१. स्वातंत्र्य मिळून ६६ वर्षे झाली. खरोखरच किती अन्याय्यग्रस्तांचे जीवनमान सुधारले? आणि किती मध्यस्थांचे? ---- आरक्षण हे पिडीत , गरीब किंवा अन्याय ग्रस्त समाजांचे जीवन सुधारण्यासाअठि आहे हीच मुळात चुकीची समजूत आहे. आरक्षण सर्व समाजघटकांना सत्ताकारण , अर्थकारण आणि एलिट क्लास यात प्रतिनिधित्व - वाटा मिळवुन देते. हि एकप्रकारची रक्त विहीन क्रांति असते. उच्च जातीच्या लोब्या जेंव्हा " नाही रे" वर्गाला… मोक्याच्या स्थानापासून दूर ठेवतात तेंव्हा दाबल्या पिच्लेल्यांना संघर्ष करण्याची उर्मी सहाजिकच येते… ज्यांकडे हरायला काही नसते ते युद्धाला कायमच तयार असतात . ज्या देशात मागास समाजाच्या उत्थानासाठी कोणत्याहि योजना नसतात त्या देशांचे काय होते ? यासाठी पाकीस्थान हे पुरेसे बोलके उदाहरण आहे.
२. जातीभेदामुळे झालेले अनेक देशांचे नुकसान आणि जातीचा उल्लेख बंद केल्यावर झालेली प्रगती याचा हि आपण अभ्यास केला आहे का? --- बिळात साप नाही असे मोठ्याने घोकाल्याने सापाचा धोका टळतो काय ? जातिव्यस्थेचा साप अस्तित्वात आहे- त्याचा उल्लेख टाळून काय मिळेल ? ---- जपान मधे अणुबोब च्या विनाशानंतर तिथल्या सामुराइ या उच्च जातीने सर्व अधिकारपदे सोडुन दिली । आणि जो पर्यंत सर्व समाज घटकांना सत्तेत स्थान मिळत नाही तोपर्यंत आम्ही गवत खाउन राहू अशी घोषणा केली… जपानची झालेली प्रगती आपल्या डोळ्यासमोर आहेच.… । ज्या ज्या सुधारलेल्या देशात जाती /वर्गभेद तीव्र होते तेथे आरक्षण किंवा तत्सम सुविधा आहेत. उदा : अमेरिकेत - कृष्ण वर्णीय विद्यार्थ्यांचा कोटा पुर्ण भरल्यासा विद्यापिठांना घसघशीत वाढीव सरकारी अनुदान मिळते.
३. व्यक्ती म्हणून मला वाटणारे प्रेम आणि निष्ठा या सर्वप्रथम कोठे असाव्यात जात, देश, धर्म, परंपरा संस्कृती, व्यक्ती? या गहन नैतिक प्रश्नाचे उत्तर द्यायला मी समर्थ नाही . पण व्यक्ती समाज देश … याबद्दल सरकारी धोरणे ठरवताना - अन्यायग्रस्त समाजाचा विचार केला जावा असे वाटते.
४. आपल्या शिक्षण पद्धतीत १७ किंवा २५ % अभ्यास केला कि पदवी मिळते मग आपण त्यात, गुण, फी, आणि skills सर्वच पातळीवर सुट का दिली जाते. अश्या पद्धतीने गुणवत्ता कशी वाढेल- खरे आहे गुणवत्ता वाढीसाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे.
आरक्षणाने गुणवत्ता कमी होते हो - अशी हाकाटी कायम केली जाते. कोणाची गुणवत्ता ? हा खरा प्रश्न आहे. देशातल्या पन्नास टक्के जनतेला निर्णयप्र्क्रियेतुन दूर ठेवल्यास त्यांची गुणवत्ता सुधारेल काय ? देशाची गुणवत्ता म्हणजे सर्व समाजाची गुणवत्ता . समाजा एका घरात दोन भाऊ आहेत । त्यापैकी दुबळ्या भावाच्या खाण्यापिण्याकडेआई वडिल अधिक लक्ष पुरवतात । प्रसंगी सशक्त भावाकडे दुर्लक्ष … करतात । त्यामुळे कुटुंबाची गुणवत्ता कमी होत नाही - वाढते.
लेखं- डॉ अभिराम दीक्षित सर.
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!