डॉ आंबेडकरांचे विचारधन १४ भाषांत... लासूरच्या कार्यकर्त्याचा वेबसाइटच्या माध्यमातून मेगा-प्रोजेक्ट !!




अडचण लक्षात घेऊन आत्मभान संघटना आणि अभ्यासक सिद्धार्थ मोकळे यांनी www.thoughtsofambedkar.com
 
ही वेबसाइट हाती घेतली आहे. त्या माध्यमातून जगभरातील १४ भाषांत बाबासाहेबांचे विचारधन मोफत उपलब्ध करुन दिले जाणार आहे.


बाबासाहेबांचे इंटरनेटवर मोजकेच साहित्य वाचायला मिळते. त्यामुळे होणारी अभ्यासकांची गैरसोय टाळण्यासाठी, नऊ भारतीय आणि पाच विदेशी भाषांत बाबासाहेबांचे विचारधन विनाशुल्क उपलब्ध करुन दिले जाणार आहे. मुंबईत स्थायिक झालेले आणि मूळचे लासूर (जि. औरंगाबाद) येथील सिद्धार्थ मोकळे त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या कामात आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, प्रकाशक व लेखकांचा सहभाग आहे. 'जागतिकीकरणात जगण्याचे संदर्भ बदलले आहेत. या प्रक्रियेत बाबासाहेबांचे विचार नव्याने मांडण्याची गरज आहे. त्यांच्या प्रत्येक पैलूवर प्रकाशझोत टाकण्यासाठी वेबसाइट असेल' असे मोकळे यांनी सांगितले.


वेबसाइटवरील साहित्य मोफत डाउनलोड करता येणार आहे. तसेच ई-बुक सुविधाही आहे. आंबेडकरांवरील सर्व पुस्तकांचा परिचय हे वेबसाइटचे वैशिष्ट्य आहे. जगासमोर बाबासाहेबांचे सर्वच पैलू आणण्यासाठी ख्यातनाम लेखकांकडून लेख मागवण्यात आले आहेत. कामगार बाबासाहेब, कायदेमंत्री बाबासाहेब, कलावंत बाबासाहेब, अर्थतज्ज्ञ बाबासाहेब अशी वर्गवारी केली आहे. सर्व साहित्य युनिकोडमध्ये उपलब्ध राहणार आहे. शिवाय 'व्हिडिओ डॉक्युमेंट्री'ही असेल. बाबासाहेबांनी नाकारलेल्या मार्क्सवादावरील लिखाणही यात असेल. प्रबोधनकार ठाकरे या वेबसाइटसाठी सिद्धार्थ सहाय्यक होते. हा अनुभव पाठिशी असल्याने त्यांनी बाबासाहेबांवरील मोठा प्रोजेक्ट हाती घेतला.


या कामासाठी पाच वर्षांचा कालावधी आणि मोठा खर्च अपेक्षित आहे. सध्या विविध भाषिक लेखक व अनुवादकांशी चर्चा करुन कामाची आखणी केली जात आहे. येत्या सहा डिसेंबर रोजी मराठी-हिंदी-इंग्रजी भाषांतील साहित्य वेबसाइटवर उपलब्ध करण्यात येणार आहे. या संशोधनात्मक कामासाठी आंबेडकरी अनुयायांनी मदत करावी असे आवाहन संघटनेने केले आहे.



संदर्भ- http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/20391429.cms?fb_action_ids=473238872752884&fb_action_types=og.recommends&fb_source=aggregation&fb_aggregation_id=288381481237582

युगपुरुष व महापुरुष हे त्यांच्या असामान्य कार्याने, लोकांकरवी त्या पदावर गेलेले असतात. त्यांना कोणत्याही पावतीची व प्रशस्तीपत्राची गरज नसते.

गोष्ट जुनीच पण नव्याने वाचा !!


 
एकदा चार आंधळ्या लोकांना एका हत्तीसमोर नेण्यात आलं... हत्ती हा प्राणी प्रत्यक्षात कसा असतो याची ओळख त्यांना व्हावी या हेतूने... पैकी एक आंधळा पुढे गेला आणि हत्तीच्या समोर उभा राहून त्याची सोंड चाचपू लागला आणि म्हणाला- " हत्ती हा एखाद्या नळकांड्यासारखा आहे.."

 

दुसरा आंधळा त्याच्या पायाला हाताने चाचपत म्हणाला- " हत्ती एखाद्या जाड खांबासारखा आहे.."

 

तिसऱ्या आंधळ्याच्या हाती हत्तीचे पोट लागले, त्यास चाचपत तो उद्गारला- " अरे हत्ती म्हणजे एखाद्या जाड भिंतीसारखा विशाल आहे..." चौथ्या आंधळ्याच्या हाती हत्तीचे शेपूट होते; त्यास हाताने चाचपत तो म्हणाला- " छे छे..तुम्ही सगळे चुकताय..अरे हा हत्ती तर एखाद्या सापाप्रमाणे लांबूळका अन छोटा प्राणी आहे..." अर्थात या सगळ्याचा त्या हत्तीवर काहीच परिणाम होत नव्हता..तो नेहमीप्रमाणे झुलत होता.

 

मित्र-मैत्रिणीनो, गोष्ट इथेच संपत नाही, खरेतर चूक पूर्णपणे त्या आंधळ्या व्यक्तींची नव्हती. त्यांच्या हाती हत्तीचा जो काही अवयव, भाग लागला, त्याचा आधार घेऊन ते "हत्ती कसा असावा..??" याबाबत आपले मत तयार करीत होते. पण त्यातील कोणत्याच आंधळ्याने त्या हत्तीस त्याच्या भोवती फिरून अगदी संपूर्णपणे चाचपून त्याचा आकार लक्षात घेऊन त्याबद्दल आपले मत बनवण्याची तसदी घेतली नव्हती आणि त्यांच्या आसपास असणाऱ्या डोळस लोकांनी सुद्धा त्यांना सत्य काय हे सांगण्याची खटपट केली नाही..आणि इथेच सगळी चूक झाली.

 

हे गोष्ट सांगण्याचे कारण म्हणजे आज असे बरेच आंधळी लोकं आपल्याला समाजात दिसतात; जे महापुरुषांचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या साहित्याचा पूर्ण व सखोल अभ्यास न करताच हाती आलेल्या सह्त्या वरून व ऐकलेल्या तोंडी माहितीवरून त्यांच्या बद्दल आपले मत बनवीत, प्रदर्शित करीत असतात. त्यांच्या विषयी असणाऱ्या अर्धज्ञानापायी त्यांना दुषणे लावीत असतात. त्यांच्यात व वरील गोष्टीतल्या आंधळ्या लोकांत फारसा फरक नाही असे मला वाटते. त्याचबरोबर आजूबाजूचे डोळस लोक म्हणजे ज्यांना त्या महापुरुषांच्या कार्याची पूर्ण कल्पना आहे, अभ्यास आहे त्यांची सुद्धा जबाबदारी असते कि अशा लोकांस सत्य दृष्टी मिळवून देऊन त्यांचे अज्ञान दूर करावे.

 


शेवटी कोणी मानो न मानो...युगपुरुष व महापुरुष हे त्यांच्या असामान्य कार्याने, लोकांकरवी त्या पदावर गेलेले असतात. त्यांना कोणत्याही पावतीची व प्रशस्तीपत्राची गरज नसते.

 

आधी स्वतः डोळस बना नि मग जगाला दृष्टी प्रदान करा !!


लेखं-गौरव गायकवाड(सोबत प्रबोधन टीम)


माझ्या स्वता:च्या घरी मला बाबासाहेबांचा फोटोसुद्धा लावता येत नाही....

मी निलेश रजनी भास्कर कळसकर. मी जातीने चांभार समाजाचा आहे.... माझ्या चांभार जातीतील लोकं हेच बोब मारतात बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं...???? ते आरक्षण बाबासाहेबाच्या जीवावर घेतात पण बाबासाहेबांचे नाव घ्यायला त्यांना लाज वाटते.... दूर कशाला जाता मी फेसबुक वर बाबासाहेबांचे विचार टाकतो तर माझ्या अनेक नातेवाईकांनी मला आपल्या फ्रेडलिस्ट मधून काढून टाकले... माझ्या स्वता:च्या घरी मला बाबासाहेबांचा फोटोसुद्धा लावता येत नाही.





मी ज्या कॉलनीत राहतो तिथे ९९ % चांभार समाजाचे लोकं आहेत ते कधीच बाबासाहेबांची जयंती साजरी करत नाही पण रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करतात खूप वाईट वाटते हे चित्र बघून कधी-कधी खूप रडतो मी माणसे कसे काय एवढे निष्ठुर असू शकतात यांचा धक्का बसतो.... बाबांनी चांभार समाजावर एवढे उपकार करून ठेवले आहे की ते उपकार मरेपर्यंत न फिटणारे आहेत... ७० % चांभार समाज बाबासाहेब आणि बुद्ध धम्मियांचा द्वेष करतो.... वाईट वाटते खूप.... खरं तर आपण २ सख्खे भाऊ आहोत पण चांभार समाजाला हे कधी कळेल....???




जे बाबा सांगतात तेच संत रोहीदासानी पण सांगितले आहे.... रोहीदासनी ब्राम्हणवाद.... वर्णवाद , वेद याला विरोध केला आहे पण चांभार लोकांनी रोहीदासानापण देव करून टाकले.... ही सर्व परिस्थिती बघून नकळत डोळ्यात पाणी येते पण.... मी हे बदलवण्यासाठी मरेपर्यंत प्रयत्न करत राहणार हे निश्चित....




"प्रिय मित्र-मैत्रिणीनो... आपल्या लढ्याची दक्षता घेणारा पुढारी क्वचितच सापडेल. लढ्यात स्वबांधवांची नाहक हत्या होऊ नये अगर त्यांच्यावर नाहक अत्याचार होऊ नये अशी तळमळ बाबासाहेबांकडे होती. कॉंग्रेसच्या व मुस्लिम लीगच्या संघर्षात हजारो लोकांची हत्या झाली, तशी हत्या बाबासाहेबांच्या चळवळीत कधीच झाली नाही."




मांतग , मेहतर , चर्मकार आणि हिंदू अस्पृश जातीतील सर्वांसाठी हा लेखं जळजळीत अंजन आहे. सर्वानी आपले आत्मपरीक्षण करावे.... अरे आता तरी सर्व आंबेडकरी अनुयांनी एक व्हा आपले नेते फक्त डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत चला बाबासाहेबांच्या विचारांवर जगूया.



मित्र-मैत्रिणीनो आपण सकारात्मक विचार करू हे नक्कीच बदलेल.... संत रोहिदास, भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार बंधूभाव शिकवणारे आहे ते आपल्याला स्वीकारावेच लागतील. आपण मिळून हे बदलू आपल्याला विद्रोह हा प्रेमाने आणि बुद्ध विचाराने करायचा आहे. द्वेषाने बदल घडवता येत नाही.... बाबासाहेब म्हणतात समाज जागृतीचा विस्तव विझू देवू नका... हा बदल आपल्याला मिळून घडवायचा आहे.


तुमचाच मित्र- निलेश रजनी भास्कर कळसकर.


संपर्क फेसबुक प्रोफाइल- https://www.facebook.com/nilesh.kalaskar2


जय रोहिदास , जय भीम ,जय भारत !!

आपल्या प्रबोधन परिवारातील सदस्य हास्यसम्राट देवा झिंजाड यांच्या जीवनाची संघर्षपूर्ण कहाणी त्यांच्याच शब्दात !!

आपल्या प्रबोधन परिवारातील सदस्य हास्यसम्राट देवा झिंजाड यांच्या जीवनाची संघर्षपूर्ण कहाणी त्यांच्याच शब्दात !!

बरेच जण मला म्हणतात तुम्ही फार हसता, हसवता याचा अर्थ तुमचा जन्म फार मोठ्ठ्या श्रीमंत कुटुंबात झाला असेल?? बालपण फार चांगल गेल असेल ?? खूप ऐश केली असेल लहानपणी,खूप मज्जा केली असेल ? पण... त्यांना काय माहिती माझा जन्म एका गरीब कुटुंबात झालाय म्हणून.... अश्या कुटुंबात जिथे वडील लहानपणीच देवाच्या घरी रहायला गेले... आईला एकटीला टाकून... अन मला पण...


 

वडील गेले तेव्हा पहिलीला होतो. अन आमच्याकडे दहा शेळ्या होत्या. मला एवढच कळले होते कि आता आईला शेळ्या सांभाळायला मदत नाही होणार...पण आई मला म्हणाली कि "अप्पा" परत पेणार आहेत... मग मी म्हटल आई , मग त्यांना जाळून का ग टाकलं ?? त्यावेळेस ती म्हणाली अरे जी माणसे देवाला आवडतात त्यांना देव बोलावून घेतो आभाळात... अन मग त्यांना देवाकडे पाठविण्यासाठी.... त्यांना अग्नी द्यावा लागतो !! हे बोलताना ती माझ्याकडे न पाहता बोलायची... मी वाट पाहिली दिवाळीपर्यंत. पण मग कळले कि जाळून टाकलेली माणसे परत कधीच येत नाहीत. मी सुन्न झालो पण सुन्न होऊन आईला जाणवून द्यायचं नाही एवढी प्रगल्भता माझ्यात आली होती त्यावेळेस...आईने सांगितलेले खोटे ठरू नये म्हणू मी ते खरे मनात गेलो ते आजवर.

 

पावशेर गोडेतेल माझी आई एका महिन्याला पुरुवून पुरवून वापरायची.. कालवणात जर चुकून जास्त तेल दिसलं तर मला केवढा आनंद व्हायचा. ताटली ला थोड हि तेल राहू द्यायचो नाही... सगळ चाटून पुसून घ्यायचो. कधी कधी कालवण नसल कि आई अन मी मीठ पाणी घ्यायचो अन त्यात बाजरीची भाकर चुरून खायचो.

 

वेगवेगळ्या रंगाच्या लुगड्या चे चार तूकडे जोडून ती लुगड तयार करायची... फाटलेल्या पदरातून तिचे काळेभोर केस डौलाने डोलायचे... आमच्या दारिद्र्याची ठिगळे ती अख्ख्या समाजात मानाने मिरवायची.. माझ्या शाळेच्या खाकी हाफ चड्डीवर पाठीमागे ठिगळावर ठिगळ वाढत जायची तशीच वरची ईयत्ता गाठायची.. चार ईयत्ता तरी आरामात पास व्हायचो एका चड्डीवर... मग कधी कुणाल थोडीफार दया आली तर त्यांच्या पोरांच्या नको असलेल्या अन वापरून वापरून खराब झालेल्या कपड्यांची एखादी जोडी मला दिवाळीला भेटायची. ती कपडे घालून ज्याने दिलेत त्याच्यासमोरून जाताना फार कसतरी वाटायचं पण " गरिबीला आग लागली होती न " !

 

दोन रुपये पाच किलो दळण दळायला लागायचे पण, ते वाचवण्यासाठी आई ती पहाटे चार ला उठून जात्यावर दळत बसायची. तिच्या माथ्यावरून निथळलेल्या घामाने त्या पिठाचे सोने करायची.... घरचे रॉकेल वाचावे म्हणून मी घराबाहेर ग्रामपंचायतीच्या लाईट च्या दिव्यावर अभ्यास करायचो किंवा ज्यांच्या घरी लायीट असेल त्यांच्या घरी अभ्यासाला जायचो.. पण ,वर्गात पहिलाच नंबर मिळवायचो. मग शाबासकी म्हणून आई मला मोलमजुरी वरून येताना चिचा,बोरे ,सिताफळे अशी हंगामी फळे आणायची अन माझ तोंड गोड करायची. त्यावेळेस मला तो रानमेवा फार मोठा वाटायचा. मी खूप अगदी Graduate, MBA etc पास झालो तरी कधीच पेढे वाटले नाहीत. कारण मला आई म्हणायची आपण कष्ट करायचे अन लोकांना का बरे पेढे वाटायचे ??? मला ते खरे वाटते.

 

नवीन दफ्तर दरवर्षी मुलांना मिळायची मला पण मिळायचे पण ,माझ्याच वापरून वापरून फाटलेल्या खाकी चड्डीच्या कापडाचे... त्यालाच दोन बंद लावायचे कि झाले नवीन दफ्तर ! फार फार तर त्याला सजवण्यासाठी आई फाटलेल्या तिच्याच चोळीचे काठ लावायची अन मग माझ दफ्तर खूप खूप छान दिसायच... मी ते मुद्दाम दिसेल अस चालायचो.

 

भात सणाला जरी मिळाला तरी मी उड्या मारायचो. कारण रेशन वरले तांदूळ भरायला जे २० रुपये लागायचे ते सुद्धा मिळणे दुरापास्त होते.. पुरण पोळी खायला वर्षभर वाट पहावी लागायची. त्याच आनंदात मी आईला मदत म्हणून दगडाच्या पाट्या वर पूरण वाटून द्यायचो. गावतल्या देवांना ती मला नैवेद्य ठेवायला सांगायची. पण मला लहानपणापासून देवांचा फार राग होता. माहितीय का ? माझा समज होता कि "देवामुळेच" आपले हाल होताहेत... मग घरून नेलेले नेवैद्य मीच खावून घायचो अन अजून पण दुसर्यांचे खावून यायचो.. तेव्हा पण एक प्रश्न होता अन आज पण आहे जो देव खात नाही त्यालाच का बरे सर्वजण खायला देतात अन मंदिरा बाहेर बसलेल्या गरिबांना का खायला देत नाहीत ??? शेवटी ते नैवेद्य कुत्रेच खातात ना ?

 

बिन तेलाच्या मिरचीला ( चटणी ला ) कंटाळून रानात शेळ्या घेऊन गेल्यावर शेळीच दुध डब्यात काढून भाकर चुरून खायचो... अन आईला घरी आल्यावर सांगायचो कि तिच्याच पिल्लाने पिऊन टाकलं म्हणून.... पण हे खोट असूनही आई काही म्हणायची नाही. माझी एक आवडती शेली होती तीच नाव "झिपरी" ती अजूनही माझ्या स्वप्नात येते...फार जीव लावल त्या शेळीने मला... माझी दुसरी आईच वाटायची ती.... रानात गेल्यावर तिच्या "स्तनाला " मी बिनधास्त तोंड लावून दुधू प्यायचो.

 

इयत्ता दहावी पर्यंत पायात घालायला चप्पल मिळालीच नाही.मामाच्या गावाला किंवा जत्रेला जायचे म्हटले कि, आई एक पिशवी द्यायची अन त्यात असायची "वडाची पाने" चटके बसू नये म्हणून ती पाने पायाला बांधायची अन मग बिनधास्त चालायचं मैलो अन मैल उन्हातूनच, आईच्या पडलेल्या सावलीवर पाउल ठेवत ठेवायचे अन पान फाटलं कि परत पिशवीतून दुसरी पाने काढायची अन पायाला बांधायची ती पाने बांधताना माझ्या आईला खूप वाईट वाटायचं. डोळ्यातल पाणी कित्येकदा माझ्या पायावर पडलेलं मी पाहिलंय. पण तिने कधी ते जाणवून दिले नाही. खूपच जर उन्हाचा त्रास व्हायला लागला तर ती मला तिच्या पाठीवर उचलून घ्यायची अन दमत नाही तोवर चालत राहायची. फार दमायची ती घामानी ओलीचिंब होऊन जायची. पदराने माझ्यासहित तीच तोंड पुसायची ओढ्यावर किंवा विहिरीवर गार गार पाणी प्यायचे अन पुढच्या प्रवासाला निघायचे. असा आम्ही दोघे एका दिवसात कमीत कमी २० किलोमीटर चा प्रवास करायचो..

 

निवडणुकांमध्ये वापरले जाणारे ह्यानडबिलाच्या पाठीमागे मी गृहपाठ करून न्यायचो... पण अक्षर पाहून गुरुजी फक्त मार्क द्यायचे. सातवीपर्यंत नवीन वही कधीच मिळाली नाही मला. गाईड काय असत ते फक्त इतर मुलांकडे च पहायचं.. जो अभ्यास करायचा तो एखाद्या जुन्या पुस्तकावर किंवा गुरुजींनी फळ्यावर शिकवलेल्या धड्यावरच पास होत जायचं.

 

जेव्हापासून हातात टिकाव ,फावडे उचलता येतंय तेव्हापासून रोजगार हमीच्या कामावर जायचो, वय बसत नसायचं, मग लेबर ऑफिसर अचानक आला कि पळत जाऊन ढेकळात पालथे लपायचे....मग तो तेथून जाईपर्यंत तसच थाम्बायचं तेव्हा उन्हाळा असायचा... त्यावेळेस अंग एवढ भाजून निघायचं कि विचारू नका.. पण जर लेबर ओफिसरने पहिले तर... आईला खड्डे खणायला मदत करता येणार नाही म्हणून गपगुमान तसच राहायचं पडून ढेकळात. खुरपायला माझा कुणी हात नव्हते धरत,ज्वारी,बाजरी,गहू काढायला आई अन मी दोघांत घ्यायचो..तेवढच वर्षाच धान्य मिळायचं ना. भुईमुगाच्या शेंगा तोडायला जायचो, आंबे पाडायला,चिंचा पाडायला,कुणाचे खत पांगवायला अशी कामे मी आनंदाने करायचो. तेवढेच दहा वीस रुपये मिळायचे.

 

दिवाळीला फटाक्यांचा आवाज माझ्यापेक्षा माझ्या आईला जास्त त्रास द्यायचा, आई म्हणायची बाला फटाके फोडून माणूस अजून गरीब होतो.... मी अजून फटाका फोडत नाही. दिवाळीला आई कधी कधी लाडू करायची अन "मी खाईन नंतर" अस म्हणून ती आख्खी दिवाळी काढायची अन मला मात्र पोटभर खायला घालायची..तरी ती फार गोड राहायची ! लाडू संपले तरी ते ज्या पातेल्यात ठेवलेले असायचे त्याचा वास मी महिनाभर घ्यायचो.

 

मला गोड फार आवडायचं पण घरात साखर अभावानेच यायची, ती भरपूर असावी म्हणून मी चौथीत असताना थोडी साखर पेरली होती.अन दररोज तिला पाणी पण घालायचो... एक दिवस आईने पहिले अन म्हणाली "काय करतोस रे" तिला कळल्यावर ती खूप हसली. अन म्हणाली अरे साखर हि उसापासून तयार होते रे... तेव्हापासून मी हुशार झालो.

 

माणसे कधी मरतील ह्याची मी लहानपणी आतुरतेने वाट पाहायचो.... का माहितीय का ???  कारण माणूस मेल्यावर दशक्रियेला बुंदी, शिरा, लापशी, भात अस खायला मिळायचं ना.... गावजेवण असल्यावर जेवायला ताटली घेवून गेलो कि घरी वाढून पण आणायचे अन ते उन्हात वाळवून वाळवून खायचे... शाळेत मिळणारी सुकडी तर खूप मोठा आधार असायची.

 

वाचनाची आवड फार होती पण शाळेचीच पुस्तके मिळणे कठीण तिथे इतर पुस्तके कुठून मिळणार ना... मग मी हॉटेल च्या बाहेर उभे राहायचो अन लोकांनी भेळ खावून टाकलेला वर्तमान पत्राचा तेलकट तुकडा घेऊन वाचनाची भूक भागवायचो... जे मिळेल ते वाचायचो.

 

मला चांगलं आठवतंय आमच्याकडे एक गारीगार (आईस्क्रीम) वाला यायचा त्याच्याकडे चार आणे आणि आठ आणे अशा दोन प्रकारच्या गारीगार असायच्या. आमच्या शेजारची एक बाई मुंबईहून उन्हाळ्यात आली कि त्याच्या मुलांना गारीगार घ्यायची.... मला पण कधी कधी द्यायची चार आन्यावली गारीगार... तेव्हा मला वाटायचं कि मला आठ आन्यावली द्यावी पण नव्हती मिळत... मग संध्याकाळी आई कामावरू आली कि मी तिच्याकडे आठ आणे मागायचो.. गारीगार् साठी... आई म्हणायची अरे आठ आण्याची गरीगारची "काडी" खाण्यापेक्षा त्याच आठ आण्यातदोन "काडेपेट्या" येतीलं अन त्या महिनाभर पुरतील.. मग मी म्हणायचं जाऊदे ग आई मी असच म्ह्टल ग... पण दुसर्या दिवशी परत तो गारीगार वाला यायचा अन माझ्या मनाला त्रास द्यायचा. मग मी नंतर, तो गारीगार वाला आला कि स्वतःला घरात कोंडून घायचो अन तो निघून गेला कि मगच बाहेर यायचो.

मला चांगल आठवतंय कि, हास्यसम्राट झाल्यावर आई माझी झी टीव्ही वर झळकली खरी..... पण ती कुठल्याच एपिसोडला हसलीच नाही... ती रडली.... ती जशी रडली तशी ती एकदाच रडती होती... बाप गेल्यावर !

 

तीच आजच वय ८० च्या पुढे आहे ,पण माझी सर्वात जवळची मैत्रीण म्हणून मी तिच्याकडे पहातो.... माझी लहानपणाची अंगडी दुपडी ती अजून जपून ठेवते अन त्यातच माझ बालपण शोधते.... तिला म्हटल का ग आई जपून ठेवते अस तू ?? तर ती म्हणते बाळा "कितीही मोठ्ठा झालास तरी मागचे दिवस विसरू नकोस" अन तेच विसरू नये म्हणून मी तुझी अंगडी दुपडी अजूनही ठेवलीत.


आई आय लव यु !!

आई तू जगातली सगळ्यात सुंदर माता आहेस ग !!
 

कधी कधी जेवायला नाही मिळाल तर.....

दोन तांबे पाणी प्यायचं !
 

मग गच्च पोट भरायचं !
 

आई म्हणायची आता
 

आता जेवणाच र काय करायचं ??
 

पोटाला पाय लावून रातभर गपगुमान झोपायचं !

 

खूप शिकलो, खूप अनुभव घेतले खूप चांगली वाईट माणसे भेटली पण मनाला कधी मळून दिले नाही.कविता केल्या, व्याख्याने करतोय,हास्यसम्राट चे शो करतोय, सूत्रसंचालन चालू आहे, माणूस म्हणून चांगली माणसे जोडतो... हे सगळ आपल्याशी शेयर करण्याच कारण म्हणजे , जर कुणी जीवनाला नावे ठेवत असेल , परिस्थितीला दोष देत असेल तर त्यांना थोडा धीर द्यावा !!

 

सांगायला गेल तर खूप आहे.... हे फक्त ०.००००१ % सांगितल मी..... आता.... नाही सांगणार... आत्ता फक्त हसायचं अन हसवायचं.. आईला राणी वाणी ठेवायचं.



आपलाच- कवी/हास्यसम्राट - देवा झिंजाड.


गाव - गारखिंडी, तालुका- पारनेर, जिल्हा- अहमदनगर. सध्या पुणे.


फेसबुक प्रोफाइल- https://www.facebook.com/DevaZinjad.Hasysmrat

अडचणीत आलेल्या भयभीत लोकांना नेहमीच धर्म आठवतो - जात आठवते !!

अडचणीत आलेल्या भयभीत लोकांना नेहमीच धर्म आठवतो - जात आठवते !!


अडचणीत आलेल्या भयभीत लोकांना नेहमीच धर्म आठवतो - जात आठवते… मागे सिनेमातल्या हरामाच्या पैशाने हरामाची दारू पिउन सल्लू भाय ने गरिबांना गाडीखाली चिरडले होते… कोर्टात हजेरी लावतान कोस्मोपोलिटियन सल्लुभायच्या डोक्यावर इमान ची इस्लामी टोपी विराजमान झाली होती. आता ह्या शाहरुख ची पाळी…. इस्लामला मंजुर नसलेल्या सर्व गोष्टी (गाणे सिनेमा दारू) करणारा रुख रुख खान बेटिंग प्रकरणी स्वत:च्या इस्लामी इमानाची साक्ष देऊ लागला आहे.
मागे भुजबळ यांच्यावरदेखील भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते तेव्हा ते ही म्हणाले होते OBC आहे म्हणून मला लक्ष केले जाते... हेच भुजबळ स्वतःला म.फुले यांच्या विचाराचा अनुयायी म्हणतात पण घरी सत्यनारायण आवर्जुन घालतात... रामदास आठवले यांचा सरकारी निवास सोडायला लावला तेव्हा त्यांना बुद्ध धम्म आणि बाबासाहेब आठवले होते. रामदास भाई आवर्जुन गणपती दर्शन घेवून बाबासाहेबांच्या २२ प्रतीज्ञा तोडतात.


 
शेवटी एकच सांगेल या धर्म-जातीचे राजकारण करून देश तोडणाऱ्या नेत्यांना एका हिंदी गाण्याद्वारे...


ये पब्लीक है सब जानती है , अजी अन्दर क्या है बाहार क्या है , ये सब पह्चानती है ।

  
लेखं- अभिराम दीक्षित सर.

वधूची मिरवणूक..... बीदचे आकर्षण !!

वधूची मिरवणूक..... बीदचे आकर्षण !!




जळगाव(खान्देश)जिल्ह्यातील यावल या तालुक्यातील घटना-


लग्नात वराची बीद हे काही नवीन नाही मात्र वधूची घोड्यावरून बीद हे यावलवासीयांनी(जळगाव ) आज प्रथमच अनुभवले. वधूची घोड्यावरून काढलेली बीद पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली.


जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर पाटील यांची एकुलती एक कन्या केतकीचा विवाह सोमवारी होत आहे. मुलीच्या लग्नाचा आनंद हा मुलाच्या लग्नाएवढाच असल्याने पाटील यांनी मुलीची घोड्यावरून मिरवणूक काढण्याचे ठरवले.


मुलगा अन् मुलगीमध्ये भेद का करायचा ?असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.


खान्देशात काही गावांमध्ये बीद मिरवणूक काढण्याची प्रथा होती. मात्र काळानुरूप ती लोप पावत आहे. यावल येथे मात्र वधू-पित्याने मुलगा-मुलगी समानतेचा संदेश देत मिरवणूक काढली.


प्रिय मित्र-मैत्रिणीनो हा आदर्श सर्वानी घ्यावा स्त्री-पुरुष समानता आहे. स्त्रीला दुय्यम लेखू नका.

 

धन्यवाद- दै.लोकमत.

 


'बाटलीबंद' राक्षस !!

'बाटलीबंद' राक्षस !!




विषय साधाच आहे.. पाणी पिऊन झाल्यावर प्लास्टिकच्या बाटल्यांचं काय करायचं. शहरी आणि निमशहरी जीवनशैलीचा भाग झालेल्या प्लास्टिक बाटल्या, आधीच रोजच्या १५ हजार टनांवर गेलेल्या प्लास्टिक कचऱ्यात मोठी भर घालत आहेत. केवळ पर्यावरण दिनी आठवण करण्याचा, पर्यावरणापुरताच हा प्रश्न राहिलेला नाही.. बाटलीबाहेरच्या पाण्यावर आपला विश्वास पुन्हा बसणार की नाही, हाही प्रश्न आहे.

 

पुण्याजवळ खडकवासला धरणाचा विस्तृत जलाशय दिसेल, अशा फार्महाऊसवर यंदाच २६ जानेवारीला दिवसभराची कार्यशाळा होती. जिथून पुणे शहरासाठी पिण्याचं पाणी पुरवलं जातं, असं हे ठिकाण होतं. पण कार्यशाळेत मात्र बाटलीबंद पाणी पुरवलं जात होतं. लहान २०० मिलिलिटरच्या बाटल्या. दुसरा पर्यायच नव्हता. दिवसभरात मी सात बाटल्या पाणी प्यायलो. सरासरी प्रत्येकाने दहा बाटल्या पाणी वापरले. कार्यशाळेला साधारणत: सव्वाशे लोक होते. एका दिवसात १२५० बाटल्या संपल्या होत्या. बाटलीवर छापील किंमत होती सहा रुपये. त्यावर साडेसात हजार रुपये खर्च झाले होते. हिशेब भीतीदायक होता- साडेसात हजार रुपयांचा नव्हे, तर १२५० रिकाम्या बाटल्यांचा!

 

एकटय़ा भारताचा विचार केला तरी असे सभा-समारंभ, बैठका-कार्यशाळा, पाटर्य़ा यांच्यात दररोज पाण्याच्या लाखो बाटल्या, प्लास्टिक पाऊच, सील केलेले ग्लास वापरले जात आहेत. अशा कार्यक्रमांच्या बाहेरही तितक्याच संख्येने त्यांचा वापर होत आहे. विशेष म्हणजे भारत हा विकसित देशांच्या तुलनेत कमी प्रमाणात पाण्याच्या बाटल्या वापरणारा देश आहे. प्रत्येक अमेरिकी माणूस वर्षांला ४५ लिटर, तर युरोपीय माणूस १११ लिटर बाटलीबंद पाणी पितो, तर भारतीयाचे प्रमाण केवळ पाच लिटर आहे. पण धक्कादायक बाब अशी की आपले अंधानुकरण व अशा पाण्याचा वापर झपाटय़ाने वाढत आहे. १९९९ ते २००४ या पाच वर्षांच्या काळात भारतात बाटलीबंद पाण्याची विक्री तिपटीहून अधिक वाढली. २००४ मध्ये तब्बल ५०० कोटी लिटर बाटलीबंद पाण्याची विक्री झाली. त्यानंतर तर ही वाढ वेगाने सुरू आहे.

 

प्लास्टिकच्या वापराबाबत आणखी एक डोळे उघडणारी बाब म्हणजे भारतात साचणारा प्लास्टिकचा कचरा. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने नुकतेच जाहीर केले की, भारतात दररोज १५ हजार ३४२ टन प्लास्टिकचा कचरा निर्माण होतो. त्यापैकी ४० टक्के जसाच्या तसा निसर्गात जातो. उरलेल्या ६० टक्के कचऱ्याच्या पुनप्र्रक्रियेचा दावा केला आहे. तो खरा धरला तरी रोज सहा हजार टनांपेक्षा जास्त प्लास्टिक शेतात, जंगलात, डोंगर-दऱ्यांमध्ये, नद्यांमध्ये, तलावात असे जागा मिळेल तिथे साठून राहते. त्या त्या ठिकाणच्या नैसर्गिक स्रोताची, पर्यावरणाची हानी करते. आता तर ही समस्या व्यवस्थापनाच्या पलीकडे पोहोचली आहे. मग याच गतीने पुढच्या काळात काय होणार, ही कल्पनाच मती गुंग करणारी आहे. त्यात गेल्या पंधरा वर्षांमध्ये भर पडली आहे प्लास्टिकच्या बाटल्यांची!

 

या बाटल्यांचा वापर का होतो, याच्या मुळाशी गेले तर काही प्रमुख कारणे पुढे येतात- १. पाण्याची अपुरी उपलब्धता, उपलब्ध पाण्याच्या शुद्धतेबाबत शंका; त्याच वेळी बाटलीबंद पाण्याबाबत वाटणारा विश्वास २. बाटल्या हाताळण्यास-वापरण्यास सोयीच्या असणे, ३. प्रतिष्ठेचे लक्षण, ४. जाहिरातींचा मारा व अनुकरण. या कारणांपैकी प्रतिष्ठा व अनुकरण या वरवरच्या कारणांकडे दुर्लक्ष केले तरी आधीची दोन कारणे विचार करायला लावणारी आहेत. विशेषत: पाण्याची उपलब्धता आणि त्याच्या किमान शुद्धतेची खात्री याबाबत आपण मागे आहोत. ग्रामीण भाग तर सोडाच, पण शहरांमध्येही शुद्ध पाण्याचा पुरवठा होतोच याची खात्री नाही. सांगली, कोल्हापूर किंवा मराठवाडा, विदर्भातील अनेक शहरांमध्ये आजही नळाचे पाणी निश्चतपणे पिण्याचे धाडस होत नाही. सार्वजनिक ठिकाणांची तर गोष्टच वेगळी. भोंगळ प्रतिष्ठेच्या नावाखाली बाटलीबंद पाणी पिणारे लोकही आहेत. त्यांची संख्यासुद्धा वाढते आहे, पण सार्वजनिक ठिकाणी प्यायला शुद्ध पाणी मिळण्याची खात्री नसल्याने बाटल्या विकत घेणाऱ्यांची संख्याही प्रचंड आहे. सार्वजनिक ठिकाणच्या पाण्याच्या दर्जाबाबत किंतु निर्माण करण्यासाठी बाटलीबंद पाणी विकणाऱ्या कंपन्या प्रयत्नशील आहेतच. बाटलीबंद पाण्याचा उद्योग देशात तब्बल आठ हजार कोटी ते दहा हजार कोटी रुपयांच्या घरात पोहोचला आहे. त्यामुळे त्यांच्याकडून स्वार्थासाठी हे होत राहणारच. पण त्याला तोंड देण्यासाठी सार्वजनिक यंत्रणांकडून काही झाले नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पुरवल्या जाणाऱ्या पाण्याची अधिकाधिक बदनामी होत राहील.

 

शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचा विषय केवळ पाणीपुरवठा व स्वच्छता विभागापुरता मर्यादित नाही. त्याच्यामुळे प्लास्टिकच्या कचऱ्यात भर पडत असल्याने तो वन व पर्यावरण विभागाचाही मुद्दा आहे. शिवाय मोकळ्या बाटल्या कचऱ्यातच जात असल्याने घनकचऱ्याची जबाबदारी असणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचीही ही डोकेदुखी आहे. म्हणूनच राज्यभर किमान शुद्ध पाणी पुरविण्याचे उद्दिष्ट हे एकाच वेळी अनेक समस्यांचे उत्तर ठरणार आहे. पाण्याच्या बाटल्यांसाठी सोसावा लागणारा आर्थिक भरुदड कमी करेल, निसर्गात वाढणारा कचरा कमी करेल, नैसर्गिक साधनसंपत्तीवरचा बोजा कमी करेल आणि तितकेच महत्त्वाचे- पाण्यासारख्या जीवनावश्यक गोष्टीचे बाजारीकरण काही प्रमाणात तरी कमी करेल. त्यामुळे सरकारने आजच्या पर्यावरण दिनी राज्याला बाटलीबंद पाण्यापासून मुक्त करण्याचा संकल्प सोडावा. त्याचा पाठपुरावा करून विशिष्ट कालावधीत सर्वत्र शुद्ध पाणी पुरविण्याचे ध्येय गाठावे.

हे ध्येय गाठण्यापर्यंतच्या काळात बाटल्यांवरील परावलंबित्व कमी करण्यासाठी अनेक उपाय करण्याजोगे आहेत. १. हॉटेल-उपाहारगृहांनी शुद्ध पाणी पुरवणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी हॉटेलमध्ये अशुद्ध, साठवलेल्या भांडय़ाचा वास येणारे किंवा उन्हाळ्यात कोमट झालेले पाणी पुरवले जाते. त्याच वेळी तिथेच थंड बाटलीबंद पाण्याचा पर्याय ठेवला जातो. ग्राहकांकडून स्वाभाविकपणे बाटलीतील पाण्याला प्राधान्य दिले जाते. अनेक हॉटेलांमध्ये शुद्ध पाणी असते, पण त्याची कल्पना दिली जात नाही, उलट भीती घालून बाटलीबंद पाणीच पुढे ठेवले जाते. हे टाळण्यासाठी हॉटेलमध्ये, शिवाय मेन्यू कार्डवर ठळकपणे 'येथे पिण्यासाठी शुद्ध पाणी पुरवले जाते' अशी सूचना लिहिणे सक्तीचे करावे. २. पाणी शुद्ध करण्यासाठी बाजारात 'झीरो बी'सारखी अनेक उत्पादने उपलब्ध आहेत. त्यांचा घरातही वापर करावा का, याबाबत वेगळे मत आहे. मात्र, सार्वजनिक ठिकाणी त्या सुस्थितीत वापरल्या तर लोकांचा पाण्याच्या शुद्धतेवरचा विश्वास वाढेल. त्यातही देखभाल-दुरुस्तीचा मुद्दा उरतो. तो सोडवण्यासाठी पाणपोया, प्याऊ उभारणाऱ्या दानशूरांची मदत घेता येईल. पाणपोयांची व्यवस्था राखल्यामुळे असंख्य लोकांना शुद्ध पाणी मिळणार असेल तर ते पुण्य मिळवण्यासाठी कितीतरी दानशूर पुढे येतील. ३. गावं, लहान नगरं, काही शहरांसाठी पाणी शुद्ध करणारी काही फिरती युनिट्स वापरता येतील. लहान टेम्पोमध्ये बसवून ती फिरवण्याचे प्रयोग काही ठिकाणी केले जातात. असे अनेक उपाय त्या त्या ठिकाणच्या, भागाच्या परिस्थितीचा विचार करून करण्याजोगे आहेत.

 

दरम्यानच्या काळात बाटल्या वापरल्या जाणार असतील तर त्यांचा कचरा गोळा करण्याची जबाबदारी कोणाची- उत्पादकाची, वितरकाची, वापरणाऱ्याची की त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांची? बाटलीला किंमत नसल्याने ती जमा केली जात नाही. तिच्यावर दोन-पाच रुपये किंमत ठेवली, तर त्या योग्य ठिकाणी जाण्याची शक्यता वाढेल. नाहीतरी बाटलीतील तांब्याभर पाण्यासाठी १५ रुपये मोजताच ना, मग शिस्तीसाठी दोन-पाच रुपयांचे 'डिपॉझिट' द्यायला हरकत असायला नको.

 

कोणतीही समस्या गळ्यापर्यंत येईस्तोवर त्याचे नियोजन करायचे नाही, हे आपल्या समाजाचे जणू व्यवच्छेदक लक्षणच बनले आहे. त्या हिशेबाने उद्या जमीन नांगरताना फाळाला बाटल्या व प्लास्टिक लागेल तेव्हा किंवा नद्यांच्या गाळामध्ये नुसत्याच बाटल्या सापडतील तेव्हा आपण जागे होऊ कदाचित! पण हा नकारात्मक हिशेब बदलूसुद्धा शकतो. प्रामाणिक प्रयत्नांद्वारे बाटल्यांच्या मुक्तीचे उद्दिष्ट पूर्ण केले तर ते एका मोठय़ा बदलाचे निदर्शक असेल. पाठोपाठ अनेक आव्हानं हाती घेता येतील. कोणतीही सुविधा हवी असेल, तर त्याला पैसा, ऊर्जा, नैसर्गिक साधनसंपत्ती किंवा अन्य गोष्टींची किंमत मोजावी लागते. त्याचबरोबर ती सुविधा वापरण्याची शिस्तसुद्धा अंगी बाणावी लागते. पाण्याच्या बाटल्यांच्या बाबतीत आपण शिस्तीचा कधी विचारच केला नाही आणि किमतीचे बोलायचे तर ती सुविधेपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. पर्यावरणाच्या ऱ्हासाची किंमत या हिशेबात धरली जात नसल्याने खरी किंमत समजत नाही इतकेच. त्याची किंमत घटती साधनसंपत्ती व पर्यावरण ऱ्हासाद्वारे आपण मोजत आहोतच, पुढच्या पिढय़ांना तर ती चक्रवाढ व्याजाने मोजावी लागणार आहे!


* 'पाणी' हा एकच विषय गेली सलग दहा र्वष दृश्यकलेतून मांडणाऱ्या अतुल भल्ला यांनी दिल्लीच्या यमुनातीरी महाकाय  पाणी-बाटल्यांची शिल्पं उभारून या समस्येकडे लक्ष वेधलं.. तर (अगदी वरच्या छायाचित्रात) चंडीगढच्या वैभव शर्मा यानं प्लास्टिकच्या बाटल्यांची राक्षसी  पावलं सिल्व्हासाच्या निसर्गावर कशी रोवली गेली आहेत, हे दाखवून दिलं होतं.


लेखं- अभिजित घोरपडे(abhijit.ghorpade@expressindia.com)

धन्यवाद- लोकसत्ता.

संदर्भ- http://www.loksatta.com/vishesh-news/bottle-pack-demon-124497/

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...