काल रात्री केदारनाथ स्वप्नात आले !!

काल रात्री केदारनाथ स्वप्नात आले !!



भयंकर चिडलेले होते. तांडव संपलेले होते तरी पारा शांत झालेला नव्हता म्हणाले....


सगळाच मूर्खपणा चाललाय. तुम्हा मानवांना काहीच अक्कल नाही. भक्ती कशाला म्हणावी देवपूजा कशाला म्हणावी कोणासही कळेनासे झाले, बाजार मांडलाय. भक्तीचा आणि देवांचा बाजार. आणि त्यामुळे विचारवंतांचा आमच्यावरील विश्वासहि उडतोय. आणि हा सगळा बाजार पाहून उडालाहि पाहिजे.

 
जो तो उठतोय मंदिर, दर्गा, गुरुद्वारे उघडतोय, मंदिराला सोन्याचा पत्र लावतोय, तीर्थयात्रा काढतोय, एकच पोथी अनेक वेळा वाचायची ' पारायण' नावाची स्पर्धा भारावातोय. कोणी दहा पंधरा टाळके गोळा करून सकाळी सकाळी टाल मृदुंग घेऊन मोठ्या मोठ्या आवाजात आमची गाणे गात घरात झोपलेली लहान मुले, आजारी माणसांची परवा न करता फिरतात. जेवढा आवाज मोठा तेवढी भक्ती जास्त असाच एकंदर आवभाव असतो.

 
'वृथा फिरतो निर्देव, देव असता अंतर्यामि, वृथा जाशी तीर्थग्रामी,
जसे साखरेचे मूळ उस, जसे दुधी असे नवनीत, देव तैसाच दिसे '

 

किती साधा सोपा अर्थ आहे संत तुकारामांनी सांगितलेला परंतु तरीही न समजल्या सारखे करत तीर्थशेत्री जीव धोक्यात घालत फिरत असतात. निसर्गाचा समतोल बिघडून ठेवलाय तुम्ह्च्या या धार्मिक कर्म- कांडणी. सगळ्या नद्या कारखान्याच्या प्रदुषणा नंतर सर्वात जास्त प्रदूषित केल्या असतील तर धार्मिक कर्म कांड यांनी. अरे ज्या पृथ्वीवर राहतात तिची तर काळजी घ्या. खुशाल अर्धवट जळलेले मृतदेह काशीत गंगेत फेकले जातात.

 
'तीर्थी जावोनी काय तुवा केले.. चर्म प्रक्षाळीले वरी वरी ' संत तुकाराम म्हणतात ते काही खोटे नाही. तीर्थी जाऊन आल्यावर लोकांना मी पाहतो पुन्हा तेच जुने गाडे सुरु. माझे घर, माझी नातवंड, माझा पैसा. 


कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी | हृदयातील भगवंत राहीला, हृदयातून उपाशी ||

 

स्वता:चा व्यवसाय चालवणाऱ्या travel agencies आणि हे आजच्या काळातील कामांध साधू तुम्हाला देवाचे दर्शन घडवतील असे तुम्हाला वाटते काय ?
 

देव दाखवी असा नाही गुरु | जेथे जय तेथे दगड शेंदरु | जेथे जय तेथे पूजा पाशन |

 
अरे मुर्खानो, आम्हा देवाचे मंदिरे बांधतात आणि अशाच मंदिरांच्या थोडे अंतर पुढे गेल्यावर पुण्यात एकेठिकाणी कुंटणखाना आहे आणि राजरोस माझ्या समोर तेथे महिलांच्या अब्रूला हात घातला जातो. स्वताला भक्त समजणारे किती लोकांना त्याबद्दल काही उपाययोजना करू म्हणून साधे मनात तरी येते का ? निरलज्ज्पणे दोन हाताने दर्शन करून पुढे निघून जातात. कशाला रे अपमान करतात माझ्या दैवात्वाचा.

 
हजारो वर्षे माझ्या नावाने भेदभाव चालवला आणि अजूनही काही दिकाणी चालूच आहे. माझ्याच पुत्रांना शुद्र म्हनणून त्यांनाच मंदिरात येऊन देत नाही ? अरे तुम्ही तुमचे होऊ शकत नाही तर माझे होण्याची काय लायकी आहे तुमची . कधी कळणार तुम्हाला....



जे का रंजले गांजले,त्यासी म्हणे जो आपुले |
तॊची साधु ओळखावा,देव तेथेची जाणावा ||

 
आणि जो कोणी हे सत्य समोर आणून प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो त्याला नास्तिक, धर्मविरोधी म्हणून हिणवतात तुम्ही. अरे संवेदनाहीन मनाची, डोळ्यावर धार्मिकतेची पट्टी लावलेले, बुवाबाजी आणि कर्म-कांडत रमून स्वताला आस्तिक समजणाऱ्या लोकांपेक्षा गोरगरीबांसाठी, विद्यार्थांसाठी, समाजाच्या पिडीत लोकांसाठी काम करणारी नास्तिक लोक मला जास्त प्रिय आहेत हे लक्षात घ्या.

 
आणि हे हि लक्षात घ्या मला विकत घेण्याचा प्रयत्नही करू नका. जो देव नवसाला पावतो, अमिशाला बळी पडतो,तो देव नसून चोर आहे. आणि मी चोर नव्हे.
 


लेखं- किरण शिंदे.

1 comment:

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...