मित्रांनो, कालपासून आपण फैन्ड्री (fandry) या चित्रपटाबाबात चर्चा करीत आहोत... नागराज मंजुळे सरांबद्दल थोड काही !!
सर्वप्रथम नागराज मंजुळे( #NagrajManjule ) सरांना फैन्ड्री( #fandry ) सारखा चित्रपट निर्मिती केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आजपासून हा चित्रपट २७० स्क्रीन्स वर दाखविण्यात येणार आहे. भारतातील मोठ्या शहरांत तो आधीच प्रदर्शित झालेला आहे व येत्या २८ फेब्रुवारी पासून तो भारतातील अन्य १५ राज्यांमध्येही प्रदर्शित होणार आहे. संपूर्ण भारतात प्रदर्शित होणारा फैन्ड्री( #fandry ) हा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे. त्यामुळे नागराज मंजुळे( #NagrajManjule ) सरांचे अभिनंदन!! नागराज मंजुळे( #NagrajManjule ) सरांचे जीवनही तसेच प्रेरणादायी व खूप काही शिकण्यासारखे आहे. मराठी अभिनेता जितेंद्र जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा थोडक्यात सारांश इथे मांडतो.
नागराज मंजुळे( #NagrajManjule ) सरांचा जन्म 'वडार' समाजात झाला असल्यामुळे घरी भयंकर गरिबी. ते तिघे भावंड. घरी गरीबी असल्यामूळे व आजूबाजूच्या वातावरणामुळे नागराज लहानपणीच म्हणजेच पाचवीत असतानाच दारू प्यायला लागला. वडिलांना दारूची शिशी आणून देतानाच त्यातीलच थोडी घेऊन वडिलांना पाणी टाकून देणे हा त्याचा नित्य नियम झाला. पुढे तो एकटा पूर्ण शिशी संपवू लागला. अर्थातच त्याने सातवीत असताना दारू सोद्लीही. घरी अभ्यास कर म्हणून सांगितले तर स्वतःचेच नाव पुन्हा पुन्हा लिहून २-३ पान भरून दाखवायचे व घरून १०-२० रुपये घ्यायचे असाही त्याचा धंदा सुरु होता. मग काय? दहावी नापास! पुढे १२ वीपर्यंत शिक्षण झाल्यानंर पोलीस म्हणून त्याची नेमणूक झाली. घरी सर्वांना आनंद वाटला पण त्याने १३ दिवसांतच ती नोकरीही सोडली. मन रमत नाही म्हणून. नागराज सरांनी नेहमीच जे काम आवडते तेच केलय. त्यासाठी कशाचीही परवा केली नाही. पुढे बी. ए. पूर्ण करताना त्यांनी महात्मा फुलेंचे समग्र चरित्र वाचून काढले, आगरकर वाचले, बाबासाहेब आंबेडकर वाचले. यामुळे त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. ते म्हणतात जर मला हे नववी, दहावीलाच मिळाले असते तर खूप बरे झाले असते.
पुण्याला एका लेक्चर मित्राजवळ राहत असताना त्याने सरांना मास कम्युनिकेशन चा कोर्स करण्याचा सल्ला दिला. पुढे त्यांनी मास कम्युनिकेशन मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे ठरविले. तिथे शिक्षण घेत असताना रूम पार्टनरही तोच, लेक्चरही तोच आणि एच.ओ.डी. ही तोच! हि पदवी मिळवत असतानाच त्यांनी प्रोजेक्ट म्हणून 'पिस्तुल्या' ची निर्मिती केली. पिस्तुल्याला राष्ट्रीय पारितोषिक मिळाले व सरांचा प्रवास सुरु झाला. आज फैन्ड्री( #fandry ला अनेक राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. पिस्तुल्या पासूनच सरांनी फक्त वास्तव बाहेर आणण्याचे ठरविले.
काही वर्ष हिंदी चित्रपटांत काम केल्यावरही त्यापेक्षा एकदम वेगळा असा फैन्ड्री( #fandry ) का तयार केला? असा प्रश्न विचारल्यानंतर सरांनी दिलेलं उत्तर खूपच अर्थपूर्ण आहे. सर म्हणतात, "मी हिंदी चित्रपटांतून काय करावे? यापेक्षा काय करू नये? हे शिकलो." पिस्तुल्या मध्ये काम केलेला व फैन्ड्री मध्ये पिर्याची भूमिका केलेला छोटा मुलगा सुरज पवार अनाथ आहे. त्याचा संभाळही सरच करतात. तो खेड्यातील पार्श्वभूमीतून आल्यामुळे त्याचे शहरातील वातावरनात जुळवून घेण्यासाठी सर त्याचे विशेष वर्ग घेतात. फैन्ड्री मध्येही जब्याच्या भूमिकेसाठी खेद्यातीलच मुलगा निवडला. तो काम करायला तयार नव्हता. सरांना पाहिल्याबरोबर पाण्याच्या टाकीवर जाऊन लपून बसायचा पण सरांनी त्याच्याकडूनही योग्य अभिनय करून घेतला. सरांचा एक भाऊ पोलीस व एक घरकाम करतो. फैन्ड्रीतील जब्याचे घरही सरांच्या भावानेच तयार केले आहे. एव्हडे सगळे त्याच्यावर अवलंबून असताना सरांना यांच्या भविष्याबद्दल प्रश्न विचारला असता सर म्हणतात, "माझ्यावर कोणीही अवलंबून राहू नये. मी पुढे काय करणार आहे हे मलाच माहित नाही. मला जे चांगले वाटते तेच मी करेन. सर्वांनी चांगल शिक्षण घ्यावं व एक चांगली व्यक्ती बनावे." त्यांचा हाच स्पष्टपणा सिनेमा मध्येही स्पष्टपणे दिसतो. ते कोणासाठीही सिनेमा तयार करत नाहीत. ते फक्त वास्तव दाखविण्यासाठीच करतात. मग ते कोणाला आवडो अथवा न आवडो. सरांच्या मते आपला एखाद्या गोष्टीवर विश्वास पाहिजे व त्यासाठी काहीही करण्याची तयारी. त्यांच्या मते जीवनात सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट 'आत्मविश्वास' होय. सर अभिनयही सुंदर करता. छोट्याश्या भूमिकेतून त्यांच्यातला कसलेला अभिनेता फैन्ड्रीमध्ये दिसला. सरांवर बुद्ध विचारांचा, संताचा पगडा आहे.
सर म्हणतात फैन्ड्री हि माझी कहाणी आहे. फैन्ड्री( #fandry ) चे लेखकही तेच आहेत. त्यांनाही पाचवीला असताना उच्च वर्णीय मुलीवर प्रेम झाल होत व सातवीला असताना एक चापट पडली नी ते संपल! फैन्ड्री( #fandry) मध्ये अतिशय उत्तमरीत्या त्यांनी हे दाखवलंय. पुढेही सरांकडून अशाच सत्य कथांवर आधारित दर्जेदार चित्रपटांची अपेक्षा आहे. आता इतर सिनेमे पाहायला सुद्धा मन करत नाहीये.. नागराज सर आम्ही वाट पाहतोय तुमच्या पुढच्या कलाकृतीची..
नागराज सर चित्रपट सृष्टीतील पहिले दिग्दर्शक जे मागासवर्गीय आहेत. पण चित्रपट सृष्टीतील सर्व दिग्दर्शक एका बाजूला व नागराज सरांना दुसर्या बाजूला ठेवले तरी सरांचेच पारडे जड असेल.. नागराज पोपोटराव मंजुळे सरांना पुढील भवितव्यासाठी या पेज कडून खूप खूप सदिच्छा..
लेख - Atubh Bhaware.

No comments:
Post a Comment
धन्यवाद !!