काय चुकले आमचे ??
आज हनुमान जयंती आमच्या घरासमोरच हनुमान मंदिर आहे सकाळपासून लाऊडस्पिकरवर हनुमान स्तोत्राचे पठण जोरात सुरु होते नंतर अंजनीच्या सुता वगैरे गाणी सुरु झाली हे सालाबादप्रमाणे दरवर्षी चालू असते, आम्हाला याचा त्रास वगैरे होत नाही. घरच्यांनीही कधी तशी तक्रार केली नाही. घरासमोर मैदान असल्यामुळे बरेचसे कार्यक्रम तीथेच होतात. हनुमान जयंतीचा कार्यक्रम एकच दिवस असतो. त्या आणि अशा कितीतरी दिवसांचा त्रास आम्ही गृहित धरलेला आहे. त्यामुळे (मोठ्या आवाजाचा त्रास )काहि जाणवत नाही आजही याबाबत माझी काहिच तक्रार नाही.
प्रत्येक सण ,उत्सवाला असलेला प्रसाद,महाप्रसाद सर्व घरपोच येते आम्ही मिष्टान्न म्हणून ते ग्रहण करतो. त्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही आणि कुणालाही वाटु नये, मी,माझे कुटूंब विज्ञाननिष्ठ असल्यामुळे असे पदार्थ सेवन केल्याने मी भ्रष्ट होईल, बाटेल अशी अंधश्रद्धा आम्ही पाळत नाही सबब एक शेजारधर्म आणि समाज म्हणून आम्ही प्रत्येक गोष्टित सहकार्य करत असतो आणि या देशातील प्रत्येक आंबेडकरी कुटूंबाची भुमिका हि या पेक्षा वेगळी नाही.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते "तुमची जात-धर्म हा उंबर्याच्या आत जेव्हा बाहेर पडाल तेव्हा फक्त आणि फक्त भारतीय म्हणूनच" समाज म्हणून एकत्र रहायचे असेल तर सर्व धर्म समभाव पाळला गेला पाहिजे सर्वांच्या सुख दु:खात आले-गेले पाहिजे...
मात्र हिच गोष्ट इतर समाजाकडून का पाळली जात नाही ??
बुद्धपोर्णिमेला आम्ही खीरदान करत असतो आंबेडकर जयंतीला भोजनदान करतो मात्र तीथे आंबेडकरी समाजाशिवाय कुणीच नसते बोलावले तर थातूरमातूर कारणे सांगून येण्याचे टाळले जाते तरीही, हे सर्व ठीक आहे, मात्र गेल्या दोन दिवसांपासून वर्तमानपत्रांमध्ये बातम्या येत आहेत आंबेडकर जयंतीदिनी काढलेल्या मिरवणूकीत अडवणूक , मारहाण बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबणा, परभणी मध्ये तर कळस केला गेला, दगडफेकीत एका महिलेचा मृत्यु झाला आहे, हेच कृत्य इतर कट्टर धर्मपंथीयांच्याबाबतीत घडले असते तर आज देशात दंगली माजल्या असत्या.
काय चुकले आमचे ??
आंबेडकरी समाजाने कधी कुठल्या श्रद्धास्थानाची विटंबणा केली काय ?? कधी कोणत्या धार्मिक मिरवणूकिवर दगड-फेक केली काय ??
तरीही आज समाजामध्ये तुमच्याकडून तिरस्कारा शिवाय काहीही मिळत नाही तुम्ही समाज म्हणून एकत्र राहण्याच्या लाईकीचे आहात काय ??
हे एकदा तरी तपासून पहा स्वतःच्या मनाला विचारा जातीयवाद, तिरस्कार हा तुमच्या रक्तात किती खोलवर भिनला आहे ?? आणि वर पुन्हा तुम्ही आरक्षण कशाला ?? म्हणून बदमाषि करणार ?? लाज वाटते मी अशा लोकांबरोबर रहातो आहे.
बोला मित्र-मैत्रिणीनो ??
नोट- आपल्या मनातील जातीद्वेष मिटवा म्हणून ही पोस्ट आहे.
लेखं - मिलिंद धुमाळे.
या लिंक ही ओपन करून बघा-
१ http://www.sataratoday.com/MoreContentPage.aspx?q=809
२ http://epaper.pudhari.com/details.aspx?ID=357091&boxid=233528328&pgno=2&u_name=0
३ https://www.facebook.com/photo.php?fbid=10200294260133612&set=a.1165564453748.163379.1067000417&type=1&relevant_count=1
४ http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=AurangabadEdition-5-3-24-04-2013-5a438&ndate=2013-04-24&editionname=aurangabad
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!