दारुच्या नशेत जय भिम काय समजनार..???

दारुच्या नशेत जय भिम काय समजनार..???
 


मागे २ महिण्यापुर्वी माझ्या आईने तिच्या मुळ गाव अमरावती जिल्ह्यातील वरखेड (तुकडोजी महाराजांचे गाव) येथे ज्योतीबा फुले यांची पुर्णाक्रुती दान दिली.तिथल्या बौद्ध बांधवांची ईछा होती की माझ्या हातून त्याचे अनावरण व्हावे.

 


 मी वरखेडला गेलो. माझ बरचसं बालपण तिकडे गेल्यामुळे मला गावातले लोक ओळखतच होते. बालपणीचे मित्र जमा झालेत. म्हाताऱ्या बाया माणस यायचे आणि गाल ओढायचे.... किती मोठा झाला रे.. किती मोठा झाला रे म्हणून लाड ही करायचे.हे सर्व होत असताना माझा मुलगा मात्र माझ्याकडे पाहत होता. त्याला वाटत असेल.. 'लहान मी आहे ! की बाबा..!'

 


मुर्ती अनावरन होण्याच्या अगोदर आम्ही सर्व बसलो होतो.तेव्ढ्यात खुप दारु पिवुन एक माझ्यापेक्षा मोठा मुलगा तिथे आला.त्याचा जीव त्याला सांभाळता येत नव्हता.

 


तो - ' जय भिम '

 


मी - नमस्कार

 


तो - जय भिम राव

 


मी - नमस्कार ..राव !

 


(तो अजूनही सापासारखा डोलत होता)

 

थोडावेळ शांत राहून त्याने बाबासाहेब मला सांगण्याची सुरवात केली.. सर्वजन संवाद एकत होते.

 


तो - बाबासाहेब आंबेडकर असे... त्यांनी असे केले.. त्यांनी तसे केले.

 


मी - कोण आहे आंबेडकर .?

 


तो - राव तुम्ही आंबेडकराना नाही ओळखत.

 


मी - नाही राव ! कोण आहेत हे ? मी तर महादेवाचा भक्त आहे.

 


तो - तुम्ही बाबासाहेबाना नाही ओळखत... काय जमाना आहे ! आता चालतो मी. तुमच्याशी बोलुन काही अर्थ नाही. असे म्हणुन तो उठायला गेला आणि खाली पडला.. पुन्हा उठला आणि.. गर्दीत जावून उभा राहीला.

 


कार्यक्रमात माझे भाषण सुरु झाले... मी ' बाबासाहेबांचे उपकार आणि दलितांची परत फेड' हा विषय मांडला. भाषण भावनात्मक असल्यामुळे लोकांच्या डोळ्यातून पाणी आले. स्टेज वरुन उतरल्यावर मघानचा तोच तरुण माझ्याजवळ आला.. आणि रडायला लगला..

 


तो - साहेब.. मला माफ करा.. आजपासुन दारु कधीच पिणार नाही.

 



मी - दादा ! तुझा आंबेडकर हा कदाचीत दारुड्या असेल... माझा बाबासाहेब स्वाभिमान.. आहे हे समजन्यासाठी प्रद्न्या लागते.. म्हणुन तुम्ही मला दारु पिवुन जय भिम म्हटले तेव्हा मी तुम्हाला नमस्कार म्हटले होते... दारुच्या नशेत जय भिम काय समजनार..
कालच पुन्हा मी वरखेड या गावावरुन आलो.मला निरोप द्यायला आलेल्या त्या सर्व मानसात तो... तरुणही होता... माझ्या कारजवळ येवून तो म्हणाला ..

 



तो - दादा जय भिम ..

 


मी - दादा जय भिम ....( आता त्याने दारु कायमची सोडली आहे.)

 



मित्रानो ही पोस्ट नसुन एक संदेश आहे. नुसत फेस बुक वर लिहुन चालनार नाही.आमचा समाज अतिशय मागासल्या स्थीतीत आहे. त्यातल्या त्यात दारुच्या नशेत... काय करु शकतो आम्ही यासाठी हा प्रश्न नक्की पडू द्या !

 



(लेखंक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांणवर पी.एच.डी करत आहेत)




 


लेखं- हर्षवर्धन ढोके.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...