"जातीयवाद संपला, ह्या देशात जातीयवाद नाही" अशी ओरड करणाऱ्या मनुवाद्यांच्या कानाखाली चपराक !!

जातीबाहेर लग्न केले म्हणून वडिलांनीच पोटच्या मुलीला जीवे मारल्याची घटना शुक्रवारी नाशिकच्या गंगापूररोड परिसरात घडली.... "जातीयवाद संपला, ह्या देशात जातीयवाद नाही" अशी ओरड करणाऱ्या मनुवाद्यांच्या कानाखाली चपराक !!

 



जातीबाहेर लग्न केले म्हणून वडिलांनीच पोटच्या मुलीला जीवे मारल्याची घटना शुक्रवारी नाशिकच्या गंगापूररोड परिसरात घडली. 'ऑनर किलिंग'च्या या धक्कादायक प्रकारामुळे दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणारया सुंस्कृतत नाशिकला धक्का बसला आहे.

 

प्रमिला दीपक कांबळे (१८) असे मुलीचे नाव असून दीड वर्षापूर्वी प्रमिलाने मूळच्या बुलढाणा येथे राहणारया आणि ती सध्या नाशिक ,कामगारनगर येथे राहत होती. नाशिक शहरात स्थायिक झालेल्या दीपकशी आंतरजातीय विवाह केला होता. त्यास प्रमिलाचे वडील एकनाथ किसन कुंभारकर (रा. मोरे मळा) यांचा विरोध होता. आपल्या विरोधाला न जुमानता मुलीने लग्न केल्याने एकनाथचे पित्त खवळले होते. त्यातच कुंभारकरचे नातेवाईकही त्याचा सतत अपमान करत होते.

 

कालांतराने प्रमिला गरोदर असल्याचे समजताच एकनाथच्या संतापात भरच पडली. हा विषय कायमचा संपवायचा निश्चय करून त्याने शुक्रवारी पहाटे घराजवळ राहणाऱ्या प्रमोद आहिरे या रिक्षाचालकाला गाठले. नातेवाईकाची तब्येत बरोबर नसल्याने मुलीला घेऊन यायचे आहे , असा बनाव करून एकनाथ रिक्षा घेऊन प्रमिलाकडे गेला. आई सिरीयस असल्याचे सांगून एकनाथ प्रमिलाला रिक्षातून घेऊन निघाला. रिक्षा गंगापूररोडवरील सावरकर हॉस्पिटलजवळ नेली आणि आहिरेला हॉस्पिटलमध्ये असलेल्या प्रम‌िलाच्या मामाला घेऊन येण्यास सांगितले. आहिरे हॉस्पिटलमध्ये जाताच एकनाथने नॉयलॉनच्या दोरीने प्रमिलाचा गळा आवळण्यास सुरुवात केली. नववा महिना सुरू असलेल्या प्रमिलाचा प्रतिकार निरुपयोगी ठरला. हा प्रकार सुरू असतानाच आहिरे परत आला.

 

मात्र , त्याने विरोध करेपर्यंत प्रमिला गतप्राण झाली होती. या प्रकाराची माहिती समजताच सरकारवाडा पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन पलायनाच्या तयारीत असलेल्या एकनाथला अटक केली. मुलीमुळे खूप मनस्ताप सहन करावा लागत असल्याने हे पाऊल उचलल्याचे एकनाथने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. निर्दयी एकनाथला तसेच त्याचा सतत अपमान करून त्याला हे कृत्य करण्यास उद्युक्त करणाऱ्या नातेवाईकांना कठोर शिक्षा व्हावी , अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी केली आहे.

 

"फुले शाहू आंबेडकरांचा" पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील हि काय पहिली घटना नव्हे. तरीसुद्धा डोळ्यावर झापड बांधून बसलेली लोक म्हणतात कि जातिवाद संपला. अश्या घटना जर रोज कानावर पडत असतील तर कोणी मानावे व कसे मानावे ह्या देशातून जातीयवाद संपला.


 

"फुले शाहू आंबेडकरी" विचारांना विरोध करण्यासाठी व अस्पृश आणि बहुजनांना मिळणाऱ्या आरक्षणाच्या व इतर सरकारी सुविधांपासून दूर ठेवण्यासाठी काही मनुवादी लोक असल्या वावग्या उठवत असतात. अस म्हणण्याचं कारण जेंव्हा जेंव्हा आरक्षणाचा मुद्धा उठतो किंवा आंबेडकरी जनता जातीयवाद विरोधी आंदोलनात उतरते तेंव्हा ह्यांच्याकडून "आता कुठे राहिलाय जातीयवाद, आता कुणी जात मनात नाही. पूर्वीच्या काळी घडत असलेल्या गोष्टी किती दिवस उकरून काढणार" अशी वाक्य ठरलेली असतात. ह्या माणसांना महाराष्ट्रात चालणाऱ्या अशा दुर्दैवी व माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनांची कुणीतरी आठवण करून द्यावी.

 

छे.... आता कुठे जातीयवाद आहे..... ई.... कशाला हवे यांना आरक्षण??? भाऊ आता जाती कुणी पाळत नाही...... असं बोलणारे पोपट आणि त्या पोपटांच्या मैना आता कुठे गुडूप झालेत.... अरे बघा ढोगी अंधाळ्यानो या माझ्या बहिणीला फक्त जातीसाठी मारलं रे !!

 

संदर्भ -  http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra/--/articleshow/20824870.cms


धन्यवाद- प्रतिक कांबळे.


No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...