आज २२ एप्रिल - जागतिक वसुंधरा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
Mobile, कॉम्प्युटर, वातानुकुलीत यंत्रे, गाड्या, मोटर बाईक, पेट्रोल, डीझेल, रॉकेल, लाकूड, कागद, फर्निचर, कृत्रिम रंग, कृत्रिम कपडे, प्लास्टिक यांचा कमीत कमी वापर करा, आवश्यक असेल तिथेच वापर करा. पाणी , विद्युत उर्जा आणि इंधनाची बचत करा....
आणि सर्वात महत्वाचे लोकसंख्यावाढ करू नका, भाराभर लेकुरे जन्माला घालू नका, वंशाचा दिवा म्हणजे मुलगा ही संकल्पनाच रद्द करा, जे मुल होईल ते स्वीकारा, आपोआप स्त्रीमुक्ती होईल आणि घराणेशाही नष्ट होइल.....
"धरतीका बोझ मत बढाओ", Creativity करायची असेल, योग्य तो विचार, आपापसात आदान-प्रदान करून आणि निसर्गाशी अनुरूप होऊन निसर्गाची हानी न होता किंवा कमीत कमी हानी होत असेल तरच नवनिर्माण करा.
सध्या भरपूर सुखसोयी उपलब्ध अहेत. पण साधन संपत्तीचे योग्य ते वाटप झालेच नाही. गरीब गरीबच होत चाललेत आणि श्रीमंत अत्यंत माजोरपणे आणि मुजोरपणे संपत्ती ओरबाडून उपभोगत आहेत.
धर्म, वंश, जात, प्रांत, भाषा, श्रीमत-गरीब यातील सर्व मतभेद मिटवा. उच्च नीचता, वर्णव्यवस्था नष्ट करा, सर्व प्रेषितांचा आदर करा. प्रेषित हे कोठल्याही धर्माचे नाहीत तर त्यांचे विचार मानव जातीच्या कल्याणासाठी आहेत. आपण असे नाही केले तर आपला विध्वंस होईल आणि पुढील मानवी पिढी अस्तितवात असेल तर आपल्याला माफ करणार नाही...
प्रत्येकाने सुरवात तर स्वतःपासून केली पाहिजे. केवळ आजच दिवस नाही तर यापुढील प्रत्येक दिवशी, प्रत्येक वेळी आपण याचे भान ठेवले पाहिजे......
सर्व विश्व नागरिक, सर्व प्राणी-पक्षीमात्रे, वृक्षावल्लरी चिरायू होवो.… "जय वसुंधरा दिन…… !!"
लेखं - Dnyanesh Parab
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!