उत्तराखंड मदत कार्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील जवानांच्या कुटुंबियांसाठी सोशल नेटवर्किंगवरून मदतनिधी !!

उत्तराखंड मदत कार्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील जवानांच्या कुटुंबियांसाठी सोशल नेटवर्किंगवरून मदतनिधी !!


उत्तराखंडच्या प्रलयंकारी अतीवृष्टीत शेकडो लोक मृत्युमुखी पडले , हजारो बेपत्ता झाले , कित्येकांची घरे दारे वाहून गेली आणि किती संसार उध्वस्त झालेत याची तर गणतीच नाही... अशा या निसर्गाच्या तांडवात सापडलेल्या असहाय्य, हतबल बांधवांच्या कहाण्या वाचून, ऐकून आणि पाहून हृदय पिळवटणार नाही असा एकही माणूस भारतात सापडणार नाही. या संकटानंतर सर्वत्र सहानुभूतीची आणि दुखाची लाट पसरली. कुठे देवावर नाराजी तर कुठे श्रद्धेचा महापूर, मदत कार्यात उशीर झाल्याबद्दल कुठे शासनावर टीका तर कुठे प्रशासनाला दोष, या संकटात देवाची भूमिका निभवणारया जवानांवर कुठे कौतुकाचा वर्षाव तर ढिसाळ आपत्ती व्यवस्थापनाला शिव्यांची लाखोलीवाहिली गेली.



उत्तराखंडाच्या प्रलयातील बचावकार्यात संकटग्रस्ताना मदत करताना हेलिकॉप्टर कोसळून  २०  भारतीय जवानही शहीद झाले आहेत. त्यातील एक जवान धुळे जिल्ह्यातील आणि एक जवान जळगाव जिल्ह्यातील  आहे. या  भयंकर प्रलयात  इतरांचे प्राण वाचवताना धुळे जिल्ह्यातील शशिकांत पवार आणि जळगाव जिल्ह्यातील गणेश अहिरराव यांनी आपले  प्राण गमावले . लहान लहान कच्या बच्यांना पत्नी आणि म्हातार्या आजी आजोबांच्या हवाली करून हे भारत मातेचे  आणि महाराष्ट्राचे दोन थोर पुत्र देशासाठी आणि देशवासियांसाठी शहीद झाले. शहीद शशिकांत पवार आणि शहीद गणेश  अहिरराव यांच्या समवेत उत्तारखंडच्या आपत्तीत शहीद झालेल्या सर्व जवानांना भारत भरातून श्रद्धांजली वाहण्यात येत   आहे. पण, भारत देशाचे  नागरिक म्हणून आपली एवढीच जबाबदारी आहे का ? मनातील खदखद कुठेतरी व्यक्त  झाली  म्हणजे आपले कर्तव्य संपणार आहे का ? या प्रश्नांची उत्तरे फेसबुकवरच्या तरुणांनी शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यातून एक भारतीय नागरिक म्हणून शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचे अनोखे कार्य उभे राहिले.



कुणाचे प्राण वाचवण्यासाठी प्राण त्यागणे याच्या इतका असीम त्याग अन्य कोणत्याही गोष्टीत नाही. म्हणूनच असा त्याग करणार्या या दोन जवानांच्या कुटुंबियांना आपापल्या परीने मदत करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य  आहे  या भावनेतून  फेसबुक वरील सोशल नेटवर्किंग फोरम या सामाजिक कार्य करणार्या ग्रूपने या जवानांच्या कुटुंबियांसाठी मदत निधी उभारण्याचे कामहाती घेतले होते. या कार्यात प्रत्येक देशभक्त आणि सामाजिक भान जागृत असणार्या भारतीयाने आपला खारीचा वाटा उचलला पाहिजे असे आवाहन फोरमचे संस्थापक श्री. प्रमोद गायकवाड यांनी केले होते. या आवाहनाला देशविदेशातील नेटीझन्सने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आणि त्यातून १ लाख वीस हजार रुपयांचा निधी उभा राहिला. हा संपूर्ण निधी या दोनही जवानांच्या गावी जाउन त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला (प्रत्येकी साठ हजार).  सोशल नेटवर्किं फॉर सोशल कॉज या अभियाना अंतर्गत जमा झालेला हा निधी या दोन जवानांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खारीचा वाटा म्हणून देण्यात आला. 





देश विदेशातील अनेक मित्रांनी या या कार्यासाठी आपली मदत पाठवली आहे. ज्या जवानांच्या जीवावर आपण आपले आयुष्य सुखात घालवत आहोत त्या जवानांना नुसत्या शाब्दिक श्रद्धांजलीऐवजी  प्रत्यक्ष मदत कार्यातून श्रद्धाजली वाहण्यात आली.

खान्देशातील दोन जवानांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी सोशल नेटवर्किंगवरून मदतनिधी जमा झाला. प्रत्येकी 60 हजार रुपये मदत दोन्ही कुटुंबीयांना देण्यात आली-




वडाळा-वडाळी येथील गणेश अहिरराव व बेटावद येथील शशिकांत पवार या जवानांना वीरमरण आले होते. त्यांना शासकीय इतमामात अखेरची मानवंदना देण्यात आली. शासनातर्फे अद्याप मदत मिळाली नसताना सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून मिळालेली मदत शहिदांच्या कुटुंबीयांसाठी लाखामोलाची ठरणार आहे. तरुणांनी उत्स्फूर्त सहभाग देऊन निधी संकलनात हातभार लावला.






शहीद गणेश आहीररावयांच्या वीर पत्नी योगिता व त्यांचा मुलगा आणि ९ महिन्याची मुलगी.

 

अनिवासी भारतीयाने पाठवले ६० हजार रुपये -




जवानांसाठी उभ्या करण्यात आलेल्या या अभियानात विदेशातील भारतीयांनी मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले. कतार येथे स्थायिक असलेले श्री. लक्ष्मीकांत पोवनीकर यांनी तब्बल साठ हजार रुपये पाठवून या मदत निधीत सर्वात जास्त रक्कम पाठवली. लक्ष्मीकांत हे भारतीय जवानांसाठी हाती घेण्यात आलेल्या कोणत्याही मदत कार्याला नेहमी आर्थिक पाठबळ देत असतात.  परदेशात राहून भारतीय सैन्याप्रती इतका आदर बाळगणारया आणि शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी हजारो रुपये भारतात सातत्याने पाठवणारया लक्ष्मीकांतजिंचे नेटीझन्सने उत्स्फुर्त प्रतिक्रिया देऊन अभिनंदन केले. याशिवाय मस्कत येथून राजेश बक्षी  आणि अमेरिकेतून संदीप राणे यांनीही या कामी भरीव मदत केली आहे.    

 

अभियानातील सक्रिय सदस्य -



निलेश कळसकर- जळगाव (सोबत प्रबोधन टीम) , श्रीकांत धोणे-पुणे , भारत राणा - जळगाव , देवा झिंजड – पुणे, अंबिका टाकळकर – औरंगाबाद, सुशीलदत्ता शिंदे, मुंबई डॉ. उत्तम फरतले-निफाड ,  डॉ. पंकज भदाणे- नाशिक , मृण्मयी राम– नागपूर, राहुल जिंदे – पुणे, सुमित म्हेत्रे - पुणे , विवेक शिंदे - नगर    

अभियान -


सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज

संस्थापक - प्रमोद गायकवाड - नाशिक

मोबाईल - ९४२२७६९३६४

उद्दिष्टे-


इंटरनेटवरील तरुणांना सामाजिक कार्याची गोडी लावणे.

तरुणांना योग्य वयात देशाप्रती असेलेल्या कर्तव्याची जाणीव करून देणे.

सोशल नेटवर्किंग साईट्स वरील गैर प्रकारांना या माध्यमातून आळा घालणे. 

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...