विश्वभुषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 384 व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

विश्वभुषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 384 व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
 



शिवरायांच्या मावळ्यानां एक सांगावेसे वाटते. शिवरायांची जयंती आली म्हटल की सगळे कसे अंनदाने मिरवत असतात. आमचा रुबाब हा वेगळाच असतो. मिरवणुकीत नाचने असे अनेक प्रकार होत असतात. पण कधी शिवचरीत्र समजुन घेतले आहे का?? त्या प्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला आहे का?? नुसती जयंती करुन काही होत नाही.

 



शिवचरित्र म्हणजे केवळ ढाल तलवारीची लढाई नाही. शिवचरित्र म्हणजे एक विचार आहे. माणसाला माणुस म्हणुन जगण्यास प्रेरित करणारा एक संस्कार आहे. तो संस्कार आपण जपला पाहिजे. शिवरायानी उभ्या आयुष्यात कधी माणसामाणसात भेदभाव केला नाही. जात, धर्म, प्रांत, भाषा या गोष्टीवरून माणसानां वेगळे केले नाही. उलट सर्वांना स्वराज्याच्या एका धाग्यात गुंफुन यशश्वी वाटचाल केली. स्वराज्याला विरोध करणारा माणुस कोणत्याही जातीचा धर्मातील असला तरी तो स्वराज्याचा शत्रु आहे. असेच शिवरायानी मानले. त्यामुळे स्वराज्याचे विरोधक जावळीचे चंद्रराव मोरे आथवा मोघलाना सामील झालेले संभाजी कावजी यांनाही शिवरायानी माफ केले नाही. जातीचा तथाकथित वर्चस्वाद बाजुला ठेवून शिवरायांच्या विचाराणे सर्व समावेशक समाज निर्मितीसाठी आपण प्रयत्न केले पाहीजे.

 



शिवरायांच्या आयुष्यात त्यानी स्त्रियाना मोठा सन्मान दिला. ज्या काळात स्त्रियांवर धर्मव्यवस्थेने अन्यायकारक बंधने लादली होती. त्या काळात ही स्त्रिला अतिशय सन्मानाची वागणुक देणारा हे राजे होते. म्हणुनच गरिब मुलीवर अत्याचार करणा~या रांझ्याच्या पाटलाचे हात तोडण्यात आले.

 



शिवरायांच्या चरित्र्यातुन आपण हा गुण घेतला पाहिजे. आपण नक्की काय शिकले पाहिजे. या दृष्टीने आपणास विचार करणे गरजेचे आहे. स्वःताला मावळे आणि शिवभक्त समजणा~यानों जेंव्हा हे गुण स्विकारुन त्या मार्गाने चालायला सुरुवात करताल तेंव्हाच खरे मावळे असाल.



(विचार- अमोल सावंत.)

 


प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार शिवाजी महाराजांना वापरले आहे, त्यामुळे कुणासाठी शिवाजी महाराज हिंदुत्ववादी असतात, कुणासाठी मराठी, कुणासाठी मराठा तर एखाद्याला राजपूत आहे म्हणून मिरवून घेण्यात कौतुक वाटते. आजच्या पिढीमध्ये शिवाजी महाराजांचे विचार रुजवायचे असतील तर अगोदर शिवाजि महाराजाविषयीचे लोकामध्ये असलेले गैरसमज दूर करायला हवेत. ते देवाचा अवतार नव्हते तर ते एक तुमच्या आमच्यासारखेच हाडामासाचा माणूस होते व स्वकष्टातून आणि जिजाऊ-शहाजी राजांच्या मार्गदर्शनातून त्यांनी स्वराज्य निर्मिती केली होती. त्यांचे राज्य हे कुणा धर्माच्या विरोधात नाही तर ते स्वकीयांचे राज्य होते, अफझल खानाला मारणे हा त्यांचा धर्म होता कारण तो स्वराज्यावरचे संकट होता पण त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधणे हा सुद्धा महाराजांचा धर्म त्यांनी पाळला होता. सतराव्या शतकामध्ये जातीपातीची उतरंड असताना त्यांनी सर्व जातीच्या आणि धर्माच्या लोकांना आपल्या सैन्यात आणि प्रशासनात स्थान देवून समतेच्या राज्याची स्थापना करताना आपण धोरणी आणि दूरदृष्टी असलेले राजे आहोत हे दाखवून दिले होते.




 



आज शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आजच्या पिढीमध्ये शिवाजी महाराजांचे एवढे गुण जरी आपण रुजवू शकलो तरी पुढे शिवाजी महाराजांचा वापर कुणी जातीय, धार्मिक व राजकारणातील दंगली साठी करायचा प्रयत्न करताना हजार वेळा विचार करील.

 



(विचार- Vaibhav Kokat.)

 



आज शिवराय असते तर...
आज शिवराय असते तर
निवडणुक लढवून आजमावले असते लोक'मत ।

आज शिवराय असते तर
वापरले असते घोड्या ऐवजी हेलीकॉप्टर ।

आज शिवराय असते तर
दिली असती तलवारी ऐवजी लेखनी हातात ।

आज शिवराय असते तर
बांधली असती मंदिरा ऐवजी ज्ञानाची केन्द्रे ।

आज शिवराय असते तर..........


 


(कवि- Jayant Nikam)

 



शिवजयंती च्या सर्व भारतीयांना हार्दिक सदिच्छा !

 



जय जिजाऊ ! जय शिवराय!

 



विचार- अमोल सावंत, Vaibhav Kokat.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...