दंगली रोखण्याचे नामी अस्त्र !!

दंगली रोखण्याचे नामी अस्त्र !!
 

दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वादग्रस्त जातीय हिंसाचार प्रतिबंधक विधेयकास केंद्रीय मंत्रिमंडळाने गेल्या वर्षी मंजुरी दिली होती. पण हे विधेयक सध्या सुरू झालेल्या संसदेच्या अधिवेशनात विरोधकांच्या दबावामुळे चर्चेसाठी पुढे ढकलण्यात आले. बहुधा हे विधेयक तीन महिन्यांनी येणा-या नव्या सरकारला चर्चेस घ्यावे लागेल.

 



या विधेयकावर मंत्रिमंडळात मंजुरीची मोहोर उमटवताना काही वादग्रस्त तरतुदी सरकारने मागे घेतल्या आणि काहींमध्ये सहमतीने बदलदेखील केले होते. उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर दंगलीनंतर जर हा कायदा आला असता तर बरे झाले असते, असादेखील सूर यानिमित्ताने आळवला गेला. राज्यघटनेने कायद्याद्वारे अनु. जाती, अनु.जमाती त्याचबरोबर अल्पसंख्याक समुदायाचे न्यायिक संरक्षण करण्याचे कर्तव्य राज्य सरकारने पार पाडावे, असे गृहीत धरलेले आहे. या विधेयकाच्या निमित्ताने हिंसेची परिभाषा आणि सरकारी कर्मचा-यांनी हिंसक घटनेदरम्यान आपल्या कर्तव्यात केलेली कसूर आणि त्याबद्दल त्यांना असलेली शिक्षेची तरतूद पुन्हा नव्याने अधोरेखित केली आहे. या विधेयकात नेमका पेच आहे तो केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या हक्कांबाबतचा.

 



कायदा आणि सुव्यवस्था या गोष्टी त्या-त्या राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असतात, परंतु जर कायदा सुव्यवस्था नियंत्रणात न राहिल्यास ती सुरळीत करण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्यास केंद्र सरकारला त्यात हस्तक्षेप करण्याची मुभा देण्यात आली आहे. हे विधेयक संसदेत येणार म्हटल्यावर साहजिकच त्याला काही घटकांनी विरोधसुद्धा केला. 2011मध्ये राष्‍ट्रीय एकता परिषदेची 13वी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत सदर विधेयकावर साधक-बाधक चर्चा करण्यासाठी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या बैठकीला त्या वेळेस पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी गैरहजर राहून आपला विरोध जाहीर केला होता. या गैरहजर मुख्यमंत्र्यांमध्ये एक नाव होते नरेंद्र मोदी यांचे! मोदी यांचा विरोध या विधेयकास का आहे, हे वेगळे सांगायची गरज नसावी; कारण गोध्रा हत्याकांडाचा जळजळीत इतिहास त्यांच्या गाठीशी आहे. अनेक पंथांत, धर्मांत आणि संस्कृतीत विभागलेल्या आपल्या देशाला जातीय दंगली या फार काही नवीन नाहीत. अल्पसंख्याक समुदाय हे धार्मिक, भाषिक, सांस्कृतिक कशाही प्रकारचे असू शकतात. त्यामुळे एखादा कायदा अथवा नियम बनवताना अल्पसंख्याक घटकांवर कुठलाही अन्याय होऊ नये याची जबाबदारी घेणे, हे सरकारचे कर्तव्यच आहे; कारण हा घटकसुद्धा आपल्या देशाचा घटनादत्त ‘सार्वभौम’ नागरिक आहे, हे विसरता कामा नये. जातीय समीकरणाच्या राजकारणात येथील लबाड राजकारण्यांनी विशिष्ट समुदायाला कायम आपल्या धाकात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. सत्तेची गणिते जुळवण्यासाठी प्रसंगी जातीय दंगली घडवून आणण्याचे कारस्थानसुद्धा झाल्याचे आढळते. या विधेयकानुसार जर हिंसापीडित व्यक्ती वा समुदायाने आरोप केला असेल, तर पीडिताने साक्ष देण्याऐवजी ज्यावर आरोप केला गेला आहे त्याने आपण निर्दोष नाही, हे सिद्ध करून दाखवायला हवे, अशी तरतूद आहे. आजपर्यंत झालेल्या जातीय हिंसाचारातील पीडितांची आकडेवारी पाहिली की 80-90 टक्के दंगलपीडित हे मुसलमान अथवा खिश्चन राहिलेले आहेत. बहुधा अशा प्रसंगी पोलिस प्रशासन व्यवस्थादेखील बहुसंख्येच्या बाजूने उभे राहिलेले आपण पाहिलेले आहेत.

 


हा कायदा मुळात हिंदू-मुस्लिम असा भेदभाव करीत नाही. जो समुदाय बहुसंख्य असेल, तर तो समुदाय हिंसक घटनेला जास्त जबाबदार असेल, असे यात स्पष्ट केले होते; परंतु प्रत्येक घटनेत बहुसंख्य समाजाला जबाबदार धरता येणार नाही, जर या विधेयकाप्रमाणे कारवाई झाली तर अल्पसंख्याक वर्गातील उपद्रवी घटक याचा फायदा उचलू शकतात. हा विचार करून विरोधकांनी विरोध केल्यावर या तरतुदीत सुधारणा करून सर्व गट किंवा जमातींना तटस्थ भूमिका घेण्यास सांगितले आहे. तसेच जातीय हिंसाचाराबाबत केंद्र सरकारचे हस्तक्षेप करण्याचे अधिकारदेखील कमी करण्यात आले आहेत, जेणेकरून राज्याच्या अंतर्गत घडामोडींवर केंद्र सरकारचा अधिक्षेप राहणार नाही.या विधेयकाला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संमत करून काँग्रेस अल्पसंख्याक समुदायाची मते मिळवू पाहते आहे, त्यांना याचा फायदा करून घेत येतो की नाही, हे येणारा काळ सांगेलच; परंतु हिंदुत्वाच्या वाटेवर स्वार होऊन दिल्ली काबीज करण्याची मनीषा बाळगत भाजपदेखील या विधेयकाचे राजकारण करेल, हे नक्की. या विधेयकातील कौतुकास्पद बाब ही की, देशात जातीय सलोखा निर्माण व्हावा यासाठी ‘राष्‍ट्रीय सांप्रदायिक सद्भाव प्राधिकरणा’चा प्रस्तावदेखील मांडण्यात आला आहे. या प्राधिकरणात सातपैकी चार सदस्य हे अल्पसंख्याक समुदायाचे असणार आहेत आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षदेखील! त्यामुळे या समुदायावर अन्याय होणार नाही, याची मात्र हमी देता येते.

 



विरोधकांचे म्हणणे आहे की, मुस्लिम व अ.जा./अ.ज. यांच्यामध्ये संघर्ष झाल्यास हे विधेयक अल्पसंख्याक असलेल्या मुस्लिम समाजाची बाजू घेईल आणि अ‍ॅट्रॉसिटीसारखे दलित अत्याचार प्रतिबंधक कायदे निष्फळ ठरतील. या प्रकरणावर चर्चा करताना प्रस्तावित विधेयकातील कलम 6 नुसार पीडितांवरील अत्याचाराचे गुन्हे हे अ‍ॅट्रॉसिटीमध्ये प्रविष्ट गुन्ह्यांपेक्षा वेगळे असतील हे स्पष्ट केले आहे. त्यामुळे अनु. जाती, जमातींना दिलेली कायद्याची ही कवच-कुंडले कुचकामी ठरणार नाहीत याची पुरेपूर काळजी घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अगदी स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या तत्त्वावर आधारलेली राज्यघटना बदलण्याची भाषा करणा-या भाजपचा या विधेयकाला विरोध राहणार हे सत्ताधा-यांनाही गृहीत धरलेले आहे. देशामधील जातीय सलोख्याला धोका उत्पन्न होण्याची भीती व्यक्त करून भाजप संसदेत या कायद्याला विरोध करेलच, परंतु कुंपणच जर शेत खायला लागलं, तर न्याय मागायचा कुणाकडे? या प्रश्नाचे उत्तर बाबरी मशीद पाडल्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीकडे पाहिले की लक्षात येते.

 



एकीकडे विकासाची कास धरत महासत्ता बनू पाहणारा भारत जातीय हिंसाचार प्रतिबंध कायदा करतो हेच खरे आपल्या मागासलेल्या विचारांचे दर्शन आहे. आधुनिकीकरणाचा मार्ग स्वीकारलेला आपला देश आजही जातीय पाळेमुळे घट्ट करण्यात गुंतलेला आढळतो आणि म्हणून मग शेवटी कायद्याचा धाक दाखवण्यासाठी अशी विधेयके येत असतात. पुरोगामी विचारांचा वारसा जपत असलेला आपला देश, विकास म्हणजे विवेकाची कास धरणारी समृद्धी अशी संकल्पना मांडतो; परंतु याच देशात जेव्हा धर्माच्या, जातीच्या नावावर विवेकाचा खून होतो, तेव्हा या प्रकरणातील गांभीर्य जाणवते. संसदेमध्ये या विधेयकावर साधक-बाधक चर्चा होणार आहेच, पण त्याचबरोबर एकंदरीत भारतीय समाजव्यवस्था, किचकट जातीय समीकरणे आणि त्याचे राजकारण याचा विचार करून या कायद्याबद्दल सामान्य नागरिकांमध्येही चर्चा होणे तेवढेच गरजेचे आहे. प्रशासकीय आणि शासकीय अनास्थेपोटी साध्या क्षुल्लक घटनांवरूनही दंगली घडल्याची धुळे दंगलीसारखी उदाहरणे आपल्याकडे आहेत, तेव्हा येत्या काळात अशा विघातक घटना घडू नयेत यासाठी कायद्याचा वचक असणे तेवढेच क्रमप्राप्त आहे.

 



संदर्भ- http://­divyamarathi.bhaskar.­com/article-srh/­EDT-article-on-anti-c­ommunal-violence-bil­l-by-sagar-bhalerao-­4514424-NOR.html

 



धन्यवाद- दै. दिव्यमराठी

 


लेखंक- सागर भालेराव. Er Sagar Bhalerao (sagobhal@gmail.com)

वाचा आपण कधीही न वाचलेला बाबासाहेबांचा इतिहास !!

वाचा आपण कधीही न वाचलेला बाबासाहेबांचा इतिहास !!



जगात आपलं नाव गिनिज बुकात नोंद व्हावे म्हणून कुणी-कुणी काय-काय उपद्व्याप केले आहेत होते हे आपण पाहतो ऐकतो.... पण जगाच्या पाठीवर ग्रथांसाठी (पुस्तकांसाठी) खास घर बाधंणारी एकच महान अशी व्यक्ती होवून गेली ती व्यक्ती म्हणजे विद्येचे व्यासंगी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 




डॉ. बाबासाहेबांच्या हिंदु क़ॉलनीतील राजगृह ह्या वास्तुतील ग्रंथसंग्रह पुढीलप्रमाणे...

 



कायदा या विषयावरील - ५०००

 

ग्रंथ राजकारण या विषयावरील - ३०००

 

ग्रंथ इतिहास या विषयावरील- २५०० ग्रंथ

 

धर्म या विषयावरील - २०००

 

ग्रंथ साहित्य याविषयावरील- १३००

 

ग्रंथ चरित्रे याविषयावरील- १२०० ग्रंथ

 

अर्थशास्त्र या विषयावरील- १२००

 

ग्रंथ तत्वज्ञान या विषयावरील- ६००

 

ग्रंथ युद्धशास्त्र याविषयावरील- ३००

 

ग्रंथ आणि इतर ग्रंथ ७९००

 



असे डॉ. बाबासाहेबांनी एकूण २५००० ग्रंथ वाचले. म्हणून अशा या महामानवाला प्रज्ञासुर्य, विद्येचे डॉक्टर, बोधिसत्व, प्रकांड पंडीत असे म्हणतात.

 



पंडित मदनमोहन मालवीय यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांकडे असलेला आपण दाखविलेला हा ग्रंथसंग्रह दोन लाख [आताच्या हिशेबात वीस कोटी] रुपयांना विकत घ्यायची इच्छा व्यक्त केली होती. बाबासाहेबांनी ती अमान्य तर केलीच. परंतु, त्यावेळेला त्यांनी जे उत्तर दिले, ते त्यांच्यातील ज्ञान, तपस्वीपणाची साक्ष देणारे ठरले. ते म्हणाले ग्रंथसंग्रह जाणे म्हणजे माझ्या कुडीतून प्राण जाण्यासारखे आहे. ग्रंथ म्हणजे त्यांच्या जीवनाचा श्वासोच्छवास होता. हे त्यांनी जमवलेल्या ग्रंथावरुन सिध्द होते. हे सांगणे एवढ्यासाठीच महत्वाचे आहे की जीवनामध्ये त्यांनी ज्या तत्वज्ञानाचा अंगीकार केला त्याला केवढा मोठा भक्कम पाया या ग्रंथातून मिळाला होता हे लक्षात येते.

 



नोट- ही पोस्ट जास्तीत-जास्त शेअर करा... कळू द्या सारया मनुवाद्यानां... सारया जगाला...

 



धन्यवाद - Harish Narayan Kadam , Shriram Pawar sir

आपल्या सर्वांचे शिवराय !!

आपल्या सर्वांचे शिवराय !!


आमचं शिवरायांवरचे प्रेम वयाच्या नवव्या वर्षी, चौथीच्या पुस्तकातील अफ़झल खानाच्या चित्रावर पेनाने गिचमिड कालवा करून सुरु झालं. त्याचवेळी चौथीत पहिल्यांदाच कळलं कि वर्गातला नौशाद् शेख आपल्यातला नाही. हे म्हणजे अफाटच होतं, आजपर्यंत आमच्या घोळक्यात तुमच्या-आमच्यासारखाच­ असणारा, मिसळणारा आणि आरेला कारे करणारा नौशाद एकदमच परका झाला होता. आम्ही काही गोष्टी फक्त तो नसतानाच बोलायला लागलो. त्याच्या समोर शिवाजी महाराजा विषयी प्रेम व्यक्त करायला कचरू लागलो. हे त्याने पण लगेच समजून घेतले असावे. कारण त्याच्या वागण्या बोलण्यात आपोआप बदल झाला होता. जरा मोठे झालो कि कळते कि आपला धर्म आणि जात आपल्या रक्तातच आहे, लहानपणी ते रक्त वेगळे असते का कुणास ठावूक ? पण मोठेपणी प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने आपल्या रक्ताचा, रक्तात भिनलेल्या संस्कृतीचा, आपल्या रक्ताशी मिळतेजुळते रक्त असणाऱ्या (जातभाई ) नेत्यालाच आदर्श मानायला चालू करतो. आणि ह्याच वेळी चालू होते दुसर्या जाती - धर्माच्या नेत्यांचा त्या-त्या लोकांच्या समोर अतोनात आदर करणे. मग अश्या तर्हेने परतफेड चालू होते, कुणी आंबेडकरांचे गोडवे गातो, कुणी शिवाजी महाराजांचे, कुणी मौलाना आझाद, टिपू सुलतान किंवा भगवानबाबा. दहावी पर्यंत येस्तोवर कळले कि आपण समाजात असताना सर्वधर्म समभाव असतो आणि सजातीय लोकामध्ये असताना आपली जात आणि धर्म संकटात आलेला असतो. बहुतेक लोक हे अश्या तर्हेचे सोंग घेवून समाजात वावरत असतात आणि वरून मी जातीभेद धर्मभेद मानत नाही असे सांगताना "त्या" लोकानी एवढे माजल्यावणी करायला नाही पाहिजे असे सल्ले पण देत असतो.

 



हळू हळू दहावी पर्यंत नौशादचा ग्रुप वेगळा झाला व आमचा वेगळा. तरी पण क्रिकेट खेळायला, गणपतीची वर्गणी मागायला तो आमच्यात असायचाच. पण आमच्या लक्ष्यात येवू लागले कि प्रत्येक वेळी याला आपण देशाशी कसे इमानदार आहोत, हिंदू धर्माचे शत्रू नाही आहोत हे सिद्ध करावे लागत आहे किंवा तोच स्वता:हून सिद्ध करायचा प्रयत्न करतोय. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात सईद अन्वरला आमच्या पेक्ष्या एक शिवी तो जास्तच द्यायचा. डोक्याला नेमाटी वोढून शिवजयंतीची वर्गणी मागताना शिवाजी महाराजा बद्दलचा त्याचा आदर आम्हाला नेहमी जास्तच वाटायचा. चुकून आम्ही कधी "शिवाजी" बोललो तरी तो फक्त "महाराजाच" म्हणायचा. अर्थात त्याच्या आदराविषयी अजिबात शंका नाही पण आमच्या इतर मित्रापेक्षा त्याचे योगदान नेहमीच जास्त असायला पाहिजे असा त्याचाच दंडक होता. असा दंडक त्याने का करून घेतला असेल याचे उत्तर आजच्या अल्पसंख्यांक आणि बहुसंख्याक ह्या दोन सज्ञे मध्ये आढळेल. त्यांनी इथे राहावे पण आम्ही सांगेन तसेच दुय्यम नागरिकत्व पत्करून राहावे हि आपली सुप्त पण कधी कधी उतू येणारी भावना. एकुणातच हे राज्य आमचे आहे हि भावना जणतेमध्ये निर्माण करणे हे म्हणजे धोरणात्मक रित्या शिवाजी महाराजांच्या विचारणा मूठमाती देण्यासारखे आहे.

 



शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीकडे बघताना सर्वसामान्य मराठी माणूस हा अफजलखानाचा वध, आग्र्याहून सुटका, पुरंदरचा तह, आणि भवानी तलवार ह्या पुढे जाताना दिसत नाही तर अमराठी माणूस हा मराठ्यांचे राज्य, लुटारूंचे राज्य अश्या कुत्सित नजरेनेच बघताना दिसतो. ह्याला मूळता आपली शिक्षण पद्धती आणि राजकारणच कारणीभूत असले पाहिजे. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीकडे स्वतंत्ररित्या पाहता येवू शकणार नाही. हिंदुस्थानमध्ये दक्षिण उत्तर आणि पशिच्म पूर्व पसरलेल्या मुस्लिम राजवटीमध्ये संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत स्वराज्य निर्मिती करणारा, हे राज्य राजाचे नाही तर रयतेचे आहे असे देशप्रेम रयतेच्या मनात निर्माण करणारा तो एकमेव राजा होवून गेला. शिवाजी महाराजांनी स्वता:साठी फक्त कार्यकर्ते नाहीत तर आपल्या पाठीमागे राज्य सांभाळतील असे नेते तयार करून एक स्वराज्याचा विचार दिला होता म्हणूनच सह्याद्रीच्या कुशीत तयार झालेले ह्या छोट्याश्या स्वराज्याने पुढे जावून आपली सीमा उत्तरेकडे अफघानिस्तान पर्यंत तर दक्षिणेला तामिळनाडू पर्यंत पोहचवली.

 



शिवाजी महाराजांच्या कारकीर्दीनंतर नंतर जवळ जवळ पावणे चारशे वर्षांनी जर आजच्या समाजाकडे आणि राज्यव्यवस्थेकडे पाहिले तर ढोबळ मानाने आपण असे म्हणू शकतो कि आपण शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्याच्या, समानतेच्या, न्यायाच्या, कायद्याच्या राज्याच्या आणि स्वराज्याच्या संकल्पनेला तिलांजली दिलेली आहे. शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आणि शिवाजी महाराजांच्या नावाने सत्ता मागणारे महाराजांचा नेमका कोणता विचार रुजवू पाहत आहेत हेच कळत नाही. आजचा काळ मला शिवपूर्व काळाची आठवण करुण देत आहे. मुघलांनी आणि इतर दक्षिणेतल्या शाह्यांनी जसे सरंजामशाहीला प्रोत्साहन देवून हिन्दुस्थानवरचि आपली पकड मजबूत केली होती तशीच पकड लोकशाही मार्गाने दिल्लीच्या राज्यकर्त्यांनी खानदानी सरंजाम निर्माण करून आपले राज्य चिरायू करण्याचा प्रयत्न केला आहे. त्या वतणासाठी झालेल्या लढाया आपण कधी कधी पाहतो पण त्यामुळे वरच्या सल्तनतीला काहीच फरक पडत नाही.

 



प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार शिवाजी महाराजांना वापरले आहे, त्यामुळे कुणासाठी शिवाजी महाराज हिंदुत्ववादी असतात, कुणासाठी मराठी, कुणासाठी मराठा तर एखाद्याला राजपूत आहे म्हणून मिरवून घेण्यात कौतुक वाटते. आजच्या पिढीमध्ये शिवाजी महाराजांचे विचार रुजवायचे असतील तर अगोदर शिवाजि महाराजाविषयीचे लोकामध्ये असलेले गैरसमज दूर करायला हवेत. ते देवाचा अवतार नव्हते तर ते एक तुमच्या आमच्यासारखेच हाडामासाचा माणूस होते व स्वकष्टातून आणि जिजाऊ-शहाजी राजांच्या मार्गदर्शनातून त्यांनी स्वराज्य निर्मिती केली होती. त्यांचे राज्य हे कुणा धर्माच्या विरोधात नाही तर ते स्वकीयांचे राज्य होते, अफझल खानाला मारणे हा त्यांचा धर्म होता कारण तो स्वराज्यावरचे संकट होता पण त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधणे हा सुद्धा महाराजांचा धर्म त्यांनी पाळला होता. सतराव्या शतकामध्ये जातीपातीची उतरंड असताना त्यांनी सर्व जातीच्या आणि धर्माच्या लोकांना आपल्या सैन्यात आणि प्रशासनात स्थान देवून समतेच्या राज्याची स्थापना करताना आपण धोरणी आणि दूरदृष्टी असलेले राजे आहोत हे दाखवून दिले होते.

 



आजच्या पिढीमध्ये शिवाजी महाराजांचे एवढे गुण जरी आपण रुजवू शकलो तरी पुढे शिवाजी महाराजांचा वापर कुणी जातीय, धार्मिक व राजकारणातील दंगलीसाठी करायचा प्रयत्न करताना हजार वेळा विचार करील. आणि नौशाद पुढे त्याच्या मित्रांना महाराजा विषयी बोलताना अडखळण्याची गरज पडणार नाही किंवा किंवा नौशादाला त्याची इमानदारी सिद्ध करण्यासाठी सईद अन्वरला एक शिवी मुद्दामहून जास्त द्यावी लागणार नाही.

 


संदर्भ- http://­vikasgodage.blogspot.­in/2014/02/­blog-post_18.html?spr­ef=fb&m=1

 

लेखं- विकास गोडगे सर.

मुसलमानो के लिए ये समझना जरूरी है..

मुसलमानो के लिए ये समझना जरूरी है..



मुसलमानो के लिए ये समझना जरूरी है कि पूर्वाग्रह वाली मानसिकता से कुछ हासिल होने वाला नहीं है. वो भारत के स्वाभिमानी नागरिक हैं और रहेंगे. हिंदू बहुमत की तरह मुसलमानों के बहुमत को भी भारतीय कानून और संविधान तक पहुँच हासिल है. लेकिन इस लक्ष्य को पाने के लिए उन्हें उस अल्पसंख्यक से टकराना होगा, जो कानून के द्वारा समस्याओं के समाधान के बजाय गैर संवैधानिक रास्ते अपनाता है. भारत में हम सांप्रदायिकता और भेदभाव का मुकाबला आक्रामकता से नहीं बल्कि बेहतर शिक्षा, आपसी बातचीत, सहानुभूति, नैतिकता और दृढ़विश्वास के साथ कर सकते हैं.

 


क्योंकि देश की बड़ी आबादी धर्मनिरपेक्ष मूल्यों और न्याय का समर्थन करती है. जब दुनिया के दूसरे समाज बड़ी हद तक अपने जातीय समस्याओं का समाधान करने में सफल हैं तो हम क्यों नहीं कर सकते? भारतीय मुसलमानों को ये बात अवश्य समझना चाहिए कि सैकड़ों दंगों के अनुभव के बावजूद भारत धर्मनिरपेक्ष बना रहा, क्योंकि अधिकांश भारतीय जिनका बहुसंख्यक हिंदू है दृढ़तापूर्वक धर्मनिर्पेक्ष बना रहा है.

 



विचार- अनीस अहमद भाई

'होळी लहान करा... पुरणपोळी दान करा...' पिंपरी-चिंचवड अ.नि.स कार्यकर्त्याचा अभिनव उपक्रम !!

'होळी लहान करा... पुरणपोळी दान करा...' पिंपरी-चिंचवड अ.नि.स कार्यकर्त्याचा अभिनव उपक्रम !!
 

गेल्या १५ वर्षापासून पिपरी-चिंचवड अंध्रश्रद्धा निर्मुलन समिती एक उपक्रम राबवत आहे.. त्या उपक्रमाचे नाव 'होळी लहान करा... पुरणपोळी दान करा...' हा उपक्रम कार्यकर्ते एखाद्या गावात राबवतात. होळीमध्ये जळून जाणाऱ्या पुरणपोळ्या होळीत न.. टाकता ते गरर्जू लोकांना वाटणे अथवा त्या पुरांपोळ्याचे समुहभोजन करणे.. तसेच होळी ही कमीत-कमी शेणी (गौरया) ची करणे... होळीत लाकडाचा वापर न करणे... व जमा झालेल्या शेणी (गौरया) स्मशानांत दान करणे. असा उपक्रम हे पिंपरी-चिंचवड अ.नि.स कार्यकते गेल्या १५ वर्षापासून राबवत आहे.

 



या वर्षी म्हणजेच काल १६ मार्च २०१४ ला होळी होती या अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या या १० कार्यकर्त्यांनी हा उपक्रम देहू जवळील.. माळवाडी, झेडेमला आणि चिंचोली गावातून पुरणपोळी जमा केल्या.. आणि रात्री ९. ३० वाजता जवळच असणाऱ्या त्या पुरणपोळ्या झाडू बनवणाऱ्या कुंचीकर समाजातील मुलं-मुलींना व लोकांना वाटल्या गेली १५ वर्ष या गावातील लोकं पुरणपोळी अग्नीत न टाकता जमा करतात. विचार तर कराल... १० लोकांनी तीन ठिकाणी ७०० पुरणपोळ्या आगींत जाण्यापासून वाचवल्या … महाराष्ट्रात किती पुरणपोळ्या आगीत जाऊन राख होत असतील?? आपण विचार करणार आहोत कि नाही??

 



महाराष्ट्रात गारपीट मुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले शेतकरी शेतात कष्टकरुन घाम गाळून शेतात धान्य पिकवतात जे लोक अजिबात कष्ट न करता सहज पुरणपोळी अग्नीमध्ये राख होण्यासाठी टाकतात खरच तो अग्नी शांत होत असेल का ?? कि कोणाच्या पोटात पुरणपोळी गेल्या मुळे जठर अग्नी शांत होईल.


 


भुकेल्याला अन्न हाच खरां धर्म हे गाडगेबाबा सांगतात... या सुविचाराचे आचरण या कार्यकर्त्यांनी केले. माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणीनो पर्यावरणाचे व राष्ट्रीय संपत्तीचे रक्षण म्हणजेच देशप्रेम होय. हा उपक्रम येणाऱ्या होळीला आपण आपल्या कॉलनी मध्ये अथवा शिक्षकांनी आपल्या विधार्थ्याना सोबत घेवून राबवावा.

 


हा उपक्रम राबवणाऱ्या पिंपरी-चिंचवड अ.नि.स कार्यकर्त्याना व त्यांना साथ देणाऱ्या देहू जवळील.. माळवाडी, झेडेमला आणि चिंचोली गावातील लोकांना मानाचा मुजरा !!

 


नोट- तुम्ही खरचं पर्यावरणावर प्रेमं करत असाल तर ही पोस्ट जास्तीत-जास्त शरे करा.

 


धन्यवाद- विवेक साम (पिंपरी-चिंचवड अ.नि.स कार्यकता)

तृतीयपंथीयांच्या जखमा !!

तृतीयपंथीयांच्या जखमा !!

 


शिक्षण नाही. कोणाचा सहारा नाही. आईबाप जवळ करीत नाही. समाज जगू देत नाही. ही परिस्थिती फारशी बदलण्याची चिन्हेही नाहीत. आम्ही म्हणजे जणू परग्रहावरून वस्तीला आलेली अस्पृश्य जमात. सांगा आम्ही जगायचं कसं?

 



तृतीयपंथीयांच्या शारीरिक किंवा मानसिक जडणघडणीतच काही वजावट राहिलेली आहे की, निसर्गाने त्यांना मुद्दामच वेगळेपणा बहाल केला, याविषयी परस्परविरोधी दृष्टिकोन आहेत. पण शास्रज्ञ, विचारवंत किंवा उत्क्रांतीवादी काहीही म्हणो, तृतीयपंथीयांना हीन लेखण्याच्या बाबतीत समाजात नेहमीच एकमत असते. तृतीयपंथीयांची गोष्ट निघाली की, शिव्याशापांनी भरलेला प्रवाह दुथडी भरून वाहू लागतो. याविषयी भरभरून बोलताना गोव्यात हल्लीच झालेल्या तृतीयपंथीयांच्या राष्ट्रीय मेळाव्यात सहभागी तृतीयपंथीयांनी त्यांच्या जखमा उघडल्या.

 



बलात्कार्‍यांना लगाम घालण्यासाठी त्यांच्या शरीराचा विशिष्ट अवयव कापावा अथवा त्यांना रासायनिक प्रक्रियेने नपुंसक करून तृतीयपंथी बनवण्याची कठोर शिक्षा द्यावी या मागणीने सध्या जोर धरला आहे. आग्रही ओठांवर आणि त्यांच्या मनात तृतीयपंथीपणा व नपुंसकपणा यांची गफलती सरमिसळ असते. ज्यांनी बलात्कार केला नाही किंवा आयुष्यात कुठलाही गुन्हा केला नाही, त्यांना तृतीयपंथीपणाची शिक्षा नशीब का देते याचा विचार मात्र अभावानेच होताना दिसतो.

 



गोव्यातील मेळावा ‘अनाम प्रेम’ चळवळीतील सेवाभावी कार्यकर्त्यांनी आयोजित केला. त्यामागे नशिबाला बोल लावत बसण्याऐवजी नशीब बदलण्याची जिगर हवी, अशी भूमिका होती.

 




तृतीयपंथी म्हणजे वेश्याव्यवसाय करणारे, आपले अवयव दाखविण्याची धमकी देऊन भीक मागताना लोकांना सतावणारे, तेवढेच त्यांचे कर्तृत्व हा गैरसमज दूर करण्यासाठी देशातील जागोजागी सर्व प्रकारच्या हिजड्यांचे मेळावे आयोजित व्हायला हवेत.

 




सध्या चित्रमालिकांमधून प्रसिद्धीस येत असलेल्या अभीना अहेर या हिजड्याने मेळाव्यात अतिशय अभ्यासपूर्ण व आत्मविश्‍वासी सादरीकरण केले. निरक्षरतेपासून उच्च शिक्षणाच्या दिशेने व परावलंबित्वापासून स्वावलंबनाच्या दिशेने तृतीयपंथीयांचा जो प्रवास होत आहे त्याचेच जितेजागते प्रतीक म्हणजे अभीना. तृतीयपंथीयांनी समाजाच्या दयेवर न जगता स्वपायांवर उभे रहावे यासाठी अभीना नृत्याच्या रिंगणात पदन्यास टाकीत अविरत प्रयत्न करते आहे. अभीनाच्या समविचारी आणि समआचारी साथीदारांची संख्या कमी असली तरी अगदीच नगण्य नाही. राष्ट्रीय मेळाव्याच्या उपक्रमाने पाठिंबा व प्रोत्साहनासोबत प्रतिष्ठाही मिळाली अशी कृतज्ञता अभीनाने आवर्जून व्यक्त केली. तृतीयपंथीयांना आज आत्मसन्मान व प्रतिष्ठेची भूक तहान आहे.

 



तृतीयपंथीयांसाठी शिक्षणाची दारे उघडू लागली की, त्यातून आत्मविश्‍वासाची झुळूकही शिरेल हे खरे असले, तरी नुसत्या शिक्षणाचाही फायदा नाही. शिक्षण घेतलेल्या तृतीयपंथीयांना त्या शिक्षणाचा वापर करण्याची संधी देण्याबाबतीत आपला समाज म्हणजे आपण सारे कमी पडतो. म्हणूनच ‘शिकून काय होणार?’ हा नैराश्यजनक सवाल तृतीयपंथीयांच्या मनात उगवतो.

 



बहुतेक तृतीयपंथीय शिक्षणापासून वंचित आहेत आणि नजीकच्या भविष्यात ही दुरस्थिती फारशी बदलेल अशी चिन्हे नाहीत. अशा अशिक्षित तृतीयपंथीयांनी कसे जगवे हा यक्षप्रश्न आहे. आईबाप त्यांना जवळ करीत नाही आणि समाज त्यांना समाजात जगू देत नाही. जणू तृतीयपंथी ही परग्रहावरून वस्तीला आलेली अस्पृश्य जमात आहे. तृतीयपंथीयांशी बोलताना जाणवले की, शिक्षणाची गरज त्यांच्यापेक्षाही जास्त त्यांच्या कुटुंबीयांना आहे. तृतीयपंथीयांचे पालक समाजाच्या दडपणाखाली चेपून स्वत:च्या संततीलाच नाके मुरडतात. आपल्या घरी हे असले अस्तित्व निपजले हे समाजाला कळले तर आपल्यावरच दोषारोप होतील या पालकांच्या मनातील धास्तीतून तृतीयपंथीविरोधी अढी किंवा चीड घरातूनच वाढीला लागते. खरे-खोटे साधूपरुष, ढोंगी बाबा, ताईत, अंगारे यांच्या मागे न लागता तृतीयपंथीयांच्या आई-वडिलांनी आपल्या मुलांना विकृत न मानता आहे तसे स्वीकारणे घडायला हवे. पालकांची सारी ताकद आपल्या तृतीयपंथीय अपत्यांचे लिंग लपविण्यात खर्च होते. या ताकदीचा ओघ तृतीयपंथीयांना सपोर्ट देण्याकडे वळवला पाहिजे.

 




शाळा कॉलेजांमधील छापील प्रवेश फॉर्मस्मध्ये केवळ मेल/फिमेल अशी खानेवारी असते, तृतीयपंथीयांसाठी त्यामध्ये तरतूद नसते. रेशन कार्ड, बँकांमधील खाती, शासकीय रोजगार खाते या सार्‍या ठिकाणी तीच परवड व तोच नन्नाचा पाढा. मग तृतीयपंथीयांनी शिकायचे तरी कसे? शिक्षण नाही म्हणून नोकरी नाही, नोकरी नाही म्हणून पगार बचत नाही व बँकेत खाते उघडता येत नाही म्हणून कर्जही मिळत नाही. मग त्यांनी उद्योगधंदा तरी कसा करायचा?

 



नोकर्‍यांमध्ये, बस, ट्रेनमध्ये महिलांना राखीव जागा असतात. तृतीयपंथीयांच्या नशिबी तीही सवलत नाही. एखादा तृतीयपंथीय चुकून किंवा हिंमत करून स्त्रियांसाठी राखीव असलेल्या सार्वजनिक शौचालयात शिरला तर तिथे आकांत उठतो आणि तो हिजडा जर पुरुषांच्या शौचालयात शिरला तर त्याला लैंगिक अतिप्रसंगांना तोंड द्यावे लागते. बलात्कार्‍यांना फाशी देऊन की तुकडे तुकडे करून मारावे या चर्चेत दिवसरात्र मग्न असलेला समाज तृतीयपंथीयांना मात्र रोजच अनुल्लेखाने मारतो. कुठल्या तृतीयपंथीयांवरच्या किती अतिप्रसंगांची नोंद किंवा किती विनयभंगांची दखल समाजाने आतापर्यंत घेतली आहे? जणू तृतीयपंथी जे भोगतात ते त्यांचे अपरिवर्तनीय प्राक्तन आहे.


 



स्वतंत्र भारताच्या भाग्यविधात्या संविधानात हिजड्यांचा उल्लेख नाही. जनरल क्लॉज अँक्ट या कायद्यानुसार ‘व्यक्ती’ या शब्दाची व्याप्ती ‘तो’ किंवा ‘ती’ इतकीच र्मयादित असते. त्यातही तृतीयपंथीयांचा समावेश नाही, म्हणजे आपल्या अवतीभवती वावरणारे हजारो लाखो तृतीयपंथी जणू अस्तित्वातच नाही. त्यांना अदृश्य करण्याची जादुई करामत आपल्या राज्यघटनेने केली आहे.

 



राज्यघटनेतील समानतेच्या तरतुदींविषयी एका तृतीयपंथीय सेक्स वर्करची मल्लिनाथी मार्मिक अन् हादरवणारी होती. मेळाव्याप्रसंगी ती म्हणाली ‘आम्ही जे करतो तेच स्री वेश्या करतात; पण त्यासाठी स्री वेश्यांना आमच्या तुलनेत चौपट कमाई मिळते. ही विषमता कधी आणि कशी दूर होणार?’

 




तृतीयपंथीसंबंधी बर्‍याच समस्या व प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे मिळविण्यासाठी आधी त्यांच्याच घरात संवाद वाढायला हवा. ते न घडता त्यांना जाणता अजाणता घराबाहेर हाकलण्यात येते. बाहेरही सर्वच नजरा तिरस्काराने रोखलेल्या. या नजरांपासून बचाव करायचा झाला तर कुटुंबानेच तृतीयपंथीयांचे चिलखत बनायला हवे. हे न घडले तर घरातून बाहेर फेकलेले रिजेक्ट्स एवढाच अपमानकारक शिक्का तृतीयपंथीयांच्या माथी कायम राहील. ही ललाटरेखा बदलण्याचे काम अनाम प्रेम व्रतस्थपणे करीत आहे आणि त्यासाठी कृपाली भिडे सारखी युवा कार्यकर्ती आपल्या आय.ए.एस. सनदी परीक्षेच्या अभ्यासाकडे प्रसंगी दुर्लक्ष करून जीवापाड प्रयत्न करते.

 



कृपाली अनुभवातून बोलते, ‘तृतीयपंथीयांवर होणारे अन्याय कमी करायचे असतील तर प्रथम त्यांच्या कुटुंबातील न्यूनगंड कमी करायला हवा’ हा दृष्टिकोन केवळ कायदा किंवा शिक्षणाच्या झारीतून पेरता येणार नाही. त्यासाठी तृतीयपंथीयांच्या कुटुंबीयांना समाजाची आश्‍वासक साथ हवी. अनाम प्रेमचे कार्यकर्ते ती साथ देण्यासाठी तृतीयपंथीयांच्या घरोघरी वेळोवेळी आपुलकीची शिदोरी घेऊन जातात.

 



समाज तृतीयपंथीयांना कसा वागवतो हे तृतीयपंथी डोळ्यात पाणी आणून सांगत होते आणि त्या पाण्यात वाहत होते ते माणुसकीचे कलेवर.

 



या मेळाव्याचा जमाखर्च काय ? माणुसकी माणसांपासून दूर वाहत गेली आहे या साक्षात्काराची फेरउजळणी एवढेच या मेळाव्याने योगदान दिले ? मला नाही तसे वाटत.

 



अश्रूंचा प्रवाह जरूर वाढला. पण त्यापेक्षाही जोमदारपणे वाढली ती प्रवाहाविरोधात पोहण्याची ताकद. काठावर बसलेल्या बिगर तृतीयपंथी समाजाने आता ही जोमदार ताकद वापरून माणुसकीच्या शत्रूसंगे म्हणजे स्वत:शीच लढायला हवे !!!

 




लेखं - सतीश सोनक.

 



धन्यवाद- दै लोकमत

चर्मकारानो, 'हरि'जन होऊ नका !!

चर्मकारानो, 'हरि'जन होऊ नका !!




मेलेल्या जनावराचे कच्चे कातडे पक्के करणे, त्याला रंग, रूप, आकार देणे, त्याचे चप्पल, बूट बनविणे ! हा आमचा परंपरागत व्यवसाय. या व्यवसायातून आम्ही हजारो वर्ष लोकांची सेवा केली, करीत आहोत. ही चरण सेवा करूनही आम्ही अस्पृश्य, उपेक्षित… आम्ही दलित … आम्ही हरिजन म्हणे ! आमचा आणि हरिचा कांही संबंध नाही. आम्हाला कधी कुणी हरीचे दर्शन घेऊ दिले नाही. मंदिरात जाऊ दिले नाही … तरीही आम्ही 'हरि'जन कसे ?

 




गांधीने आम्हाला 'हरि'जन कसे काय म्हटले ? हे काय षड्यंत्र आहे ? आमचा आणि हरीचा कधी संबंध येऊ दिला नाही ! आम्हाला हरीच्या जवळ जाऊ दिले नाही, तरीही आम्ही हरिजन कसे ? आम्ही हरी दर्शनाला गेलो, हरीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला धक्के मारून मंदिराच्या बाहेर हाकलून दिले ! लाथा घातल्या आम्हाला ! मारून, शिव्या घालून मंदिराच्या बाहेर हाकलून दिले आम्हाला, तरीही आम्ही हरिजन कसे ?

 




आम्हालाच नव्हे तर आमच्या हरीला म्हणजे आमच्या देवालाही शिव्या घातल्या या लोकांनी. "चांभाराच्या देवाला खेटरांची पूजा !" आम्ही कधी प्रश्न विचारला नाही, आमचा देव कोणता ? आमच्या देवाला खेटरांचीच पूजा का ? तुमचा देव कोणता? तुमच्या देवाला कश्याची पूजा ? आमचा देव कोणता ? तुमचा देव कोणता ? देवांचा हा भेदभाव कुणी निर्माण केला ? त्याला अगोदर खेटरांची पूजा का नको ? असे प्रश्न आणि असंख्य प्रश्न निर्माण होत आहेत. हे प्रश्न समस्त चर्मकार समाजाच्या मनात निर्माण झाले पाहिजेत !

 




कांही वर्षांपूर्वी चर्मकार सुपुत्र व बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी आणि बहन मायावती यांच्या मनात हे प्रश्न निर्माण झाले होते. त्यांनी इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारला. आम्ही हरिचे जण… तर तुम्ही कोण ? आम्ही हरिचे जण तर तुम्ही शैतानाचे जण काय ? आम्ही हरिचे जण तर आम्हाला हरिजन म्हणणारे गांधी आणि त्याची समस्त पिलावळ ही शैतानाची पैदास आहे काय ? मान्यवर कांशीरामजी आणि बहन मायावती यांनी आम्हाला तेंव्हा सावध केले होते, परंतु आम्ही गाफील राहिलो, आजही गाफील आहोत.

 




मान्यवर कांशीरामजी आणि बहन मायावती यांच्याही अगोदर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही आम्हाला सावध केले होते. 'हरिजन' हा गांधीचा भूल भुल्लैय्यां आहे, बाबासाहेबांच्या सामाजिक परिवर्तनाच्या लढाईपासून दलितांना अलग पाडण्यासाठी गांधीने हरिजनचे शास्त्र व शस्त्र वापरले, तेंव्हा त्याला कांही चर्मकार बळी पडले होते आणि आजही बळी पडत आहेत ! हातात हरीचे निशाण घेवून आजही चर्मकार नाचत आहेत, ही एक फार मोठी शोकांतिकाच म्हणावी लागेल !!

 




हातात हरीचे निशाण घेवून नाचणाऱ्या चर्मकाराना एक प्रश्न विचारावा वाटतो कि, या हरीने आजवर चर्मकाराना काय दिले? आमच्या बापजाद्यांनी हजारो वर्ष हरीची उपासना केली, सनातनी लोकांनी आम्हाला हरीच्या मंदिरात येऊ दिले नाही, ज्यांनी आम्हाला हरिजन म्हटले त्या लोकांनी आम्हाला हरीच्या मंदिरात तर येऊ दिले नाही परंतु गावातही राहू दिले नाही, गावकुसाबाहेर, सर्व गावाचे घाण पाणी वाहून येते त्या घाणेरड्या नाल्याच्या कडेला, उतारावर, उकीरड्याच्या कडेला आमच्या झोपड्या, उंच टेकड्यांवर त्यांचे वाडे आणि बंगले… ते वेशीच्या आत… आम्ही वेशीच्या बाहेर.. स्मशानभूमी आमच्या शेजारी… आम्हाला सोबत स्मशानभूमीतील शैतानांची… कारण आम्ही शैतानच ना त्यांच्या हिशोबाने ! त्यांनी आम्हाला माणूसच समजले नाही… फक्त हरिजन म्हटले, त्यातच आम्ही खूष आहोत !!

 




सनातनी उच्चवर्णीय जातीयवादी माणसांनी आम्हाला गावकुसाबाहेर ठेवले, हरकत नाही ! जातीयवादी लोक जातीयवाद करणार नाहीत तर काय करतील ? ते त्यांचे काम करतील, परंतु ज्या हरीचे निशाण डोक्यावर घेऊन आम्ही शेकडो वर्षांपासून नाचत आहोत, त्या हरीने आमच्यासाठी काय केले ? हरी तर सर्वश्रेष्ठ आहे म्हणतात, या सर्वश्रेष्ठ हरीने त्या जातीयवादी लोकांना समजून सांगायला पाहिजे होते, ऐकत नसतील तर आपल्या सर्वश्रेष्ठ शक्तीने विषमतावादी वर्तन करणाऱ्या जातीयवादी लोकांना चांगली कडक शिक्षा करायला पाहिजे होती. दलितांना, हरिजनांना गावकुसाबाहेर ठेवता काय ? थांबा मी तुम्हाला गावातच ठेवत नाही असा कांही तरी चमत्कार या हरीने करायला पाहिजे होता परंतु तसे कांहीही या हरीने, ईश्वर, राम आणि कृष्णाने केले नाही, हे चर्मकार समजून घेणार आहेत कि नाही ?

 




हरिजन बनून, हरीचे निशाण हातात घेवून, जय गुरु 'देव' म्हणून गुरु रविदास जयंतीच्या मिरवणुकीत नाचणाऱ्या चर्मकारानो, या हरीला कधी जाब विचारणार आहात कि नाही ? आम्हाला गावकुसाबाहेर का ठेवले ? गावाच्या मुख्य विहिरीवर पाणी का भरू दिले नाही ? शाळेत सर्व मुलांबरोबर का बसू दिले नाही ? पंक्तीत बसून सर्वांबरोबर का जेवू दिले नाही ? उकिरड्यावर कुत्र्या-मांजरांबरोब­र आमच्या लेकरांनी तुम्ही फेकलेले तुमचे उष्टे अन्न खाल्ले… ताजे अन्न खाऊ दिले नाही, चांगले नवे वस्त्र लेऊ दिले नाही, लग्नाच्या वरातीत आम्हाला घोड्यावर बसू दिले नाही… जातीच्या नावाने सतत शिव्या, मारहाण, अन्याय-अत्त्याचार, खून, आया-बहिणींच्या अब्रूवर घाला… आमच्या महिलांना नग्न करून रस्त्यावरून फिरविण्यात आले…. या सर्व वेळी हा हरी कुठे लपला होता ?

 




क्रांतिकारी महामानव गुरु रविदास यांनी भक्तीचे नव्हे तर मानव मुक्तीचे आंदोलन केले. "भक्ती भ्रम है सो जाण !" असा संदेश गुरु रविदास यांनी दिला. भक्तीला त्यांनी भ्रम असे समजले. गुरु रविदास यांच्या अनुयायांनी मात्र नेमके त्यांच्या उलटे आचरण सुरु केले आहे. रविदासाना त्यांनी भक्तीमार्गात गुंतविण्याचा प्रयत्न चालविला आहे. आधीच हिंदू धर्मातील सर्व कर्मकांडात आणि भक्तीमार्गात गुंतलेल्या या चर्मकार समाजाला नव्याने स्थापन झालेल्या 'रविदासिया धर्माने' आणखी पार बुचकाळ्यात टाकले आहे. 'रविदासिया धर्मात' नामदान, नामजप, किर्तन, प्रवचन, भजन, भंडारा हे सारे हिंदू धर्म पद्धती प्रमाणे होत आहे. हिंदू धर्मात पालखी निघते तशी गुरु रविदास जयंतीची मिरवणूक निघत आहे. "जय रविदास" ऐवजी "जय" केवळ हिंदू धर्माची नक्कल करून काय साध्य होणार आहे ? या सनातन पद्धतीने समाज परिवर्तन होणार आहे काय ? केवळ भक्तीने समाज परिवर्तन होणार आहे काय ? गुरुचा गुरुद्वारा असतो, गुरु रविदास यांचा देखिल गुरुद्वारा असायला पाहिजे परंतु तसे न होता मोठ्या प्रमाणात मंदिरे निर्माण केली जात आहेत, या मंदिरांना धाम, धर्मस्थान, पवित्र स्थान वगैरे विशेषणे दिली जात आहेत. पहिले धाम, दुसरे धाम, तिसरे धाम…. अशी नामकरणे केली जात आहेत. सर्व कांही हिंदू धर्माचीच नक्कल केली जात आहे. अक्कल गहाण ठेऊन अंधानुकरण केले जात आहे. देव, दैव, हरी, धाम, नामदान या सर्व खुळचट कल्पना आहेत. त्यामुळे आमचे भले झाले नाही.

 




आमचे बापजादे हजारो वर्षांपासून इमाने-इतबारे हरीची उपासना करीत आले, त्यामुळे त्यांचे कांहीही भले झाले नाही, शिक्षण, आरक्षण, संरक्षण हे सर्व बुद्ध, बसवेश्वर, रविदास, कबीर, फुले, शाहू आणि संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे मिळाले, याचे भान न ठेवता, या महामानवांचे उपकार न मानता चर्मकार समाज हरी… हरी… करीत "हरिजन " होऊ पाहत आहे ! हा 'हरि'जन, चर्मकार समाजाला प्रगतीच्या वाटेवर न घेऊन जाता पुन्हा एकदा सनातनी काळोख्या अंधारातच घेवून जाणार आहे, म्हणून म्हणतो चर्मकारानो, 'हरि'जन होऊ नका …!

 




लेखं- चंद्रप्रकाश देगलूरकर, संस्थापक, अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषद



 



मोबाईलं न- ०९४२३७८१११४

२७ फेब्रुवारी २०१४. 'गोध्रा हत्याकांड' या घटनेला एक तप म्हणजे १२ वर्षे पूर्ण झाली !!

२७ फेब्रुवारी २०१४. 'गोध्रा हत्याकांड' या घटनेला एक तप म्हणजे १२ वर्षे पूर्ण झाली !!

 



२७ फेब्रुवारी २००२ ची सकाळ होती. अशी सकाळ की जी गुजरातच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरली. तसेच ही सकाळ गेल्या दशकात झालेल्या सर्वाधिक मोठ्या दंगलीचे कारण आणि केंद्रबिंदू ठरली. या सकाळी जे काही घडलं ते कोर्टाच्या रेकॉर्डपासून वर्तमानपत्राच्या हेडलाइपर्यंत आणि सामान्य माणसांसाठी गोध्रा हत्याकांड म्हणून प्रसिद्ध आहे. या हत्याकांडात ५९ जण ठार झाले होते. मात्र, त्यानंतर उसळलेल्या दंगलीनंतर सुमारे १२०० जण ठार झालेत.

 



२७ फेब्रुवारी २००२ ला साबरमती एक्स्प्रेस गोध्राच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर सुमारे पाच तास उशिराने पोहचली होती. गाडीची नियोजित वेळ ही रात्री २ वाजून ५५ मिनिटांची होती. मात्र ही गाडी सकाळी सात वाजून ४३ मिनिटांनी प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर पोहचली आणि पाच मिनिटे थांबली होती.

 



अहमदाबादकडे जाणार्‍या साबरमती एक्स्प्रेसमध्ये त्या दिवशी मोठ्या संख्येने कारसेवक होते. अयोध्येत झालेल्या एका यज्ञ समारंभातून ते परतत होते. गाडी जेव्हा गोध्रा रेल्वे स्टेशनवर थांबली तेव्हा काही कारसेवकांचे स्टेशनवरील काही मुस्लिम विक्रेत्यांशी भांडण झाले. गाडी सुरू झाल्यावर भांडण थांबली, मात्र काही वेळातच आठ वाजेच्या सुमारास स्टेशन सोडल्यावर ए केबिनजवळ गाडी पुन्हा थांबली. गाडी सुरू झाल्यावर दोन वेळा चैन खेचण्यात आली. एकदा ७.५५ वाजता आणि दुसर्‍यांदा ७.५८ वाजता ही गाडी थांबविण्यात आली.

 



गोध्रा हत्याकांडाचे ग्राउंड झिरो हे ए केबिन हे सांगता येईल. या ठिकाणीच २७ फेब्रवारी २००२ ला साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ या डब्याला आग लावण्यात आली. या डब्यासमोर जमा झालेल्या जमावाने आग लावल्याचे निदर्शनास आले. या संदर्भात गुजरात पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीनंतर असे सांगण्यात आले की, गोध्रा रेल्वे स्टेशनवरील मुस्लिम विक्रेते आणि कारसेवकांमध्ये झालेल्या भांडणामुळे ही आग लावण्यात आली होती. तर गुजरात सीआयडी आणि एटीएसने आपल्या अहवालात आग लावण्याची घटना ही पूर्व नियोजित कट असल्याचे नमूद केले आहे.

 



भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अशा प्रकारे एखाद्या रेल्वे गाडीला लक्ष्य बनवून आग लावण्याचा हा पहिला प्रकार होता. यानंतर यावर राजकारण सुरू झाले. दुसरीकडे या संदर्भात पोलिसांसमोर या घटनेच्या दोषींना पकडण्याचे आव्हान होते. गोध्रा रेल्वे पोलिसचे तत्कालिन पोलिस अधीक्षकांमार्फत या घटनेची चौकशी सुरू करण्यात आली. परंतु दोन महिन्यानंतर या घटनेच्या चौकशीची जबाबदारी गुजरात सीआयडीच्या तत्कालिन महासंचालक राकेश अस्थाना यांच्याकडे सोपविण्यात आली. अस्थाना हे नुकतेच गुजरातमध्ये दाखल झाले होते. त्यांनी यापूर्वी लालू प्रसाद यादव यांच्याशी संबंधित असलेल्या चारा घोटाळा, कोलतार घोटाळा आणि उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीच्या प्रकरणांच चौकशी केली होती. अस्थाना यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली.

 



साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ या डब्यात लागलेली आग ही क्षणिक प्रतिक्रिया नसून हे जाणू-बुजून घडवून आणलेला हत्याकांड होता. या संदर्भात एसआयटीने जाबिर बिन यामिन बेहरा या स्थानिक चहा विक्रेत्याची सविस्तर चौकशी केली, तेव्हा त्याने हा कट असल्याचे कबुल केले.

 



बेहरा याने मॅजिस्ट्रेटसमोर पाच फेब्रुवारी २००३ नोंदविलेल्या जबाबानुसार कारसेवकांनी भरलेल्या एस-६ या डब्याला आग लावण्याचा कट गोध्रा रेल्वे स्टेशनच्या जवळच्या सिंगल फडिया या परिसरात राहणाऱ्या मौलाना हुसेन उमरजी याने रचला होता. या कामासाठी मौलाना याने आपल्या चार शिष्यांना सामिल केले होते. बिलाल हाजी, फारुक भाणा, रज्जाक कुरकुर आणि सलीम पानवाला असे यांची नावे आहेत. यातील रज्जाक कुरकुर याच्या मालकीच्या अमन गेस्ट हाऊसमध्ये २६ फेब्रुवारी २००२च्या रात्री चाळीस लिटर पेट्रोल जमा केले होते. या पेट्रोलच्या साहय्याने एस-६ हा डबा जाळ्यात आला. एसआयटीच्या चौकशीनुसार, एस-६ या डब्याला जाळण्यासाठी जे पेट्रोल वापरण्यात आले ते काळाभाई पेट्रोल पंपावरून आणण्यात आले होते. हा पेट्रोलपंप गोध्रापासून जवळच आहे. या पेट्रोल पंपावरून मोठ्या प्रमाणात पेट्रोल खरेदी करण्यात आले. या संदर्भातील साक्ष पेट्रोल पंपाच्या दोन कर्मचार्‍यांनी एसआयटीकडे दिली आहे.

 



साबरमती एक्स्प्रेसच्या एस-६ या डब्ब्यात कारसेवक मोठ्या प्रमाणात होते, ही माहिती मौलानाला पूर्वीच पुरवण्यात आली होती. हल्लेखोरांना हा हल्ला मुळात रात्री करायचा होता. तशी योजनाही बनविण्यात आली होती. साबरमती एक्स्प्रेस ही साधारण रात्री २.५५ वाजता ग्रोधा स्टेशनमध्ये येत आणि त्याच दरम्यान हा हल्ला करायचा होता. परंतु गाडीला उशीर झाल्याने रात्रीच्या अंधारात होणारा हा प्रकार दिवसाढवळ्या करणे हल्लेखोरांना भाग पडले.

 



या दंगल प्रकरणातून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकार्‍यांची अद्याप सुटका झालेली नाही. दंगलींदरम्यान मोदी सरकारनं जाणीवपूर्वक निष्क्रियता दाखवली असा आरोप आहे.

 



या संदर्भात कॉंग्रेस नेता व कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांनी बीजेपी चे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना नपुसंक म्हटले आहे. ते याचे समर्थन करतांना म्हणतात, मी मोदींचा डॉक्टर नाही. त्यामुळे त्यांची शारीरिक तपासणी मी केलेली नाही. त्यामुळे त्यांची शारीरिक स्थिती काय आहे, याबाबत मी बोललेलो नाही. तर 'नपुंसक' हा शब्द 'क्षमता' या अर्थाने राजकीय संदर्भात वापरला आहे. एखादी परिस्थिती हाताळण्यात असलेली अकार्यक्षमता, म्हणून हा शब्द वापरला असून तो योग्यच आहे,' असे आपल्या भूमिकेचे समर्थन खुर्शिद यांनी काल बुधवारी २६ फेब्रुवारीला केले. लोकांची हत्या करणा-यांना तुम्ही थांबवू शकला नाहीत, त्यामुळे तुम्ही नपुंसक आहात, असा आमचा आरोप आहे असे खुर्शीद मंगळवारी म्हणाले होते. सलमान खुर्शीद यांच्या मतानुसार सुप्रीम कोर्ट ने गुजरात दंगा प्रकरणी नरेन्द्र मोदी याना क्लीन चीट दिलेली नाही.

 



नोट- अश्या काळ्याकुट्ट इतिहासाची पुनरावृत्ती यापुढे नको हे या लेखातून सांगायचे आहे !!


 



लेख- Shriram Pawar सर. (लेखक वकील आहेत)
मित्रांनो, कालपासून आपण फैन्ड्री (fandry) या चित्रपटाबाबात चर्चा करीत आहोत...  नागराज मंजुळे सरांबद्दल थोड काही !!

सर्वप्रथम नागराज मंजुळे( #NagrajManjule ) सरांना फैन्ड्री( #fandry ) सारखा चित्रपट निर्मिती केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजपासून हा चित्रपट २७० स्क्रीन्स वर दाखविण्यात येणार आहे. भारतातील मोठ्या शहरांत तो आधीच प्रदर्शित झालेला आहे व येत्या २८ फेब्रुवारी पासून तो भारतातील अन्य १५ राज्यांमध्येही प्रदर्शित होणार आहे. संपूर्ण भारतात प्रदर्शित होणारा फैन्ड्री( #fandry ) हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. त्यामुळे नागराज मंजुळे( #NagrajManjule ) सरांचे अभिनंदन!! नागराज मंजुळे( #NagrajManjule ) सरांचे जीवनही तसेच प्रेरणादायी व खूप काही शिकण्यासारखे आहे. मराठी अभिनेता जितेंद्र जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा थोडक्यात सारांश इथे मांडतो.



नागराज मंजुळे( #NagrajManjule ) सरांचा जन्म 'वडार' समाजात झाला असल्यामुळे घरी भयंकर गरिबी. ते तिघे भावंड. घरी गरीबी असल्यामूळे व आजूबाजूच्या वातावरणामुळे नागराज लहानपणीच म्हणजेच पाचवीत असतानाच दारू प्यायला लागला. वडिलांना दारूची शिशी आणून देतानाच त्यातीलच थोडी घेऊन वडिलांना पाणी टाकून देणे हा त्याचा नित्य नियम झाला. पुढे तो एकटा पूर्ण शिशी संपवू लागला. अर्थातच त्याने सातवीत असताना दारू सोद्लीही. घरी अभ्यास कर म्हणून सांगितले तर स्वतःचेच नाव पुन्हा पुन्हा लिहून २-३ पान भरून दाखवायचे व घरून १०-२० रुपये घ्यायचे असाही त्याचा धंदा सुरु होता. मग काय? दहावी नापास! पुढे १२ वीपर्यंत शिक्षण झाल्यानंर पोलीस म्हणून त्याची नेमणूक झाली. घरी सर्वांना आनंद वाटला पण त्याने १३ दिवसांतच ती नोकरीही सोडली. मन रमत नाही म्हणून. नागराज सरांनी नेहमीच जे काम आवडते तेच केलय. त्यासाठी कशाचीही परवा केली नाही. पुढे बी. ए. पूर्ण करताना त्यांनी महात्मा फुलेंचे समग्र चरित्र वाचून काढले, आगरकर वाचले, बाबासाहेब आंबेडकर वाचले. यामुळे त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. ते म्हणतात जर मला हे नववी, दहावीलाच मिळाले असते तर खूप बरे झाले असते.




पुण्याला एका लेक्चर मित्राजवळ राहत असताना त्याने सरांना मास कम्युनिकेशन चा कोर्स करण्याचा सल्ला दिला. पुढे त्यांनी मास कम्युनिकेशन मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे ठरविले. तिथे शिक्षण घेत असताना रूम पार्टनरही तोच, लेक्चरही तोच आणि एच.ओ.डी. ही तोच! हि पदवी मिळवत असतानाच त्यांनी प्रोजेक्ट म्हणून 'पिस्तुल्या' ची निर्मिती केली. पिस्तुल्याला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले व सरांचा प्रवास सुरु झाला. आज फैन्ड्री( #fandry  ला अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. पिस्तुल्या पासूनच सरांनी फक्त वास्तव बाहेर आणण्याचे ठरविले.





काही वर्ष हिंदी चित्रपटांत काम केल्यावरही त्यापेक्षा एकदम वेगळा असा फैन्ड्री( #fandry ) का तयार केला? असा प्रश्न विचारल्यानंतर सरांनी दिलेलं उत्तर खूपच अर्थपूर्ण आहे. सर म्हणतात, "मी हिंदी चित्रपटांतून काय करावे? यापेक्षा काय करू नये? हे शिकलो." पिस्तुल्या मध्ये काम केलेला व फैन्ड्री मध्ये पिर्याची भूमिका केलेला छोटा मुलगा सुरज पवार अनाथ आहे. त्याचा संभाळही सरच करतात. तो खेड्यातील पार्श्वभूमीतून आल्यामुळे त्याचे शहरातील वातावरनात जुळवून घेण्यासाठी सर त्याचे विशेष वर्ग घेतात. फैन्ड्री मध्येही जब्याच्या भूमिकेसाठी खेद्यातीलच मुलगा निवडला. तो काम करायला तयार नव्हता. सरांना पाहिल्याबरोबर पाण्याच्या टाकीवर जाऊन लपून बसायचा पण सरांनी त्याच्याकडूनही योग्य अभिनय करून घेतला. सरांचा एक भाऊ पोलीस व एक घरकाम करतो. फैन्ड्रीतील जब्याचे घरही सरांच्या भावानेच तयार केले आहे. एव्हडे सगळे त्याच्यावर अवलंबून असताना सरांना यांच्या भविष्याबद्दल प्रश्न विचारला असता सर म्हणतात, "माझ्यावर कोणीही अवलंबून राहू नये. मी पुढे काय करणार आहे हे मलाच माहित नाही. मला जे चांगले वाटते तेच मी करेन. सर्वांनी चांगल शिक्षण घ्यावं व एक चांगली व्यक्ती बनावे." त्यांचा हाच स्पष्टपणा सिनेमा मध्येही स्पष्टपणे दिसतो. ते कोणासाठीही सिनेमा तयार करत नाहीत. ते फक्त वास्तव दाखविण्यासाठीच करतात. मग ते कोणाला आवडो अथवा न आवडो. सरांच्या मते आपला एखाद्या गोष्टीवर विश्वास पाहिजे व त्यासाठी काहीही करण्याची तयारी. त्यांच्या मते जीवनात सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट 'आत्मविश्वास' होय. सर अभिनयही सुंदर करता. छोट्याश्या भूमिकेतून त्यांच्यातला कसलेला अभिनेता फैन्ड्रीमध्ये दिसला. सरांवर बुद्ध विचारांचा, संताचा पगडा आहे.




सर म्हणतात फैन्ड्री हि माझी कहाणी आहे. फैन्ड्री( #fandry ) चे लेखकही तेच आहेत. त्यांनाही पाचवीला असताना उच्च वर्णीय मुलीवर प्रेम झाल होत व सातवीला असताना एक चापट पडली नी ते संपल! फैन्ड्री( #fandry) मध्ये अतिशय उत्तमरीत्या त्यांनी हे दाखवलंय. पुढेही सरांकडून अशाच सत्य कथांवर आधारित दर्जेदार चित्रपटांची अपेक्षा आहे. आता इतर सिनेमे पाहायला सुद्धा मन करत नाहीये.. नागराज सर आम्ही वाट पाहतोय तुमच्या पुढच्या कलाकृतीची..




नागराज सर चित्रपट सृष्टीतील पहिले दिग्दर्शक जे मागासवर्गीय आहेत. पण चित्रपट सृष्टीतील सर्व दिग्दर्शक एका बाजूला व नागराज सरांना दुसर्या बाजूला ठेवले तरी सरांचेच पारडे जड असेल.. नागराज पोपोटराव मंजुळे सरांना पुढील भवितव्यासाठी या पेज कडून खूप खूप सदिच्छा..





लेख - Atubh Bhaware.

फँड्री.. शालू आणि जब्याची जातीयवादी अनोखी प्रेमकहाणी !!

फँड्री.. शालू आणि जब्याची जातीयवादी अनोखी प्रेमकहाणी !!



मी सहसा चित्रपट पहात नाही. पण फँड्री पाहू पाहू असं करत करत शेवटी डॉ. नानासाहेब प्रधान यांच्या आग्रहामुळे त्यांच्या सहवासात ''फँड्री'' पहाण्याचा योग आला. चित्रपटातील अनेक प्रसंग त्यांच्या बरोबरच्या चर्चेतून समजले.



 



कलाकृती अप्रतिम आहे. कथा, पटकथा, छायाचित्रण, दिग्दर्शन, कलाकार सर्वच भट्टी इतकी छान जमली आहे की एक मी चित्रपट पहात नाही तर जिवंत अनुभव पहात आहे, अनुभवत आहे असा भास झाला.

 



भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत. आपल्या देशवासीयांबद्दलची समानतेची भावना सांगणार्यात या आपल्या प्रतिज्ञेच्या ओळी… भारतीय राजघटनेच्या प्रास्ताविकेत स्वातंत्र्य, समता, बंधुता यावर विशेष भर देण्यात आला आहे. तर घटनेच्या कलम १४ ते १८ मध्ये समतेचा अधिकार आणि कलम १७ मध्ये अस्पृश्यता निवारणाच्या मुद्याचा समावेश आहे. पण ही घटना आणि त्यातील कलम हे पूर्णपणे लागू झाले आहेत काय ? ही घटना भारतीय नागरिकांसाठी आहे. पण समाजात आज किती तरी लोक असे आहेत ज्यांना आपण ‘भारतीय’ आहोत म्हणजे काय आहोत हे देखील माहिती नाही. कित्येकांना तर अन्न, वस्त्र, निवार्या सोबतच ‘माणूस’ म्हणून जगण्याचा अधिकारच नाकारला गेला आहे. समाजातील अशा वर्गाबद्दल अतिशय प्रभावीपणे भाष्य करण्याचं काम ‘फँड्री’ या चित्रपटाने केलं आहे. ‘फँड्री’ ही वरकरणी प्रेमकथा वाटत असली तरी या कथेचा गाभा मात्र खूप खोलवर आहे. कारण प्रेमकथेच्या पलीकडे जाऊन ती इथल्या समाज आणि जातीव्यवस्थेवर प्रखरपणे भाष्य करते? ‘नावात काय आहे?’ असं शेक्सपिअर म्हणतो. पण नावात काही नसलं तरी आडनावात खूप काही आहे हे भारतीय समाजव्यवस्था बघितल्यानंतर लक्षात येतं. आडनावावरून ‘त्या मागची जात’ शोधण्याचा प्रयत्न होतो आणि त्यावरून इतर सामाजिक संदर्भ जोडले जातात. त्यामुळे गोखलेच्या मुलाने कुलकर्णींच्या मुलीवर प्रेम केलं तर ते वावगं ठरत नाही. पण गोखलेंचा मुलगा कांबळे, माने आडनाव असणार्या मुलीच्या प्रेमात पडतो त्यावेळी अनेकांच्या भुवया उंचावतात हे वास्तव आजही समाजात कायम आहे. याच वास्तवावर अचूकपणे बोट ठेवण्याचं काम ‘फँड्री’ करतो. प्रेमासारख्या निर्मळ भावनेलाही जेव्हा जातिव्यवस्थेचं कोंदण लागतं, तेव्हा होणारी वेदना आणि त्याच्यातून निर्माण होणारा विद्रोह या दोन्ही गोष्टी चित्रपटात जब्या या पात्राच्या माध्यमातून उत्तम पद्धतीने पडद्यावर उतरवल्या आहेत.

 



चित्रपटाची कथा साधी आहे. पण ती प्रचंड अस्वस्थ करून सोडणारी वाटली. कचरू माने आणि कुटुंबीय असेच गरिबीचे चटके सहन करणारे, त्या दाहक अनुभवातून जाणारे आहे. कचरू स्वतः, त्याची बायको , दोन मुली पैकी एक विवाहित पण सासरी न नांदता परत माहेरी आलेली, दुसरी लग्नाळू अन् एक मुलगा १४-१५ वर्षाचा जांबुवंतराव, पण सर्वजण त्याला 'जब्या' हाक मारतात, असे पाच जणांचे कुटुंब ! … जब्याला शिक्षणाची विलक्षण ओढ आहे, शाळेत जायला त्याला फार आवडते, त्याचे अक्षर अतिशय सुंदर आहे. घरात नांदणारं अठराविश्व दारिद्र्य, घरात कुणालाच शिक्षणाचा गंधही नसताना जब्या मात्र शिक्षणाची आवड मनापासून जोपासतोय. ज्या दिवशी कामाला गेल्यामुळे शाळेत जाऊ शकला नाही त्या दिवसाचा होमवर्क जब्या दुसर्यााला विचारतो व चिमणीच्या उजेडात अभ्यास पूर्ण करतो. शिकून सवरून त्याला मोठं माणूस व्हायचंय. त्यामुळे परंपरेने आलेल्या किंवा लादलेल्या संस्कृतीला, गावगड्याच्या कामाला तो नकार देतो. पण नियती त्याच्यावर सूड उगवते. शिकणे हा जसा हेतू आहे तसेच वर्गातील शालू नावाची उच्च जातीची असलेली मुलगी त्याला मनापासून आवडलेली ! तिच्यावर त्याचे एकतर्फी प्रेम ! तिच्यासाठी काहिही करायची त्याची तयारी एवढी कि, जीव सुध्दा द्यायची. तिचे त्याच्यावर प्रेम आहे की नाही याचा त्याला अंदाजही घेता येत नाही. पण तिच्या ओढीने तो तिला मिळविण्यासाठी एकीव गोष्टींवर आधारीत म्हणजे काळी चिमणी मारून तिची राख जर शालूच्या डोक्यावर टाकली तर ती त्याच्यावर वश होईल. यासाठी तो जिवाचा आटापिटा करतो. जब्याचा मित्र त्याला या कामी प्रोत्साहन देत असतो. घरची गरीबी, त्यामुळे शिकतांना काम करावं लागणं. त्यामध्येच मनात उमटणारे तरंग...त्यामध्ये वडिलांना हातभार लावण्यापेक्षा शिक्षणाने आपल्या जगण्याला दिशा मिळेल... अन् अर्थात प्रेमाला...त्या सगळ्यामध्ये जगण्याचा अन् स्वप्नांचा संघर्ष दाखवण्याचा स्ट्रोक वेगळा असला तरी तो एकजीव वाटतो. कारण घरच्या परिस्थितीशी झगडणारा...एका मुलीचा उद्धवस्त झालेला संसार... दुसरी मुलीचं लग्न अन् त्यासाठी हुंडा... अन् मुलाला मात्र जीन्स हवीय... या स्ट्रगलमध्ये गुरफटलेला प्रेमाचा सिक्वेन्स... त्यात ती मुलगी शालू ही उच्चवर्णीय.

 



बापाला मात्र त्याने जेव्हा जेव्हा काम मिळेल तेव्हा मदत करावी असे वाटते अन् ते स्वाभाविकही आहे. चार हात काम करायला लागले तर तेवढा ताण कमी होईल हा हेतू. तो पूर्णपणे निरक्षर. एका प्रसंगात तो जब्याचे दफ्तर, वह्या, पुस्तके उचलतो. जब्याने शालूला लिहिलेले, पण न दिलेले प्रेमपत्र (चिठ्ठी) असते ! जब्या शालूला लिहिलेल्या पत्रात खाली स्वतःचा उल्लेख 'जांबुवंतराव' म्हणून करतो. कोणीतरी आपल्याला मान द्यावा, हे मनापासून त्याला वाटते. पण बापाला कोठे वाचता येतयं? तो जब्याला दप्तर नीट ठेवायला सांगतो. कचरूच्या चेहर्याेवरील भाव पाहून आपल्यालाच अपराधी वाटत. निरक्षरतेची समस्या आजही आपल्याला भेडसावतेय !

 



या कैकाडी कुटुंबाची मातृभाषा वेगळीच आहे. ती फक्त कचरू व त्याची बायको बोलू शकतात. मुलांना ती भाषा बोलायची लाज वाटते. माझी मातृभाषा अहिराणी आहे पण मला ती बोलायची संधी मिळत नाही. हळूहळू अनेक बोलीभाषा अशाच मृत होताहेत याचे हे एक सबळ कारण आहे. आपल्या देशात आज अशा किती तरी भटक्या विमुक्त जाती-जमाती आहेत. ज्यांची एक वेगळी बोलीभाषा आहे. त्या भाषेला लिपी नसली तरी ती भाषा अस्तित्वात आहे. एक मोठा वर्ग ती भाषा बोलतो. पण त्यांच्या भाषिक, सामाजिक प्रश्नांची चर्चा इथे होताना कधीच दिसत नाही. एरव्ही मराठी भाषेच्या अस्मितेचं राजकारण करणार्या नेत्यांना महाराष्ट्रातील या नागरिकांच्या प्रश्नाचं, त्यांच्या भाषेचं भानही असल्याचं जाणवत नाही. अनेकांच्या लेखी तर त्यांचं अस्तित्वही नाही.

 



चित्रपटाचे कलाकार अभिनय करतात असे कुठेच वाटत नाही. कृत्रिमतेचा कोठे लवलेशही नाही. सर्वच स्वाभाविक. सर्व कलाकार भूमिका करत नसून ती भूमिका स्वत: जगत असल्याचा फिल म्हणजे जबरदस्तच. जब्याच्या बाबतीतही हेच खरे ! या चित्रपटातील सर्वच कलाकारांचे कौतुक करावे. चित्रपट अतिशय वास्तववादी वाटतो. प्रत्येकाने आपापली भूमिका चोख पार पाडली आहे. कोणत्याही गाण्याशिवाय, ग्लॅमरस घटकांशिवाय केलेला हा सिनेमा मनाला भावून जातो. सगळ्याच बाबतीत सिनेमा सरस झाल्यानं थेट भिडतो.

 



जातीव्यवस्थेमधील दाहक वास्तव मांडणारा हा चित्रपट आहे. कुणाच्याही भावनांना धक्का न लावता,त्या न भडकवता, अत्यंत अभ्यासपूर्ण व सहजतेनं यात भाष्य केलं आहे.

 



सिनेमा म्हणून पाहिलं तर फँड्रीमध्ये एकतर्फी लव्हस्टोरी आहे, चिमणीचा सस्पेन्स आहे. कधी उडणार्याल काळया चिमणीच्या स्वरूपात तर कधी रॉकेलचा धूर सोडणार्याा चिमणीच्या स्वरूपात. बाप-मुलाचा संघर्ष आहे, पाठलाग आहे. याशिवायही अनेक बारीक बारीक गोष्टी आहेत ज्यामध्ये खूप मोठा अर्थ लपलेला आहे. गावातल्या कोणत्याही जमातीत अगदी उघडपणे होणारा हुंड्याचा व्यवहार आहे, गावातल्या रिकामटेकड्या जगण्यात हातातल्या मोबाईलमध्ये फेसबुक आहे. हाताला काम नसलं तरी डोक्यात आयपीएलची नशा आहे, अशा अनेक गोष्टी चित्रपटात अगदी सूचकपणे सतत पेरलेल्या आहेत. या गोष्टी सहजपणे सिनेमात येत राहतात आणि त्याच सहजतेने मुख्य कलाकारांचं जगणं, त्यांची सुख-दु:खं, त्यांचं हतबल होणं पडद्यावर दिसत राहतं, त्यांच्या वेदनेशी आपणही अगदी लगेच एकरुप होऊन जातो.

 



'तुझा झगा गं झगा गं ' करत जिवलग दोस्ताला गाण्यात गुंफणारा लोभस जब्या आणि पिर्यादची दोस्ती मस्त. पिर्याी पाठोपाठ चंक्या अफलातून. तो कलंदर चंक्या मोहवून टाकतो. 'तुझा विश्वास आहे ना, मग होईल' भिडलंच. त्याचं आणि जब्याचं नातं केवळ देखणं आहे.

 



फँड्री गोष्ट आहे एका सामाजिक विषमतेची ज्यात आपला समाज अजूनही गुरफटला आहे आणि त्यातून बाहेर येणार्याटला परत परत कसं त्यातच ढकललं जातं याची.

 



स्वतःला फुले, शाहू, आंबेडकरांचे आणि पुरोगामी विचारसरणीचे वारसदार म्हणवून घेणार्या समाजाच्या पुरोगामीपणाचा बुरखा ‘फँड्री’ फाडतो.पुरोगामीपण हे केवळ विचारांतून नाही तर जगण्यातून आलं पाहिजे हा संदेशही या चित्रपटाच्या माध्यमातून देण्यात आलाय. विचारात आलेलं पुढारलेपण आपल्या कृतीत आहे का असा प्रश्न ‘फँड्री’ आपल्या मनात निर्माण करतो.

 



जब्या हा अकोळनेर या एका लहानशा गावातील एका मागास जातीतील अत्यंत गरीब कुटुंबामधला पंधरा सोळा वर्षाचा मुलगा, ज्याला त्याच्याच शाळेमधील शालू ही एका पाटील या वरच्या जातीतील आणि श्रीमंत घरातील मुलगी आवडते. वरकरणी ह्या एका ओळीत संपणार्याी कथेत दिग्दर्शकाने खूप सार्याा बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. जब्या अशा एका जमातीमधे जन्माला आला आहे की ज्यांना गावातील ‘फँड्री’ म्हणजेच डुक्करे पकडण्यासारखे खालचे काम करावे लागते जे त्याला स्वतःला मान्य नाही. जब्याचे वडील कचरू माने हा एक उतारवयाकडे झुकणारा गरीब माणूस, ज्याला आपल्या मुलाला शाळा सोडून काम करायला लावणं आणि तसच पारंपारिक डुक्करे पकडण्यासाठी त्याच्या इच्छेविरुद्ध ओढणं आणि मग यातूनच जब्याचा त्याच्या वडिलांबरोबर आणि समाजसंस्थेविरुद्धचा संघर्ष म्हणजेच फँड्री !

 



जब्याची तरल प्रेमकहाणी उभी करत असतानाच त्याचं एका गरीब कुटुंबात जन्माला आल्याने त्याची होणारी ससेहोलपट, ऐन शिकण्यासवरण्याच्या काळात वडिलांसोबात कष्ट करून कुटुंबाला करावी लागणारी मेहनत, हलक्या प्रतीची कामे शाळेतल्या मुलांसमोर आणि तसेच आपल्या आवडत्या मुलीसमोर करायला लागू नयेत म्हणून करायला लागणारी धडपड अशी बरीचशी अंगे समोर आणण्यात चित्रपट यशस्वी झालाय. जब्याची कौटुंबिक आणि सामाजिक फरफट बर्याुचदा काळीज चिरून जाते. साध्या साध्या आणि दैनंदिन गोष्टीत दाखवून दिला जाणारा जातीय कमीपणा आपल्यातल्या ‘मनाला’ला सुद्धा विचार करायला लावतो. जब्याचं जाणतं अजाणतं वय, मग त्यातून त्याचा समाजव्यवस्थेविरुद्ध होणारा नकळत विरोध, पण तोच समाज त्या विरोधाला झुगारून त्याला परत परत त्यातच ढकलणार्या् या समाजाबद्दल राग आल्यावाचून राहत नाही. ही सामाजिक तेढ दाखवण्यात जेवढा हा चित्रपट यशस्वी झालाय तेवढाच यशस्वी तो एका लहानश्या खेड्यातलं दैनंदिन जीवन दाखवण्यात सुद्धा तितकाच यशस्वी झालाय. गावातली समाजव्यवस्था, राहणीमान, बोली या गोष्टी तर उत्तम साधल्या आहेतच परंतु गावात आजकाल शौचालय नसून इंटरनेट कनेक्शन वाले मोबाईल फोन, फेसबुक, आयपीएल सारख्या लेटेस्ट गोष्टींचं आकर्षण दाखवून दिलं आहे.

 



चित्रपटाच्या नावावरून या चित्रपटात काय असेल याचा बोध होत नाही. मध्यतंरापर्यंत फँड्री’ म्हणजे काळी चिमणी वाटते. मात्र ‘फँड्री’ म्हणजे काय हे समजायला चित्रपटाच शेवट गाठायला लागतो. फँड्री हा कैकाडी भाषेतला शब्द आहे. तर फँड्री’ म्हणजे डुक्कर [pig]. गावात उकीरडयावर वावरणारं डुक्कर म्हणजे फँड्री. माझ्यामते फँड्री म्हणजे सामाजिक विषमतेतून बाहेर पडण्याची धडपड.

 



समाजातील जातीव्यवस्था आज ठळकपणे दिसत नसली, तरीही कुणाच्याच मनातून जात कधी जात नाही. हेच खरं ! मग ते सरकारी दरबारी का असेना आयु. विजय कांबळे यांच्या उदाहरणा सारखं !

 



डुक्कर पकडण्याचं काम करण्यासाठी गावच्या पाटलाने सांगितल्यावर नकार देणार्या जब्याला नियती ते डुक्कर पकडण्याच्या कामासाठी कशी जुंपते. या अवघड वळणाची ही गोष्ट चित्रपटात अतिशय रंजक पद्धतीने मांडली आहे. त्यामध्ये येणारी जत्रा, लग्नाची बोलणी, फँड्री हा एक वेगळा अनुभव आहे. आपल्याला एका वेगळ्या अनुभवविश्वाशी जोडणारा तो दुवा आहे. हा सिनेमा आपल्यातल्या श्वापदाच्या उन्मत्त होण्यावर... त्याच्या उन्मादाला आवर घालण्यावर... वृत्तींवर प्रवृत्तीवर... मुखवटे घातलेल्या चेहर्यां वर... त्यांच्या मानसिकतेवर... जगण्यावर... अस्तित्त्वावर... अन् माणूस म्हणून जगू पाहणार्या् निरागस आयुष्यांच्या भावविश्वावर उजेड टाकतो.. त्या पोळलेपणात आपण होरपळतो...पण त्या मधल्या निरागस भावनेच्या निखार्याावरची फुंकर...मारताना जरा जपून ती राख तुमच्या डोळ्यात जाण्याची... त्यामुळे डोळ्याच्या कडा पाणवण्याची शक्यता अधिक आहे.

 



सिनेमाचा शेवटचा सीन ज्याला आपण घेऊन बाहेर पडतो… जब्याने शेवटचा मारलेला दगड पार डोक्यात घुसतो. एकंदरीत फँड्री वेगळ्या धाटणीचा, सामाजिक संस्थेवर बोट ठेवणारा आणि तितकंच प्रभावीपणे विचार करायला लावणारा सिनेमा आहे. चित्रपटातले सर्वात उत्तम आणि आणि प्रभावी सीन म्हणजे जब्या आणि त्याची बहीण पकडलेले डुक्कर खांद्यावर घेऊन जात असताना बॅकग्राउंडला असणारी जब्या शिकत असलेल्या शाळेच्या भिंतीवर काढलेली राजश्री शाहू महाराज, क्रांतीबा फुले, सावित्रीमाई फुले, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची चित्रे. या महामानवांच्या सामाजिक चळवळी कशा आपण धुळीत मिळवल्यात याची करून देणारी जाणीव काळीजाच्या चिंध्या चिंध्या करून टाकते.

 


चित्रपट समीक्षण- श्रीराम पवार सर.

गुजरात दंगलीचे ‘पोस्टर बॉय’ एकत्र... गुजरात दंगलीतले दोन विरोधी चेहरे 'हिंदू-मुस्लिम' एकतेसाठी एकत्र येतात तेव्हा..

गुजरात दंगलीचे ‘पोस्टर बॉय’ एकत्र... गुजरात दंगलीतले दोन विरोधी चेहरे 'हिंदू-मुस्लिम' एकतेसाठी एकत्र येतात तेव्हा..



 




केरळमधील कान्नुर जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम परिसंवादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परिसंवादात दोन व्यक्ती कार्यक्रमाच्या प्रमुख स्थानी होत्या. दोन्ही व्यक्ती एकमेकांशी हसत छान गप्पा मारत होत्या.. एका घटनेतील छायाचित्रांमुळे या दोन्ही व्यक्ती माध्यमांमध्ये प्रकाशझोतात आल्या होत्या. ही छायाचित्रे होती २००२ साली झालेल्या गुजरात दंगलीची. छायाचित्रातील एक चेहरा दंगलीतील पीडिताचा आहे. रक्ताचे शिंतोडे शर्टावर उडालेले, डोळ्यांत अश्रू आणि हात जोडून दयेची विनवणी, तर दुसऱया बाजूला डोक्यावर भगवी पट्टी, चेहऱयावर राग-रोष आणि हातात लोखंडी सळी, मागे जाळपोळ..




 



दयेची विनवणी करताना दिसणारा व्यक्ती एक टेलर आहे. नाव- क्युताबुद्दीन अन्सारी, गुजरात दंगलीचा साक्षीदार आणि दुसरा दंगलीत सहभाग घेणारा अशोक मोची. हे दोघेही गुजरात दंगलीतील विरोधी चेहरे एकत्र आले होते 'हिंदू-मुस्लिम' एकतेसाठी. आज हे दोघेही आपआपले व्ययक्तीक जीवन जगत असले, तरी हिंदू-मुस्लिम एकता देशात अबाधीत राहावी या विचाराने दोघेही या परिसंवादात एकत्र आले होते. अशोक मोचीने या परिसंवादात झालेल्या चुकांची अन्सारी आणि संपूर्ण मुस्लिम समाजाची माफी मागितली. तसेच झालेला प्रकार आयुष्यातील वाईट घटनेप्रमाणे असल्याचेही त्याने म्हटले. दोघांनीही गुजरात दंगलीतील घटनांना उजाळा देऊन दंगलीचे आणि त्यानंतर निर्माण होणाऱया अडचणींचे भयाण रूप मांडले. देशातील एकतेमध्येच सर्वांचे भले आहे आणि यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवेत असेही दोघे म्हणाले.



 


संदर्भ- http://www.loksatta.com/desh-videsh-news/attacker-victim-2-faces-of-gujarat-riots-come-together-for-hindu-muslim-unity-392500/?SocialMedia

 



धन्यवाद- Loksattha.
 



-----------------------------------------------------

साल 2002 के गुजरात दंगों के दौरान दो ऐसे चेहरे उभरे जिन्हें इन दंगों का प्रतिनिधि चेहरा माना गया !!



साल 2002 के गुजरात दंगों के दौरान दो ऐसे चेहरे उभरे जिन्हें इन दंगों का प्रतिनिधि चेहरा माना गया। दुनिया भर मैं असंख्य बार ये दोनों चेहरे छप चुके हैं। एक है दाहिने हाथ में तलवार लिए और बाएं हाथ की मुट्ठी बांधे अशोक मोची का चेहरा, जो दंगाइयों की पहचान बन गया। दूसरा है हाथ जोड़े जान बचाने की गुहार लगाता कुतुबुद्दीन अंसारी का चेहरा, जो दंगा पीड़ितों की बेचारगी की पहचान बनकर उभरा। तीसरी तस्वीर पिछले दिनों तब सामने आई जब केरल के कन्नूर में एक कार्यक्रम के दौरान ये दोनों मंच पर एक-दूसरे से मिले। अवसर था अंसारी पर लिखी एक किताब के विमोचन का। दंगों में अपनी भूमिका के लिए जेल काट चुके बजरंग दल के पूर्व कार्यकर्ता अशोक ने कहा, 'मुझे इस बात का अहसास काफी देर से हुआ कि मैं लुटेरों के हाथ का औजार था। जो कुछ हुआ उसका मुझे अफसोस है।'

 




39 साल के अशोक गुजरात में हुए कथित विकास पर कहते हैं, 'कैसा विकास? मैं आज भी फुटपाथ पर ही हूं। अकेला ही रहता हूं क्योंकि शादी की तो परिवार को कैसे पालूंगा?' इतना ही नहीं, अशोक ने दंगों में अपनी भूमिका के लिए अंसारी से खास तौर पर माफी मांगी। हालांकि अंसारी के लिए यह पहला मौका नहीं था कि किसी हिंदू ने दंगों के लिए उनसे माफी मांगी हो, मगर फिर भी अशोक का माफी मांगना खास मायने रखता है। उन्होंने अशोक को भाई बताते हुए कहा, मुझे मालूम है कि दंगे अशोक ने नहीं करवाए थे, उसे तो लोगों ने इस्तेमाल किया था। खुशी की बात है कि अब वह बदल चुका है। अंसारी के साथ दंगों में चाहे जैसा भी सलूक किया गया हो, मोदी सरकार से उन्हें भी जिंदगी सुधारने का ऑफर जरूर मिला था। यह अलग बात है कि उन्होंने इस ऑफर को ठुकराने में एक पल की भी देर नहीं की। ऑफर यह था कि उन्हें जुहापुरा में फ्लैट दिया जाएगा और ढेर सारे पैसे भी मिलेंगे, बस एक विज्ञापन में वे कैमरे के सामने यह एक वाक्य बोल दें कि 'अभी गुजरात में अमन है'। अंसारी ने इनकार कर दिया क्योंकि उनके मुताबिक 'पैसों से ज्यादा अहम है इंसानियत।' उन्होंने कहा कि मेरे लिए अशोक मोची, नरेंद्र मोदी से कहीं बेहतर है क्योंकि उसने सबके सामने मुसलमानों से माफी मांग ली।

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...