'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाची मुळ संकल्पना, गीत, संगीत मांडणारे शाहिर संभाजी भगत यांची एक दिलखुलास मुलाखत !!

'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाची मुळ संकल्पना, गीत, संगीत मांडणारे शाहिर संभाजी भगत यांची एक दिलखुलास मुलाखत !!



 

शाहिर संभाजी भगत यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मिफ्टा अ‍ॅवॉर्ड विजेते 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाच्या दमदार १२५व्या प्रयोगा निमित्त शाहिर संभाजी भगत हे दिलखुलास बहुआयामी व्यक्तिमत्व त्यांच्याशी केलेली दिलखुलास बातचीत...


 
सर्व प्रथम, मिफ्टा अ‍ॅवॉर्ड आणि नाटकाच्या विक्रमी यशाबद्दल तुमचे मनःपुर्वक अभिनंदन नाटकाची यशस्वि घोडदौड आणि पुरस्कार याबद्दल या क्षणी तुम्हाला काय वाटते आहे.

 
 


संभाजी भगत - मी समाधानी आहे,परिश्रमाचे चीज झाले,हे यश सर्व टिमचे आणि विशेषतः चळवळीचे आहे.



तुम्ही या नाटकाचे श्रेय चळवळीलाहि देत आहात ??


 

संभाजी भगत - अर्थात, मी चळवळ्या माणूस आहे, लोकप्रबोधनकरणे हे माझे काम आहे, जलशांमधून मिळणारी रक्कम, जोडणारी माणसे, त्यांच्याकडून मिळणारी मदत यामुळेच तर हे सर्व शक्य झाले.






 

विद्रोहि, आंबेडकरी जलशांमधून समाजप्रबोधन करणारे संभा'दा' नाटकाकडे कसे काय वळले ??


 

संभाजी भगत - ग्रामिण भागात जलशांमधून समाजप्रबोधन करत असताना मी ४-५ तरुण गोळा केले छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो नेहमी एका विशिष्ट धर्माविरुद्ध रंगविला जातो त्यातील सत्यता लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने मी या तरुणांना एकत्र करुन एक टिम तयार केली व खरा शिवाजी जलशांमधून लोकांसमोर मांडू लागलो,लोकांचा त्यास उत्तम प्रतिसाद मिळत होता, त्यातच एकदा राजकुमार तांगडे यांची भेट झाली, हि कन्सेप्ट त्यांना आवडली व त्यांनी या जलशाचे नाटकात रुपांतर करण्याचा मनोदय व्यक्त केला, मी त्यास अनुमोदन दिले, त्या नंतर हे नाटक रंगभुमीवर अवतरले.



सुरुवातीला या नाटकास समाजातील काहि लोकांकडून विरोध होत होता ??



संभाजी भगत- होय,खरा शिवाजी हा कुठल्या एका जातीचा, धर्माचा, समाजाचा किवा प्रांताचा नसून तो सर्व "रयतेचा राजा" होता हेच आम्हाला लोकांसमोर माडांयचे होते. असा इतिहास लोकांसमोर न येवू देणे हे त्यांच्या(प्रस्थापितांच्या)फायद्याचे होते, छत्रपतींच्या पर्वानंतर आजतागायत प्रस्थापितांनी सोयीचा इतिहास लोकांसमोर मांडला आहे, कधी धार्मिक कधी जातीय रंग देवून त्याचा राजकारणासाठी फायदा घेतला आहे त्यामुळे खरा शिवाजी लोकांसमोर येणे त्यांच्यासाठी गैरसोयीचे होते, त्यातूनच या नाटकाला सुरुवातीला विरोध झाला होता.



नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न झाला होता ?? तुम्हि यातून कसा मार्ग काढलात ??



 

संभाजी भगत - नाहि, नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न केला गेला नाहि, मात्र त्रास देण्याचे प्रकार वाढले होते, अगदि राज्यात शासकिय पातळीवर, कलेक्टर पासून पोलिस प्रशासनाला कामाला लावले होते, ते सर्व आप आपल्यापरीने आडकाठी आणन्याचा प्रयत्न करत होते, मात्र लोकांच्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे हे नाटक त्यातूनही तगले अर्थात नाटकामागे चळवळीतील लोकांचे खंबिर पाठबळ उभे होते, त्यामुळेच हे शक्य झाले.



 

मध्यंतरी या नाटकाबद्दल विवादास्पद गोष्टिहि वर्तमानपत्रांमध्ये छापून आल्या होत्या श्रेय घेण्यावरुन तुमच्या मधे काहि वाद आहेत काय ??


 

संभाजी भगत- होय, दुर्दैवाने हे खरे आहे.काहि लोकांनी सरकारी अनुदान पदरात पाडून घेण्यासाठी या नाटकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न चालवला होता,अर्थात असे होणे शक्य नाही कारण या नाटकाची मुळ संकल्पना, गीत, संगीत हे सर्वस्वी माझे आहे, त्यामुळे त्यांना यात श्रेय उपटता येणार नाही.

 

म्हणजे याचा अर्थ काहि लोक तुमचे आणि राहुल भंडारे यांचे योगदान नाकारत आहेत ?? आणि नाटकाचा आशय बदलण्याचा प्रयत्न करत आहेत ?? सध्या तुम्हा दोघांच्या नावांचा उल्लेख जाणीवपुर्वक टाळला जात आहे.

 

संभाजी भगत- याबद्दल मला खंत वाटते, जेव्हा मी म्हणतो की या नाटकाची मुळ संकल्पना, गीत,संगीत हे सर्वस्वी माझे आहे, त्या अर्थाने हे नाटक चळवळीचे आहे या नाटकावर चळवळीचा अधिकार आहे. या नाटकाच्या सुरुवातीपासूनच ज्या ज्या लोकांनी आम्हाला हे नाटक उभे करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे मदत केली त्या सर्वांचे आहे एक सामाजिक बांधिलकी म्हणून मी हे नाटक करायला तयार झालो, आंबेडकरी जलशांमधून मिळालेली रक्कम मी या नाटकासाठी दिलेली त्यामुळे श्रेय लाटण्याचा कुणी प्रयत्न करत असेल तर चळवळीतील कार्यकर्ते अशा लोकांना धडा शिकवतील याची मला खात्री आहे.


 

मिफ्टा अ‍ॅवॉर्ड,त्यानंतर NSD दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय भारंगम नाट्यमहोत्सवातहि निवड झाली. त्याबद्दल काय वाटते ??

 


संभाजी भगत- हि कामाची पोचपावती आहे. अर्थात या यशामध्ये सर्वांचाच महत्वाचा वाटा आहे. मिफ्टा स्विकारला तेव्हा माझी भुमिका मी नम्रपणे मांडली हा पुरस्कार स्वीकारताना मला अनेकांची आठवण आली अद्वैत थिएटर्सचे राहुल भंडारे,नंदु माधव कुलकर्णी, राजकुमार तांगडे, तालमीसाठी एक महिना मोफत जेवण व राहण्याची सोय केलेले पुरुषोत्तम खेडकेर, युवराज मोहिते आणि सर्व कलाकार टिम नाटकाची प्रेरणा हि या देशातील सामान्य जनता आहे म्हणून हा पुरस्कार जनतेचा आहे. खास करून तळागाळातल्या जनतेचा आहे हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अनेक वर्तमान पत्रांनी लेख लिहिले. वृत्तवाहिन्यांनी दाखल घेतली, समिक्षा झाली.

 

नाटकामध्ये एक संवाद आहे "शिवाजी महाराजांच्या तोरणावर किती दिवस चर्चा करणार? जरा धोरणांवर या.” 


संभादा... मिश्किलपणे हसत मला वाटते काहि प्रमाणात का होईना जनता आता धोरणांवर विचार करु लागली आहे.



 

सध्या तुमचे "अडगळ" हे सुद्धा रंगभुमिवर गाजते आहे. संभाजी भगत- हो,हे एका वेगळ्या विषयावरील नाटक आहे यात एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाची कथा आहे. ती तरुणांना जास्त भावते आहे.



 (या छायाचित्रात मध्यभागी शाहीर संभाजी भगत हे आहेत... उजवीकडून मिलिंद धुमाळे दादा आणि डावीकडून अमोल गायकवाड दादा हे आहेत.)


संभा'दा' तुम्हि आमच्याशी संवाद साधल्याबद्दल धन्यवाद आणि पुढिल वाटचालीसाठी तुम्हाला आणि तुमच्या टिमला शुभेच्छा, जय भीम.


 

संभाजी भगत:- जयभीम.



 

शाहीर संभाजी भगत यांनी FAM या संघटनेच्या कार्यक्रमात 'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाबद्दल माहिती दिली होती. या नाटकाची संकल्पना त्यांना कशी सुचली यावर भाषण करून त्यांनी पुढे सांगितले कि या नाटकाच्या जाहिराती छापल्या जात नव्हत्या. कोणतेच वर्तमानपत्र तयार होत नव्हते. वेगवेगळे प्रश्न निर्माण केले जात होते जसे ' शिवाजी ' च का ?, भीमनगर मध्येच का ? किंवा अंडरग्राउंड का ? नाटक सेन्सॉर ने सहमत केलेले असताना सुद्धा हि परिस्थिती होती.



 

संभाजी भगत यांनी सांगितले आम्ही आमच्या नाटकाच्या कलाकारांना स्पष्टच सांगूनच ठेवले आहे जर कोणी या नाटकाला विरोध करायला उभा राहिला कि सरळ अगोदर नाट्यगृहाचे सगळे दरवाजे बंद करून त्याला ठोकून काढायचा. मग पुढे बघता येईल काय होईल ते ?? विशेष म्हणजे या नाटकाचे कलाकार हे जालना जिल्ह्यातले शेतकरी आहेत.



 

'शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला' या नाटकाच्या पूर्ण टीम ला आम्हा रसिकांचा सलाम आणि एक वाचन आम्ही सर्व रसिक आपल्या सोबत आहोत !!



लेखं- मिलिंद धुमाळे. (Milind Dhumale)

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...