तालिबान मध्येही बुद्ध हसत होता.. बुद्ध आजही हसत आहे !!
बुद्धगया येथे काल झालेल्या बॉम्बस्फोटामुळे भारतातच नव्हे तर अवघ्या जगात खळबळ माजवून दिली. भारतीय जनतेला (अगदी स्वतःला बौद्ध म्हणवून घेणाऱ्या लोकांना सुद्धा) जितके बुद्धाचे महत्व कळले नसेल तितके आज जागतिक पातळीवर आज ते मानले जाते, हे कर्मठांना टोचले तरी ते सत्यच आहे हे ते देखील नाकरू शकणार नाहीत. कदाचित म्हणूनच जगाच्या पातळीवर 'भगवान बुद्धाचा देश' म्हणूनच भारताला ओळखले जाते आणि त्यामुळेच केंद्रीय सरकारच्या एका महत्वाच्या व मोठ्या प्रकल्पाच्या यशस्वी चाचणीनंतर त्याचे वर्णन 'And Buddha laughs..'(आणि बुद्ध हसला) असेच करण्यात आले. याचे कारण बुद्धाचे जागतिक पातळीवर असलेले स्थान हेच आहे यात वाद नाही.
गेल्या अडीच हजार वर्षांपासून ज्या महामानवाचे विचार येथील व्यवस्था जंग-जंग पछाडूनही पूर्णपणे संपवू शकली नाही ते एखाद-दुसऱ्या बोंब स्फोटाने संपेल काय..?? यामागे आतंकवाद्यांचा हात आहे असे जरी नेहमीप्रमाणे ओरडून सांगितले जात असले तरी बिहार मध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या राजकीय घटना सुद्धा सुज्ञ मनांस विचार करायला लावणाऱ्या आहेत. अर्थात Indian Intelligence Bureau कडून आधीच मिळालेल्या सूचनेकडे केलेले दुर्लक्ष, वोट बँक, येऊ घातलेल्या निवडणुकांकडे डोळा ठेऊन राजकारणासाठी हवा असलेला नवा विषय या सर्व अंगाने या सर्व प्रकाराकडे पहावे लागेल.
भारतात धर्मांधता व (कुजलेले) राजकारण यापायी महापुरुषांचे अपमान आजवर होत आलेलेच आहेत. थोडे दिवस तापलेलं वातावरण, सोशल नेट्वर्किंग साईट्सवर तीव्र प्रतिक्रिया, प्रसंगी हिंसक आंदोलने या नेहमीच्या फिरून आपाल्या संसारात मग्न होणाऱ्या (मुर्दाड) भारतीय जनतेला सुद्धा आता याची जणू सवय झालीये.
जेवढे हल्ले व अपमान भारतात महापुरुषांचे होतात तेवढे जगात अन्यत्र कुठेही होत नाहीत आणि हि अजिबात कौतुकास्पद बाब नाही.
महापुरुषांच्या पुतळ्यावर, पवित्र स्थळांवर हल्ले करून जगभरातील कोट्यावधी जनतेच्या मनात असलेली त्यांच्याबद्दलची श्रद्धा व त्यांचे स्थान कणभरही हलत नसते, उलट अशा प्रत्येक घटनेनंतर त्यांची प्रतिमा स्वछ होत असते, जनमानसांत प्रसारित होत असते हे अशा कुजक्या मानसिकतेच्या गंजबाधित मेंदूंना कळत नाही हे त्यांचे दुर्दैव..!! अर्थात अशा घटना करण्यासाठी फार ताकदीची व मेंदूची गरज नसतेच मुळी..ते आणतारिक भ्याडपणाचे लक्षण आहे कारण असे हल्ले नेहमी पाठीमागून गेले जातात..छातीसमोर येउन नाही.
तेव्हा अशा हल्ल्याने बुद्ध संपत नाही..त्याची शिकवणूक असलेला धम्मही संपत नाही..कारण हे कुणी व्यक्तीस्वरूप नाहीत. या दोन्ही विचारधारा आहेत.
तेव्हा तालिबान मध्येही बुद्ध हसत होता.. बुद्ध आजही हसत आहे, कारण त्याचा स्वतःचा विश्वास आहे कि- "बुद्ध आणि धम्म हे शाश्वत आहेत..चिरकाल टिकणारे आहेत, कारण त्यांचा मार्ग सत्याचा आहे.."
लेखं- गौरव गायकवाड(सोबत प्रबोधन टीम)
लेखं- गौरव गायकवाड(सोबत प्रबोधन टीम)
satya ki jay ho............!!!!!!!!!!!!!!!!!
ReplyDelete