तमाशा, डोंबारी, कडकलक्ष्मी, पोतराज ही काळी संस्कृती जपायला हवी का ????
फेसबुकवरच्या एका फ्रेंडची पोस्ट पाहिली अन् अस्वस्थ व्हायला झालं. त्या मित्रानं म्हटलं होतं कडकलक्ष्मी, पोतराज ही संस्कृती जपायला हवी. त्यासाठी हे खेळ करणाऱ्यांना पैसे देऊन ते या प्रयत्नांना हातभार लावतात. हे वाक्य अत्यंत दुःखदायक वाटलं. कारण कडकलक्ष्मी, पोतराज हे आपल्या कथित संस्कृतीचं काळं अंग आहे. या मंडळींवर असं पशुवत जिणं लादणारी संस्कृती कशी काय बरं थोर असेल आणि ती टिकवावी तरी का ???
हल्ली तमाशा, डोंबारी या मंडळींनाही संस्कृतीचं अंग म्हणून जोपासना करण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी खरोखर ही मंडळी कसं जगतात ते पाहिलंय का ?? शक्य असेल तर चमचमाट असलेल्या तमाशा फडाच्या मागे या कलावंतांची पालं पाहावीत. मग कळेल. आणि संस्कृतीसंरक्षण जर खरोखरच करायचं असेल तर ते त्यांनीच का करावं. ज्यांना ही संस्कृती हवी असेल त्यांनी आपल्या पुढच्या पिढ्यांना ती खुश्शाल शिकवावी. पण जी मंडळी हजारो वर्षांपासून हे जगणं जगत आहेत,त्यांच्यावर ते बंधन लादू नये. किंवा तसा पुरस्कारही करू नये.
तमाशा, डोंबारी, कडकलक्ष्मी, पोतराज काळी संस्कृती जपायला हवी का ???? मित्र-मैत्रिणीनो तुमचे मत काय ????
लेखं- नितीन सावंत.
Japayla nako.
ReplyDeleteJapayla nako. Nakoch.
ReplyDelete