भीमशाहीर विलास घोगरे अमर रहे !!

भीमशाहीर विलास घोगरे अमर रहे !!


 


माता रमाबाई आंबेडकर नगर घाटकोपर मध्ये ११ जुलै १९९७ रोजी पुतळा विटंबना झाली. त्यावेळी नीच मनोहर कदम याने दिलेल्या आदेशावरून SRPF च्या जवानांनी ११ भीमसैनिकांवर अंधाधुंध गोळीबार करून शहीद केले, त्याच्या नंतर ४ दिवसांनी म्हणजे १५ जुलै १९९७ रोजी ख्यातनाम भिमशाहीर "विलास घोगरे" यांनी मुलुंड येथे स्वता:च्या राहत्या घरी भीमसैनिकावर झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ गळफास लावून आत्महत्या केली आणि शहीद झाले.

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरापूर्वीच त्यांच्या शाहिरांनी गायन पार्ट्यांची निर्मिती केली होती. गावोगावी आंबेडकरी गायन पार्ट्या सुरू झाल्या होत्या आणि धर्मांतरानंतर तर या गायनपार्ट्यांची प्रचंड मोठी लाट आली. विलास घोगरे यांच्यासारख्या साम्यवादी शाहिरांची कलापथके होती, पण आंबेडकरी गायकांच्या गायन पार्ट्या होत्या. या गायन पार्ट्या उर्दू कव्वालीपासून प्रेरणा घेऊन निर्माण झाल्याने त्यांचा सारा बाज कव्वालीचा होता. पण बाबासाहेबांच्या चळवळीचा प्रभाव म्हणून त्यांच्या गाण्यातून देव, धर्म, अंधश्रद्धा, बुवाबाजी वगैरेवर हल्ला करून बाबासाहेबांनी दिलेली लोकशाही मूल्यव्यवस्था आणि बुद्धाचा विचार कसा जीवन सुखी करेल हा आशावाद होता.

 


हिंदू धर्म नाकारल्याने हिंदू धर्मासोबत असणारे व त्यांच्या आकांक्षा व्यक्त करण्यास सहज असणारे पोवाडा, लावणी, भजन, कीर्तन, पोतराज, गोंधळी, भारुड वगैरे सारे कलाप्रकारही या गायकांनी नाकारले. नव्याने विकसित होणाऱ्या सिनेसंगीताचा त्यांनी आश्रय घेतला. त्यामुळे संगीताच्या क्षेत्रात हे गायक फार मोठे योगदान देऊ शकले नाहीत, पण प्रचाराच्या क्षेत्रात आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्याचे काम याच गायकांनी केले, हे सत्य नाकारता येत नाही. पुढे आंबेडकरी चळवळीतील गायन पार्ट्यांतून नवे निर्माण झाले नाही. पुढे कामगार चळवळीच्या माध्यमातून लोकशाहीर विलास घोगरे या पल्लेदार आवाजाच्या गायकाची ओळख साऱ्या देशाला झाली आणि आव्हान नाट्य मंच पथनाट्याच्या वर्तुळातून बाहेर पडले अन् ख-या अर्थाने शाहिरी पथक झाले.


 

शाहीर विलास घोगरे यांच्या 'जळतोय मराठवाडा' या प्रसिद्ध गीतातील काही ओळी आजही तितक्याच वास्तववादी आहेत.

 


जळतोय मराठवाडा !!

 

"आम्ही पुण्या-मुंबयची लोकं
पोकळ आमचा हा झोकं
जयभीम जयभीम म्हणतो
गांडूचं जीवन हे जगतो !

रक्ताची दलिता हि आण
अन्यायस्थळी जाऊन
शीर तळहाती घेऊन
रे बंधो जग रे म्हणून
अरे हाणा मारा ss कापा तोडा ss
कोण मध्येच घालील खोडा रं !

जळतोय मराठवाडा रं !!! "

- शाहीर विलास घोगरे


रमाबाईनगरात पोलिस गोळीबारात ११ लोकांचे बळी गेले. हे हृदयद्रावक मुडदे बघून विलास अस्वस्थ झाले. त्यांनी भिंतीवर‘आंबेडकरी जनतेच्या एकजुटीचा विजय असो’ असा नारा लिहून डोक्याला निळी पट्टी बांधून आत्महत्या केली.


 

भिमशाहीर "विलास जी घोगरे" अमर रहे...  अमर रहे...  अमर रहे...  भिमशाहीर "विलास जी घोगरे" यांच्या १६व्या स्मृतिदिनानिमित्त त्रिवार अभिवादन.... जय भीम !!



संदर्भ- http://www.youtube.com/watch?v=w4N8bEpY5G8



धन्यवाद- वैभव मोरे , आनंद जाधव, संजय सामंत.


लेखं - निलेश यशवंत ठेंगे (नाशिक)

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...