तुझे डोळे.. माझे डोळे... प्रकाश देवो जगाला !!

तुझे डोळे.. माझे डोळे... प्रकाश देवो जगाला !!




जळगाव : जीवनात एकदाच येणारा सुखद प्रसंग म्हणजे विवाह होय. आपल्या विवाहाची आठवण आयुष्यभर सोबत राहावी आणि प्रसंग येणार्‍या जोडप्यांना आदर्श ठरावा, यासाठी जळगाव शहरातील रामनगरमध्ये राहणार्‍या परेश शांताराम चौधरी (वय वर्षे २६) यांनी विवाहाच्या दिवशी कोणालाही न कळविता येणार्‍या वर्‍हाडींना आपल्याकडून लग्नाची भेट म्हणून शनिवारी लग्नमंडपातच भावी आयुष्याची सोबतीण प्रिया अरुण चौधरी (वय वर्षे २५) हिच्यासह नेत्रदानाचा अनमोल संकल्प अधिकृतरीत्या पूर्ण केला.
लग्नाच्या दिवशी विवाहबद्ध होणारे अनेक जोडपे भविष्यकाळाची स्वप्ने रंगवित असतात.

 


हे संकल्प कुटुंब नियोजनापासून ते पगाराच्या व्यवस्थापनापर्यंतच र्मयादित राहतात. आपण समाजाचं देणं लागतो याचा त्यांना विसरच पडलेला असतो. जीवनातील आनंदाचा क्षण अनुभवत असताना मग समाजोपयोगी कार्याला वेळ तरी कसा मिळणार... चौधरी दाम्पत्याची मॅरेज स्टोरी आणि संकल्पपूर्ती मात्र या सर्वांना अपवाद आणि वेगळी ठरली.


 

सप्टेंबर महिन्यात मुंबई येथील निर्मन संस्थेबद्दल तसेच त्यांच्या कार्याबद्दलची माहिती परेशला मिळाली. नागरिकत्वाची परिभाषा सिद्ध करून दाखविण्याची ही उत्तम संधी असून ती दवडता कामा नये. म्हणून परेशने होणार्‍या भुसावळस्थीत पत्नीला मागील महिन्यात नेत्रदानाच्या संकल्पाबद्दल माहिती दिली. ७ डिसेंबरला लग्नाच्या दिवशी आलेल्या पाहुण्याच्या उपस्थितीत नेत्रदानाचा संकल्प करण्याची इच्छा निर्मन फाउंडेशनचे प्रकल्प प्रमुख राजू चव्हाण यांना बोलून दाखविली.



परेश आणि त्याची पत्नी प्रिया दोघे संगणक विषयाचे पदवीधर आहेत. पारंपरिक पद्धतीने दोघांचा विवाह पार पडला. नेत्रदानामुळे आम्हाला प्रत्येकी दोनशे वर्षाचे आयुष्य लाभले आहे. अंध नागरिकाला दृष्टी मिळाली तर आमच्या जीवनाचे कल्याण होईल. प्रत्येकाने जर नेत्रदानाचा संकल्प केला तर देशातील अंधत्व नष्ट होईल, असे चौधरी दाम्पत्याने बोलताना सांगितले आहे.


 



शनिवारी भुसावळ येथे चौधरी उपवरांचा विवाह सोहळा पार पडला. विवाहाचे सप्तफेरे पूर्ण करताच दोघांनी आपल्या संकल्पाच्या प्रतिज्ञापत्रावर मान्यवरांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली. जमलेल्या पाहुण्यांना नेमके काय चालले आहे ते काही मिनिटे कळालेच नाही. झालेला प्रकार कळताच सर्वांनी टाळ्या वाजवून दोघांच्या संकल्पाचे स्वागत केले.


 



परेश अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा माजी कार्यकर्ता आहे. मार्च महिन्यात त्याच्या लग्नाची बोलणी पक्की झाली होती. विशेष म्हणजे इतरांप्रमाणे याने लग्नाचा हुंडादेखील घेतलेला नाही.


 


THANK U- LOKMAT

चला 'मनुस्मृती दहन दिन' साजरा करू या !!

चला 'मनुस्मृती दहन दिन' साजरा करू या !! 


२५ डिसेंबर १८७३ साली राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी ब्राम्हन भटजीला नं बोलावता सीताराम जबाजी आल्हाड, मंजुबाई धानोबा निम्ह्नणकर यांचा आजच्याचं दिवशी  राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांनी पहिले सत्यशोधक लग्न पुण्यामध्ये लावले होते आणि 'मनुस्मृती' नाकारली होती... व आजच्याच दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडच्या पायथ्याशी महाड मध्ये 'मनुस्मृती' दहन केली होती...


 


तरी पण आज हि आपल्या सर्वांच्या आयुष्यात 'मनुस्मृतीचा अंमल' संपलेला नाही. त्याची सुरवात आपल्या सर्वांच्या जीवनात आपल्या नकळत 'जन्मकुंडली' या विषयापासून होतो... माणसाची 'जन्मकुंडली' आज हि आपल्या जीवनात 'मनुस्मृतीचा अंमल' असल्याचा पुरावा आहे... मी­ बरेच दिवस 'मनुस्मृती दहन दिन' कसा साजरा करावा या विचारात होतो... मला वाटते हा दिवस आपण सर्वांनी आप-आपल्या गावात/­शहरात छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता जोतीराव फुले किंवा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पैकी ज्यांचा पुतळा उपलब्ध असेल तेथे सामुहिक 'जन्मकुंडली दहन' कार्यक्रम आयोजित करावा.... आणि आजची मनुस्मृती असणार्या जन्मकुंडली पासून आपली नाळ तोडावी... व प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष­ आपल्या जीवनावर असणारा 'मनुस्मृतीचा अंमल' झुगारून द्यावा... व आपल्या महापुरुषांनी दाखवलेल्या वाटेची 'वहिवाट' करावी !!





विचार- अमरजित पाटील सर, पंढरपूर.

मनुस्मृती आणि संविधान !!

मनुस्मृती आणि संविधान !!



आजचा दिनविशेष- आज दि. २५ डिसेंबर, मनुस्मृती दहनाचा ८६ वा वर्धापन दिन !!
 


महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लहानपणापासून पुस्तकांवर खूप प्रेम करत होते. नंतर त्यांनी आपल्या पुस्तकांवरील प्रेमाखातर पुस्तकांसाठी राजगृह हे घर बांधले. परंतु याच पुस्तकप्रेमी विद्वानाने २५  डिसेंबर १९२७  रोजी महाड येथे कोट्यावधी पददलित जनतेला हीन समजणारया विषमतावादी मनुस्मृती या पुस्तकाचे दहन करून क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली होती.


 

काय होते या मनुस्मृती मध्ये जाणून घेऊन या भारतीचे संविधान आणि मनुस्मृती यामधील फरकातून:-



 
१) मनुस्मृती:- [1.31, 429, 499] निच ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य व शुद्र हे जन्मत: `असमान` आहेत. कारण,
 
ब्राम्हणोस्य मुखमासीद बाहू राजन्य कृत्य:।
उरु तदस्य यह वैश्य: पदभ्यां शुद्रो अजायत॥

 


अर्थ - ब्राम्हणांचा जन्म ब्रम्हाच्या मुखातून झाला आहे, क्षत्रियांचा जन्म बाहुतून, वैश्यांचा जन्म मांडीतून आणि शुद्रांचा जन्म ब्रम्हाच्या पायातून झाला आहे.

 

संविधान:- [कलम 14.] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिक `समान` आहेत. त्यांचा धर्म,वंश, जात, लिंग, किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. राज्य, कोणत्याही व्यक्तीस भारताच्या राज्यक्षेत्रात कायद्यापुढे समानता अथवा कायद्याचे संरक्षण नाकारणार नाही.


 

२) मनुस्मृती:-[99, 98, 1.91] कपटी ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार चार वर्णातील लोकांना सरकारी नोकरी मिळविण्याचा समान अधिकार नाही. शुद्र व्यक्ती न्यायधिश बनू शकत नाही व ब्राम्हणांशिवायशिक्ष­कीपेशा कोणीही करु शकत नाही.

 

संविधान:- [कलम 16] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना जात, धर्म, वंश, जन्म किंवा भाषा याची कोणतीही अडचण न आणता सरकारी नोकर्‍या मिळविण्याचा समान संधी देते.


 

३) मनुस्मृती:- .[1.88, 98, 90, 130] लबाड ब्राम्हणी मनुस्मृती नुसार ब्राम्हणांशिवायअन्य कोणालाही स्वातंत्र्य नाही, व्यवसाय करण्याचेही स्वातंत्र्य नाही. प्रत्येकाचे व्यवसाय ठरलेले, ब्राम्हण शिक्षण घेणार, यज्ञ करणार, क्षत्रियांनी राजकारभार करावा, वैश्यांनी व्यापार करावे. आणि शुद्रांनी या सर्वांची सेवा करावी.

 
संविधान:-[कलम 19] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार सर्व नागरिकांना सर्व प्रकारची स्वातंत्र्ये बहाल केली आहेत. त्यामध्ये भाषण व अभिव्यक्ती, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा, रहाण्याचा व स्थायिक होण्याचा तसेच कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय करण्याचा हक्क असेल.


 


४) मनुस्मृती:- [अध्याय 715, 716] धुर्त ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांना गुलाम बनविले जाऊ शकते. परंतु कोणत्याही परिस्थितीत ब्राम्हणांना गुलाम बनविले जाऊ शकत नाही.

 

संविधान:- [कलम 23] परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधान सांगते की, माणसांचा अपव्यापार आणि वेठबिगारी यांना मनाई आहे. कोणत्याही परिस्थितीत माणसांना विकता किंवा विकत घेता येत नाही. किंवा त्यांना गुलाम बनविले जाऊ शकत नाही. याचे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल.


 

५) मनुस्मृती:- [1.88, 89, 90, 91] ढोंगी ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार फक्त ब्राम्हणांनाच शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांना शिक्षण घेण्याचा अधिकार नाही.

 
संविधान:- [कलम 21ए] परंतु आंबेडकरी भारतीय संविधानानुसार या कलमान्वये शिक्षणाचा हक्क बहाल करण्यात आला आहे. राज्य हे, सहा वर्षापासून ते चौदा वर्षापर्यँतच्यासर्व मुलांना कायद्याने ठरविल्यानुसार मोफत व सक्तीचे शिक्षण देईल.


 

६) मनुस्मृती:- [1.100, 10, 129] विदेशी ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हण जगातील सर्व संपत्तीचा मालक आहे. शुद्र कितीही लायक असला तरी त्याला संपत्ती जमा करण्याचा अधिकार नाही. कारण शुद्राने संपत्ती जमा केल्यास ब्राम्हणांस त्रास होतो.

 
संविधान:- [कलम 300 क] परंतु आंबेडकरी भारतीय संविधानानुसार कायद्याने प्राधिकार दिल्यावाचून कोणत्याही व्यक्तीला तिच्या मालमत्तेपासून वंचित करण्यात येणार नाही`. कायद्याने कोणत्याही व्यक्तीला त्याच्या संपत्तीच्या अधिकारापासून परावृत्त केले जाऊ शकत नाही. त्याच्या संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे.


 

७) मनुस्मृती:- [मनुस्मृती 8.276] युरेशियन ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार शुद्राने ब्राम्हणाची निंदा केल्यास त्याची जीभ कापावी, परंतु तोच अपराध ब्राम्हणांनी केल्यास त्यास राजाने कमीत कमी शिक्षा द्यावी.

 
संविधान:- परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार कोणत्याही व्यक्तीने कोणत्या दुसर्‍या व्यक्तीची निंदा, भाषा किंवा लिखीत स्वरुपात केली असल्यास त्यास प्रचलीत कायद्यानुसार दोन वर्षाची सजा किंवा जुर्माना किंवा दोन्ही सजा दिल्या जाते.

 


८) मनुस्मृती:- [8. 359] आर्य ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हण स्त्री बरोबर कोणी व्यभीचार केल्यास त्यास मृत्यूदंड द्यावा परंतु ब्राम्हणाने क्षत्रिय, वैश्य, शुद्र यांच्या स्त्रीशी व्यभिचार केल्यास त्यास फक्त रु. 500 पण सौम्य दंड करावा.

 

संविधान:- मात्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार, तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा सांगितलेली असेल ती करता येईल. आयपीसी म्हणजे इंडियन पीनल कोड नुसार कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही कोणत्याही स्त्रीशी व्यभिचार केल्यास त्यास पाच वर्षाची शिक्षा व जुर्माना किंवा दोन्ही शिक्षा केल्या जातात.

 



९) मनुस्मृती:- [11.127, 129.30, 10.381] भट ब्राम्हणी मनुस्मृतीनुसार ब्राम्हणाच्या हत्येची शिक्षा फक्त मृत्यूदंड आहे. परंतु ब्राम्हणाने कोणाची हत्या केल्यास त्याला मृत्यूदंडाची शिक्षा करता येत नाही कारण ब्राम्हण हत्येपेक्षा मोठा अपराध पृथ्वीतलावर नाही. त्यामुळे राजाने ब्राम्हण वधाचा विचारही मनात आणू नये.

 

संविधान:- परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत भारतीय संविधानानुसार, तो अपराध करण्याच्या वेळी अंमलात असलेल्या कायद्याखाली जी शिक्षा सांगितलेली असेल ती करता येईल. आयपीसी म्हणजे इंडियन पीनल कोड नुसार हेतु पुरस्पर हत्या केली असल्यास त्याच्या या कृत्याला मानव हत्त्या समजून त्यास मृत्यूदंड किंवा आजीवन कारावास या शिक्षा दिल्या जातात.

आपली राज्यघटना जगात वंदनीय आहे. आपल्या राज्यघटनेमुळे राजेशाही, सरंजामशाही नेस्तनाबूत झाली. राज्यघटनेमुळे सर्व समाज व बहुजनांमध्ये आमूलाग्र बदल झाला. एकेकाळी मनुस्मृतिनुसार सती जाणारी स्त्री आज देशाची पंतप्रधान अथवा राष्ट्रपती बनू शकते. ही व्यवस्था बदलण्याचे काम राज्यघटनेमुळे झाले आहे. सामाजिक सुधारणा व सामाजिक परिवर्तन ही राज्यघटनेची देणगी आहे. संविधानामुळे राणीच्या पोटी जन्माला येणारा राजा मतपेटीतून जन्माला येऊ लागला.परंतु स्वातंत्र्याचे सुराज्य झाले नाही. कारण त्यांच्या पोटात मनुस्मृती व ओठात संविधान या बाजिंदेपणामुळे राष्ट्रीय विकास झालाच नाही. राजकीय व प्रशासनव्यवस्थेमुळे सामान्यांच्या विकासात अडथळे येत आहेत. त्यामुळे राजकारण व प्रशासन व्यवस्थेतही त्या दृष्टिकोनातून बदल घडायला पाहिजेत.


मनुस्मृतीचे समर्थक असणार्‍यांच्या मनातून मनुस्मृती अजूनही जात नाही. त्यामुळे देशात रोज अनेक अविपरीत घटना घडत असतात. त्यासाठी भारतीय संविधानाची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे . तरच या देशात स्वांतत्र्य, समता, बंधुता, न्याय व विज्ञान या पंचसूत्री वर आधारित भारत निर्माण होईल.


मनुस्मृतीने स्त्रिया आणि शुद्र ह्या दोघांना जनावरापेक्षा खालची वागणूक द्यावी हे लिहिले आहे, आजही शिकल्यासवरलेल्या स्त्रिया मुली मासीक पाळीत स्वयंपाक घरात जात नाहीत, देवळात जात नाहीत, आजही वयाच्या तिशीत विधवा झालेल्या मुलीना अगदी घाणेरडी स्थळे येतात, मात्र घटस्फोटीत मुलाला जॉब चांगला असला तर प्रथम वधु मिळते, पण मुलीना घटस्फोटीत किंवा विधुर हेच पर्याय असतात. कौमार्याचा इतका बावू करून ठेवलाय कि बास. मुलगी झाली तरी स्त्रीला दोष, वाईट घडलं तरी तीच पांढर्‍या पायाची असं सांगते मनुस्मृती. बहुजनांना न्याय द्यायचा असेल तर भारतीय संविधानाची तंतोतंत अंमलबजावणी गरजेची आहे. वरिष्ठ नोकरशहा हा कनिष्ठांना व सामान्यांना हीनतेची वागणूक देत आहे. सोशल वर्णाश्रमाची मनुवादी व्यवस्था पद्धती प्रशासनामध्ये आहे. पोटात मनुस्मृती व ओठात संविधान या वृत्तीमुळे राष्ट्रीय विकास झालाच नाही. शासन व्यवस्थेत वरिष्ठ नोकरशहा हे नियंत्रित कार्यसंस्कृतीचाअवलंब­ करतात. त्यामुळे प्रशासनात व या कार्यसंस्कृतीत बदल घडवला पाहिजे. राजकीय नेतृत्वाने हे ध्यानात घेऊन बदल घडवले पाहिजेत. ‘भारतीय संविधान आणि शासनव्यवस्था किती जवळ, किती दूर?’ हे बहुजनांनी समजून घेतले पाहिजे.
 



मनुस्मृतीने स्त्रीदास्याचा सातत्यानेच पुरस्कार केलेला आहे आणि त्याचा प्रभाव जनमानसावर टिकून आहे. मनुस्मृतीच्या प्रभावामुळे आजच्या विज्ञान युगामध्येदेखील स्त्रियांवर पाशवी अन्याय अत्याचार होताना दिसून येतात. मनुस्मृतीचा अभ्यास करून, तिची निरर्थकता पटल्यानंतर भारतातील ज्या विद्वानांनी मनुस्मृतीला कचराकुंडीचा रस्ता दाखविला त्या विद्वानांपैकी प्रबोधनकार ठाकरे हे एक आहेत. त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, '' मनुस्मृती हा ब्राह्मण्याचा एक दैवत ग्रंथ होऊन बसला आहे. कोणत्याही आत्मविश्वासू , स्वावलंबी आणि अतुल पराक्रमी राष्ट्राला गुपचूप हतबल करून त्याच्या पायांत गुलामगिरीच्या अभेद्य श्रृंखला ठोकायच्या असतील तर त्याला नित्य मनुस्मृतीचे डोस ढोसण्यास द्यावे. हटकून ते राष्ट्र नामर्द, परावलंबी आणि पतीत झाल्याशिवाय राहणार नाही.'' प्रबोधनकारांच्या वरील उद्गारावरून देशाभिमान, राष्ट्राभिमान आणि राष्ट्रभक्तीचा डांगोरा पिटणार्‍यांच्याडोळया­त अंजन घातले जाईल काय ! खर्‍या अर्थाने आपल्या राष्ट्राला नामर्द, पतीत आणि परावलंबी बनवायचे नसेल तर देशातील स्वाभिमानी वीरांनी प्रथमत: मनुस्मृतीला गाडून टाकणेच आवश्यक आहे. प्रबोधनकारांचे हे विचार आजही प्रेरणादायी आहेत. निधर्मी समाज आणि निधर्मी राज्य ह्या तत्त्वाला प्रबोधनकारांनी मान्यता दिलेली आहे.थोडक्यात प्रबोधनकारांच्या सामाजिक विचारांमध्ये वर्तमान काळाच्या गरजांची पूर्तता करण्याची क्षमता आहे.

 


मनुस्मृतीने ज्या वर्गाच्या आणि जातीच्या हितसबंधाचे रक्षण केले, त्या वर्गाचा जळफळाट होत आहे. मनुस्मृती आणि भारताची राज्यघटना ही दोन ध्रुवाची दोन टोके आहेत. मनुस्मृती विषमतेचा पुरस्कार करते तर भारताची राज्यघटना समतेचा पुरस्कार करते त्यामुळे मनुस्मृतीच्या समर्थकांना भारताची राज्यघटना सोसवत नाही. ती त्यांच्या डोळयात कुसळाप्रमाणे एकसारखी सलत आहे. म्हणून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. भारतीय संविधान आणि मनुस्मृती यातील फरक लक्षात घेवून बहुजन समाजाने आपला शत्रु कोण व मित्र कोण आहे हे ओळखावे. आता मनुस्मृतीप्रमाणे नव्हे, तर भारतीय संविधान याप्रमाणे आपली वाटचाल सुरू ठेवावी. मनुस्मृती दहनाचा इतिहास आठवावा. कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जे इतिहास विसरतात, ते इतिहास घडवू शकत नाहीत.


 


स्त्री मुक्ती दिनाला ... मनूस्मृती दहन दिनानिमित्त क्रांतिकारी सलाम...  विषवल्ली रोवणाऱ्या मनूस्मृतीची विषारी रोपटे मुळासकट उपटून काढत संवैधानिक प्रशासनाचा पाया रचणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन !!




लेखं- श्रीराम पवार सर.


२५ डिसेंबर आज मनुस्मृती दहन दिन !!

आज मानवतेचा दिन आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण आजच्या दिवशी दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या... पहिली म्हणजे जगाला विश्वशांती आणि मानवतेचा संदेश देणारे ख्रिश्चन धर्मसंस्थापक येशू ख्रिस्त यांचा जन्म दिन आणि दुसरी म्हणजे तमाम भारतीय स्त्रियांना आणि ब्राम्हणेतरांन ब्राम्हणी गुलामगिरीतुन मुक्त करण्यासाठी मनुस्मृतीच दहन करुन बाबासाहेबांनी दिलेला मानवतेचा संदेश.
 


 आज मनुस्मृती दहन दिन !!


आज दि. २५ डिसेंबर १९२७  रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे सहकारी 'सहस्रबुध्दे' यांच्या हातुन विषमतावादी, जातीवादी, कर्मकांडवादी, वर्णवादी, व्यवस्थेला धरून चालणारी "मनुस्म्रूती" चे २५/१२/१९२७ साली बाबासाहेबांनी महाड येथे मनुस्मुर्तीचे दहन केले आणी बहूजनांना जातीवादी समाजरचनेतून मुक्त केले.


 

चला मनुस्मृतीत काय आहे हे जाणून घेऊ या....
-------------------------------------------------

 


आज मनुस्मृती या ग्रंथाविषयी देत आहे. मी कुण्या एका धर्मविरोधी नाही माझा उदेश एकच आहे धर्मात जे चुकीचे आहे ते मांडणे.....


 

कृपया माझ्या प्रिय मित्र-मैत्रीणीनी मला समजुन घ्यावे आणि समर्पक प्रतिक्रिया देणे !!!!!!!


 

मी "मनुस्मुर्ति" ग्रंथात काय दिले आहे ते संक्षिप्त स्वरुपात मांडतो आहे,

 



"मनुस्मुर्ति" में क्या कहा हैं... यह देखिये-


 



१- पुत्री,पत्नी,माता या कन्या,युवा,व्रुद्धा किसी भी स्वरुप में नारी स्वतंत्र
नही होनी चाहिए.
- मनुस्मुर्तिःअध्याय-९ श्लोक-२ से ६ तक.

 


२- पति पत्नी को छोड सकता हैं, सुद (गिरवी) पर रख सकता हैं, बेच
सकता हैं, लेकिन स्त्री को इस प्रकार के अधिकार नही हैं.
किसी भी स्थिती में, विवाह के बाद, पत्नी सदैव पत्नी ही रहती हैं.
-मनुस्मुर्तिःअध्याय-९ श्लोक-४५

 


३- संपति और मिलकियत के अधिकार और दावो के लिए, शूद्र
की स्त्रिया भी "दास" हैं, स्त्री को संपति रखने का अधिकार नही हैं,
स्त्री की संपति का मलिक उसका पति,पूत्र, या पिता हैं.
- मनुस्मुर्तिःअध्याय-९ श्लोक-४१६.

 


४- ढोर, गंवार, शूद्र और नारी, ये सब ताडन के अधिकारी हैं,
यानी नारी को ढोर की तरह मार सकते हैं....तुलसी दास पर भी इसका प्रभाव
दिखने को मिलता हैं, वह लिखते हैं-"ढोर,चमार और नारी, ताडन के
अधिकारी."
- मनुस्मुर्तिःअध्याय-८ श्लोक-२९९

 


५- असत्य जिस तरह अपवित्र हैं, उसी भांति स्त्रियां भी अपवित्र हैं,
यानी पढने का, पढाने का, वेद-मंत्र बोलने
का या उपनयन का स्त्रियो को अधिकार नही हैं.
- मनुस्मुर्तिःअध्याय-२ श्लोक-६६ और अध्याय-९ श्लोक-१८.

 


६- स्त्रियां नर्कगामीनी होने के कारण वह यग्यकार्य या दैनिक अग्निहोत्र
भी नही कर सकती.(इसी लिए कहा जाता है-"नारी नर्क का द्वार")
-मनुस्मुर्तिःअध्याय-११ श्लोक-३६ और ३७ .

 


७- यग्यकार्य करने वाली या वेद मंत्र बोलने वाली स्त्रियो से
किसी ब्राह्मण भी ने भोजन नही लेना चाहिए, स्त्रियो ने किए हुए सभी यग्य
कार्य अशुभ होने से देवो को स्वीकार्य नही हैं.
-मनुस्मुर्तिःअध्याय-४ श्लोक-२०५ और २०६ .

 


८- - मनुस्मुर्ति के मुताबिक तो , स्त्री पुरुष को मोहित करने वाली
- अध्याय-२ श्लोक-२१४ .

 


९ - स्त्री पुरुष को दास बनाकर पदभ्रष्ट करने वाली हैं.
अध्याय-२ श्लोक-२१४

 


१० - स्त्री एकांत का दुरुप्योग करने वाली.
अध्याय-२ श्लोक-२१५.

 


११. - स्त्री संभोग के लिए उमर या कुरुपताको नही देखती.
-अध्याय-९ श्लोक-११४.

 



१२- स्त्री चंचल और हदयहीन,पति की ओर निष्ठारहित होती हैं.
अध्याय-२ श्लोक-११५.

 


१३.- केवल शैया, आभुषण और वस्त्रो को ही प्रेम करने वाली, वासनायुक्त,
बेईमान, इर्षाखोर,दुराचा री हैं .
-अध्याय-९ श्लोक-१७.

 


१४.- सुखी संसार के लिए स्त्रीओ को कैसे रहना चाहिए? इस प्रश्न के उतर
में मनु कहते हैं- (१). स्त्रीओ को जीवन भर
पति की आग्या का पालन करना चाहिए.
-मनुस्मुर्तिःअध्याय-५ श्लोक-११५. (२).

 


१५. पति सदाचारहीन हो,अन्य स्त्रीओ में आसक्त हो, दुर्गुणो से भरा हुआ
हो, नंपुसंक हो, जैसा भी हो फ़िर भी स्त्री को पतिव्रता बनकर उसे देव
की तरह पूजना चाहिए.
- मनुस्मुर्तिःअध्याय-५ श्लोक-१५४.

 


१६. वर्णानुसार करने के कार्यः - -
महातेजस्वी ब्रह्मा ने स्रुष्टी की रचना के लिए ब्राह्मण,क्षत्रिय,वैश्य और
शूद्र को भिन्न-भिन्न कर्म करने को तै किया हैं - - पढ्ना,पढाना,यग्य
करना-कराना,दान लेना यह सब ब्राह्मण को कर्म करना हैं.
-अध्यायः१:श्लोक:८७ -

 


१७. प्रजा रक्षण , दान देना,यग्य करना, पढ्ना...यह सब क्षत्रिय
को करने के कर्म हैं.
-अध्यायः१:श्लोक:८९ -


 


१८. पशु-पालन , दान देना,यग्य करना, पढ्ना,सुद (ब्याज) लेना यह वैश्य
को करने का कर्म हैं.
-अध्यायः१:श्लोक:९०.

 


१९. द्वेष-भावना रहित, आंनदित होकर उपर्युक्त तीनो-वर्गो की नि:स्वार्थ
सेवा करना, यह शूद्र का कर्म हैं.
- अध्यायः१:श्लोक:९१. (२) प्रत्येक वर्ण की व्यक्तिओके नाम कैसे हो?:-
-

 



२०. वर्ण की श्रेष्ठा का अंकन :-
- ब्राह्मण को विद्या से.
- क्षत्रिय को बल से.
- वैश्य को धन से.
- शूद्र को जन्म से ही श्रेष्ठ मानना.
(यानी वह जन्म से ही शूद्र हैं)
- अध्यायः२:श्लोक:१५५.

 



२१. विवाह के लिए कन्या का चयन:-
ब्राह्मण सभी चार वर्ण की कन्याये पंसद कर सकता हैं.
- क्षत्रिय - ब्राह्मण कन्या को छोडकर
सभी तीनो वर्ण की कन्याये पंसद कर सकता हैं.
- वैश्य - वैश्य की और शूद्र की ऎसे दो वर्ण
की कन्याये पंसद कर सकता हैं. -
- शूद्र को शूद्र वर्ण की ही कन्याये विवाह के लिए पंसद कर सकता हैं.
- (अध्यायः३:श्लोक:१३)
(यानी शूद्र को ही वर्ण से बाहर अन्य वर्ण की कन्या से विवाह नही कर
सकता.)

 



२२. अतिथि विषयक:-
- ब्राह्मण के घर केवल ब्राह्मण ही अतिथि गीना जाता हैं, (और वर्ण
की व्यक्ति नही)
- क्षत्रिय के घर ब्राह्मण और क्षत्रिय ही ऎसे दो ही अतिथि गीने जाते थे.
- वैश्य के घर ब्राह्मण,क्षत्रिय और वैश्य तीनो द्विज अतिथि हो सकते हैं,
लेकिन ...
- शूद्र के घर केवल शूद्र ही अतिथि कहेलवाता हैं
- (अध्यायः३:श्लोक:११०) और कोइ वर्ण का आ नही सकता...

 



२३. पके हुए अन्न का स्वरुप:-
- ब्राह्मण के घर का अन्न अम्रुतमय.
- क्षत्रिय के घर का अन्न पय(दुग्ध) रुप.
- वैश्य के घर का अन्न जो है यानी अन्नरुप में.
- शूद्र के घर का अन्न रक्तस्वरुप हैं यानी वह खाने योग्य ही नही हैं.
(अध्यायः४:श्लोक:

 



२४. महिलाओ के साथ गैरकानूनी संभोग करने हेतू:-
- ब्राह्मण अगर अवैधिक(गैरकानूनी) संभोग करे तो सिर पे मुंडन करे.
- क्षत्रिय अगर अवैधिnक(गैरकानूनी) संभोग करे तो १००० भी दंड करे.
- वैश्य अगर अवैधिक(गैरकानूनी) संभोग करे तो उसकी सभी संपति को छीन
ली जाये और १ साल के लिए कैद और बाद में देश निष्कासित.
-शूद्र अगर अवैधिक(गैरकानूनी) संभोग करे तो उसकी सभी संपति को छीन
ली जाये , उसका लिंग काट लिआ जाये.
- शूद्र अगर द्विज-जाती के साथ अवैधिक (गैरकानूनी) संभोग करे
तो उसका एक अंग काटके उसकी हत्या कर दे.
(अध्यायः८:श्लोक:३७४,३७५,३७९)

 



२५. हत्या के अपराध में कोन सी कार्यवाही हो?:-
- ब्राह्मण की हत्या यानी ब्रह्महत्या महापाप. (ब्रह्महत्या करने
वालो को उसके पाप से कभी मुक्ति नही मिलती)
- क्षत्रिय की हत्या करने से ब्रह्महत्या का चौथे हिस्से का पाप लगता हैं.
- वैश्य की हत्या करने से ब्रह्महत्या का आठ्वे हिस्से का पाप लगता हैं.
- शूद्र की हत्या करने से ब्रह्महत्या का सोलह्वे हिस्से का पाप लगता हैं.
(यानी शूद्र की जिन्द्गी बहोत सस्ती हैं)
- (अध्यायः११:श्लोक:१२६)


 


यह सिर्फ trailer था ऐसा समझा जाये, फिर देखिये मनुस्मृती मै और कितनी गंदगी होगी.. ऐसी मनुस्मृती को लाने के लिये आज भी भारत का एक समाज काम कर राहा है, क्यूंकी उनको उपर दिया हुआ सब भारत मै लाना है, उन्हे अपनी उच्चता चाहिये.

 



http://sndiamond.blogspot.com/2013/04/manusmruti.html?m=1



 


खालील लिंकवर बरीच पुस्तके PDF स्वरुपात उपलब्ध आहेत ती तुम्ही डाउनलोड करुन वाचु शकता.

 


http://yashwantmanohar.com/vaicharek/ambedkaranni-manusmruti-ka-jalali/


.
.
 


http://yashwantmanohar.com/category/vaicharek/
 



 


धन्यवाद- Amol Kore-Mali

गर्भलिंगनिदानाची माहिती कशी द्याल ???

गर्भलिंगनिदानाची माहिती कशी द्याल ???



१९९४ चा गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र वापर (गर्भलिंग निदान प्रतिबंध) कायदा गर्भाधारणेआधी आणि नंतरही गर्भालिंगनिदानाला प्रतिबंध करतो. या कायद्यानुसार, कोणत्याही वैद्यकीय कारणाशिवाय गर्भाचे लिंग जाणून घेणे किंवा सांगणे हा गुन्हा आहे. परंतु लोकांच्या सहभागाशिवाय आणि त्यांनी असे गुन्हे पुढे आणल्याशिवाय या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकणार नाही. तुम्हाला गर्भलिंग निदानाची एखादी घटना माहित असेल तर तुम्ही या संकेतस्थळावर तक्रार नोंदवू शकता. तुमची इच्छा असेल तर तुमची ओळख जाहीर करण्याची गरज नाहे / तेही स्वतःची ओळख उघड न करता.

 

हे लक्षात ठेवा.-

 

तक्रार करताना संबंधित दवाखाना किंवा रुग्णालयाचे पूर्ण नाव आणि पत्ता द्यावा लागेल.
   
 

तुमची बाजू बळकट करण्यासाठी तुम्ही फोटो, दवाखान्यात दिलेली चिट्ठी इत्यादी संकेतस्थळावर पाठवू शकता.
   
 

तुमच्या तक्रारीची आधी छाननी केली जाईल. अशा छाननीशिवाय आणि पुरेशा पुराव्याशिवाय कोणताही डॉक्टर किंवा दवाखाना दोषी मानला जाणार नाही.
   
 

तुम्ही तुमची ओळख उघड न करता तक्रार नोंदवू शकता.


 

तक्रार नोंदवण्याच्या पायऱ्या-

   


१. तुमची तक्रार इथे नोंदवा असे लिहिलेल्या बाणावर क्लिक करा.
   


२. तुम्ही तुमची माहिती दिल्यास आम्हाला तुमच्या तक्रारीची चौकशी करणं सोपं जाईल. परंतु, तुम्हाला तुमची ओळख उघड करायची नसेल तर नाही वर क्लिक करा आणि पुढे चालू (continue) वर क्लिक करा.


 



तक्रार अर्ज भरताना-

 

टीप: * अशी खूण असलेले सर्व रकाने भरणं आवश्यक आहे.
   


१. ‘जिल्हा निवडा (Select District) वर क्लिक करा, यानंतर येणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीतून तुम्हाला ज्या जिल्ह्यातील घटनेची तक्रार नोंदवायची आहे त्यावर क्लिक करा.
   


२. ज्या दवाखान्याची किंवा डॉक्टरची तक्रार करायची आहे त्यांचे नाव आणि पत्ता सोबत ठेवा. कारण तक्रार नोंदवण्यासाठी हे लागेलच. डॉक्टरचे किंवा संबंधित दवाखान्यातील कर्मचाऱ्यांचे नाव तुम्हाला माहित असल्यास द्या.
   


३. गर्भालिंग निदानाची घटना तुम्हाला कशी समजली याचे उत्तर दिलेल्या पर्यायांमधून निवडून त्यावर क्लिक करा.
   


४. तुम्हाला संबंधित घटनेची जास्त माहिती द्यायची असेल तर सोबतच्या घटनेचे तपशील (Description of the Complaint) चौकटीत जास्तीची माहिती लिहा.
   


५. जर संबंधित घटना तुमच्या स्वतःच्या बाबतीत, तुमच्या कुटुंबातील कुणाबरोबर किंवा ओळखीच्या कुणाबाबत घडली असेल तर पुढील प्रत्येक प्रश्नासमोर हो, नाही किंवा माहित नाही यातील योग्य पर्याय निवडा.
   


६. तुमच्याकडे या घटनेसंदर्भात औषधाची चिठ्ठी, फोटो किंवा इतर कागदपत्र असल्यास तेही सोबत ठेवा. म्हणजे तेही नेटवर लगेच पाठवा. यामुळे तुमची तक्रार जास्त सबळ होईल.
   


७. या केससंदर्भात जास्त माहितीसाठी तुम्हाला संपर्क केलेला चालणार असेल तर सोबतच्या चौकटीवर क्लिक करा. टीप: ही माहिती सक्तीची नसली तरी ती दिल्यास केसच्या तपासात नक्कीच मदत होते.
  

 
८. ‘यानंतर पाठवा (Submit) वर क्लिक करा.


 



ज्यांना स्वतःची माहिती द्यायची आहे त्यांच्यासाठी जास्तीच्या पायऱ्या:-

   


१. तुमचं नाव, दूरध्वनी क्रमांक (असल्यास), ईमेल (असल्यास) आणि तुम्हाला जिथे संपर्क करता येईल असा पूर्ण पत्ता द्या.
   
 

२. यानंतर तक्रार नोंदवा (Register Complaint) वर क्लिक करा.


www.amchimulgi.gov.in

 


गर्भलिंगनिदानाबाबत काही तथ्यं -

 


एखाद्या समाजात मुलींची संख्या कमी आहे किंवा खालावत चालली आहे हे कसं ठरवायचं?


 

निसर्गाच्या नियमानुसार, १००० मुलांमागे ९४०-९५० (जास्त अचूक म्हणजे ९५२) मुली जन्माला येतात. आपल्या भागात १००० मुलां मागे प्रत्यक्षात किती मुली जन्म घेतात हे जर आपण शोधलं तर आपल्याला जन्माच्या वेळचे लिंग गुणोत्तर (Sex Ratio at Birth) मिळू शकेल. ०-६ वयोगटासाठी १००० मुलांमागे मुलींची संख्या घेतल्यास आपल्याला बाल लिंग गुणोत्तर (Child Sex Ratio) मिळते. एखाद्या समाजात गर्भलिंग निवडीचे प्रमाण किती आहे हे आपल्याला जन्माच्या वेळच्या लिंग गुणोत्तरावरून जास्त अचूकपणे समजू शकते.
 



जनगणनेवरून देशाच्या, राज्याच्या आणि जिल्ह्याच्या पातळीवर ०-६ वयोगटातील लिंग गुणोत्तर काय आहे हे समजते तर सँम्पल रजिस्ट्रेशन सर्वेतून (Sample Registration Survey) जन्माच्या वेळचे लिंग गुणोत्तर समजते.
 



२००१ च्या जनगणनेनुसार देशाचं ०-६ वयोगटासाठी लिंग गुणोत्तर ९२७ होतं. महाराष्ट्रासाठी हे गुणोत्तर ९१३ होतं. त्यातही कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण ८७८ हून कमी होतं.
एस आर एस च्या आकडेवारीनुसार २००६-२००८ साठी महाराष्ट्राचे जन्माच्या वेळचे गुणोत्तर १००० मुलांमागे ८६९ मुली इतके कमी झाले आहे. यातून राज्यामध्ये गर्भलिंगनिदान होत आहे हे स्पष्टपणे दिसून येते.


गर्भलिंग निवड कायद्याने गुन्हा आहे का?


१९९४ चा गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र वापर (गर्भलिंग निदान प्रतिबंध) या कायद्यानुसार गर्भलिंगनिवड गुन्हा आहे. सोनोग्राफीसारख्या तंत्राचा वापर गर्भाचं लिंग जाणून घेण्यासाठी केला जाऊ नये म्हणून हा कायदा अस्तित्वात आला. या कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी ३ वर्षांपर्यंत कैद आणि १०,००० रु. दंडाची शिक्षा होऊ शकते. परंतु या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकलेली नाही आणि त्यामुळे थोड्याच लोकांना शिक्षा होऊ शकली आहे. गुन्हा सिद्ध करणं हेच सर्वात मोठा आव्हान आहे. कारण गर्भलिंग निदान उघडपणे होत नाही आणि बहुदा दोन्ही पक्षांच्या संमतीने घडत असते. त्यामुळे तक्रार कोण दाखल करणार?



पण गर्भपाताला तर कायद्याने मंजुरी आहे ना ?

हो. १९७२ चा वैद्यकीय गर्भपात कायदा विशिष्ट परिस्थितीत गर्भपात करण्यास मंजुरी देतो. उदा. आईच्या किंवा होणाऱ्या बाळाच्या जीवाला धोका असल्यास, बलात्कार झाला असल्यास किंवा गर्भनिरोधक निकामी ठरल्याने दिवस राहिले असल्यास गर्भपात करता येतो. परंतु हा कायदा गर्भलिंग निवड करून नंतर केलेल्या गर्भपाताला परवानगी देत नाही.



लेखं- निलेश कळसकर. (जळगाव)


डॉ. देवयानी खोब्रागडे ऐवजी देवयानी जोशी असती तर ??

डॉ. देवयानी खोब्रागडे ऐवजी देवयानी जोशी असती तर??


भारताच्या उपवाणिज्य महादूत डॉ देवयानी खोब्रागडे यांच्यावर व्हिसा अर्जात चुकीची महिती देऊन मोलकरणीला कमी वेतन दिल्याबद्दल अमेरिकेने कारवाई केली. ही कारवाई करत असताना अमेरिकन सरकारने देवयानी यांचे पद व प्रतिष्ठा दुर्लक्षित केली. अर्थातच देवयानी अमेरिकेत भारताचे प्रतिनिधित्व करतात. ते काही ब्राह्मण समाजातील लोकांप्रमाणे अमेरिकेचे तळवे चाटून आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी तेथे गेलेल्या नाहीत. त्यांना ज्या प्रमाणे वागणूक देण्यात आली ती आपल्या देशाला मान खाली घालायला लावणारी आहे.


परंतु आपल्या देशाचे दुर्दैव. इथल्या मिडीयाने या समग्र प्रकरणात अमेरिकन सरकारची बाजू उचलून घेत देवयानी यांच्यावरच ताशेरे ओढले. काही मनुवादी वृत्तपत्रांनी देवयानी यांच्या सारख्या लोकांमुळे प्रतिमा डागाळते ती आपल्या देशाची असे लिहून अमेरिकेला झुकते माप दिले. काहींनी खोब्रागडे यांची बाजू न तपासता त्यांना आरोपीही करून टाकलय. तर केंद्र सरकारने जेव्हा अमेरिकेला त्यांची जागा दाखवण्यासाठी ठोस पावले उचलली तेव्हा लोकसत्ता या ब्राहाम्नी वृत्तपत्राने १९ डिसेंबर २०१३ च्या संपादकीयात भारत सरकार व देवयानी खोब्रागडे यांच्यावर टीकेची झोड उठवली.


बऱ्याच मनुवादी वृत्तपत्रांनी देवयानी आणि त्यांचे वडील उत्तम खोब्रागडे यांनी भारतात केलेले घोटाळे उघडकीस आणून आगीत तेल ओतण्याचे काम केले. खोब्रागडे कुटुंबाने भारतात जर काही घोटाळे केलेले असतील तर त्यांच्यावर भारतीय कायद्यानुसार आपल्या देशात कारवाई केल्या जाऊ शकते, परंतु अमेरिकेने एका उच्चपदस्थ भारतीय महिलेला ज्या प्रकारची वागणूक दिली त्याच्या विरोधात सबंध देशाने पेटून उठायला हवे होते. तसे इथल्या मनुवादी मिडीयाने होऊ दिले नाही.
 


देवयानी खोब्रागडे जर जोशी-कुलकर्णी-नेणे-दिक्क्षित-पाठक-देशपांडे असल्या असत्या तर मग मात्र सबंध देश पेटला असता. वृत्तपत्रांनी त्यांची बाजू घेण्यासाठी रकानेच्या रकाने खर्ची घातले असते. इलेक्ट्रोनिक मिडीयाने तेच तेच दाखवून सामन्यांचे डोके उठवले असते. अमेरिकन सरकार जोपर्यंत माफी मागणार नाही तोपर्यंत देशवासियांना समस्त ब्राह्मणवादी कम्पुनी वेठीस धरले असते. आर.एस.एस. कृत भारत मातेच्या चेहऱ्याला जोशी बायींचे तोंड बसवून रथयात्रा काढून भारतभर फिरवल्या गेले असते. रास्ता रोको-जाळ पोळ केल्या गेली असती.....


कारण ब्राह्म्नाचा अवमान म्हणजे समस्त देशाचा अवमान, ब्राह्मण खतरेमे म्हणजे समस्त हिंदू खतरेमे. काश्मीर ते कन्याकुमारी येथील समस्त भटांना राष्ट्रवादाचा पान्हा फुटला असता आणि त्यांनी भारत सरकारवर दबाव टाकून अमेरिकन सरकारला माफी मागायला भाग पाडले असते. परंतु दुर्दैवाने खोब्रागडे कुटुंबीय हे आंबेडकरी समाजातील आहे. त्यातही उत्तम खोब्रागडे यांनी परिवर्तनवादी चळवळीत काम केलेले आहे. या निमित्ताने लोकसत्ता (नव्हे भटसत्ता) या ब्राह्मणी वृत्तपत्राने त्यांच्या या परिवर्तनवादी कार्याची देखील खिल्ली उडविली आहे.



म्हणजेच आजही या देशात ब्राह्मणवाद किती जिवंत आणि ज्वलंत आहे याचे हे उदाहरण आहे. ब्रि.सुधीर सावंत म्हणतात की- "सध्या या देशात नुसता मनुवाद नाही तर तो अमेरिकन भांडवलशाहीच्या हातात हात घालून बहुजनांना गुलाम बनवत आहे." याचा मनुवादी अमेरिकन भांडवलशाहीचे उत्तम उदाहरण म्हणजे हे खोब्रागडे प्रकरण.


शिव-फुले-शाहू-आंबेडकर या विचारधारेत कार्य करणाऱ्या समस्त कार्यकर्त्यांनी देवयानी ताई आणि खोब्रागडे कुटुंब यांच्या खंबीर पणे पाठीशी उभे राहावे आणि अमेरिकन भांडवलवाद आणि भारतीय मनुवाद यांची क्रूर युती गाडून टाकावी. एवढेच.



लेखं- डॉ.बालाजी जाधव, औरंगाबाद.


दाभोळकरांची हत्या करणारा केवळ हाथच नव्हे तर त्यामागील मेंदू सुद्धा गजा आड होईल अशी अपेक्षा बाळगूया !!

दाभोळकरांची हत्या करणारा केवळ हाथच नव्हे तर त्यामागील मेंदू सुद्धा गजा आड होईल अशी अपेक्षा बाळगूया !!




मानवी  मेदूत १० बिंदू असे असतात कि जे माणसाचा विचार स्वभाव, भाव, भावना नियंत्रित करत असतात. त्या बिंदू पैकी जे बिंदू जास्त उद्दीपित होतात त्या बिंदूशी निगडीत भावना त्या माणसाच्या मनामध्ये प्रबळ होते. उदा . राग, लोभ, प्रेम, संशय, आस्था, श्रद्धा इ... जवळ जवळ प्रत्येक माणूस हा कमी अधिक प्रमाणत संमोहित होऊ शकतो (अशाप्रकाराचे संमोहन संमोहन तज्ञ, वक्ते, धार्मिक बाबा गुरु उपदेशक ... इ. करू शकतात)  त्यापैकी ३५ % लोक हे डि-ट्रान्स अवस्थेत जाऊ शकतात. ह्या अवस्थेमध्ये जो संमोहित झालेला असतो तो संमोहन कर्त्यानेच दिलेल्या सूचनांचे पालन करत असतो. त्या अवस्थेत संमोहित झालेल्या माणसाला जे काही सांगितले जाते त्याची अनुभूती त्या व्यक्तीला येत असते. त्याला ते सर्व सत्य वाटू लागते. तेच सत्य आहे असे ते मानतात अशा अवस्थेत त्यांना सांगितले कि तुम्ही स्वर्गात आहात तुम्हाला साक्षात इंद्रदेव दिसत आहे तर खरच त्या संमोहित माणसाला इंद्र देव दिसू लागतो. त्या संमोहित व्यक्तीला पुढे जाऊन सांगितले कि तू स्वर्गातल्या अप्सारांबरोबर प्रणय करत आहेस तरी त्याला ते खरे वाटू लागते इतके कि त्याचे बसल्या जागेवर वीर्यपतन होते. अशा संमोहित होणार्या व्यक्तीला वारंवार काही सूचना (suggetions) देऊन त्याच्या कडून एखादे कार्य घडवून आणता येऊ शकते. अशा व्यक्ती त्या कार्यासाठी आत्म बलिदान सुद्धा देऊ शकतात . संमोहन शास्त्रातील ह्या अभ्यासाचा फायदा घेऊन त्याचा विकृतीसाठी केलेल्या वापराचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे अतिरेकी (धार्मिक दहशतवादी). अतिरेकी सुद्धा अशाच पद्धतीने तयार केले जातात . वारंवार त्यांना धार्मिक कार्यासाठी प्रेरित करून त्यांचा ब्रेन वॉश केला जातो व त्यांना बलिदानासाठी तयार केले जाते .




ह्यातील पुढचा टप्पा म्हणजे अशा प्रकारे तयार केलेल्या व्यक्तीला एक प्रोग्राम दिला जातो त्या प्रोग्राम ची तयारी करून घेतली जाते . व त्याच्या कडून ते कार्य करून घेतले जाते .



आता तर संमोहन शास्त्राचा ह्याच्यापुढे जाऊन वापर केला जातो. अशा प्रकारे संमोहन करून वैचारिक दृष्ट्या अंध केलेल्या व्यक्तीला तो कार्यक्रम देऊन पुन्हा त्याला सूचना दिल्या जातात कि हा कार्यक्रम तू पार पाडलास कि तुझ्या मेंदूतून ( स्मरण शक्तीतून ) तू पार पडलेला कार्यक्रम , कृती पूर्णपणे डिलीट होऊन जाईल म्हणजे तू जे काही केलेस त्यापैकी एकही गोष्ट तुला आठवणार नाही . तुला ह्या विषयी कोणी सूचना व मार्गदर्शन केले ते सुद्धा तुला काही आठवणार नाही . आणि खरोखर त्या अंध व्यक्तीच्या स्मरण शक्तीतून त्याने तो प्रोग्राम पूर्ण केल्या नंतर त्याला सूचना देणाऱ्या व्यक्तीने सांगितलेल्या एका विशिष्ट वेळे नंतर किंवा एका विशिष्ट ठिकाणी आल्यानंतर तो प्रोग्राम पूर्णपणे डिलीट होऊन जातो . त्याला काहीच आठवत नाही . त्याला नुकतेच झोपेतून उठल्या सारखे वाटते.




तुम्हाला हे पटत नसले तरी संमोहन शास्त्रात हे शक्य आहे व याचा वापर अतिरेकी संघटना, गुप्तचर संघटना, सैन्य खाते, कमांडो प्रशिक्षणात केला जातो. आणि अशा प्रकारे सैन्यात प्रशिक्षण देणारा एक अधिकारी "कर्नल पुरोहित" होता.



प्रज्ञा सिंग च्या बाबतीत पण असाच संमोहन शास्त्राचा वापर करण्यात आला होता . त्यामुळे सर्व पुरावे तिच्या विरुध्द दाखवत असताना सुद्धा तिच्या केलेल्या दोन्ही नारको टेस्ट मध्ये करकरेंना काही सापडले नव्हते . अर्थात करकरेंना या संदर्भात बरेचशे ज्ञान माहित असल्यामुळे ते ठाम राहिले . पण सरकार व गृह खात्याला ह्याची काही माहिती नसल्यामुळे त्यांना हा सुरुवातीला हा विनोदच वाटला पण मानव सरांच्या प्रयत्नांमुळे ह्या विषयातील गांभीर्य शरद पवारांना कळले व त्यामुळे गृह खात्याने करकरेंना पाठबळ दिले. इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते कि सनातन चा आठवले सुद्धा संमोहन शास्त्रात पारंगत आहे. त्याने तर इंग्लंड मध्ये याविषयाशी संबधित ९ वर्ष नोकरी सुद्धा केलेली आहे.



 

आता दाभोळकरांच्या हत्ये संदर्भातसुद्धा अशाच प्रकारे संमोहन शास्त्राचा वापर करण्यात आलेला असावा अशी एक शक्यता आहे . त्यामुळे हजारो लोकांची चौकशी करून सुद्धा पोलिसांच्या हाती काही फारसे लागलेले नाही. दुसरी एक शक्यता असू शकते कि खून करणार्यांचा चेहरा अगोदरच किंवा दाभोलकरांची हत्येनंतर बदलण्यात आलेला असावा . त्यामुळे रेखाचित्रांचा काही उपयोग होत नसावा. तूर्तास पोलिसांवर रोष प्रकट करणे जर घाईचे होईल. निश्चितच पोलिसांवर दबाव असला पाहिजे पण ते करत असलेल्या प्रयत्नांचा सुद्धा विचार केला पाहिजे. आपण सर्वांनी सकारात्मक मानसिकतेने लवकरात लवकर दाभोळकरांची हत्या करणारा केवळ हाथच नव्हे तर त्यामागील मेंदू सुद्धा गजा आड होईल अशी अपेक्षा बाळगूया व दाभोळकर व मानव सरांनी चालू केलेले काम पुढे चालू ठेवलं पाहिजे .




लेखं- Rahul AJ

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...