कॅलिफोर्नियाः हो, हे शक्य आहे. व्हॉट्सअॅप किंवा व्हॉट्सअॅपच्या सुविधा तुम्ही थर्डपार्टी अॅपच्या माध्यमातून अॅक्सेस करणार असाल, तर तुम्हाला अशापद्धतीने व्हॉट्सअॅप कदाचित कधीच वापरता येणार नाही. पण तुम्ही व्हॉट्सअॅपचे अधिकृत अॅप पुन्हा वापरायला सुरुवात कराल तरच तुम्हाला व्हॉट्सअॅप वापरता येईल, अन्यथा नाही.
सध्या WhatsApp+, WhatsApp Reborn, OgWhatsapp यासारख्या काही अॅप्सच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपचा वापर करता येतो. मात्र ही काही अधिकृत अॅप्स नाहीत. या अॅपचा वापर करणाऱ्या युजरला काही मेसेज मिळतच नाहीत किंवा याद्वारे जाहिराती पसरविल्या जातात किंवा अन्य मार्गाने युजरच्या डेटाचा गैरवापर होतो, अशा तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे जे युजर या अॅपवरून व्हॉट्सअॅप वापरत असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांना व्हॉट्सअॅपवरून हद्दपार करण्याची कारवाई कंपनीने सुरू केली आहे. जोपर्यंत हे युजर व्हॉट्सअॅपचे अधिकृत अॅप वगळता इतर अॅप वापरत राहतील, त्यांना व्हॉट्सअॅपच्या सुविधा मिळणार नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. या युजरला व्हॉट्सअॅपच्या सुविधा हव्या असतील, तर त्यांना व्हॉट्सअॅपच्या अधिकृत अॅपचा वापर पुन्हा सुरू करावा लागेल.
कॉलिंगच्या माध्यमातून व्हायरस
काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅपने कॉलिंगची सुविधा सुरू केली आहे. अर्थात ठराविक युजरनाच सध्या ती वापरता येते. मात्र व्हॉट्सअॅपची लोकप्रियता पाहता, इतर युजरनाही त्याचा वापर करायची इच्छा आहे. या युजरना गंडविण्यासाठी whatsappcalling.com आणि यासारख्या या वेबसाइटचे नाव असलेला मेसेज युजरपर्यंत पाठविला जात आहे. ही वेबसाइट ओपन करा आणि व्हॉट्सअॅप कॉलिंग सुरू करा, अशाप्रकारचा संदेश यासोबत पाठविण्यात येतो. व्हॉट्सअॅप कॉलिंग मोफत असल्याने व मेसेजमधील वेबसाइटचे नाव व्हॉट्सअॅपशी साधर्म्य दाखविणारे असल्याने अनेक युजर याला बळी पडत आहेत. या मेसेजमधील वेबसाइटच्या नावावर क्लिक केल्यास अनेक व्हायरस मोबाइलमध्ये आपोआप डाऊनलोड होत आहेत. त्यामुळे युझरची अनेक प्रकारची गोपनीय माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचते आहे. कुठल्याही आमिषाला बळी न पडता अधिकृतरित्या व्हॉट्सअॅप कॉलिंगची सुविधा मिळेपर्यंत वाट पाहणेच योग्य.
स्त्रोत : महाराष्ट्र टाईम्स
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!