल. तोच एक खरा लोकशाहीचा मार्ग आहे. 

समाजातील ८० % लोकांस विद्या प्राप्ती करणेस न देणे आणि त्यांना सामाजिक, आर्थिक व राजकीय गुलामगिरीत जखडून ठेवणे हे सर्व दिसत असता स्वराज्य, स्वराज्य म्हणून ओरडण्यात काय फायदा ? स्वराज्याचा फायदा सर्वांना मिळाला पाहिजे मागासालेल्या वर्गाच्या सर्वांगीण उन्नतीचा कार्यक्रम घेऊन पुढे आल्याशिवाय कोणताही पक्ष खऱ्या अर्थाने जनतेचे नेतृत्व करू शकत नाही हे सूर्यप्रकाशा एव्हढे स्पष्ठ आहे. 



संकलन - विवेक घाटविलकर
दि. २८ नोव्हेंबर २०१४ क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या १२४ व्या स्मृती दिनानिमीत्त विनम्र अभिवादन.

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ह्युजचे निधन

उसळता चेंडू डोक्याला लागल्याने कोमात गेलेला ऑस्ट्रेलियाचा झुंजार फलंदाज फिलिप ह्युज याचे आज भारतीय वेळेनुसार सकाळी निधन झाले. सिडनी येथील व्हिन्सेंट रुग्णालयात वयाच्या २५व्या वर्षीच त्याने अखेरचा श्वास घेतला. ह्युजच्या अकाली निधनामुळे क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सिडनी क्रिकेट ग्राउंडवर शेफील्ड शील्ड क्रिकेट स्पर्धेदरम्यान गोलंदाजाने टाकलेला उसळता चेंडू डोक्याला लागल्याने मंगळवारी ह्युज मैदानावरच कोसळला होता. ह्युजची प्रकृती परवापासून गंभीरच होती.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे व्यवस्थापकीय कार्यकारी संचालक पॅट होवार्ड यांनी सांगितले, 'आम्ही खेळाडूंशी बोलून त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. या कठीण स्थितीत खेळाडूंच्या पाठीशी उभे राहण्यासाठी खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांचे काउन्सिलिंग आम्ही सुरूच ठेवणा र आहोत. या कठीण काळात खेळाडू, क्रिकेटशी संबंधित सगळे जण ह्युजच्या कुटुंबियांसोबत आहोत.'

ह्युजला कसोटी सामन्यांसाठी संधी मिळण्याची शक्यता होती. 'न्यू साउथ वेल्स'चा गोलंदाज शॉन अॅबॉटच्या बाउन्सरवर हुक मारण्याच्या प्रयत्नात असताना चेंडू ह्युजच्या डोक्यावर आदळला. हेल्मेट परिधान करूनही त्याला चेंडूचा आघात सहन झाला नाही. तो तत्काळ मैदानावर कोसळला. त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

दरम्यान, शेफील्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धेची फेरी रद्द करण्यात आली आहे. व्हिक्टोरिया आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, क्वीन्सलँड आणि टास्मानिया यांच्यातील सामनेही रद्द करण्यात आले आहेत.

टूू द लास्ट बुलेट....

To The Last Bullet Book Cover
२६/११ च्या घटनेत एकंदर कामा हॉस्पिटल परिसरात नेमके काय घडले याबाबत वृत्तपत्रे, टिव्ही व ईतर मिडीया यात कुठेही ठळक तपशील नाही. किंबहुना अनेक वेळा "ईतक्या अनुभवी अन हुषार अधिकार्‍यांनी एकाच जागी एकत्र जायची चूक केली कशी"? असे निव्वळ संतापजनक अकलेचे तारे लोकांनी तोडलेले आपण ऐकलेले आहेत. नेमकी याचेच ऊत्तर शोधायचा ध्यास या पुस्तकातून समोर येतो.
विनीता कामटे लिहीतात-
"अशोकची साथ आता कायमची संपल्याचं दु:ख्ख आता माझ्या काळजात सलत होतं पण त्याहीपेक्षा ही घटना का घडली याची बोच माझ्या मनात अधिक होती. सात्वनाला येणारे सुध्धा अगदी सहजपणे, नकळत बोलून जात होते, "करकरे, कामटे, आणि साळसकर यांना स्थितीचं गांभीर्य कळलच नाही." या अशा वाक्यांनी मी मनातल्या मनात पेटून ऊठत होते. हे कसं शक्य आहे? हा प्रश्ण माझा पिच्छा सोडत नव्हता. एकीकडे हे तिन्ही अधिकारी एका रात्रीत सगळ्या देशाचे हिरो झाले होते. चौकाचौकात लोक त्यांचे फोटो लावून त्यांना अभिवादन करत होते. माझ्या मनात मात्र विचारांचं रणकंदन चालू होतं. हे तीनही अधिकारी एकाच वाहनात बसले अन अचानक झालेल्या गोळीबारात ठार झाले- असच चित्रं मुंबई पोलिसांकडून माध्यमांपुढे रंगवलं जात होतं.
मला ते मान्य नव्हतं. करकरे- त्यांची अत्यंत काटेकोर कार्यपध्धती आणि दूरदृष्टी यासाठी प्रसिद्ध होते. साळसकर एन्काऊंटर स्पेशालिस्ट होते. तर, तातडीने प्लॅनिंग करणे हा अशोकचा लौकीक होता आणि शस्त्राचा वापर करण्यात तो कमालीचा तरबेज होता असं असताना हे तिन्ही अधिकारी कुठलिही योजना न आखता किंवा थोडाही संघर्ष न करता मृत्त्यू स्विकारायला तयार होतील यावर विश्वास ठेवायला मी तयार नव्हते. मुंबई पोलिसांकडून मात्रं तसच भासवलं जात होतं"..
त्यावेळी मी मनाचा निर्धार केला "मी वाट्टेल ते कष्ट घेईन, पण या प्रकरणातलं सत्त्य शोधून काढीनच". देशासाठी वीरमरण पत्करणार्‍यांच्या बलिदानाचं पावित्र्य कायम राखण्यासाठी हे सत्त्य शोधून काढणं हे आपलं एकमेव कर्तव्य आहे असं माझं मन मला सांगत होतं."
लेखक - वनिता अशोक कामटे
संदर्भ- टूू द लास्ट बुलेट..(BOOK)

छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र Android वर

शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजीने एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.

रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासात त्यांना महत्त्वपूर्ण स्थान आहे.

बलात्कार... स्त्री अत्याचार थांबवण्याचे उपाय !!

आपल्या शाळांमध्ये, शिक्षण व्यवस्थेत आपण जी बैठक व्यवस्था करतो, त्यात मुले आणि मुली एकमेकांपासून वेगवेगळी बसवली जातात. मला वाटते, ही व्यवस्था बदलायला हवी. अगदी लहान वयाच्या मुलांपासून कोणत्याही वयाच्या मुलांपर्यंत सगळे शिक्षण पूर्ण होईपर्यंत मुलामुलींना एकत्र, एकमेकात मिसळून बसू दिले पाहिजे. लहान वयात मुलेमुली एकमेकात मिळूनमिसळून वागत वावरत असतात. पण ती वयात येऊ लागली की त्यांना एकमेकांपासून वेगळे केले जाते आणि मिसळू दिले जात नाही. याचा त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होतो. एकमेकांबद्दल परकेपणा येतो, दुरावा येतो, दुसरी जमात आपल्यापेक्षा वेगळी आहे असे वाटू लागते, गूढ आकर्षण वाटू लागते किंवा तिरस्कारसुद्धा वाटू लागतो. हा दुरावा भविष्यात वेगवेगळी रूपे घेतो.
स्त्री-पुरुष एकमेकांनी एकमेकांना जिंकण्याच्या वस्तू होऊन जातात. माणूस म्हणून एकमेकांची किंमत संपते आणि एकमेकांकडे नर-मादी म्हणून पाहिले जाऊ लागते. पुरुष ही दहशतीची बाब होते तर स्त्री ही नजरेने ओरबाडण्याची, संधी मिळाली तर बलात्कार करण्याची बाब होते. एकमेकांबद्दल दोघांच्याही मेंदूत अनेक प्रकारच्या विकृती निर्माण होतात, त्यातून कधीच न मिटणारा स्त्री-पुरुष वर्चस्वाचा झगडा सुरू होतो, प्रथम-दुय्यम सुरू होते, एकमेकांवर अन्याय अत्याचर करण्याचे प्रकार वाढतात. एकमेकात जगण्याच्या प्रत्येक मुद्द्याबाबत स्पर्धा निर्माण होते. एकमेकांबद्दलचा निकोपपणा, निरोगीपणा, निर्मळपणा संपतो. स्त्री-पुरुषांच्या सर्व नात्यांमध्ये आज जे जे बिनसलेले दिसते ते ते सगळे सुरू होते. हे सर्व थांबवायचे किंवा किमान कमी करायचे तर, स्त्री-पुरुषांना अगदी लहान वयापासून पुढच्या सर्व वयांपर्यंत मोकळेपणाने सर्वच ठिकाणी एकमेकात मिळू-मिसळू दिले पाहिजे.
पण आज शाळा शिकण्याचे प्रमाण वाढले आहे, त्यात मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष सहभागी होतात, तर किमान त्या ठिकाणी तरी स्त्री-पुरुषांना म्हणजेच मुला-मुलींना एकत्र, मिसळून बसू, वावरू दिले पाहिजे. त्याचे सकारात्मक परिणाम बरेच मिळतील. त्यातले काही ठळक असे स्त्रियांचे दुय्यमपण संपेल. स्त्रियांवरचे बलात्कार कमी होतील. एकमेकांकडे वासनाळपणे पाहणे कमी होईल. स्त्रियांवरचे अन्याय कमी होतील. मुला-मुलींचे परीक्षांमधले उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढेल. असे अनेक फायदे आहेत. शोधत जाऊ तेवढे सापडत जातील. सर्व देशात किमान शैक्षणिक ठिकाणी तरी या गोष्टीची अंमलबजावणी केली पाहिजे. त्याने स्त्री-पुरुषांचा समाज निश्चितच उन्नत होईल आणि देशही उन्नत होईल.
विचार- राजन खान

प्लास्टिकच्या कपात पॉयझनच!

घातक रसायनांमुळे कॅन्सर, अल्सर, त्वचारोगांसोबतच वंध्यत्वाचाही धोका...
धावपळीच्या दिनचर्येत फक्कड चहाचा एक घोटसुद्धा ताजेतवाणे करतो. पण, आपण हा चहा प्लास्टिकच्या कपात घेत असाल तर सावधान! प्लास्टिकच्या कपात सतत चहा किंवा गरम पदार्थ घेणे आरोग्याच्या दृष्टीने घातक आहे. गरम पदार्थांमुळे प्लास्टिकमधील घातक रसायने त्यात विरघळतात. पोटात जातात. आता तर प्लास्टिकच्या बाटलीतील औषधेही सुरक्षित नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. 

चहाचा घोट घेतल्यानंतर थोड्यावेळासाठी तरतरीत वाटत असले तरी त्यातून शरीरात जाणाऱ्या घातक रसायनांमुळे कॅन्सर, अल्सर आणि त्वचारोगांना आमंत्रण मिळते. प्लास्टिकची बाटली किंवा कपात बिस्फिनॉल-ए आणि डायथॉइल हॅक्सिल फॅलेट आदी घातक घटक आढळतात. गरम पदार्थाच्या संपर्कात आल्यास ते त्यात विरघळतात. प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिणेही आरोग्याच्यादृष्टीने घातक आहे. स्वच्छतेसाठी म्हणून बाटली वारंवार धुतली जाते. या धुण्याने त्यातील रसायने पाण्यात मिसळू लागतात. त्यातून शरीरात हार्मोन्सचे बॅलन्स बिघडते आणि कॅन्सर व त्वचा रोगांचा धोका वाढतो, असे रॉकलॅन्ड रुग्णालयाचे डॉ. एम. पी. शर्मा यांनी सांगितले. 

जेवढे गरम तेवढेच घातक खाद्य पदार्थांसाठी प्लास्टिकच्या भांड्यांचा वाढता वापर घातक आहे. सतत प्लास्टिकच्या कपातून चहा पिणे, प्लास्टिक बॉटल आणि प्लेट्सचा वापर करणे हे आरोग्याच्यादृष्टीने घातकच आहे. जेवढा गरम पदार्थ यात दिला तेवढी घातक रसायने झटपट मिसळतात. त्यातून येणारे काही रासायनिक पदार्थ हे डाऊन सिंड्रोम आणि काही मानसिक आजारांस कारणीभूत ठरतात. प्लास्टिकची बॉटल उन्हात गरम होत असेल तरी त्यातील पाणी पिणेही घातक आहे. त्यामुळे प्लास्टिकचे कप, बाटल्या, ताटांचा वापर शक्य तेवढा कमी ठेवणेच आरोग्याच्या हिताचे आहे, असे डॉ. दास यांनी सांगितले.
धन्यवाद : महाराष्ट्र टाईम्स

पुण्यातील मुलुखावेगळा रिक्षाचालक !

आजारपणात अथवा अपंगत्व असो मध्यमवर्गीय नागरिक सोय म्हणून रिक्षाचा वापर करतात. मात्र अनेकदा या रुग्णांच्या किंवा अपंग व्यक्तींच्या वाहतुकीसाठी रिक्षावाले तयार होत नाहीत, हा अनेकांचा अनुभव आहे. मात्र, पुण्यात एक रिक्षाचालक रुग्णांची आणि अपंगांची वाहतूक करायला कधीच नाही म्हणत नाही. तर उलट त्यांना मदत व्हावी या उद्देशाने, त्यांनी गेली अडीच वर्षे ही वाहतूक कोणताही मोबदला न घेता केली आहे.

अजीज इनामदार या जेमतेम ३५ वर्षे वयाच्या रिक्क्षाचालकाने हे रूग्णसेवेचे व्रत अंगीकारले आहे. याला कारण आहे त्यांच्यावर गुदरलेला प्रसंग. अजीज यांची पत्नी काही वर्षांपूर्वी पेरालिसिसने आजारी पडली आणि जादा सुट्ट्यांच्या कारणानं हातची नोकरीही गेली. जगण्यासाठी पैसा लागतो आणि त्यासाठी काहीतरी काम तर केलच पाहिजे म्हणून शेवटी इनामदार यांनी रिक्षा चालवायचा निर्णय घेतला. रिक्षा चालवून जे काही पैसे हातात पडतील त्यावर तीन मुलं, पत्नी असा पाच जणांच्या कुटुंबाचा गाडा इनामदार
हाकतात. मात्र, पत्नीच्या आजारपणात तिला रुग्णालयात नेताना त्यांना फार त्रास सहन करावा लागला. एकतर रुग्णालयात जायला लवकर वाहन मिळायच नाही, मिळालं तरी रिक्षावाले भाडं नाकारायचे. शेवटी अक्षरश: स्वत: उचलून घेत त्यांनी आपल्या आजारी पत्नीला अनेकदा रुग्णालयात नेले आहे. आपल्याबाबतीत जे झालं, ते इतर रुग्णांच्या बाबतीत होऊ नये असा निश्चय अजीज यांनी केला आणि मग त्यातून अजीज यांनी सुरू केली ही आगळीवेगळी समाजसेवा !

आपल्या रिक्षाच्या धंद्यातून वेळ काढत इनामदार आपल्या परिसरातील रुग्ण आणि अपंगांची मोफत वाहतूक गेल्या अडीच वर्षांपासून करत आहेत. यामध्ये आपल्याला समाधान मिळते असे ते सांगतात. अनेकदा गरीब रुग्णांकडे औषधासाठीही पैसे नसतात, तर वाहतुकीसाठी पैसे देणार कसे. अशांना या मोफत वाहतुकीमुळे खूप मोठा दिलासा मिळतो. त्यावेळेला त्यांच्या डोळ्यांतील समाधान माझ्यासाठी मोलाच आहे
असे इनामदार म्हणतात. तसेच इतर रिक्षाचालकांनीही रुग्ण आणि अपंगाची वाहतूक करणे न टाळता त्यांना मदत करावी असेही ते आवर्जूनपणे सांगतात.

ज्या गरजू रुग्णांना रुग्णालयात जायचं असेल, मेडिकल मध्ये जायचं असेल किंवा अपंगांना कोणत्या कामासाठी बाहेर जायचं असेल ते अजीज इनामदार यांना ९६५७८७८६१५ दूरध्वनीवरून संपर्क साधू शकतात. अनेकदा रिक्षावाल्यांना त्यांच्या सोईने भाडे हवे असतात, त्यामुळे प्रवासी आणि रिक्षाचालक यांच्यात नेहमीच वाद होतात. त्यातही रुग्ण, अपंग प्रवासी म्हटले की भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांच्या डोळ्यात अजीज इनामदारांनी आपल्या या मोफत सेवेच्या माध्यमातून झणझणीत अंजन घालत समाजसेवेच एक उदाहरणच घालून दिले आहे.

पर्यावरणामध्ये प्रत्येक गोष्टीला वेगळे महत्व आहे. आणि या महत्वपूर्ण गोष्टीमधील साप हा सुद्धा महत्वाचा घटक आहे.

आता पावसाळा सुरू होत आहे.या काळात जंगल जिवंत होऊन उठते.प्रत्येक प्राण्याच्या हालचाली वाढतात.त्यामध्ये सापाचाही समावेश होतो पण साप हा प्रकार मानवाच्या मनात इतक्या खोलवर भिती निर्माण करून बसला आहे की,एखाद्या व्यक्तीला समजवणे फार कठीण होते.याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या पूर्वजांच्या काळात दवाखाने,हॉस्पीटल,डॉक्टर उपलब्ध नव्हते.जंगले मोठी व घनदाट होती.लोकवस्ती लहान व घरे साधी होती.रस्ते व पायवाटा तितक्याशा उपलब्ध नव्हत्या यामुळे वन्यजीवांची प्रामुख्याने सापांच्या हालचाली जास्त होत होत्या.अशामुळे एखाद्या व्यक्तीला विषारी सर्पदंश झाला असावा.औषधोपचार उपलब्ध नसल्याने काही वेळात ती व्यक्ती मृत्यूमुखी पडली असावी.या घटनेमुळे तिथल्या लोकांमध्ये सापांविषयी भिती निर्माण झाली असावी व स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी दिसेल तो साप मारायला सुरूवात केली असावी.पुढे पिढ्यान्‌पिढ्या हि गोष्ट पसरत जाऊन संपूर्ण भारतभर अशा गोष्टींचा प्रसार झाला.

भारतामध्ये 278 जातीचे साप सापडतात.यापैकी फक्त 72 साप विषारी आहेत.महाराष्ट्रामध्ये 52 जातीचे साप सापडतात त्यापैकी फक्त 10 सापच विषारी आहेत.या 10 सापांपैकी मानवाचा फक्त 4 विषारी सापांसोबत सामना होतो.बाकीचे 6 साप खूप दूर्मिळ आहेत.पावसाळ्यामध्ये उंदिर,बेडूक,सरडे,पाली अशा प्राण्यांची संख्या व हालचाली वाढतात.परिणामी साप या भक्ष्यावर आकर्षित होऊन आपल्या घरापर्यंत येण्याची शक्यता असते.महाराष्ट्रामध्ये आढळणारे 52 जातीच्या सापांपैकी 42 साप बिनविषारी आहेत या सापांमधील काही दुर्मिळ जातीचे साप आपल्या घराजवळ येऊ शकतात पण हे साप बिनविषारी असून या सापांपासून मानवाला काही अपाय नसतो.पण सापांबद्दलची अनुवांशिक भिती शास्त्रीय अज्ञान व माहितीचा अभाव यामुळे लोक दिसेल तो साप मारून टाकतात.सापाला मारण्याची काहीच गरज नसते कारण साप कधीच मानवाला उगाच चावत नाही किंवा डूख धरत नाही किंवा मागावरही येत नाही.कारण सापांच्या मेंदूचा विकास झालेला नाही त्यामुळे त्यांच्या स्मरणात काहीच राहत नाही.सापांना आपली प्रतिमा कृष्णधवल दिसते.सापांना लांबी व रूंदी कळते.जाडी कळत नाही कारण,सापांची दृष्टी द्विमितीय असते.सापांना 6 फूटापलिकडे अंधूक दिसते त्यामुळे साप व्यक्ती ओळखू शकत नाही.यातही आता गावोगावी दवाखाने हॉस्पीटल झाले आहेत.प्रत्येक गावांमध्ये सर्पमित्र तयार झाले आहेत.त्यामुळे सापांपासून घाबरण्याचे कारण राहिलेले नाही.सापांबद्दलची माहिती आता डॉक्युमेंटरी,पुस्तके,जनजागृती कार्यक्रम,बॅनर्स,पोस्टर्स द्वारे दिली जाते यामुळे साप तितका भयावह प्राणी राहिलेला नाही.प्रत्येक माणसाने सापांना जाणून घेऊन त्यांची शास्त्रीय माहिती वाचली तर साप किती शांत व भित्रा प्राणी आहे हे लक्षात येते.
उपाय:
साप आपल्या घराजवळ येऊ नये म्हणून काय कराल ?
¤ घराजवळ पालापाचोळा साचू देऊ नका.भिंतीच्या भेगा व बिळे बुजवावीत.गोवय्रा व सरपणाची लाकडे घरापासून दूर व उंचावर ठेवावीत.
¤ शेतात किंवा घराबाहेर झोपताना शक्यतो जमिनीवर झोपू नये.कॉटचा पलंगाचा वापर करावा.खरकटे व कचरा घरापासून लांब अंतरावर टाकावा.
¤ पाळीव प्राणी,ससे,पोपट,कोंबड्या घरापासून दूर व उंचावर ठेवावेत.
- सदाफ कडवेकर

मी प्रथम भारतीय आणि अंतत: भारतीय !!

प्रत्येक राष्ट्राचा विकास हा त्या राष्ट्रातील नागरिकांच्या बहुआयामी विकासावर अवलंबून असतो. भारतासारख्या देशाला लागलेली जातीयतेची किड हा देशावरील सर्वात मोठा कलंक आहे. हा कलंक धुवून काढणे आणि जातीयता मुक्त भारत राष्ट्राची निर्मिती करणे हेच एकमात्र उद्दिष्ट घेऊन आकारास आलेल्या ‘कॅम्पेन फॉर कास्ट फ्री इंडीया’ या अभियानाचे भूमिकापत्र आम्ही आपणास सादर करित आहोत.
जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशाचे आपण नागरिक. आपला देश बदलत्या काळासोबत अधिकाधिक विकसित होण्यासोबतच येथील प्रत्येक नागरिक सुखी, समृद्धी आणि संपन्न व्हावा या इच्छेने प्रत्येकाचे मन तळमळत असते. परंतू सत्य परिस्थिती नेमकी याच्या उलट असल्याचे आपणास पहायला मिळत आहे. नानाविध धर्म, शेकडो पंथ, हजारो जाती समुहात विभागला गेलेला भारतीय समाज हा वरकरणी जरी एक वाटत असला तरी राष्ट्रीयत्वाच्या भावनेखाली त्यांचं एकत्रितपण अजूनही तितकेसे विकसित झालेले नाही हेच कटू सत्य आहे.

जातीयवादाच्या विषवल्लीने पोखरलेला येथील पुरातन समाज आजही जातीय विद्वेषाच्या पखाली बेमालूमपणे वाहताना आपण पाहत आहोत. गेल्या काही वर्षांत वेगाने कार्यन्वित झालेल्या कट्टर धर्मांध प्रवृत्ती, भांडवली संस्था विशेषकरून जातीयवादाला बळकटी देणाऱ्या आणि क्रोनी कॅपटलीझम चा पुरस्कार करणाऱ्या उद्योजक घराण्यांचा राजकारणातील वाढता हस्तक्षेप सोबतच जातीय अत्याचारांची वाढती प्रकरणे हे एका सशक्त समाजाचे उदाहरण असूच शकत नाही.

भारतीय समाज हा इतक्या गुंतागुंतीने विभागला जाण्याचे एकमात्र कारण म्हणजे इथली जातीव्यवस्था आणि जातीव्यवस्थेतून उगम पावलेली जात-वर्ग-पितृसत्ताकवादी मानसिकता. स्वातंत्र्याने पासष्टी प्रवेश केलेला असताना देखील देशातील जातीय असमानता आपण संपवण्यात अयशस्वी ठरलो आहोत. याला एकमात्र जबाबदार घटक ही जातीयताच आहे.

आज देशातील प्रत्येक नागरिक दुस-या नागरिका पासुन जातींमुळे दुर झाला आहे. त्यांच्यात उच्च-नीच, द्वेष आणि शत्रुत्वाची भावना निर्माण झाली आहे. समतामधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी प्रत्येकाच्या मनात बंधुत्वाची भावना निर्माण होणे गरजेचे आहे. त्यातूनच एकतेचे तत्व अंमलात आणले जाऊ शकते. देशातील राजकिय, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समस्यांना प्रभावीपणे सोडवण्यासाठी समता आणि समानतेचे तत्व आचरणात आणणे गरजेचे आहे

जो पर्यंत या देशात बंधुत्वाची भावाना रुजत नाही तोपर्यंत ईथे लोकशाही देखील ख-या अर्थाने रुजणार नाही व पर्यायाने या देशाचे राष्ट्रनिर्माण होऊ शकत नाही. जाती हि देशाच्या बंधुत्वाच्या पर्यायाने एकतेच्या-अखंडतेच्या आड येणारी कृत्रिम व्यवस्था आहे व राष्ट्रविरोधी देखील आहे. त्यामुळे जातीव्यवस्था नष्ट करणे हे प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतीयाचे आद्य कर्तव्य आहे. जातीमुक्त राष्ट्राची निर्मिती करणे हीच या अभियानाची मुख्य भूमिका आणि गाभा आहे. एका भारतीयाला दुस-या भारतीयापासुन दुर करणारी, त्यांच्यात बंधुत्वा ऐवजी शत्रुत्व निर्माण करणारी जातीव्यवस्था नष्ट करणे हि काही एका विशिष्ट जातीची नाही तर प्रत्येक राष्ट्रप्रेमी नागरीकाची जबाबदारी आहे.

‘कॅम्पेन फॉर कास्ट फ्री इंडिया’ हे अभियान देशभरातील तमाम समविचारी संघटनांना एकत्रित आणून एका किमान समान कार्यक्रमाअंतर्गत कार्यान्वित करण्यासाठी जबाबदार असणार आहे. जातिनिर्मूलनाच्या कार्यात सहभागी असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना जातीमुक्त समाजाच्या निर्मितीसाठी एका किमान समान कार्यक्रमावर एकत्र आणण्याची जबाबदारी हे अभियान उचलणार आहे.

येत्या काळात जातीय अत्याचारासंदर्भात असलेली उपाययोजना अत्यंत कठोर पद्धतीने राबवली जाण्यासाठी कराव्या लागणाऱ्या सर्व उपाययोजनांचा पाठपुरावा करण्याची भूमिका हे अभियान घेत असून जातीमुक्त भारत राष्ट्राच्या निर्मितीचा संकल्प आम्ही करत आहोत.
- Vaibhav Chhaya

त्यांच्या साहसाला सलाम...

आंध्रप्रदेशातील आदिवासी कुटुंबातील १३ वर्षिय पूर्णा ठरली एव्हरेस्ट शिखर सर करणारी सर्वात तरूण मुलगी. विशेष म्हणजे आपला आदर्श असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं छायाचित्रही तिने एव्हरेस्टवर सोबत नेलं होतं.

काही लोक बोभाटाच जास्त करतात आणि आदर्शांना कमीपणा आणतात. तर पूर्णा सारखी लहानगी आपल्या पराक्रमाने आदर्शांना मानवंदना देते. हे इथे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

मालवथा पूर्णा आणि साधनापल्ली आनंद कुमारया दोन मुलींनी आज एवरेस्ट हे जगातील सर्वोच्चशिखर गाठले. यातील एक आदिवासी तर दुसरी दलित. पूर्णा १३ वर्षाची व आनंद कुमार१६. एकीचे वडील शेतीकाम करतात तर दुसरीचे सायकल दुसृस्तीचे. दोन्ही आंध्र प्रदेशातील आहेत.

दोघींचे लक्ष्य आयपीएस अधिकारी बनणे आहे. निश्चितच ते आपले लक्ष्य प्राप्त करतील कारणत्यांचे आदर्श आहेत कर्तृत्वाचे हिमालय डॉ.बाबासाहेब आंबेडकर ! बाबासाहेबांची प्रतिमा घेऊन शिखराच्या टोकावर पोहचल्या.

अनेक सुखवस्तू दलित ब्राह्मणांना जयभीम म्हणायची लाज वाटते, भीमराजच्या बेटींनी जगातल्या सर्वोच्च शिखरावरून उच्चरवाने जयभीम ठोकला. त्यांच्या साहसाला सलाम आणि कोट्यवधी जीवांना प्रेरणा व शक्ती देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना शतकोटी अभिवादन !

"The world is very small", when Poorna spoke outthese words from atop Mount Everest, she capturedthe magnitude of achievement, an inspiring tale forgirls in India. At just 13 years and 11 months old, Malavath Poorna, daughter of farm labourers from Nizamabad district of Andhra Pradesh has becomethe youngest woman to scale Mount Everest, thehighest mountain peak in the world. On this uniquemission, she was accompanied by Sadhanapalli Anand Kumar, who is the son of a cycle mechanicfrom the state's Khamman district. They havebecome the first Dalits
to conquer the tallest peak.The teenagers, Poorna and Anand, symbolicallycarried photographs of Dr. BR Ambedkar andformer IAS officer SR Sankaran, and hoisted the National Flag at the top of the world. Aiming to be an IPS officer, Poorna, coming fromfamilies that struggle to simply survive to the topof the world is a long journey that would inspiremillions across the country.
Post By : Vishal Sonawane, Raj Asrondkar, Anand Gaikwad, Milind Patil

रिपोर्ताज.. Action Against Anti Social Facebookers

फेसबुक वर जे देशद्रोही विध्वंसक पोस्ट टाकतील आपले गृप मेंबर त्या पोस्टचा रिपोर्ट फेसबुक ला करणार जेणेकरून ती पोस्ट लागलीच डीलीट होणार. चला तर तर मग या समाजपरिवर्तानाच्या लढ्यात सहभागी होवूया... कोणत्याही आक्षेपार्य पोस्ट बाबत १६०० तक्रारी (रीपोर्ट) गेल्यास ५ मिनिटांत फेसबुक ती पोस्ट काढून टाकते. त्यासाठी कोणत्याही आक्षेप असणारया पोस्ट ला लाईक किंवा शेअर करण्याऐवजी रिपोर्ट करा.

रिपोर्ताज.. Action Against Anti Social Facebookers गृप-

https://www.facebook.com/groups/294227280751104/

गृप प्रमुख (ADMIN)-

१ प्रदीप बोरगे.
२ निलेश कळसकर.

३. वैभव छाया.
४. अभिषेक ठमके.

चला जनप्रबोधन करुया । झोपलेल्याना जागे करू या ।।

दंगली रोखण्याचे नामी अस्त्र !!

दंगली रोखण्याचे नामी अस्त्र !!
 

दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वादग्रस्त जातीय हिंसाचार प्रतिबंधक विधेयकास केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या वर्षी मंजुरी दिली होती. पण हे विधेयक सध्या सुरू झालेल्या संसदेच्या अधिवेशनात विरोधकांच्या दबावामुळे चर्चेसाठी पुढे ढकलण्यात आले. बहुधा हे विधेयक तीन महिन्यांनी येणा-या नव्या सरकारला चर्चेस घ्यावे लागेल.

 



या विधेयकावर मंत्रिमंडळात मंजुरीची मोहोर उमटवताना काही वादग्रस्त तरतुदी सरकारने मागे घेतल्या आणि काहींमध्ये सहमतीने बदलदेखील केले होते. उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर दंगलीनंतर जर हा कायदा आला असता तर बरे झाले असते, असादेखील सूर यानिमित्ताने आळवला गेला. राज्यघटनेने कायद्याद्वारे अनु. जाती, अनु.जमाती त्याचबरोबर अल्पसंख्याक समुदायाचे न्यायिक संरक्षण करण्याचे कर्तव्य राज्य सरकारने पार पाडावे, असे गृहीत धरलेले आहे. या विधेयकाच्या निमित्ताने हिंसेची परिभाषा आणि सरकारी कर्मचा-यांनी हिंसक घटनेदरम्यान आपल्या कर्तव्यात केलेली कसूर आणि त्याबद्दल त्यांना असलेली शिक्षेची तरतूद पुन्हा नव्याने अधोरेखित केली आहे. या विधेयकात नेमका पेच आहे तो केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या हक्कांबाबतचा.

 



कायदा आणि सुव्यवस्था या गोष्टी त्या-त्या राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असतात, परंतु जर कायदा सुव्यवस्था नियंत्रणात न राहिल्यास ती सुरळीत करण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्यास केंद्र सरकारला त्यात हस्तक्षेप करण्याची मुभा देण्यात आली आहे. हे विधेयक संसदेत येणार म्हटल्यावर साहजिकच त्याला काही घटकांनी विरोधसुद्धा केला. 2011मध्ये राष्‍ट्रीय एकता परिषदेची 13वी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सदर विधेयकावर साधक-बाधक चर्चा करण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीला त्या वेळेस पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी गैरहजर राहून आपला विरोध जाहीर केला होता. या गैरहजर मुख्यमंत्र्यांमध्ये एक नाव होते नरेंद्र मोदी यांचे! मोदी यांचा विरोध या विधेयकास का आहे, हे वेगळे सांगायची गरज नसावी; कारण गोध्रा हत्याकांडाचा जळजळीत इतिहास त्यांच्या गाठीशी आहे. अनेक पंथांत, धर्मांत आणि संस्कृतीत विभागलेल्या आपल्या देशाला जातीय दंगली या फार काही नवीन नाहीत. अल्पसंख्याक समुदाय हे धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक कशाही प्रकारचे असू शकतात. त्यामुळे एखादा कायदा अथवा नियम बनवताना अल्पसंख्याक घटकांवर कुठलाही अन्याय होऊ नये याची जबाबदारी घेणे, हे सरकारचे कर्तव्यच आहे; कारण हा घटकसुद्धा आपल्या देशाचा घटनादत्त ‘सार्वभौम’ नागरिक आहे, हे विसरता कामा नये. जातीय समीकरणाच्या राजकारणात येथील लबाड राजकारण्यांनी विशिष्ट समुदायाला कायम आपल्या धाकात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सत्तेची गणिते जुळवण्यासाठी प्रसंगी जातीय दंगली घडवून आणण्याचे कारस्थानसुद्धा झाल्याचे आढळते. या विधेयकानुसार जर हिंसापीडित व्यक्ती वा समुदायाने आरोप केला असेल, तर पीडिताने साक्ष देण्याऐवजी ज्यावर आरोप केला गेला आहे त्याने आपण निर्दोष नाही, हे सिद्ध करून दाखवायला हवे, अशी तरतूद आहे. आजपर्यंत झालेल्या जातीय हिंसाचारातील पीडितांची आकडेवारी पाहिली की 80-90 टक्के दंगलपीडित हे मुसलमान अथवा खिश्चन राहिलेले आहेत. बहुधा अशा प्रसंगी पोलिस प्रशासन व्यवस्थादेखील बहुसंख्येच्या बाजूने उभे राहिलेले आपण पाहिलेले आहेत.

 


हा कायदा मुळात हिंदू-मुस्लिम असा भेदभाव करीत नाही. जो समुदाय बहुसंख्य असेल, तर तो समुदाय हिंसक घटनेला जास्त जबाबदार असेल, असे यात स्पष्ट केले होते; परंतु प्रत्येक घटनेत बहुसंख्य समाजाला जबाबदार धरता येणार नाही, जर या विधेयकाप्रमाणे कारवाई झाली तर अल्पसंख्याक वर्गातील उपद्रवी घटक याचा फायदा उचलू शकतात. हा विचार करून विरोधकांनी विरोध केल्यावर या तरतुदीत सुधारणा करून सर्व गट किंवा जमातींना तटस्थ भूमिका घेण्यास सांगितले आहे. तसेच जातीय हिंसाचाराबाबत केंद्र सरकारचे हस्तक्षेप करण्याचे अधिकारदेखील कमी करण्यात आले आहेत, जेणेकरून राज्याच्या अंतर्गत घडामोडींवर केंद्र सरकारचा अधिक्षेप राहणार नाही.या विधेयकाला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संमत करून काँग्रेस अल्पसंख्याक समुदायाची मते मिळवू पाहते आहे, त्यांना याचा फायदा करून घेत येतो की नाही, हे येणारा काळ सांगेलच; परंतु हिंदुत्वाच्या वाटेवर स्वार होऊन दिल्ली काबीज करण्याची मनीषा बाळगत भाजपदेखील या विधेयकाचे राजकारण करेल, हे नक्की. या विधेयकातील कौतुकास्पद बाब ही की, देशात जातीय सलोखा निर्माण व्हावा यासाठी ‘राष्‍ट्रीय सांप्रदायिक सद्भाव प्राधिकरणा’चा प्रस्तावदेखील मांडण्यात आला आहे. या प्राधिकरणात सातपैकी चार सदस्य हे अल्पसंख्याक समुदायाचे असणार आहेत आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षदेखील! त्यामुळे या समुदायावर अन्याय होणार नाही, याची मात्र हमी देता येते.

 



विरोधकांचे म्हणणे आहे की, मुस्लिम व अ.जा./अ.ज. यांच्यामध्ये संघर्ष झाल्यास हे विधेयक अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम समाजाची बाजू घेईल आणि अ‍ॅट्रॉसिटीसारखे दलित अत्याचार प्रतिबंधक कायदे निष्फळ ठरतील. या प्रकरणावर चर्चा करताना प्रस्तावित विधेयकातील कलम 6 नुसार पीडितांवरील अत्याचाराचे गुन्हे हे अ‍ॅट्रॉसिटीमध्ये प्रविष्ट गुन्ह्यांपेक्षा वेगळे असतील हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनु. जाती, जमातींना दिलेली कायद्याची ही कवच-कुंडले कुचकामी ठरणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अगदी स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या तत्त्वावर आधारलेली राज्यघटना बदलण्याची भाषा करणा-या भाजपचा या विधेयकाला विरोध राहणार हे सत्ताधा-यांनाही गृहीत धरलेले आहे. देशामधील जातीय सलोख्याला धोका उत्पन्न होण्याची भीती व्यक्त करून भाजप संसदेत या कायद्याला विरोध करेलच, परंतु कुंपणच जर शेत खायला लागलं, तर न्याय मागायचा कुणाकडे? या प्रश्नाचे उत्तर बाबरी मशीद पाडल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीकडे पाहिले की लक्षात येते.

 



एकीकडे विकासाची कास धरत महासत्ता बनू पाहणारा भारत जातीय हिंसाचार प्रतिबंध कायदा करतो हेच खरे आपल्या मागासलेल्या विचारांचे दर्शन आहे. आधुनिकीकरणाचा मार्ग स्वीकारलेला आपला देश आजही जातीय पाळेमुळे घट्ट करण्यात गुंतलेला आढळतो आणि म्हणून मग शेवटी कायद्याचा धाक दाखवण्यासाठी अशी विधेयके येत असतात. पुरोगामी विचारांचा वारसा जपत असलेला आपला देश, विकास म्हणजे विवेकाची कास धरणारी समृद्धी अशी संकल्पना मांडतो; परंतु याच देशात जेव्हा धर्माच्या, जातीच्या नावावर विवेकाचा खून होतो, तेव्हा या प्रकरणातील गांभीर्य जाणवते. संसदेमध्ये या विधेयकावर साधक-बाधक चर्चा होणार आहेच, पण त्याचबरोबर एकंदरीत भारतीय समाजव्यवस्था, किचकट जातीय समीकरणे आणि त्याचे राजकारण याचा विचार करून या कायद्याबद्दल सामान्य नागरिकांमध्येही चर्चा होणे तेवढेच गरजेचे आहे. प्रशासकीय आणि शासकीय अनास्थेपोटी साध्या क्षुल्लक घटनांवरूनही दंगली घडल्याची धुळे दंगलीसारखी उदाहरणे आपल्याकडे आहेत, तेव्हा येत्या काळात अशा विघातक घटना घडू नयेत यासाठी कायद्याचा वचक असणे तेवढेच क्रमप्राप्त आहे.

 



संदर्भ- http://­divyamarathi.bhaskar.­com/article-srh/­EDT-article-on-anti-c­ommunal-violence-bil­l-by-sagar-bhalerao-­4514424-NOR.html

 



धन्यवाद- दै. दिव्यमराठी

 


लेखंक- सागर भालेराव. Er Sagar Bhalerao (sagobhal@gmail.com)

वाचा आपण कधीही न वाचलेला बाबासाहेबांचा इतिहास !!

वाचा आपण कधीही न वाचलेला बाबासाहेबांचा इतिहास !!



जगात आपलं नाव गिनिज बुकात नोंद व्हावे म्हणून कुणी-कुणी काय-काय उपद्व्याप केले आहेत होते हे आपण पाहतो ऐकतो.... पण जगाच्या पाठीवर ग्रथांसाठी (पुस्तकांसाठी) खास घर बाधंणारी एकच महान अशी व्यक्ती होवून गेली ती व्यक्ती म्हणजे विद्येचे व्यासंगी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 




डॉ. बाबासाहेबांच्या हिंदु क़ॉलनीतील राजगृह ह्या वास्तुतील ग्रंथसंग्रह पुढीलप्रमाणे...

 



कायदा या विषयावरील - ५०००

 

ग्रंथ राजकारण या विषयावरील - ३०००

 

ग्रंथ इतिहास या विषयावरील- २५०० ग्रंथ

 

धर्म या विषयावरील - २०००

 

ग्रंथ साहित्य याविषयावरील- १३००

 

ग्रंथ चरित्रे याविषयावरील- १२०० ग्रंथ

 

अर्थशास्त्र या विषयावरील- १२००

 

ग्रंथ तत्वज्ञान या विषयावरील- ६००

 

ग्रंथ युद्धशास्त्र याविषयावरील- ३००

 

ग्रंथ आणि इतर ग्रंथ ७९००

 



असे डॉ. बाबासाहेबांनी एकूण २५००० ग्रंथ वाचले. म्हणून अशा या महामानवाला प्रज्ञासुर्य, विद्येचे डॉक्टर, बोधिसत्व, प्रकांड पंडीत असे म्हणतात.

 



पंडित मदनमोहन मालवीय यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे असलेला आपण दाखविलेला हा ग्रंथसंग्रह दोन लाख [आताच्या हिशेबात वीस कोटी] रुपयांना विकत घ्यायची इच्छा व्यक्त केली होती. बाबासाहेबांनी ती अमान्य तर केलीच. परंतु, त्यावेळेला त्यांनी जे उत्तर दिले, ते त्यांच्यातील ज्ञान, तपस्वीपणाची साक्ष देणारे ठरले. ते म्हणाले ग्रंथसंग्रह जाणे म्हणजे माझ्या कुडीतून प्राण जाण्यासारखे आहे. ग्रंथ म्हणजे त्यांच्या जीवनाचा श्वासोच्छवास होता. हे त्यांनी जमवलेल्या ग्रंथावरुन सिध्द होते. हे सांगणे एवढ्यासाठीच महत्वाचे आहे की जीवनामध्ये त्यांनी ज्या तत्वज्ञानाचा अंगीकार केला त्याला केवढा मोठा भक्कम पाया या ग्रंथातून मिळाला होता हे लक्षात येते.

 



नोट- ही पोस्ट जास्तीत-जास्त शेअर करा... कळू द्या सारया मनुवाद्यानां... सारया जगाला...

 



धन्यवाद - Harish Narayan Kadam , Shriram Pawar sir

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...