छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीख : एक ऐतिहासिक संशोधन !!

छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीख : एक ऐतिहासिक संशोधन !!

१९ फेब्रुवारी १६३० ला महाराष्ट्रात सूर्य उगवला .... एका युगपुरुषाच्या जन्माची पहाट महाराष्ट्रात आली .... शिवजन्म विषयीचे ऐतिहासिक पुरावे पाहूयात-


 

कवी परमानन्द तो दिवस नमूद करतो शालिवाहन शके १५५१ शुक्ल्नाम सवत्सरे उत्तराणायनात शिशिर रुतु मधे फाल्गुन वदय तृतीयेस रात्रि शुद्ध लग्नावर...( म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० )... अलौकिक पुत्ररत्नास ( शिवरायास ) जन्म दिला .(२१) शिवनेरी किल्ल्यावर ह्या श्रेष्ठ पुरुशाचा जन्म म्हणून त्याचे नाव " शिव" असे प्रसिद्द झाले (संदर्भ- शिवभारत , कविन्द्र परमानंद कृत , अध्याय ६ , पृ ५१-५९)

 


कविन्द्र परमानंद हा शिवाजी महाराजांच्या सान्निध्यात इ.स. १६३६ पुर्विपासुनाच कवी आणि पंडित म्हणून असल्याने तो सहाजिकच प्रत्यक्ष साक्षीदार आहे. कारण त्यांस जिजाई व इतरांकडुन या घरान्याची बारकाईची सत्य माहिती मीळने शक्य होते . तो पुर्विपासुनाच कवी म्हणून प्रसिद्ध होता . त्यामुळे त्यांनी चरित्रलेखनाच्या दृष्टीने या घरान्याची माहिती मिळवने क्रमप्राप्तच होते. त्याने आपल्या "अनुपुरान" अथवा "शिवभारत" यामधे हे तारीख नमूद केलेली आहे .



 


जेधे शकावालिची नोंद पाहू - "शके १५५१ शुक्ल सवत्सर , फाल्गुन वाद्य तृतीया शुक्रवार ( १९ फेब्रुवारि १६३० ) नक्षत्र हस्त घटी 18 पले 31 गड़ 5 पले ये दिवसी राजश्री शिवाजी राजे शिवानेरिस उपजले" (संदर्भ- जेधे शकावली , शिवचरित्र प्रदीप , पृ १६)

 


आता आपण शिवापुर देशपांडे वहितिल शकावली तील नोंद पाहू - " शके १५५१ शुक्लनाम सवत्सरि फाल्गुन वद्य ३ शुक्रवार ये दिवसी राजे उपजले " याचीही तारीख १९ फेब्रुवारी १६३० हीच येते (संदर्भ- शिवचरित्र प्रदीप पृ ५४)

 



तसेच इथे मी जोधपुरकरांचे अनुवांशिक ज्योतिष शिवराम पुरोहित यांच्या स्वहस्ते बनवलेली हि शिवरायांची जन्मपत्रिकेची प्रतही देत आहे यातील उल्लेख "
फाल्गुन वद्य तृतीया, रात्री, शके १५५१" , ( १९ फेब १६३०).

 



हि पत्रिका प्रथम रावबहादूर गौरीशंकर यांनी प्रसिद्ध केली. पत्रिका ज्योतिषाने जसवंतसिंघा सोबत तो पुण्याला आल्यावेळी बनवली असावी. (संदर्भ- ग. ह. खरे (मराठ्यांचा इतिहास)

 



वरील चार ऐतिहासिक अव्वल पुरावे सिद्ध करतात कि शिवराय यांचा जन्म दिनांक १९ फेब्रुवारी १६३० तारखेला शिवनेरीला झालाया सर्व साधनात एकमत आहे.

 



इतिहास संशोधक संजय सोनवणी म्हणतात " जयंत्या-पुण्यस्मरणे तिथ्यांनीच साजरी करायचे खूळ काही लोकांत का भरले आहे हे समजत नाही.(त्यांना तिथ्या-पंचांगे वैदिक वाटत असतील म्हनून ते असा आग्रह धरत असतील तर तेही चूक आहे...वैदिक पंचांग मुळात अस्तित्वात नाही. राशी भारतियांनी उधार घेतलेल्या आहेत तर तिथ्या अशास्त्रीय चांद्र-मासांवर अवलंबून आहेत!.) तेंव्हा शिवजयंती तारखेनुसारच साजरी करा...कारण ते जागतिक क्यलेंडर आहे" सोनवणी यांचे विचार महत्वपूर्ण आहेत. आपण जागतिक दिनदर्शिकेनुसार शिवजयंती साजरी करावी आणि शिवरायांना विश्ववंदनीय स्वरूप मोठे करावे असे त्यांचे मत आहे. उलट तिथीचा आग्रह करणारे शिवरायांना संकुचित ठरवू पाहत आहेत असे दिसते. म्हणून ऐतिहासिक पुराव्यांना ते फाटा देत आहेत हे स्पष्ट दिसते.- शंकर माने

 


संदर्भ- http://shankarmane03.blogspot.in/2014/02/blog-post.html

 


धन्यवाद- शंकर माने सर.
-

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...