
भारतामध्ये 278 जातीचे साप सापडतात.यापैकी फक्त 72 साप विषारी आहेत.महाराष्ट्रामध्ये 52 जातीचे साप सापडतात त्यापैकी फक्त 10 सापच विषारी आहेत.या 10 सापांपैकी मानवाचा फक्त 4 विषारी सापांसोबत सामना होतो.बाकीचे 6 साप खूप दूर्मिळ आहेत.पावसाळ्यामध्ये उंदिर,बेडूक,सरडे,पाली अशा प्राण्यांची संख्या व हालचाली वाढतात.परिणामी साप या भक्ष्यावर आकर्षित होऊन आपल्या घरापर्यंत येण्याची शक्यता असते.महाराष्ट्रामध्ये आढळणारे 52 जातीच्या सापांपैकी 42 साप बिनविषारी आहेत या सापांमधील काही दुर्मिळ जातीचे साप आपल्या घराजवळ येऊ शकतात पण हे साप बिनविषारी असून या सापांपासून मानवाला काही अपाय नसतो.पण सापांबद्दलची अनुवांशिक भिती शास्त्रीय अज्ञान व माहितीचा अभाव यामुळे लोक दिसेल तो साप मारून टाकतात.सापाला मारण्याची काहीच गरज नसते कारण साप कधीच मानवाला उगाच चावत नाही किंवा डूख धरत नाही किंवा मागावरही येत नाही.कारण सापांच्या मेंदूचा विकास झालेला नाही त्यामुळे त्यांच्या स्मरणात काहीच राहत नाही.सापांना आपली प्रतिमा कृष्णधवल दिसते.सापांना लांबी व रूंदी कळते.जाडी कळत नाही कारण,सापांची दृष्टी द्विमितीय असते.सापांना 6 फूटापलिकडे अंधूक दिसते त्यामुळे साप व्यक्ती ओळखू शकत नाही.यातही आता गावोगावी दवाखाने हॉस्पीटल झाले आहेत.प्रत्येक गावांमध्ये सर्पमित्र तयार झाले आहेत.त्यामुळे सापांपासून घाबरण्याचे कारण राहिलेले नाही.सापांबद्दलची माहिती आता डॉक्युमेंटरी,पुस्तके,जनजागृती कार्यक्रम,बॅनर्स,पोस्टर्स द्वारे दिली जाते यामुळे साप तितका भयावह प्राणी राहिलेला नाही.प्रत्येक माणसाने सापांना जाणून घेऊन त्यांची शास्त्रीय माहिती वाचली तर साप किती शांत व भित्रा प्राणी आहे हे लक्षात येते.
उपाय:
साप आपल्या घराजवळ येऊ नये म्हणून काय कराल ?
¤ घराजवळ पालापाचोळा साचू देऊ नका.भिंतीच्या भेगा व बिळे बुजवावीत.गोवय्रा व सरपणाची लाकडे घरापासून दूर व उंचावर ठेवावीत.
¤ शेतात किंवा घराबाहेर झोपताना शक्यतो जमिनीवर झोपू नये.कॉटचा पलंगाचा वापर करावा.खरकटे व कचरा घरापासून लांब अंतरावर टाकावा.
¤ पाळीव प्राणी,ससे,पोपट,कोंबड्या घरापासून दूर व उंचावर ठेवावेत.
- सदाफ कडवेकर
- सदाफ कडवेकर
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!