सकाळपासून व्हेलन्ताइन विरोधासाठी भगतसिहाच्या फोटोचे पोस्टर फिरते आहे. भगतसिग आणि १४ फेब्रुवारी यांचा काहीही संबध नाही . भगतसींग आणि त्याच्या सहकारी क्रांतिकारकांना २३ मार्च १९३१ ला फाशी झाली. ७ ओक्टोबर १९३० ला हि फाशीची सजा सुनावली गेली होती . भगतसिग यांची दोनदा अटक ,सोंडर्स मर्डर केस , लाहोर खून खटला यातल्या एकाही महत्वपूर्ण घटनेशी १४ फेब्रुवारी या तारखेचा दुरान्वयेहि संबंध नाही . बरेच संशोधन केल्यावर असे आढळते . कि या केस मध्ये - फाशिविरुद्ध कोन्ग्रेस चे तत्कालीन अध्यक्ष पं मदन मोहन यांनी एक फाशी माफी अर्ज ब्रिटिश सरकारला पाठवला होता त्याची तारिख १४ फेब्रुवारी आहे . तो अर्ज पुढे बर्याच काळाने फ़ेटाळण्यात आला . त्यामुळे भगतसिंगांच्या चरित्रपटात १४ फेब्रुवारी हि तारीख अजिबात महत्वाची ठरत नाही . एका कोन्ग्रेस अध्यक्षाने भगतसिंगला पाठिबा देण्याचा तो स्मरणदिन आहे . प्रत्येकच तारखेला कोण्या न कोण्या हुतात्म्याचा मृत्यू / मृत्यू ची सरकारी ओर्डर निघालेली असते . ह्या न्यायाने मुलांचे वाढदिवस सुद्धा साजरे करणे अवघड होऊन बसेल …
व्हेलेण्टाइन डे विरोधकांनी चालवलेला हा खोटा प्रचार आहे. शर्ट पेंट फेसबुक कोम्प्युटर सगळे परदेशी चालते … पण प्रेम म्हटले कि कट्टर वाद्यांच्या पोटात पाश्चिमात्य गोळा उठतो !
भगतसिघांचे स्मरण धार्मिक आगंतुकांनि १४ फेब्रुवारीलाच काय ? तर रोजच केले पाहिजे . पण फुले उदबत्त्यांनि त्यांच्या फोटोची मूर्तीपूजा करून नव्हे । तर भगतसिंहाच्या क्रांतिकारी विचाराचे चिंतन करून ! धर्माला व्हेलनटैनपेक्षा अधिक धोका भगत सिहाच्या विचारांमुळे आहे हे संस्कृती रक्षकानि समजून घेतले पाहिजे. भगतसिंह लिहितात...
मी नास्तिक का झालो ? - सदार भगतसिंग
"माझ्या लक्षात एक गोष्ट आली की सर्व शक्तीमान परमात्माची कहाणी, विश्वनिर्मिती आणि विश्वाचं संचालन देव करतो ही गोष्ट एकदम बकवास आहे. माझ्या या विचारांना मी मांडू लागलो. माझ्या मित्रांशी याबाबत मी विचार विनिमय, चर्चा करू लागलो. मी नास्तिक म्हणून जाहीर झालो होतो… फाशी जाहीर झाली त्या दिवसापासून काही पोलीस अधिकारी मी नियमितपणे दोन वेळा देवाची प्रार्थना करावी म्हणून माझे मन वळवू लागले. मी तर नास्तिक होतो.
फक्त शांततेच्या काळातच नव्हे - तर कठीण प्रसंगीदेखील …. विचारान्ती मी निर्णय घेतला की देवावर विश्वास ठेवणे व त्याची प्रार्थना करणे हे माझ्याकडून होणार नाही. नाही, ते कधीही शक्य नाही. फाशीच्या आदल्या दिवशीही नाही !
ज्याक्षणी माझ्या मानेभोवती फास आवळला जाईल आणि पायाखालची फळी खेचली जाईल तो शेवटचा क्षण असेल. तोच अंतिम क्षण असेल. मी, किंवा अगदी काटेकोर आध्यात्मिक भाषेप्रमाणे बोलायचे झाले तर माझा आत्मा याचा तेथेच अंत होईल. बस्स इतकेच. जर असे मानायचे धैर्य मला असेल तर कोणतेही भव्यदिव्य यश न मिळालेले, एक संघर्षाचे, थोड्याच दिवसांचे जीवन हेच खुद्द माझे बक्षीस आहे. याहून जास्त काही नाही. स्वार्थी हेतू न बाळगता, तसेच इहलोकी किंवा परलोकी फळाची अपेक्षा न ठेवता, अगदी निरिच्छपणे मी माझे आयुष्य स्वातंत्राच्या ध्येयासाठी वाहिले, कारण त्याहून वेगळे काही करणे मला जमलेच नसते."
समाजाची सर्वांगीण प्रगती व्हावी, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, जन्म-पुनर्जन्म, ८४ लक्ष फेरे व त्यातून मुक्ती, मृत्यूनंतरचे जीवन, वगरे तर्कशुद्ध नसलेल्या गोष्टींवर अंधविश्वास न ठेवणारा कणखर समाज निर्माण व्हावा यासाठीच त्यांचा हा प्रयत्न होता. सदार भगतसिंग यांच्या नास्तिक विचाराचे स्मरण आपण करणार का ? कि इतरांच्या लैगिक - भावनिक आयुष्याचे हुकुमशाही नियंत्रण करण्यासाठी फक्त त्यांच्या फोटोची पूजा करणार ?
लेखक - डॉ . अभिराम दिक्षित Abhiram Dixit
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!