राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये दुसरया आलेल्या P.S.I झालेल्या रुपाली गोरड यांची संघर्षपूर्ण सत्यकहाणी नक्की वाचा / सोबत दिलेली VIDEO लिंक देखील बघा!!
कोल्हापूर प्रेमासाठी वाट्टेल ते करणारी माणसं आपण पाहिली आहेत. मात्र प्रेमविवाह केला म्हणून सासऱ्याचा खून झाल्यानंतर भीती, तणावात जगून त्यावर पोलिस अधिकारी होऊन मात मिळवणाऱ्या रुपालीची कथा काही औरच आहे. मनात एखादी गोष्ट आणली तर जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ती सिद्ध करु शकतो, याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे कोल्हापूरची रुपाली गोरड.
अतिशय प्रतिकूल परिस्थिती असतानाही रुपाली गोरड यांनी पोलिस अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगलं. मात्र अशा स्थितीतही राज्यसेवा आयोगाच्या परीक्षेत मुलींमध्ये दुसरी येण्याचा मान रुपाली गोरड यांनी मिळवला. दोन बाय चारच्या खोलीत राहून आणि आपला संसार सांभाळत रुपाली आज या ठिकाणी पोहोचल्या आहेत. या प्रवासात त्यांना त्यांचे पती धनंजय गोरड यांची मोलाची साथ आहे.
पण या प्रवासाची सुरुवात कशी झाली तो क्षण अतिशय भेदक आणि मनाला चटका लावणारा आहे. रुपाली आणि धनंजय एकाच गावचे, एका गल्लीतले. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम. पण जातीने घात केला आणि घर पारखं झालं. मात्र याची किंमत त्यांना भोगाली. त्यांच्या सासऱ्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर कुटुंबियांनी धनंजय आणि रुपालीला कोल्हापूरला धाडलं. दोघांचा संसार सुरु झाला. पण सासऱ्यांच्या हत्येची जखम रुपाली आणि धनंजयच्या मनात ताजी होती..
पोलीस दलात सामील व्हायचं दोघांचंही स्वप्न होतं आणि धनंजय यांनी त्यासाठी रुपालीला पाठिंबा दिला. स्वत: छोट्या-मोठ्या नोकऱ्या करत घराला, कुटुंबाला आधार देत राहिले.
रुपाली यांच्या अभ्यासात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी धनंजय जीवाचं रान करत होते. लहान मुलीला सांभाळणं, तिला खाऊ-पिऊ घालणं सगळी कामं धनंजय स्वत: करायचा. घराची स्टडी रुम झाली होती. कॉटखाली, कॉटवर इतकंच नाही तर बंद पडलेल्या फ्रीजमध्येही पुस्तकं. पुस्तकांनीच दोघांचं आयुष्य बदललं.
प्रेम आंधळं असतं असं म्हणतात. कदाचित ते खरं असावं नाहीतर आयुष्यात इतकी मोठी किंमत मोजूनही झगडा देण्याचं बळ क्वचित कोणाच्या हातांना येईल.
खालील VIDEO लिंक ओपन करून नक्की बघाचं मित्र-मैत्रिणीनो...
http://www.youtube.com/watch?v=hRNSWnCKdiY
संदर्भ- http://abpmajha.newsbullet.in/maharashtra/pune/31711
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!