'सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज' या संघटनेच्या माध्यमातून पदमश्री नामदेव ढसाळ संराना त्यांच्या आजारपणासाठी मदत निधी प्रदान !!

'सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज' या संघटनेच्या माध्यमातून पदमश्री नामदेव ढसाळ संराना त्यांच्या आजारपणासाठी मदत निधी प्रदान !! 
 



 

सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज या माध्यमातून आजवर आपण अनेक उपक्रम राबवले आहेत. महाराष्टातच नव्हे तर बाहेरच्या राज्यात देखील आपले कार्य पोहोचले आहे. याच श्रुंखलेत अजून एका उपक्रमाच्या माध्यमातून आपणा सर्वांना अतिशय आनंद होइल असे काम फेसबूकवर्रील मित्र-मैत्रिणीनी करून दाखवले आहे.




 

मध्यंतरात श्री ढोणे यांनी पद्मश्री नामदेव ढसाळ हे कॅन्सरने आजारी असून त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याच्या IBN लोकमतच्या बातमीची लिंक पाठवली होती. त्यासोबतच सोशल नेटवर्किंग अभियानाच्या माध्यमातून आपण काही मदत उभारणार असू तर स्वतः मदत करण्याची तयारी दर्शवली. डॉ.उत्तम फरताळे यांनी पुढील कार्यासाठी पाठवलेला अॅडव्हान्स बॅंकेत जमा होताच. या बळावर मदत निधीला सुरूवात केली. निलेश कळसकर यांच्या मेहेनतीने या कामाला मोठा हातभार लावला. गंभीर आजाराला मदत करण्यासाठी उभ्या राहिलेल्या या उपक्रमासाठी दि. २३ आक्टोंबर पर्यंत जमा झालेला ५०,००० रुपये निधी आपण Bomby हॉस्पिटल, मुंबईला जाउन ढसाळ सरांच्या हाती स्वाधीन केला आहे. लक्ष्मीकांत पोवनीकर, संध्या चौगुले, उज्वल गोडबोले , वर्षा डोळस, विनोद गहाणे आणि इतर काही मित्र-मैत्रिणीच्या या सर्वांच्या सहकार्यातून आणि सहभागातून जमा झालेले ५०,००० रुपये थोर कवि नामदेव ढसाळ यांच्या शस्त्रक्रीयेसाठी त्यांना सुपूर्द करण्यात आले. (काही मित्र-मैत्रिणींची नावे बॅंक स्टेटमेंट मध्ये आली नाहीत)






 

हॉस्पीटल मध्ये देखील ढसाळ सरांचे लिखाण अविरत चालू असल्याचे बघून या माणसाचे लेखणीवरील प्रेम लक्षात येवू शकेल. त्यांच्या अडचणीत त्यांना मदत करू शकलो या पेक्षा त्यांच्यासारख्या ग्रेट माणसाची भेट झाल्याचा जास्त आनंद टीमच्या सदस्यांना झाला... हेतू स्वच्छ असेल तर कोणतेही कार्य निश्चित सिद्धीस जाते हे सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज या अभियानंतर्गत आपण सर्वांनी मिळून सिद्ध करून दाखवले. विद्रोही कवी पदमश्री नामदेव ढसाळ यांच्या आम्ही नामदेव ढसाळ सर आणि त्यांच्या पत्नी मल्लिका अमर शैख यांची भेट घेतली. नामदेव सरांनी अगदी मनमोकळ्या गप्पा केल्या आम्हाला त्यांच्या आगामी काव्यसंग्रहाच्या २ कविता वाचून दखवल्या. फेसबुकवरील मित्रांचा-मैत्रीणीना सततचा सहभाग आणि विश्वास यामुळे अभियानातील जवळपास प्रत्येक कार्य आपण यशस्वी केले आहे. याचे सर्व श्रेय आपल्या सर्वांनाच आहे यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही... अभियानातील सक्रीय सदस्य आणि सातत्याने मदत करणार्या सर्व मित्रांना... मैत्रीणीना माझे प्रणाम... 





विद्रोही कवी ढसाळ सरांना भेटायला सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज प्रमुख- प्रमोद गायकवाड सर, निलेश कळसकर, जितेंद्र माने, गौरव गायकवाड, अनुराधा नारकर, वैभव छाया, सुनील गजाकोश हे हजर होते.



 

फेसबुकच्या माध्यमातून सामाजिक भान जपण्याच्या आपल्या वाटचालीतील हे अजून एक पाउल आपणा सर्वांना समाधान देवून गेले असेल याची मला खात्री आहे... सर्व सहभागी मित्रांचे मनपूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन !!



- सोशल नेटवर्किंग फॉर सोशल कॉज प्रमुख- प्रमोद गायकवाड सर.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...