ती रोडरोमीवोवर तुटून पडली !!
पलामू । झारखंडच्या विर्शामपूर गावातील महाविद्यालयात शिकणारी एक तरुणी गेल्या तीन महिन्यांपासून रोमिओंच्या त्रासाकडे दुर्लक्ष करत होती. तिच्या कॉलेजच्या रस्त्यावर उभे राहून हे रोमिओ तिची छेड काढत. तरुणीने आईवडिलांकरवी या तिघांच्या घरी तक्रार केली, पण व्यर्थ....
त्रासाला कंटाळलेल्या या तरुणीने शेवटी या रोडरोमिओंना जिजाऊअवतार दाखवलाच. सोमवारी या रोडरोमिओंनी तिची छेड काढताच तिने अनपेक्षितपणे या रोमिओंवर हल्ला चढवला.
तरुणांची सँडलने धुलाई करणारी ही तरुणी पाहून आजूबाजूचे लोकही तिच्या मदतीला धावले. सर्वांनी मिळून या रोमिओंना चांगलाच चोप दिला व कोंबडा करून तरुणीची माफीही मागायला लावली. विशेष म्हणजे या तिघांपैकी दोघे तरुणीच्याच गावचे रहिवासी आहेत.
प्रिय मैत्रिणीनो... ताईनो.... डॉ आंबेडकर सांगतात "अन्याय करणाऱ्यापेक्षा तो अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो."..... म्हणून प्रिय मैत्रिणीनो... ताईनो.... असां अन्याय सहन करू नका आवाज उचला... तुम्ही विसरू नका तुम्ही राजमाता जिजाऊ, राजमाता अहिल्याई, सावित्रीमाई फुले , फातिमा शेख , यांच्या वंशज आहात तुम्ही या जगाच्या निर्मात्या आहत... आवाज उचला आणि बघा हे जग तुमचे असणार.
लेखं- निलेश रजनी भास्कर कळसकर(सोबत प्रबोधन टीम)
धन्यवाद- दै. दिव्यमराठी.
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!