मराठ्यांचीया तो इज्जत वाचणार नाही -छत्रपती शिवराय !!

मराठ्यांचीया तो इज्जत वाचणार नाही -छत्रपती शिवराय !!




"मराठा समाजाने स्वताच्या रक्तातील सरंजामीपणा अगोदर संपवावा, ब्राह्मणशाही तर चुटकी सरशी उडून जाईल- प्रसिद्ध विचारवंत बा.ह.कल्याणकर "


प्रबोधनाची खरी गरज कुठे आहे हे ओळखून आम्ही आमची वाटचाल केली पाहिजे. जग हे खेडे बनलेले असताना आपण ग्लोबल होत आहोत की अजूनही बुरसटलेली मानसिकता जपत आहोत याचा विचार करावा. अन्यथा झपाट्याने बदलणाऱ्या या जगात मराठा कुठेही नसेल. दुसर्यांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या मराठ्यांना खडसावताना छ.शिवराय म्हणाले होते "अशाने मराठ्यांचीया तो इज्जत वाचणार नाही." पण उठसुठ शिवाजी महाराजांशी थेट संबंध दाखवत इतर जातींवर हल्ले करायचे हा कोणता शिव विचार आहे? शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी ज्या ज्या जाती लढल्या त्या त्या मराठा ही व्याख्या जर आपण मानत असू तर मग आपल्याच गाव वस्तीत राहणारे इतर जातींचे लोक मराठा नव्हेत काय? प्रत्येकाला वाटते परिवर्तन झाले पाहिजे, समाज बदलला पाहिजे परंतु हा बदल स्वताला वगळून कसा काय होईल याचाही विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. चला आपण आपल्या अंगातील सरंजामशाही अगोदर संपवूया मग पहा या देशातील ब्राह्मणवाद कसा चुटकी सरशी संपतो ते.



विचार- डॉ.बालाजी जाधव, औरंगाबाद.

मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना !!

मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना !!





आनंद वा दु:ख किंवा राग, लोभ, मोह, मत्सर या मानवी भावना सर्वांच्या अंत:करणात कमी जास्त प्रमाणात असतीलही... फटाक्यांची आतशबाजीही अशीच... भेदाभेद ओलांडून सार्‍यांना आनंद देणारी...  शनिवारी सायंकाळी शहरातील जळगाव शाहूनगरातील एका मुस्लीम कुटुंबातील मुलांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.



छायाचित्र- सुमित देशमुख.


धन्यवाद - दै.लोकमत.

फटक्यावर जो खर्च करता तो गरिब अनाथ व्यक्तीवर खर्च करा आणि त्याची दिवाळी साजरी करण्यासाठी तुम्ही मदत करा- सत्यशोधक सत्यपाल महाराज !!

फटक्यावर जो खर्च करता तो गरिब अनाथ व्यक्तीवर खर्च करा आणि त्याची दिवाळी साजरी करण्यासाठी तुम्ही मदत करा - सत्यशोधक सत्यपाल महाराज !!




लहानपणी चौथीला असताना दिवाळी च्या सुट्टी मध्ये मी सत्यपाल महाराज यांचे कीर्तन ऐकण्यास गेलो होतो. आज जसे लहान मुले एकदम पुढे जाऊन बसायचा प्रयत्न करतात तसा मी पण महाराजाच्या समोरच जाऊन बसलो. पारंपारिक कीर्तन प्रवचन यांच्या पेक्षा हे कीर्तन खूपच नवीन होते महाराज सात खंजिरी वाजवतात सर्व नवल होते माझ्यासाठी. सत्यपाल महाराज हे तुकडोजी महाराज यांचा प्रबोधनाचा वारसा चालवणारे महाराज.


 



कीर्तन सुरु झाले तुकाराम महाराज गाडगेबाबा तुकडोजी महाराज यांचे प्रबोधनाचे विचार महाराज समोर जमलेल्या तीस चाळीस हजार लोकांना विनोदी पद्धतीने आणि गावरान भाषेत सांगत होते. विषय दिवाळीचा आला मला महाराजांनी उठवले आणि विचारले ये पोऱ्या दिवाळी ला फटाके किती रुपयाचे आणले आहेस?? मी सांगितले २५० रुपयाचे आणले. त्यांनी विचारला फटाके फोडून किती वेळ मज्जा येते?? मी उत्तर दिले फटका फोडला आवाज झाला किंवा रॉकेट वर जाऊन फुटला कि तेव्हढी मज्जा येते. महाराजांनी मला सांगितले दिवाळी मध्ये अनेक घरात खायला अन्न नसत आणि तुम्ही लोक मोठा खर्च फटाक्या वर करता. तुझ्या २५० रुपये मध्ये ४ घराची दिवाळी साजरी झाली असती. या फटाक्याच्या आनंदात आपण आपल्या बाजूच्या गरीब शोषित लोकांच्या कडे लक्ष दिलेच नाही अशी मला तेव्हा भावना झाली. फटक्यावर जो खर्च करता तो गरिब अनाथ व्यक्तीवर खर्च करा आणि त्याची दिवाळी साजरी करण्यासाठी तुम्ही मदत करा... कोणाच्या घरात चूल पेटत नाही आणि बाबानो तुम्ही मोठा खर्च करून फटाके उडवता हा कुठला सण साजरा करतात??


 


मला ती गोष्ट त्या वयात खूप मनाला लागली मी फटके वाजविणे बंद केले....कोणाच्या घरात दिवाळीला गोडधोड बनत नाही कोण उपाशी असते याकडे माझी नजर तेव्हा पासून लागलेली असायची तेव्हा मी काही मोठी मदत करू शकायचो नाही पण आपल्या घरातील जे काही गोडधोड बनायचे त्या माझ्या मित्रासोबत वाटून घ्यायचो... सत्यपाल महाराज यांनी माझा दृष्टीकोन बदलून टाकला गरीब वंचित शोषित लोकांच्या कडे माझ्या मनात आत्मीयता निर्माण झाली.. मुख्य म्हणजे वायफळ खर्च टाळून आपल्या आनंदात या लोकांना सामावून घेण्याची वृत्ती तयार झाली.


 


आज दिवाळी मध्ये हजारो लाखो रुपयाची फटके आणून वाजवल्या जातात हे वाजवणारे लोक कोण आहेत त्यांनी एकदा आपल्या आनंदात दुसर्याला सहभागी करून घेतल्यावर जे काही समाधान आणि आनद भेटतो त्याचा अनुभव घ्यावा... आपल्या अवतीभवती अनेक उपाशी लोक आहेत आणि आपण गोडधोड खाचा खरच पटते का ?? अनावश्यक खर्च टाळून अनाथ गरीब मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या कपड्या साठी खर्च करावा.. नक्कीच खूप वेगळा आनंद आपल्याला मिळेल... त्या वयात मला या गोष्टी ज्यांनी गावरान भाषेत विनोदी शैली आणि खऱ्या तळमळीने सांगितल्या त्या तुकडोजी महाराज यांच्या विचाराच्या वारसास म्हणजे सत्यपाल महाराज यांना मी कधी विसरू शकत नाही... त्यांनी माझ्या मधील माणुसकी अत्यंत लहान वयात जागी केली... महाराज खूप खूप धन्यवाद आज तुम्हाच्या मुळे मला हि दृष्टी आली !!



लेखं- भैया पाटील.

इडा पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो !!

इडा पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो !!




बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता. आजही शेतकऱ्याला बळीराजा असे म्हंटले जाते. ग्रामीण भागात दर दिवाळी-दसऱ्याला आमच्या माता-बहिणी "इडा पीडा जावो आणि बळीचे राज्य येवो" असे म्हणून घरातील पुरुषांना ओवाळतात. चार हजार वर्षापूर्वी बळीराजाचं राज्य संपूर्ण आशिया खंडात होते. परकीय आक्रमक असलेल्या आर्य वामन याने बळीराजाशी युद्ध पुकारले. या युद्धात आमचे जे शूर सरदार हुतात्मे झालेत ते आमचे पूर्वज होते. हे युद्ध भाद्रपद महिन्यात झाले म्हणून भाद्रपद महिन्याच्या पित्तरपाटामध्ये श्राद्ध घालून श्रद्धांजली वाहिली जाते. शेणाचा भालदेव बसवतात. १५ दिवस सुतक पळून बळीराजाच्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहतात. भालदेव म्हणजे बळीराजा. खंडोबा, म्हसोबा, मल्हार, मार्तंड हे बळीराजाच्या मंत्रिमंडळातील हुशार व कार्यक्षम मंत्री होत.


 

बळीराजाचे राज्य नऊखंडी होते. आजच्या अफगाणिस्तानापासून ते मलेशियाच्या बाली बेटापर्यंत बळीराजाचे साम्राज्य पसरलेले होते. प्रत्येक खंडाच्या प्रमुखाला खंडोबा म्हंटले जात असे. आज जसे भारतात अनेक राज्य आहेत व प्रत्येक राज्याच्या प्रमुखाला मुख्यमंत्री म्हंटले जाते, त्याचप्रमाणे खंडाचा प्रमुख खंडोबा होय. प्रत्येक खंडात छोटे-छोटे सुभे असायचे. अनेक सुभ्यांचे मिळून एक महासुभा असायचा. या महासुभ्याचा प्रमुख तो महासुभेदार म्हणजेच म्हसोबा होय. त्याचप्रमाणे सुभ्याचा प्रमुख जोतिबा, मल्हार व मार्तंड हे सुरक्षा अधिकारी होत. आज केवळ बळीराजाचीच पूजा होते असे नाही तर त्याच्या या मंत्री व अधिकाऱ्यांचीही पूजा होते. यावरून बळीचे राज्य प्रजेला किती सुखी व संपन्न ठेवत होते याची कल्पना येते. अशा सुखी व संपन्न राज्यावर परकीय आक्रमक नेहमीच वाईट नजर ठेवत असत. गझनीच्या महंमदाने सोरटी सोमनाथ मंदिर जसे लुटले, तसेच आर्यांचे दहा अवतारांपैकी असलेल्या वामन-परशुराम वगैरेनी या बळीच्या देशाला लुबाडले.

 



सात काळजाच्या आत जपून ठेवावा, असा निरागस 'माणूस'... आपल्या प्रजेतील प्रत्येक व्यक्तीला तिच्या कष्टाचे व हक्काचे फळ सम्यक रीतीने विभागून देणारा संविभागी नेता... भारतीयांचे वास्तव आणि विधायक पूर्वसंचित असलेला कृती, प्रकृती आणि संस्कृती यांचा तजेलदार मोहर.... बळी- हिराण्याकाशिपुचा पणतू, प्रल्हादाचा नातू, विरोचानाचा पुत्र, कपिलाचा पुतण्या आणि बाणाचा पिता. भारताच्या सांस्कृतिक इतिहासातील एक अत्यंत उत्तुंग व्यक्तिमत्व... सुमारे साडे तीन ते पाच हजार वर्षापूर्वी होवून गेलेला भारतीय बहुजन समाजाचा एक महानायक, एक महासम्राट, एक महातत्ववेत्ता... या बळीचा वंश तो बळीवंश. या बळीवंशातील माणसे-आपली माणसे, आपल्या रक्तामासाची माणसे आणि मुख्य म्हणजे आपल्या विचारांची माणसे... ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आपले प्राण गमावणे पत्करले, पण तत्वांशी द्रोह केला नाही, आपल्या श्वासोच्छवासावर दडपणे लादून घेणे मान्य केले नाही, अशी माणसे.


 


आपण मात्र असे धन्य, कि आपण आपल्या डोळ्यादेखत त्यांच्या स्मृतीना खुशाल करपू-कोमेजू दिले; त्यांना आपल्या हृदयापासून सात तटांच्या आणि मस्तकापासून सात उंबरठ्याच्या बाहेरच रोखून धरले. या सगळ्याला थोडे अपवाद असतील, पण इतरापैकी काही जनानी त्यांना विसरून जाण्यात आपले सुख शोधले आणि काही जनानी तर त्यांची निंदा करण्यात पुण्याचा मार्ग पहिला. या लोकांना आज ना उद्या आपल्या अंतर्यामी असलेले त्यांचे अस्तित्व जाणवेल आणि त्या जाणीवेने त्यांचा स्व अक्षरशः मोहरून-बहरून येईल, असा विश्वास आहे. ज्यांनी त्यांचे महात्म्य आधीच ओळखले आहे, त्यांच्यापुढे मात्र आपण नतमस्तक व्हायलाच हवे.



विषमता, वर्णव्यस्था आणि जातीव्यवस्थेचे कट्टर धर्माध समर्थक, बहुजन समाजाचे शत्रु शोषक असणाय्रा सर्व आर्यांनी कट रचून आमच्या आदर्श राजा बळीराजाची हत्या केली. बळीराजाची हत्या करणाय्रा वामणाला विष्णूचा अवतार घोषित करुन मनुवाद्यानी आमच्या माथी मारला. हे मनुवाद्याचे कावे, षढयंत्र हजारो वर्षापासुन चालत आले आहे व आजही चालत आहे. परंतू जेव्हा हे मनुवाद्याचे प्रचारक, प्रसारक, बहुजन विरोधी षढयंत्र तमाम भारतीय येथील मुळ वास्तव्य असणाऱ्या बहुजन समाजाच्या लक्षात येईल. बळीराजा हे एक कतृत्ववान आदर्श राजे होते. ज्यांनी आपले राज्य बहुजन हिताय, बहुजन सुखायसाठी समर्पित केले होते. आपल्या राज्यातील प्रजेचे हित लक्षात घेता त्यांनी प्रजेचा विकास आणि संरक्षणांकडे अधिक लक्ष दिले. त्यांनी कोणताही वर्ण, जात, धर्म पंथ पाहीला नाही. न्याय करताना कधीही भेदभाव केला नाही. म्हणूनच ते उदारमतवादी, मोठ्या मनाचे. शुर पराक्रमी, अनेक गुणसंपन्न, बलवान, मितभाषी, शत्रु आर्य ब्राम्हणांना रणांगणात पाठ न दाखविणारे, समान विभागणी करणारे, योग्य काळाची वाट पहाणारे, सत्य शील, सर्वावीषयी सावध असे महान राजे होते. बळीराजा हे शेतकऱ्यांवरती आर्याद्वारे कुठे अन्याय अत्याचार घडत असतील तर लगेच ते शत्रु आर्यास कठोर शासन करीत होते. या त्यांच्या आदर्श कार्य कतृत्वामुळेच भयभीत झालेल्या आर्यानी कपटाने त्यांची हत्या केली. बळी राजा हे गोर गरीबांना न्याय, हक्क देणारे होते म्हणूनच आजही आपल्या समाजामध्ये एक प्रचलित म्हण आहे 'बळी तो कान पिळी'.
 




आर्य वामन हा आपल्या. टोळ्या घेवून बळीराज्याच्या प्रदेशात घुसला आणि त्याने लुटमार सुरू केली. बळीला छलकपट करून बंदी बनविले. त्याचे शस्त्र, संपती व राजसत्ता हिरावून घेण्यात आली. बाहेरून आलेल्या आर्यानी कपटाने बळीराजाला ठार मारले व राज्य बळकावले. युद्धात जिंकता येत नाही म्हणून आर्यांचा सेनापती असलेला वामन(विष्णूचा अवतार?) याने बळीराजाला कपटाने मारले. दशावतारातील वामन अवताराने तीन पावले जमीन मागून बळीराजाला पाताळात गाडले, ही भाकडकथा आपणास पुराणातून सांगितली जाते. परंतु शिक्षणावर बंदी घातल्याने आपले पूर्वज हा सर्व इतिहास लिहून ठेवू शकले नाहीत. म्हणून पाताळात गाडण्याचा खोटा इतिहास आम्ही खरा मानू लागलो. आपल्या हिताची प्रत्येक गोष्ट ते गाडून टाकतात.  

बा ! बहुजन समाजा, तुला एकच प्रार्थना...




बळीराजा... सात काळजात जपून ठेवावा असा ’जिवलग’ सुमारे तीन-चार हजार वर्षांपुर्वी बळीराजाच्या पूर्वजांनी केलेल्या उत्तम शेतीमुळे पिकलेल्या धान्याने सिंधुसंस्कृतीमधील धान्याची कोठारे भरली होती. बळीराजानेही आपल्या पूर्वजांचे अनुसरण करीत, पण त्यांच्यापेक्षा अधिक कौशल्याने,पेरणी सुरू केली.पेरणी धान्याची होती. पेरणी संस्कृतीचीही होती. पेरणी जीवनमुल्यांची होती, पेरणी जगण्याच्या कलेची होती. पेरणी रक्तमांसाची होती आणि माणसासाठी नव्या नव्या स्वप्नांचीही होती. तेव्हापासून बळीराजा प्रत्येक पिढीच्या श्वासोच्छवासात वसत आहे, रक्तवाहिन्यांतून वहात आहे, बहुजनांच्या उराउरांतून धडधडत आहे. घराघरातून बहरत आहे, रक्तवाहिन्यांतून वाहत आहे, उत्कट जिज्ञासेने सृष्टीच्या आणि जीवनाच्या नव्या-नव्या रहस्यांचा शोध घेत आहे. बहुजन समाजाच्या दृष्टीने बळीवंश आणि त्याच्या प्रवाहातील असंख्य व्यक्ती जमिनीत अदृश्य असलेल्या मुळांसारख्या आहेत. बा ! बहुजन समाजा, तुला एकच प्रार्थना-आपल्या या मुळांस विसरू नकोस, नाकारू नकोस, झिडकारू नकोस. जर असा वागलास तर तुझे असणे आणि नसणे सारखेच होईल !!


संदर्भ- बळीवंश , लेखक डॉ. आ. ह. साळुंखे सर.





बळी हा कुलस्वामी -क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले.




क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांनी दस्युचा पोवाडा म्हणून जो पोवाडा लिहिला आहे, त्याच्या तिसऱ्या कडव्याची सुरुवातच त्यांनी ‘बळी राज्यादी कुळस्वमिला’ या शब्दांनी केली आहे. येथे ‘राज्यादी’ हा शब्द ‘राजादी’ या अर्थाने आला आहे. कारण, बळीच्या राज्याला कुळस्वामी म्हणणे, हे आशयाच्या दृष्टीने जुळत नही. याउलट बळीराजाचा तसं निर्देश करणे हे मात्र पूर्णपणे सुसंगत ठरते. क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले बळीराजाला कुलस्वामी मानतात, याचाच अर्थ ते त्याला आपला अत्यंत आदरणीय पूर्वज मानतात. या उल्लेखाद्वारे ते एक प्रकारे बळीराजाबरोबरचे आपले नातेच सांगून टाकतात. कुळस्वामिकडे हल्ली देवता म्हणून पहिले जात असले, तरी कुळस्वामी म्हणजे मूळ पुरुष, हाच खराखुरा अर्थ आहे, हे आपण ध्यानात घेतले पाहिजे.


 


|| बळीराजा ||

 

आमुच्या देशीचे अतुल स्वामी वीर ||
होते रणधीर ||मरुत्यास ||
बळीस्थानी आले शूर भैरोबा ||
खंडोबा,जोतिबा || महासुभा ||१||

सद् गुणी पुतळा राजा मुळ बळी ||
दशहरा,दिवाळी ||आठविती ||२||

क्षत्रिय भार्या "इडा पीडा जाओ ||
बळी राज्य येवो "||अशा का बा ?||३||

आर्य भट आले,सुवर्ण लुटिले ||
क्षत्री दास केले ||बापमत्ता ||४||

वामन का घाली बळी रसातळी ||
प्रश्न जोतीमाळी ||करी भटा ||५||

 

- क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले.


 


बळीराजा हा बहुजन असल्यामुळे वामनाने त्याला पाताळात घातले म्हणजेच कपटाने ठार केले. आणि आपणही वामनाची पूजा करून बळी चा धिक्कार करतो. उठा बहुजानानो, जागे व्हा आणि बळीच्या स्मृतीना पालवी फुटू द्या. आज ही बहुजन समाजातील स्रिया प्रत्येक बलीप्रतीपदे दिवशी आपल्या पुरुषांना ओवळताना इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो असे का म्हणत आहेत? परंतू अजून पर्यंत आपल्या देशातील पुरुषांना हा प्रश्न पडला नाही कि आपल्या स्त्रीया इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो असे का बोलत आहेत?? मित्रांनो याची उत्तरे आम्हास च शोधावी लागणार आहेत. आज बळीपूजनाच्या निमित्ताने बळीराजाचे स्मरण करुया व बळीराष्ट्राच्यानिर्म­तीचा निर्धार करुया. 



इडा पिडा टाळू दे ! बळी राज्याचं राज्य येऊ दे !!



संदर्भ- बळीवंश- अ.वा.साळुखे सर.


लेखं संपादन- निलेश रजनी भास्कर कळसकर(प्रबोधन टीम) 

खरे लक्ष्मीपूजन !!

खरे लक्ष्मीपूजन !!


 

गेली अनेक शतके, सहस्त्रके भारतात परंपरेनुसार दिवाळीला लक्ष्मीपूजन करण्यात येते. कोट्यवधी भारतीय लोक दीपावलीला दिव्यांची आरास करून मोठ्या श्रद्धेने व थाटामाटात लक्ष्मीची पूजा करतात. वर्षात इतर सणावारांना दुर्गा देवी, सरस्वती यांचीही पूजा होते. ज्ञान, समृद्धी, स्थैर्य व वीरतेची ही पूजा असते. स्त्रीच्या ठायी या सर्व शक्ती वास करतात असाही समज भारतात रूढ आहे. परंतु हे सर्व करताना घरातील व समाजातील स्त्रीला मिळणारी दुय्यम दर्जाची विपरीत वागणूक हे विरोधी चित्र भारतात ठायीठायी दिसते.

 



स्त्री व पुरुष यांच्यात फरक करणे व तो फरक जोपासणे.या फरक करण्याच्या मनोवृत्तीचे पडसाद कसे, कोणत्या पद्धतीने दिसून येतात यांचा हा थोडक्यात आराखडा...


 


१. जन्मण्याचा हक्क- स्त्रियांना अनेकदा जन्मण्याच्या हक्कापासून वंचित राहावे लागते. सध्या भारतातील स्त्री:पुरुष टक्केवारी पाहिली तर किती स्त्रियांची भ्रूणावस्थेतच नामोनिशाण मिटवले जाते याची कल्पना येईल. मात्र हे चित्र फक्त भारतापुरतेच नव्हे तर जगातील अनेक देशांसाठी लागू आहे.

 


२. मृत्यूचे प्रमाण- आफ्रिका व आशियातील अनेक देशांमध्ये स्त्रियांच्या मृत्यूचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे. स्त्रियांना पुरेशा आरोग्य सुविधा नाहीत. तसेच कुपोषण, अपुरी वैद्यकीय मदत, स्त्रियांची हिंसा अशा कारणांमुळे आजही स्त्रिया पुरुषांपेक्षा जास्त प्रमाणात मृत्युमुखी पडतात.

 


३. मूलभूत सोयींचा अभाव-  शिक्षणासारख्या अतिशय मूलभूत गोष्टीपासून वेगवेगळ्या कारणांमुळे आजही स्त्रियांना मुकावे लागते. आकडेवारीनुसार भारतात ७५ टक्के पुरुष तर फक्त ५४ टक्के स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळते. भारतासारख्या देशात मुली लहान वयातच धाकट्या भावंडांचे पालनपोषण, घरकाम, मोलमजुरी, दूरच्या ठिकाणाहून पाणी भरणे अशा कारणांमुळे शाळा व शिक्षणापासून पारख्या राहतात.

 


४. सुसंधीची कमतरता- स्त्रियांच्या प्रगतीच्या आड येणारा आणखी एक अडसर म्हणजे त्यांना अनेक क्षेत्रांमध्ये पुरेसा वाव न मिळणे, संधीचा अभाव असणे. तसेच प्राथमिक - माध्यमिक शिक्षणानंतर महाविद्यालयीन शिक्षण उपलब्ध नसणे.

 


५. व्यावसायिक स्तरावर लिंगभेद- नोकरी, बढती, व्यवसायाच्या क्षेत्रात सामोरा येणारा लिंगभेदही गंभीर स्वरूपाचा आहे. नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी स्त्रियांसाठी अपुर्या स्वच्छता सुविधा व मूलभूत सुविधा, त्याच दर्जाच्या कामाला / पदाला इतर पुरुष सहकार्यांपेक्षा कमी पगार, बढतीच्या संधी नाकारल्या जाणे, शोषण, निम्नस्तरीय वागणूक, चारित्र्यहनन यांसारख्या गोष्टी अर्थार्जन करणार्या स्त्रियांना सहन कराव्या लागतात.

 


६. मालकी हक्काबाबत असमानता- स्त्रियांच्या नावे जमीन-जुमला, घर, इस्टेट करण्याची तयारी नसल्यामुळे, त्यांचा हक्क डावलण्याच्या प्रथेमुळे आजही स्त्रियांच्या नावे केलेल्या, त्यांच्या मालकीच्या इस्टेटी, जमिनी, घरे, उद्योग-व्यवसाय कमीच दिसून येतात.

 


७. घरातील लिंगभेद- स्त्रियांना घरात निम्न दर्जाची वागणूक, त्यांचे आरोग्य - पोषण यांकडे दुर्लक्ष, शारीरिक-भावनिक-मानसिक शोषण, घरातील स्त्रीच्या एकटीच्या वाट्याला घरकाम-अर्थार्जन-मुलांचे पालन-पोषण यांची संमिश्र जबाबदारी यातूनही पूर्वापार चालत आलेला लिंगभेद सामोरा येतो. स्त्रियांना घरी, समाजात, धर्मात, राजकारणात व संस्कृतीत, सर्वत्र दुय्यम दर्जाची वागणूक देणे व त्यांना त्याच दृष्टिकोनातून बघणे थांबवले गेले पाहिजे. अन्यथा केवळ दुर्गा- लक्ष्मी-सरस्वती च्या प्रतिमेचे पूजन करून काहीही साध्य होणार नाही.

 



घरातील स्त्रियांना समान वागणूक द्या. मुलगा व्हावा म्हणून व्रतवैकल्ये - नवस - उपासतापास करणार्या माता, नातू मिळाला नाही म्हणून सुनेचा छळ करणार्या सासवा भारतात कमी नाहीत. हे चित्र बदलले पाहिजे. स्त्रीला शिकवा, तिला समान संधी द्या, तिचे आरोग्य - शिक्षण - स्वास्थ्य उत्तम राखण्याची काळजी घ्या, तिच्या खांद्याला खांदा लावून काम करा, घरात व बाहेर दोन्ही ठिकाणी तिची साथ द्या, घरी वा समाजात तिची हेटाळणी होईल असे वागू नका, तिला सन्मानाने जगू द्या... त्यातून होणारी प्रगती ही खरी प्रगती असेल. स्त्रियांना जगात सक्षम होण्यास सर्वतोपरी साहाय्य करणे, स्त्री- पुरुषांच्या पारंपरिक पुरुषप्रधान विचारसरणीत बदल घडवून आणणे, स्त्रियांना समान वागणूक देणे ही लक्ष्मीची खरीखुरी पूजा असेल.



धन्यवाद- जरा विसावू या वळणार (फेसबुक पेज)

 

लेखं- अरुंधती कुलकर्णी.

फटाके फोडू नका... पर्यावरण वाचवा !!

फटाके फोडू नका... पर्यावरण वाचवा  !!




फटाक्यांचा शोध चीनमध्ये इसवी सनापूवीर् लागला होता व त्याचा प्रसार आणि लोकप्रियता झपाट्याने जगभर पसरली. आज जगात सर्वच देशांत प्रमुख दिवशी अथवा राष्ट्रीय सण-समारंभांत फटाक्यांचा वापर केला जातो. कालांतराने या फटाक्यांत नावीन्य आले. कुठल्याही जागतिक स्पधेर्च्या उद्घाटन अथवा समारोपाच्या प्रसंगी नयनरम्य फटाक्यांची आतषबाजी बघावी लागतेच. अशा या बहुढंगी आणि बहुरंगी फटाक्यांमुळे दिवाळीची रंगत वाढते, असा एकेकाळी सर्वांचाच समज होता. परंतु पर्यावरण संदर्भातली जागृती वाढत गेली, तसा फटाक्यांपासून होणाऱ्या ध्वनी आणि वायुप्रदूषणाचा त्रास आणि धोका जाणवू लागला. गेल्या काही वर्षांत दिवाळी तसेच अन्य सणांच्या निमित्ताने होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दिवाळीत फटाक्यांमुळे ध्वनिप्रदूषण तर होतेच; शिवाय वातावरणही दूषित होते.

 



ध्वनिप्रदूषणाच्या संदर्भात केंद्रीय पर्यावरण आणि वन विभागाने १९८६ सालच्या पर्यावरण रक्षण कायदा ऑक्टोबर १९९९मध्ये दुरुस्ती केली. नवीन कायद्यांतर्गत १२५ डेसिबल (ए. एल) अथवा १४५ डेसिबलच्या (सी) पेक्षा जास्त आवाज निर्माण करणाऱ्या फटाक्यांस बंदी घातली आहे. अर्थात हा नियम केवळ कागदावरच राहतो, हे उघड आहे. महाराष्ट्र सरकारने मात्र या कायद्याच्या अंतर्गत ध्वनिप्रदूषण कमी करण्याबाबत कडक नियम आखले आहेत. हे नियम सवोर्च्च न्यायालयाच्या २००० सालच्या आदेशाप्रमाणे बनविलेले आहेत. या आदेशांतर्गत शहरातील व्यापारी विभागात ५५ डेसिबल , निवास भागात ४५ डेसिबल आणि शांतता भागात ४० डेसिबल पर्यंत आवाजावर बंधने आहेत. याबरोबरच महाराष्ट्र पोलिसांनी रात्री १०.०० नंतर सार्वजनिक ठिकाणी फटाके लावण्यास बंदी केली आहे.

 



हे सर्व नियम शासनाने केलेले आहेतच, परंतु नागरिकांनी- विशेषत: मुलांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहिले नाही, तर ते अमलात आणणे पोलिसांना अथवा शासनाला कठीण जाते. वेगवेगळ्या फटाक्यांतून निघणाऱ्या आवाजाची पातळी चार फूट दूर अंतरावरून खालीलप्रमाणे होती: लंवगीमाळा ८५ डेसिबल , आपटीबार ९२, लक्ष्मीबार / कृष्णबार ९८, अॅटम बॉम्ब ११८. या कोष्टकावरून फटाक्यांपासून निर्माण होणाऱ्या प्रचंड ध्वनिप्रदूषणाची कल्पना येते. या प्रचंड आवाजामुळे डोकेदुखी, बहिरेपणा आणि मानसिक अशांतता या व्याधी उद्भवतात. ध्वनिप्रदूषणाबरोबर फटाक्यातील धातू आणि रासायनिक संयोगापासून निर्माण होणाऱ्या वायूचे प्रदूषणही मानवी आरोग्याला घातक असते. १०० ग्रॅम फटाक्यात अथवा शोभेच्या दारूत (म्हणजेच अनार, फुलबाजी, वायर) खालील घटक मिली ग्रॅममध्ये आढळतात.

 



धातू : कॅडमियम ५.२ ते ८.०, जस्त ४६२ ते ८५०, झिंक ३२४, मॅग्नेशियम २६२२, तांबे ७४४ मँगनीज+लोखंडाचे कण+अल्युमिनियमचे कण.

 



आम्लधमीर्य मूलक: नायट्रेट + सल्फेट + फॉस्फेट ११६० ते १४२०, नायट्राइट १६२४.

 



नायट्रेट, नायट्राइट्स, फॉस्फेट आणि सल्फेट या आम्लधमीर्य मूलकांचा ऑक्सीडायझिंग एजन्ट म्हणून उपयोग केला जातो. त्याच्या संयोगातून कार्बन मोनॉक्साइड आणि नायट्रोजन डायॉक्साइड यासारखे विषारी वायू शोभेच्या दारूतून निर्माण होतात. हे वायू मानवी जीवनाला अतिशय घातक असतात. हदयरोग रक्तदाब, अस्थमा, क्रॉनिक ब्राँकायटिस असणाऱ्यांना हे तर जास्त घातक आहेतच, परंतु याबरोबरच गर्भवती स्त्रिया, वृद्ध माणसे, लहान बालके यांनासुद्धा फटाक्यापासून निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा जास्त धोका आहे. फटाके वाजवताना सर्वसाधारण निरोगी व्यक्तींनाही अपचन, सदीर्-खोकला, मानसिक अशांती, डोके दुखणे या व्याधी होतात. फटाके लावताना होणारी इजा वा अपघात हा चिंतेचा विषय आहेच.

 




मानवाला प्रदूषणाचा त्रास होतो, त्याच्या शेकडो पटीने हा त्रास मुक्या जनावरांना आणि पक्ष्यांना होतो. कुत्रा, मांजर या पाळीव प्राण्यांची श्रवणक्षमता आपल्यापेक्षा ४०० पटीने जास्त असते. हे लक्षात आल्यावर फटाक्यांची माळ अथवा अॅटमबॉम्बच्या आवाजाचा त्यांना किती त्रास होत असेल याची कल्पना येते. ज्यांच्या घरी हे पाळीव प्राणी आहेत, त्यांना या प्राण्यांचे होणारे दिवाळीतील हाल बघवत नाहीत. दोन वर्षांपूवीर् आमच्या घरासमोरील आंब्याच्या झाडावरून खारीचे पिल्लू फटाक्यांच्या आवाजाने खाली पडले होते. त्याचा पाठीचा मणका मोडला होता. त्याच्यावर औषध उपचार करूनही ते वाचू शकले नाही. झाडावर बसलेले पक्षी उडणाऱ्या फटाक्यांमुळे जखमी होतात. अशा अनेक घटना दिवाळीच्या दिवसात पक्षीमित्रांना आढळतात.

 




दिवाळीच्या या ध्वनी आणि वायू प्रदूषणाबरोबर सामाजिक प्रदूषणाचे वेधही आपल्या संवेदनशील मनाने घेतला पाहिजे. आपल्याकडे बाजारात मिळणारे ८५ टक्के फटाके हे शिवकाशी, तामिळनाडू येथून येतात. ही गावे बालकामगारांना देण्यात येणाऱ्या अमानुष वागणुकीसाठी कुप्रसिद्ध आहे. १६ वर्षांखालील बालकामगार ठेवणे हा कायद्याने गुन्हा असूनही शिवकाशीमध्ये अजूनही धोकादायक वातावरणात बालकामगार अठरा-अठरा तास काम करत असतात. फटाके कमी प्रमाणात विकत घेऊन आपण एक प्रकारे या बाल कामगारांवरील अन्याय कमी करू शकतो. याचप्रमाणे दिवाळीच्या दिवसात वंचित व परिस्थितीशी झगडत जीवन जगणाऱ्या असंख्य लहान मोठ्यांना अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारे दिवाळीच्या निमित्ताने मदत करत असतात. जास्तीतजास्त लोकांनी, विशेषत: मुलांनी त्याचा कित्ता गिरविला पाहिजे. फटाक्यांवरील खर्च कमी करून त्यातील काही रक्कम आपण सामाजिक संस्था व शाळांना निश्चितच देऊ शकतो. 





संदर्भ -जिज्ञासा ट्रस्ट.



लेखं- विवेक साम.



नाशिक जिल्ह्यात शेवगेडांग (ता. इगतपुरी) येथील बौध्द वस्तीवर झालेला जातीयवादी हल्ला म्हणजे दुसरी खैरलांजी !!

नाशिक जिल्ह्यात शेवगेडांग (ता. इगतपुरी) येथील बौध्द वस्तीवर झालेला जातीयवादी हल्ला म्हणजे दुसरी खैरलांजी !!






नाशिक जिल्ह्यात शेवगेडांग (ता. इगतपुरी) ह्या  गावात २० ऑक्टोबरला बुद्ध बांधवांच्या वस्तीवर जातीयवादी हल्ला झाला. अर्थातच खेळाडू आणि नटनट्यांच्या हागल्या मुतल्याच्या न्यूज करुन दलाली करणाऱ्या प्रसारमाध्यमांनी याची दखल घेतली नाहीच, केवळ सम्राट या दैनिकात याची छोटेखानी बातमी होती. या गावात गेल्या अनेक वर्षांपासून असे जाती वर्चस्वाचे खटके उडताहेत. तीनेक वर्षांपूर्वी या गावातील स्वतःला उच्चवर्णीय समजणाऱ्या जातीयवादी काही मराठा समाजातील तरुणांनी निळ्या झेंड्याची विटंबना केल्यापासून या घटनांना जास्त पेव फुटला आहे. सध्या या प्रकरणाला सुरुवात झाली ती एका किरकोळ भांडणातून. एक जीप कलंडल्याने जखमी झालेल्या एका स्त्रीच्या व मुलाच्या औषधोपचाराचा अर्धा खर्च जीप ड्रायव्हरने उचलावा या मागणीचे पर्यवसन भांडणात झाले जे पोलिसांनी मिटवले. 




यानंतर रविवारी २० तारखेंला जातीयवादी काही मराठा समाजातील १९ तरुणांनी दुपारी चारच्या सुमारास गाव बेसावध गाठून गावातील बुद्ध बांधवांच्या घरावर जोरदार दगडफेक केली. ट्रॅक्टर भरुन दगड आणल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगतात. बेसावध तरुण जबरी जखमी झाले, गाड्या फोडण्यात आल्या. दगडाच्या मार्याने घाबरलेल्या स्त्रिया व लहान मुलं लपून बसले. बुद्ध वस्तीतील १० जखमी तरुणांना नाशिक सिव्हील येथे नेण्यात आले, त्यातील एका तरुणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याला न्युरोसर्जरीसाठी केईएम येथे नेण्यात आले. या घटनेत अनेक घरातील वस्तू दरवाजे दरवाजांच्या चौकटी कवले सिमेंटचे पत्रे दुचाक्या इ.ची प्रचंड हानी झाली. बाबासाहेबांच्या फोटोंची विटंबना केली गेली.






नाशिक जिल्ह्यात शेवगेडांग (ता. इगतपुरी) ह्या खेडे गावात जातीयवादातून बौद्ध वस्तीवर हल्ला करून तेथील तरुणांना सळ्यांनी आणि गजीने चोप दिला. तेथील आपल्या आया-बहिणी सध्या भयभीत अवस्थेत आहेत. हा हल्ला इतका भयंकर होता कि जातीयवाद्यांनी लहान मुले, स्त्रिया, वायोवृद्धांना देखील सोडले नाही. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात शेवगेडांग गावी गावातीलच काही जातीयवादी गुंडांनी बौद्ध वस्तीवर शसस्त्र हल्ला केला. या हल्यामध्ये दहा बांधव गंभीर रित्या जखमी आहेत. नीच गावगुंडानी केलेला हल्ला अतिशय भयानक होता, दगड, विटा,कोयते, तलवारी,लाठ्याकाठ्या,­लोखंडी गज आदि प्राणघातक शस्त्रांचा वापर करण्यात आला होता. 





गावगुंडांनी बौद्धवस्तीत आपल्या घरासमोर असलेल्या दुचाकी, टीव्ही, संसारपयोगी साहित्य तसेच तथागत बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची ही मोडतोड केलेली आहे. 






या गावातील भयग्रस्त बौद्ध बांधवांची तसेच महिलांची समक्ष भेट घेतली असता गावातील सर्वच कुटुंबीय भयग्रस्त अवस्थेत आढळून आले व त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे दडपणदेखील जाणवत होते. जातीयवादी गावगुंडांवर शासनाने कठोर कारवाई करावी, तसेच बौद्ध बांधवांच्या मालमत्तेची नुकसानीची शासनाने त्वरित भरपाई द्यावी अशी अशा आहे. अटक असलेल्या १८ जातीयवाद्यावर अट्रोसिटी कलम लावले आहेत, परंतु त्याची कठोर अंमंलबजावणी व्हावी. आमचा भारतीय संविधानावर प्रामाणिकपाने खूप विश्वास आहे. आम्हाला न्याय मिळेल यात शंकाच नाही.

 


या गावात अनेक वर्षांपासून असे जातीवादाचे चटके बौद्ध बांधव सहन करत आहे. इथल्या बौद्धांची प्रगती, त्यांची आर्थिक परिस्थिती इथल्या सवर्णांना बघितल्या जात नाही हे या हल्ल्यावरून व टार्गेट करण्यात आलेल्या घरांवरून मला प्रखरतेने जाणवले. तीन वर्षांपूर्वी या गावातील जातीयवाद्यांनी निळ्या झेंड्याची विटंबना केली होती. तेव्हापासून येथील जातीयवादी मानसिकता अजूनच वाढीस लागली होती. या घटनेचे गांभीर्य वाचकांना आता जरी जाणवत नसले तरी त्या ठिकाणी गेल्यावर तेथील परिस्थिती पाहून, विशेष करून भारतीय घटनाकाराच्या व विश्वाला शांती देणाऱ्या युगप्रवर्तकाच्या प्रतिमांची केलेली मोडतोड पाहून तळपायाची आग मस्तकाला जाते.


 



एकूण १९  जणांवर खटले भरले असून १७ जणांना अटक झालेय २ जण फरार झालेत. अॅट्रोसिटी कलम लावले गेलेय मात्र हल्लेखोरांनीच उलट चाप्टर केस टाकलेय. अतिशय कठिण परिस्थितीए. ग्रामस्थ संतप्त आणि भयभीत आहेत. गावातील तरणी मुलं पहारे देतायत. दोन तीन पोलीस दिमतीला दिलेयत. या घटनेचे पडसाद अतिशय थंडपणे उमटतायत. दिनांक ६ नोव्हेंबरला संपूर्ण गावातून तालुका कचेरीपर्यंत निषेध रॅली काढली जाणार आहे.

 



आपल्या भारतीय बांधवाना  धीर देण्यासाठी तसेच आपली एकी दर्शवण्यासाठी आपल्याला त्याच गावात महामोर्चा काढायचा आहे. पक्ष, गट आणि तट विसरून आपल्या समाजासाठी प्रत्येक तरुणांनी एकत्र यावे हीच अपेक्षा. कारण जी गुलामाची बेडी आपण घातली आहे तिला आता तोडण्याची वेळ आली आहे. बांधवांनो आता तरी संघटीत व्हा. दिनांक ६ नोव्हेंबरला संपूर्ण गावातून निषेध रॅली काढली जाणार आहे. विनंती करून प्रत्येकाने आपले राजकीय गट-तट बाजूला ठेऊन समाजासाठी या रॅलीत जास्तीत जास्त सहभागी व्हावे. आणि प्रत्येकाने आपापल्या परिने जातीयतेच्या वर्चस्ववादा विरोधात बंड पुकारावे.. शक्य असेल त्या प्रत्येकाने आपले राजकीय हेवेदावे बाजूला ठेऊन समाजासाठी या रॅलीत जास्तीत जास्त सहभागी व्हावे. आणि प्रत्येकाने आपापल्या परिने जातीयतेच्या वर्चस्ववादाविरोधात ग्राऊंड लेव्हलवर समाजाचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न करावा. सर्व परिवर्तनवादी भारतीयांनी या निषेध मोर्चात दाखील व्हावे. जो जातीयवाद करेल तो माणुसकीचा दुश्मन आहे या आपल्या देशाचा दुश्मन आहे.

 




एक गोष्ट सर्व जातीयवादी मंडळीनी लक्षात घ्यावी तुम्ही जरी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करत असलां तरी त्यांनी अथवा त्यांच्या अनुयायांनी तुमचां द्वेष केलां नाही. बाबासाहेबांनी नेहमी देशाला प्रथम आणी अंती: स्थान दिले आहे. त्यांनी जगातले सर्वोच्च घटना(संविधान) लिहूण आपल्या मातांना समानतेचे स्थान दिले. आपल्या सर्वाना मतस्वातंत्र्याचा अधिकार दिला. त्यांनी कधी कुणाचा द्वेष केला नाही. तथागत बुद्धांनी कधी कुणाला जात बघून जवड केले नाही. महापुरुष फक्त माणुस बघतात. स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या माता राजमाता आई जिजाऊ यांनी कधी जातीभेद केलां नाही. त्यांचीच प्रेरणा घेवून राजश्री शाहू महाराजांनी डॉ.आंबेडकरांना शिक्षणासाठी सहकार्य केले. या सर्वानी बंधुभाव जपला यांनी माणुसकी जपली या आपल्या मातृभूमीला सर्वोच्च स्थान दिले आणि स्वतःला शिवरायाचे वारस म्हणवणांरे आपण खरचं त्यांचे अनुयायी शोभतो का?? फक्त जय शिवराय म्हटलं म्हणजे संपले का?? आपण शिवराय आई जिजाऊ... राजश्री शाहू महाराज यांचे विचार मनात कधी घालणारं... त्यांच्या विचारांवर कधी जगणार... माझ्या भावनो एकदां विचार करा अरे आता भारतीय म्हणून आपल्या भारतीय राष्ट्र्ध्वजाखाली एक व्हा दाखवून दया भारतावर वाकडी नजर टाकणाऱ्या आपल्या दुश्मनांना होय आम्ही भारतीय आहोत फक्त भारतीय !!




लेखं संकलन- निलेश रजनी भास्कर कळसकर(सोबत प्रबोधन टीम)




संदर्भ- दै सम्राट.


धन्यवाद- अतुल खरात, डॉ आशिष तांबे, निलेश ठेगे आणी F.A.M

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...