शून्यातून विश्व !!

शून्यातून विश्व !!


पहाटेचा इंतजार करा-

रात्रीच्या अंधाराला घाबरू नका, पहाटेचा इंतजार करा. एक दिवस तुमचाही उजाडेल. वयाच्या ८ व्या वर्षी लग्न झाले आणि बाराव्या वर्षी मी नांदायला सासरी गेले. मात्र सासरच्यांनी छळले. तान्ह्या मुलीसह घराबाहेर पडले. रेल्वेत गाणी म्हणून भिक मागितली. स्मशानात राहिले. जगणे कठीण झाले. अशा परी स्थितीत झगडले, रडले नाही, माघार तर घेतलीच नाही. पोटच्या पोरीला पुण्यात प्रतापराव गोडसे दगडू सेठ हलवाई गणपती ट्रस्ट यांच्या हवाली केले आणि मग उपेक्षित मुलांची आई बनले. मी आज १००० अनाथांची आई होऊ शकले, आज माझ्या ३२० सुना व २६५ जावई आहेत , माझा एक मुलगा आज माझ्यावरच phd करतो आहे. माझे गाणे, माझे बोलणे वेदनेतून आले आहे, ते वरवरचे नाही.

 

जगायला शिका, देश तुमच्या खांद्यावर आहे-

पतीने गरोदर असताना घरातून बाहेर हाकलून दिले, गाईच्या गोठ्यात मुलीला जन्म दिला. मृतदेहावरील पिठाची त्याच ठिकाणी भाकरी करून खाल्ली. रेल्वेत भिक मागून उदरनिर्वाह केला. आयुष्यात मी कधी थांबली नाही, आयुष्याला फुलस्ट्योप दिला नाही. रस्त्यावरच्या कागदातील कविता वाचल्या. बहिणाबाई च्या कवितांनी प्रेरणा दिली, सुरेश भटांच्या गझलांनी जगण्याचे बळ दिले. माझ्या काळजातील हुंदका त्यांच्या शब्दात होता, त्या शब्दांनी मी आभाळ पेलायला शिकले. हिम्मत ठेवा, अंगावर आभाळ आले तर मागे हटू नका, त्यावर पाय देउन उभे रहा.

 

स्मशानात खाल्लेली भाकरी विसरणे अशक्य-

माणूस वाईट नसतो तर माणसाची भूक वाईट असते. भुकेनेच मला माणूस बनविले. स्मशानात खाल्लेली भाकरी मला कधीही विसरता येत नाही. सुख नको तर दुखातच जगायला आवडेल. गरोदर असताना मला गाईच्या गोठ्यात टाकण्यात आले, त्या वेळी गाईच्या पोटाखाली मी बाळंत झाले. गाय असून ती माझ्यासाठी माय झाली. दगडाने नाळ तोडताना असा दिवस कोणावर ही येऊ द्या य चा नाही असा निश्चय केला. काही ही नसताना मी जगले तर तुम्ही का जगू शकणार नाही.
 

आयुष्य जगताना तीन वेळा आत्महत्याचा विचार केला. २२ वर्षांनी सासरच्या दारात सत्कार झाला. सासरच्या घरातून बाहेर काढताना माझ्या पातळाला गाठी होत्या. सासरच्या गावी सत्काराला आले तेव्हा पतीच्या धोतराला गाठी होत्या. पतींना रडताना पाहून एकक्षण आनंद झाला तर दुसऱ्याच क्षणी त्यांच्यामुळेच मी घडल्याची जाणीव झाली आणि त्यांना माफ करून टाकल. आज त्याच पतींची पत्नी म्हणून नाही तर आई म्हणून सांभाळ करत आहे.

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...