४ फेब्रुवारीला `वर्ल्ड कॅन्सर डे` ... पाहा कोणी-कोणी हरवलं कॅन्सरला !!

४ फेब्रुवारीला `वर्ल्ड कॅन्सर डे`... पाहा कोणी-कोणी हरवलं कॅन्सरला !!
 


`कॅन्सर`बाबत जागृती करण्यासाठी त्याच्या कारणांची आणि उपचारांची माहिती देण्यासाठी दरवर्षी ४ फेब्रुवारीला `वर्ल्ड कॅन्सर डे` साजरा करण्यात येतो. किमोथेरपी सारख्या उपायाचा विज्ञानानं शोध लावलाय. पण तरीही या असाध्य आजारानं अनेकांना आपल्या विळख्यात घेतलंय. असं म्हणतात, कॅन्सर झाल्यानंतर आजारापेक्षा मानसिकरित्या रुग्ण लवकर खचतो, हार मानतो त्यामुळं त्याचा लवकर मृत्यू होतो. मात्र जे व्यक्ती या कॅन्सर सोबत लढतात ते कँसरला हरवतात सुद्धा. जगभरात कॅन्सरनं मृत्यू होणारे अनेक व्यक्ती आहेत. मात्र कॅन्सर सोबत झगडत आजही आपलं आयुष्य जगणारे अनेक लोक आहेत.


चला एक नजर टाकूया अशा सेलिब्रेटींवर की ज्यांनी कँसरला हरवलं...



मनीषा कोईराला, अभिनेत्री-
 


९०च्या दशकात आपल्या सौंदर्यानं सर्वांच्या हृदयात बसलेली अभिनेत्री मनीषा कोईराला. अनेक वर्षांपासून ती बॉलिवूडपासून दूर झालीय. मात्र २०१२मध्ये ती चर्चेत आली जेव्हा ति हॉस्पिटलमध्ये भर्ती असल्याची बातमी आली. डॉक्टरांनी तिला ओवेरियन कॅन्सर असल्याचं निदान केलं. मात्र तिनं खचून न जाता कॅन्सरसोबत लढा दिला. उपचारासाठी ती अमेरिकेत गेली. डिसेंबर २०१२मध्ये तिनं शस्त्रक्रिया करवली, जी यशस्वी झाली. उपचारांनंतर परतल्यानंतरचे मनीषाचे फोटो सोशल मीडियावर झळकले. त्यात तिच्या डोक्यावर केस नव्हते. मात्र तिचं हास्य हे सांगत होतं की "पाहा मी कॅन्सरला हरवलं".



युवराज सिंग खेळाडू -


`जब तक बल्ला चल रहा हे तब तक थाट हे`, असं एका जाहीरातीत अभिनय करताना युवराज सिंग म्हणाला होता. मानवी जीवनाचा फोलपणा सांगणार वाक्य युवी जगलाय. त्याला कॅन्सर झाला होता. तमाम क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या युवराजच्या आयुष्यासाठी जगभरातील चाहत्यानी प्रार्थना केली होती. आता युवी बरा झालाय. युवी मैदानावर परतलाय. कॅन्सर त्याला बरचं काही शिकवून गेलाय, असं युवी म्हणतोय.




लीसा रे, अभिनेत्री-



`वाटर`, `कसूर` आणि `बॉलिवूड-हॉलिवूड` सारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं सगळ्यांचं मन जिंकणारी कॅनेडियन अभिनेत्री लीसा रे... २००९मध्ये मल्टिपल मायलोमा म्हणजेच अस्थिमज्जा कॅन्सर तिला झाल्याचं पुढं आलं. १०-११ महिने ती या आजारासोबत लढत होती. कॅन्सरसोबत यशस्वी लढा देत तिनं त्यावर विजय मिळवला. त्यासाठी तिनं टोरंटोतील प्रिंसेस मार्गारेट हॉस्पिटलमध्ये आपला उपचार केला आणि स्टेम सेल ट्रांसप्लांट करवलेत.



बारबरा मोरी, अभिनेत्री-



बारबरा मोरी ही मेक्सिकन मॉडेल अभिनेता हृतिक रोशन सोबतच्या `काईट` या चित्रपटामुळं ती बॉलिवूडशी जोडली गेली. भारतात तिची खूप चर्चा झाली असली तरी बारबरानंही कॅन्सरला हरवलंय, हे कुणाला माहित नाही. आपल्याला कॅन्सर आहे हे कळल्यानंतर तिनं न खचता त्याच्यासोबत लढा दिला. २०१०मध्ये पूर्णपणे बरी झाली.


क्रिस्टीना अप्पलगेट, अभिनेत्री-
 


क्रिस्टीना अमेरिकेतल्या छोट्यापडद्यावरील चर्चित अभिनेत्री आहे. २००८मध्ये क्रिस्टीनाला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं कळलं. तिच्या आईला कॅन्सर होता. जेनेटिक्स कारणामुळं तिलाही हा आजार झाला. मात्र तिनं हिम्मत न हरत आपल्यावर पूर्ण उपचार करून घेतले आणि कॅन्सरला हरवलं. आता ती प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करते.


 

लान्स आर्मस्ट्राँग, खेळाडू-



`लान्स आर्मस्ट्राँग` फ्रान्सचा सायकलिंगचा मास्टर कधीही हार न मानणारा खेळाडू, टेस्टीक्युलर कॅन्सर झालेला तेव्हा त्यातून बरा होण्याची शक्यता केवळ ४० टक्केच होती. आजाराचं निदान होता-होता याला तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर झाला होता. लान्स आर्मस्ट्राँगने याही परिस्थितीत आपल्या खिळाडूवृत्तीनं कॅन्सरशी झुंज दिली. कॅन्सरमधून बरा झाल्यावर त्याने आपल्या लिव्हस्ट्राँग या संस्थेच्या माध्यमातून कॅन्सर पिडीत व्यक्तीनां मदतीचा हात दिला. कॅन्सरसोबत त्याची झुंज संपली पण गेली २५ वर्ष इतरांसाठी लान्स आर्मस्ट्राँग कॅन्सरशी लढा सुरू आहे.




अँजेलीना जोली, हॉलिवूड अभिनेत्री-

हॉलीवूडमधील सुंदर अभिनेत्री एंजेलीना जोलीच्या आईचा ब्रेस्ट कॅन्सरने बळी घेतला होता. त्यामुळे अँजेलीनाला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता होती. अँजेलीना वेळोवेळी काळजी घेत होती. डबल मॉस्टेकॉटॉमी करून अँजेलीनाने आपल्या या दुर्धर आजारापासून स्वतःचे संरक्षण केले. या आजाराबद्दल महिलांमध्ये जागृती करण्यावर अँजेलीना लक्ष देत आहे. सुंदरतेसह आरोग्य हा अँजेलीनाचा जीवनाबद्दल दृष्टीकोन आहे.



 

संदर्भ- http://zeenews.india.com/marathi/slideshow/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE_307.html



धन्यवाद- झी २४ तास.


No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...