काळ कधी, कोणासाठी थांबत नाही असं म्हणतात. अशीच काहीशी घटना रतन टाटांसोबत १९९९ मध्ये घडली. बोलावणं आल्याने रतन टाटा आपल्या चमूसह त्यावेळी अमेरिकेत डेट्रॉइटला गेले होते. मात्र अतिशय वाईट पद्धतीने अपमान झाल्याने त्यांना तिथून परतावे लागले. नंतर २००८ मध्ये म्हणजे नऊ वर्षींनी टाटांनी आपल्या अपमानाचा बदला घेतलाच.
हॅचबॅक इंडिका नावाने टाटा समूहाने १९९८ मध्ये आपली पहिली कार बाजारात आणली. पण त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कंपनीने हा कार उद्योग फोर्ड मोटर्सला विकण्याची तयारी सुरु केली. टाटा समूहाचे मुख्यालय असलेल्या बॉम्बे हाऊसमध्ये येऊन फोर्डच्या अधिकाऱ्यांनीही खरेदीत रुची दाखवली. आणि त्यानंतर डीलसाठी टाटा समूहाला अमेरिकेत डेट्रॉइटमध्ये बोलवण्यात आलं. त्यावेळी रतन टाटा आपल्या प्रमुख अधिकाऱ्यांसह १९९९ मध्ये डेट्रॉइटला गेले. 'तुम्हाला काही माहितीच नव्हती तर कार उद्योगात उतरलेच कशाला? तुमचा हा उद्योग आम्ही खरेदी करतोय याबद्दल तुम्ही आमचे उपकारच मानायला हवेत', असं त्या बैठकीत फोर्डकडून सुनावलं गेलं. त्या बैठकीत सहभागी असलेले टाटा समूहातील प्रमुख अधिकारी प्रवीण कडले हा सर्व घटनाक्रम सांगत होते. या अपमानामुळे टाटा मोटर्सच्या टीमने संध्याकाळी लगेचच मायदेशी रवाना होण्याचा निर्णय घेतला. परतीच्या प्रवासात रतन टाटा खूपच उदास दिसून आले, असं कडलेंनी सांगितलं.
१९९९ मध्ये झालेल्या अपमानाचा बदला अखेर नऊ वर्षांनी म्हणजे २००८ मध्ये टाटा समूहाने फोर्डला चुकता केला. प्रमुख ब्रॅण्ड असलेल्या जॅग्वार आणि लँड रोवरला खरेदी करत टाटा समूहाने फोर्डला सनसणीत चपराक दिली. 'जेएलआर' खरेदीकरुन टाटा समूहाने फोर्डवर खूप मोठे उपकार केले, असं 'जेएलआर' डीलनंतर फोर्डचे अध्यक्ष बिल बोर्ड यांना बोलावं लागलं. अशी माहिती कडलेंनी दिली. टाटा समूहाने २००८ मध्ये २.३ अब्ज डॉलरमध्ये 'जेएलआर'ला खरेदी केलं होतं. जागतिक पातळीवर 'जेएलआर' आता टाटांच्या नावाने धावतेय.
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!