एड्सबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस वर्ल्ड एड्स डे म्हणून पाळण्यात येतो. त्यानिमित्त राज्यासह मुंबईतील एचआयव्हीबाधित पेशंटांची परिस्थिती, उपचारांच्या नवीन पद्धती, आखलेल्या योजना यावर यानिमित्ताने टाकलेला हा फोकस.
राज्यासह मुंबईतील एचआयव्हीबाधित पेशंटची संख्या घटत असल्याचे सकृतदर्शनी दिसून आले आहे. येत्या २०३० सालापर्यंत महाराष्ट्र राज्य एड्समुक्त करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून एड्सची चाचणी व उपचार यांच्यातील दरी दूर करण्यासाठी बांधकाम मजूर, स्थलांतरित मजूर, ट्रक ड्रायव्हर, रिक्षा व टॅक्सी चालक आणि मालक यांच्यासोबत संयुक्त मोहीम राबवण्यात येणार आहे.
एड्सबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस वर्ल्ड एड्स डे म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीच्या वतीने भविष्यात राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देण्यात आली. २०३० सालापर्यंत महाराष्ट्र एड्समुक्त करण्यासाठी समाजातील विविध स्तर व घटकांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. कौन्सिलिंगबरोबर चाचणी, उपचार, जागृती आणि जीवनशैलीशी निवडीत सुविधा देण्यावर भर देण्यात येणार असल्याचे राज्य एड्स नियंत्रण सोसायटीचे प्रकल्प संचालक खुशालसिंह परदेशी यांनी सांगितले. राज्यात राबवण्या येणाऱ्या या मोहिमेत उसतोडणी कामगार, स्थलांतरित मजूर व विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याचा मुख्य उद्देश आहे. तसेच एसआयव्हीबाधितांची समाजिक स्थिती समजावून घेणे, त्यांची माहिती ठेवणे, त्यांच्या संक्रमणाचा अभ्यास करणे यांचा समावेश आहे.
मध्यंतरी कोल्हापूरमध्ये उसतोडणी व साखर उद्योगातील कामगारांमध्ये प्रायोगित तत्त्वावर एक मोहीम राबवण्यात आली होती. त्यात उसतोडणी कामागारांची एचआयव्ही चाचणी व आवश्यक्ता भासल्यास उपचार देण्यात आले. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. त्याचधर्तीवर बीड, उस्मानाबाद, लातूर, औरंगाबाद व राज्यातील इतर जिल्ह्यातही हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.
राज्यातील आकडेवारी राज्यात ऑक्टोबर, २०१४मध्ये ११ लाख ७३ हजार ३७३ जणांची एचआयव्ही चाचणी. त्यापैकी १७ हजार ७४४ जण पॉझिटिव्ह २०१३-२०१४मध्ये राज्यात १७ लाख ७७ हजार ९३५ जणांची एचआयव्ही चाचणी. त्यात ३१,०८२ पॉझिटिव्ह मुंबईसह राज्यातील एचआयव्हीचे संशयित पेशंट ३ लाख ७४ हजार ३७५ कायमस्वरूपी एचआयव्हीच्या उपचारांवरील औषधे घेणाऱ्या राज्यातील पेशंटची संख्या - १ लाख ४७ हजार ६९० आणि मुंबईतील संख्या - ३० हजार ४५ एड्सवरील उपचारांसाठी राज्यात सध्या १५५ एआरटी सेंटर. त्यात वाढ करून ७० सेंटर करण्याची योजना
स्थलांतरित मजुरांवर लक्ष केंद्रीतया व्यतिरिक्त स्थलांतरित मजुरांवरही लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. स्थलांतरित मजूर हे एचआयव्ही एड्सची चाचणी करताना मुंबई किंवा हॉस्पिटलच्या जवळपासचा निवासी पत्ता देतो. पण प्रत्यक्षात पेशंट त्या ठिकाणी राहात नाही. त्यामुळे तो पेशंट उपचार घेतो अथवा नाही त्याची माहिती मिळत नाही. मूळ गावी पेशंट गेल्यास त्याला उपचार घेता येतील, यासाठी एड्स जिल्हा नियंत्रण केंद्राला पेशंटची माहिती दिली जाईल. त्याला ट्रॅकिंग सिस्टीम असे नाव देण्यात आले आहे.
आरटीओचीही मदतएचआयव्ही चाचणी व उपचार यांच्यातील दरी दूर करण्यासाठी आरटीओच्या मदतीने रिक्षा व टॅक्सी चालक व मालक यांच्या युनियन, ट्रकचालक यांना सोबत घेऊन एक मोहीम राबवण्यात येईल. पुढील दोन-तीन महिन्यांत हा उपक्रम सुरू होईल, असे मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीच्या संचालक डॉ. श्रीकला आचार्य सांगतात.
तीन एआरटी सेंटरएड्सवरील उपचारांसाठी मुंबई महानगर पालिकेच्या हॉस्पिटलध्ये तीन नवीन एआरटी सेंटर सुरू करण्याची योजना आहे. सध्या पालिकेच्या १२ हॉस्पिटलांमध्ये एआरटी सेंटर आहेत. पालिकेने आता राजावाडी, वांद्रे भाभा व शिवडीच्या टीबी हॉस्पिटलमध्ये नवीन एआरटी सेंटर सुरू करण्यात येणार आहेत.
खलाशांसाठी तपासणी केंद्र
जहाजावर नोकरी करणाऱ्या खलाशांच्या तपासणीसाठी पालिकेने एचआयव्ही तपासणी सेंटर सुरू करण्याची योजना आखली आहे. मुंबई सी फेअरर हॉस्टेल आहे. या ठिकाणी तपासणी केंद्र सुरू करण्याची योजना आहे. जहाजांवर काम करणारे खलाशी अनेक महिने कुटुंबापासून दूर असतात. त्या काळात लैंगिक संबंधांची शक्यता बळावते. त्यामुळे त्यांच्यातील आरोग्यविषयक जनजागृतीसाठी हे केंद्र सुरू होणार आहे.
गर्भवती महिलांसाठी नवीन नियमावली
वैद्यकीय क्षेत्रात अलिकडेच नवीन नियमावली लागू केली आहे. त्यानुसार एखादी गर्भवती एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्यास तिला चौथ्या महिन्यापासून औषधे दिली जातात. ज्यामुळे विषाणूचा संसर्ग कमी होतो. तसेच अर्भकांना जन्मानंतर सहा आठवडे सिरप दिले जाते. दीड महिन्यानंतर अर्भकाची तपासणी केली जाते. यात जर अर्भक एचआयव्हीबाधित आढळून आल्यास त्याच्यावर उपचार केले जातात. पण चौथ्या महिन्यात गर्भवती महिलेला औषध देण्यास सुरुवात केल्यामुळे विषाणूंचा धोका कमी होत आहे.
यंदाची संकल्पना
राज्यासह मुंबईतील एचआयव्हीबाधित पेशंटची संख्या घटत असल्याचे सकृतदर्शनी आढळून आले आहे. त्यामुळे २०१५ साली हे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्न करण्यावर सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे.
- महाराष्ट्र टाईम्स
http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/HIV-AIDS/articleshow/45329922.cms

No comments:
Post a Comment
धन्यवाद !!