बलात्कार कसे रोखाल ?
1. तुमच्या सभोवतील परिस्थितीचे नेहमी भान ठेवा -
सोसायटी किवा ऑफिस इमारतीतील पार्किंग ची जागा किवा वापरत नसलेली जागा, जास्त रहदारी नसलेला रस्ता, उंच इमारतीचे टेरेस अशा जागी बलात्कार होण्याची शक्यता जास्त असते. अशा ठिकाणी जाताना विशेष काळजी घ्या. तिथे आरोपी लपून बसलेला किवा तुमची वाट पाहत असू शकतो. गरजच पडली तर गेल्यावर फोन वर मोठ्या आवाजात बोलत राहा म्हणजे तुम्ही एकटे नाहीत असे त्यास वाटेल.
२. तुमच्या कपड्यांची योग्य निवड करा -
हे तुमच्या आकर्षक किवा मादक स्वरूपाच्या कपड्याशी संबंधित नाही. सार्वजनिक जीवनात जर वाईट प्रसंग आलाच तर पळून जाण्यासाठी किवा स्वताची सुटका करून घेताना उपयोगी पडतील असेल कपडे वापरा. खूप सैल कपडे किवा उंच कपडे चांगले नाहीत. जे कपडे अंगावर तंग बसतात ते कधीही चांगले. जीन्स, बेल्ट बांधलेला पायजमा कधीही चांगले. ईलास्तिक असलेला पायजामा सारखे सहज काढता येणारे कपडे आरोपीस अत्याचार करायला मदत करतात. म्हणून अंगावरून काढायला अवघड जाईल असे कपडे वापरा.
३. पार्टी आणि बार सारख्या ठिकाणी जास्त काळजी घ्या -
पार्टीत तुमचा ग्लास कोणाच्या हि हातात देऊ नका किवा कोठेही ठेऊ नका. कोणीही दिलेले पेय पिऊ नका. स्वताचा ग्लास स्वताच्या डोळ्या देखत भरून घ्या. आणि भरताना लक्ष द्या. पेय तेथील वेटर किवा बार टेंडर यांनीच स्वत तुम्हाला दिले पाहिजे इतर व्यक्तीने नाही.
अशा वेळी आपले मित्र किवा मैत्रिणी काय म्हणतील याची अजिबात काळजी करू नका. जर तुम्हाला काही शंका आली तर ते पेय न पिता बाथरूम ला जाण्याचे नाटक करून तुम्ही पेय फेकून देऊ शकतात.
४. स्पष्ट आणि उघडपने बोलणे शिका -
सार्वजनिक ठिकाणी किवा जीवनात जर कोणी तुमच्या कडे कारण नसताना किवा वाईट नजरेने पाहत असल्याचे तुम्हास दिसले तर लगेच त्याच्याशी थोडी हुज्जत घालायला पाहिजे. तुम्ही काहीच बोलले नाही तर त्याची हिम्मत वाढत जाते. त्यामुळे स्पष्टपणे बोलायला शिका. शंका आलीच तर अशी व्यक्तीचे वय, व्यक्तिमत्व, नाते याचा विचार करू नका. आजकाल वडील सुद्धा मुलीवर बलात्कार करतात अशा घटना होत आहे.
५. तुमची केसांची style तपासा -
होय, तुमचे केसांची style ने आरोपीला मदत होऊ शकते. लांब वेणी किवा सुटे केस तुम्हाला पकडायला मदत करतात. सैल केस नकोत किवा सहज पकडता येतील अशी वेणी नको.
६. जोरात ओरडा -
काहीही शंका आली तर जोरात ओरडा. लक्षात घ्या कोणी तात्पुरते मूर्ख म्हंटले तर चालेल पण बलात्कार झालेला नको.
७. मोठ्या आवाजाच्या ठिकाणी जास्त काळजी घ्या -
पार्टी किवा समारंभात जेथे मोठ्या आवाजात संगीत किवा गाणी वाजवली जात असेल तेथे जास्त काळजी घ्या. कारण तिथे तुमचे ओरडणे सुद्धा इतरांना ऐकू जाणार नाही आणि मदतीला येऊ शकणार नाही. चांगल्या मित्र किवा मैत्रीनिसोबातच राहा.
८. आत्मविश्वासाने चला किवा वावरा -
चालताना पाठ सरळ ठेवा. पाऊले टाकताना आत्मविश्वासाने टाकत आहे असे दिसले पाहिजे. स्वताची रक्षा करायला आपण समर्थ आहोत आहे इतरांना दिसले पाहिजे. आरोपी अश्या स्त्रीच्या शोधात असतो जी गरीब आणि स्वताची रक्षा करू शकणार नाही.
९. स्वताची वैयक्तिक माहिती कोणाला देऊ नका -
कोणालाही आपली माहिती देऊ नका उदा. फोन नंबर, फोटो, पत्ता. Internet वर सुद्धा आपली माहिती टाकू नका. कोणासही भेटण्यास एकटे जाऊ नका. Internet वरील मैत्रीवर भरवसा करू नका.
१०. बगीच्यात किवा समुद्र किनारी फिरायला सोबत कुत्रा घ्या -
अश्या ठिकाणी नेहमी जात असेल तर कुत्रा नक्की सोबत असू द्या. लहान किवा मोठा कसाही आकार असू द्या कुत्र्यांना धोक्याची सूचना लवकर मिळते आणि ते धोक्याचा सामना नक्कीच करतात.
११. कोणी पाठलाग करत असेल तर त्या व्यक्तीच्या नजरेला नजर द्या -
थोडी जरी शंका आली कि कोणी पाठलाग करत आहे तर थोडे थांबून न घाबरता मागे ओळून नजरेला नजर द्या तो व्यक्ती नक्की घाबरेल आणि त्याला कळेल कि हि महिला कमजोर नाही.
१२. मानसिक दृष्ट्या अश्या वाईट प्रसंगी तुम्ही काय आणि कसा प्रतिकार कराल याची योजना आखून ठेवा -
समजा कोणी तुमच्यावर वाईट प्रसंग करायला लागला तर तुम्ही काय आणि कसा प्रतिकार कराल याची योजना आखून ठेवा. उदा. ओरडणे, आरोपीच्या गुप्तांगाला मारणे, डोळे नाक अशा नाजूक भागाला मारणे इ. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.
१३. मदत केंद्राचे नंबर हाताशी ठेवा -
पोलीस आणि महिला मदत केंद्राचे नंबर लक्षात ठेवा. मोबाईल वर लगेच call करता येईल असे ते राहू द्या.
इतर काही प्रासंगिक उपाय योजना-
१. प्रसंग - रात्री लिफ्ट मध्ये -
जर कंपनीच्या किवा एखाद्या उंच इमारतीच्या समजा १३ व्या मजल्यावर तुम्हाला जायचे असेल आणि लिफ्ट मध्ये अनोळखी मनुष्य आणि तुम्ही एकट्याच असेल तर ?
लिफ्ट मध्ये प्रवेश करा. आणि समजा १३ व्या मजल्यावर जायचे असेल तर १३ व्या पर्यंत सर्व मजल्याची बटन दाबा. जी लिफ्ट प्रत्येक मजल्यावर थांबते अशा लिफ्ट मध्ये कोणीही तुमच्यावर बलात्कार करण्याचे धाडस नाही करणार.
२. प्रसंग - घरात एकटे असताना -
घरात कोणी तुमच्यावर हल्ला केला तर तुम्ही तुमच्या स्वयंपाक घरात पळा. फक्त तुम्हाला माहित असते कि लाल मिरची किवा हळद कुठे आहे. किवा चाकू, चिमटे कुठे आहे. वेळप्रसंगी या साधनांचा खूप चांगला उपयोग होतो. काहीच नसेल तर भांडी अशा व्यक्तीच्या अंगावर फेकत राहा. आणि हो जोर जोरात ओरडा. असा आवाज आरोपीचा शत्रू असतो कारण त्याला पकडले जावे असे कधीही वाटू शकत नाही.
३. प्रसंग - रात्रीच्या वेळी रिक्षा किवा Taxi घेताना -
रात्री एकटे असताना रिक्षा, Tax मध्ये प्रवेश करताना तिचा नंबर लिहून घ्या. आणि घरी मोबाईल वरून कोल करून तो नंबर सांगा, सांगताना ड्रायवर ला ऐकू जाईल असेल मुद्दाम संभाषण करून सांगा. फोन जरी घरच्यांनी किवा मित्रांनी उचलला नाही तरी नाटक करा कि त्यांनी ते ऐकले आहे. ड्रायवरची हि आपोआप जबाबदारी निर्माण होईल कि त्याने सुरक्षित तुम्हाला घरी पोचवावे. (कारण त्याचे Details तुम्ही घरी किवा मित्रांना दिले आहे )
४. प्रसंग - जर गाडीचा ड्रायवरने नको त्या रस्त्यावर गाडी वळवली आणि तुम्हाला धोका दिसतोय -
तुमच्या हातातील वस्तूंचा वापर करा उदा. पर्स किवा दुपट्टा. यांचा वापर करून तुम्ही त्याच्या मानेला आवळून मागे खेचू शकतात. लगेचच त्याला गळा चोक -उप होऊन helpless वाटेल. जर दुपट्टा नसेल तर क्वालर पकडा.
५. प्रसंग - जर तुमचा कोणी पाठलाग करत असेल तर -
कोणत्याची दुकानात घुसा आणि त्यांना पाठलाग बद्दल सांगा. जर रात्र असेल आणि दुकाने बंद असेल तर ATM box मध्ये जा. तेथे सुरक्षा रक्षक असतोच आणि विदिओ केमेरा सुद्धा असतो त्याला घाबरून कोणी हल्ला करणार नाही.
हि माहिती आपल्या बहिणीला, मुलीला आणि माहिती असलेल्या सर्वच महिलांना वाचायला द्या काळजीपूर्वक वाचून मनाने सुदृढ आणि आत्मविश्वासपूर्ण राहिल्यास बरेच प्रसंग टाळता येऊ शकतात आणि वेळ प्रसंगी सामना करून आपली सुटका करता येऊ शकते.
लेखं - किरण शिंदे.(Kiran Shinde)
संदर्भ - http://coffeewithkiranshinde.blogspot.in/2013/04/blog-post_22.html