भ्रष्टाचाराच्या भस्मासुराविरुद्ध लढणारे जळगावचे योद्धा पुरूष - नरेंद्र पाटील !!

भ्रष्टाचाराच्या भस्मासुराविरुद्ध लढणारे जळगावचे योद्धा पुरूष - नरेंद्र पाटील !! 


हे आहेत माझे नगरसेवक आणि आमच्या जळगाव(खान्देश, महाराष्ट्र) येथील नगरसेवक नरेंद्रअण्णा पाटील. नरेंद्रअण्णा भ्रष्टाचाराविरुद्ध नेहमी एका योध्यासारखा एकाकी लढा देत असतात. नरेंद्रअण्णा यांनी आतापर्यंत जळगाव घरकुल घोटाळा, वाघूर धरण घोटाळा , जिल्हा बँकेत ५५५ कोटींचा अपहार (जे.डी.सी.सी बँक घोटाळा),  जळगाव विमानतळ घोटाळा, नूतन मराठा कॉलेज घोटाळा. असे अनेक घोटाळे माहिती अधिकार आणि भारतीय न्यायलयांच्या सहाय्याने बाहेर काढले. हे घोटाळे नुसते बाहेर काढले नाही तर या घोटाळ्यांचा पाठपुरावा केला. या घोटाळ्यात जळगाव जिल्ह्याचे बडेमांसे गुंतलेले असल्यामुळे पोलिसांवर ही राजकारण्यांचा दबाव पडू लागलां त्यामुळे पोलीस या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करायला देखील तयार नव्हती. तेव्हा नरेंद्रअण्णा पाटील यांनी हार न मानता याविरुद्ध न्यायालयात दाद मागीतेली आणि आपल्या भारतीय न्यायालयाने नरेंद्रअण्णा पाटील यांना न्याय दिला व ठणकावून सांगितले या लोकांविरुद्ध गुन्हे दाखल करा.


 

पोलिसांनी गुन्हे दाखल करणाऱ्या आरोपीमध्ये जळगावचे विद्यमान आमदार सुरेश जैन , जळगावचे पालकमंत्री गुलाबराव देवकर , जळगावचे माजी महापौर प्रदीप रायसोनी , खान्देश बिल्डर्सचे संचालक मेजर वाणी, राजा मयूर , यांच्यासह  50 गुन्हेगारांवर गुन्हे दाखल झालेत. यामध्ये जळगावचे अनेक प्रतिष्टीत नगरसेवक आहेत. विशेष न्यायालयाने सर्व 50 आरोपींवर फौजदारी स्वरूपाचे भादंवि कलम 120 ब (कट कारस्थान), कलम 406 (विश्वासघात व सार्वजनिक निधीचा अपहार), 409 (नगरपालिकेची फसवणूक), कलम 420 (घरकूल घोटाळा करण्यासाठी परस्परांना मदत करणे), कलम 109 ( गुन्हा करण्यासाठी संगनमत करणे), 34 (कटकारस्थान करणे) यास्वरुपात गुन्हे दाखल केले आहेत. यासह खटल्यातील आरोपी प्रदीप रायसोनी, तत्कालीन नगराध्यक्ष, नगरसेवक व मुख्याधिकारी यांना न्यायालयाने लोकसेवक असल्याचे मान्य केल्याने त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 13 (ए) ड प्रमाणे फौजदारी स्वरुपाचे गैरवर्तन म्हणून स्वतंत्र गट पाडून प्रत्येकाच्या गुन्ह्यातील सहभागानुसार आरोप निश्चित केले.


 

आ. सुरेश जैन यांचे जळगाव शहराच्या राजकारणावर सुमारे ३० वर्षांपासून जवळपास एकछत्री वर्चस्व आहे. २००१च्या लोकनियुक्त नगराध्यक्षांच्या निवडणुकीत मिळालेला धक्का वगळता दादा गटाने निरंकुशपणे सत्ता उपभोगली आहे. दरम्यान, तत्कालीन नगरपालिका बरखास्तीसह अनेकदा या गटाला हादरे बसले तरी ते पचवण्याची क्षमताही त्यांच्याकडे असल्याचे जगाला दिसून आले आहे. यासाठी आ. सुरेश जैन यांच्या पाठीशी असणारे आर्थिक पाठबळ, बदलत्या परिस्थितीचा वेध घेण्याची दृष्टी, राजकीय चाणाक्षपणा या गुणांचा महत्वाचा वाटा आहे. याहूनही सर्वात महत्वाची बाब म्हणजे ‘७ शिवाजीनगर’ यांच्याकडे अगदी विरोधकालाही ‘मॅनेज’ करण्याची अफलातून क्षमता आहे. यामुळे आ. जैन यांच्या अनेक समर्थकांनी त्यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. या प्रत्येक आव्हानाला ते पुरून उरले. एवढेच नव्हे तर प्रत्येक विरोधकाला आपलेसे करण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे नगरपालिका आणि महापालिकेतील विरोधकांमध्ये फुट पाडून आपल्याला हवे ते ठराव पारित करण्याचा फंडाही अनेकदा वापरण्यात आला. एकंदरीत पाहता नगरपालिका आणि मनपातील अगदी विरोधकांनाही खेळविण्याची अद्भूत ‘कामगिरी’ आ. सुरेश जैन यांच्या गटाने पार पाडली आहे. या सर्व प्रकारात त्यांना विरोध करण्याचे धाडस फक्त नरेंद्र भास्कर पाटील यांनी दाखविले.

 

तत्कालीन नगरपालिका आणि विद्यमान महापालिकेतील जनहिताचे प्रस्ताव वगळता नरेंद्रअण्णा पाटील यांनी सत्ताधार्‍यांच्या प्रत्येक प्रस्तावाला लेखी आक्षेप नोंदविला आहे. अनेकदा सभागृहात त्यांना बोलू दिले जात नव्हते. त्यांच्या आक्षेपाला सत्ताधारी हसण्यावरी नेतात असे दिसून आले होते. इकडे नरेंद्रअण्णा पाटील यांचा स्वत:चा अपवाद वगळता त्यांच्या बाजूने अगदी विरोधकही उभे राहिल्याचे चित्र दिसून येत नाही. परिणामी, नरेंद्रअण्णा पाटील यांचा दादा गटाला असणारा विरोध हा एकाकी योध्याप्रमाणे होते. अनेकदा नरेंद्रअण्णा पाटील हे दगडावर डोके आपटण्याचा आततायीपणा करत असल्याचा प्रेमळ सल्लाही त्यांना देण्यात आला. या सर्व बाबींचा विचार करता पाटील हे सत्ताधार्‍यांना कधी अडचणीत आणतील याची कल्पनाही कुणी केली नव्हती. मात्र घरकूल प्रकरणी आ. जैन यांच्यासह तमाम मातब्बरांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर दादा गटाला जबर हादरा बसला. आता वाघूर प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने पुन्हा भूकंप झाला.


 

जळगाव शहरावर राज्य करतांना आ. जैन यांच्या गटाने अनेक निरंकुश आणि संशयास्पद निर्णय घेतले होते. मात्र येनकेनप्रकारे प्रत्येक कचाट्यातून ते बाहेर पडत होते. यासाठी काही वेळेस राज्यातील सत्ताधार्‍यांशी सलगी करण्यात आली तर काही वेळेस धनशक्तीचा वापर करण्यात आला. यामुळे नरेंद्र पाटील यांनी स्वबळावर काही प्रकरणे न्यायालयात दाखल केली होती. घरकूल प्रकरणी त्यांनी त्रयस्थ म्हणून अर्ज दाखल केला आहे. इकडे वाघूर प्रकरणी तर त्यांनी केलेल्या तक्रारीवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे त्यांनी राजकीय पातळीवरून विरोध दर्शवितांना न्यायदरबारातही दाद मागितली. त्यांना राजकीय पातळीवर इतरांकडून सहकार्य मिळाले नसले तरी कायद्याने त्यांना पाठबळ दिले आहे. आज नरेंद्र पाटील एकांदया  शिलेदाराप्रमाणे लढत असून महापालिकेतील कथित विरोधी पक्ष मात्र निव्वळ बघ्याच्या भूमिकेत आहेत ही बाब जळगावकरांसाठी शोकांतिकेसमानच आहे. अर्थात कायद्याने तरी त्यांना पाठबळ दिले आहे. परिणामी आजवर घरकूल आणि वाघूर प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. या माध्यमातून नरेंद्र पाटील यांच्या लढ्यास नवीन उभारी मिळणार हे मात्र निश्‍चित आहे.


 

निवडणूक काळात रात्री होणार्‍या ओल्या पाटर्य़ांना ब्रेक लावण्यासाठी नगरसेवक नरेंद्र पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. पालकांमध्ये जनजागृती करत आहेत. निवडणूक काळात कार्यकर्त्यांचा मोठा ताफा आपल्या मागे ठेवण्यासाठी उमेदवारांकडून विविध प्रलोभनांसह रात्रीच्या ओल्या पाटर्य़ांचे आयोजन केले जाते. दहावी, बारावीतील युवा वर्ग याकाळात बळी पडून व्यसनाधीनतेकडे वळतात. या कुप्रथेविरुद्ध नगरसेवक नरेंद्र पाटील लढा देणार असून पालकांमध्ये जनजागृतीचे काम केले जाणार आहे.


 

पालिका निवडणुका जवळ येताच इच्छुकांकडून वातावरण निर्मिती करण्यासाठी कार्यकर्त्यांना पाटर्य़ां देण्यास सुरुवात केली आहे. खर्चाची परवा न करता कार्यकर्ते जोडून ठेवण्यासाठी रात्रीच्या बैठकाही केल्या जात आहेत. या सर्व प्रकारात दहावी, बारावी तसेच महाविद्यालयीन तरुणांचा भरणा अधिक आहे. निवडणूक काळात दिल्या जाणार्‍या पाटर्य़ांमुळे मद्य प्राशनाकडे वळलेल्या तरुणवर्गाला या दिवसांमध्ये व्यसन जडते. निवडणुकीनंतर विनामूल्य मिळणार्‍या ओल्या पाटर्य़ा बंद झाल्यावर हीच तरुण मंडळी स्वखर्चाने हॉटेलची पायरी चढते. दरवर्षी निवडणुकीनंतर व्यसनाधीनतेकडे वळणार्‍या युवा पिढीला या गोष्टींपासून प्रवृत्त करण्यासाठी ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र पाटील यांच्याकडून पालक जनजागृती करण्याची मोहीम हाती घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. निवडणूक काळात आपला मुलगा रात्री उशिराच्या पाटर्य़ांना जातो काय? जात असल्यास व्यसनाधीनतेकडे वळतो आहे काय? या संदर्भात जनजागृती करणारे माहिती पत्रक तयार करून ते शहरातील विविध भागात पोहचवण्याचे नियोजन महानगर विकास आघाडीतर्फे केले जात आहे.


 

प्रिय मित्र-मैत्रिणीनो हा लेखं टाकण्याचे कारण... प्रत्येक पक्षात चांगली आणि वाईट लोकं असतात. आपण चांगले हिरे शोधायची असतात. नरेंद्रअण्णा यांच्या लढ्यावरुण एक प्रेंरणा निश्चित घेता येते... तुम्ही जर अन्यायाविरुद्ध लढ्यासाठी झुंज दिली तर तुम्हाला लोकांची साथ नक्कीच मिळते. नरेंद्रअण्णा  हे निवडणुकीत कधीच पैसे वाटत अनाही आणि कुणाला वाटू देत नहि.  खरचं मला अभिमान आहे माझ्या या माझ्या नगरसेवकाचा.


 

सेनापतीपासून सैनिकांपर्यंत रणांगणावर लढणारे सारे योद्धेच म्हणवतात. अन्यायाविरुद्ध प्राणपणाने पराभवाचीही पर्वा न करता अंगावर वार झेलत घाव सहन करणारे अन् प्रसंगी घाव घालणारे सतत संघर्षरत या पराक्रमी पुरुषांसाठी माझ्या लेखी एकच सार्थक शब्द आहे 'योद्धा पुरुष' !!

 

संदर्भ- http://­jalgaonlive.com/­नरेंद्र-पाटील-यांच्या­-एक/



लेखं- निलेश रजनी भास्कर कळसकर(सोबत प्रबोधन टीम)


No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...