आजही जातात हुंडाबळी !!

आजही जातात हुंडाबळी !!



'वयात आलेली पोर अन् बापाच्या जिवाला घोर' ही म्हण मराठीत प्रचलित आहे. एकदा मुलगी वयात आली, की एखादं 'चांगलं' स्थळ पाहून तिचं लग्न लावून दिलं की बाप जबाबदारीच्या ओझ्यातून मोकळा, अशी मानसिकता आपल्या समाजामध्ये आहे. मग या वयात आलेल्या मुलीसाठी घरच्यांच्या दृष्टीनं चांगलं स्थळ आलं, की ते हातचं जाऊ नये यासाठी

 


प्रयत्न सुरू होतात. वरपक्षाकडून केल्या जाणार्‍या अवास्तव अपेक्षा आणि मोठा हुंडा देण्याचं कबूल करत बाप आपल्या लेकीचं लग्न लावून देतो. मात्र, हे लग्न जमवताना हुंडा म्हणून ठरलेली रक्कम देता न आल्यानं मुलीला सासरी जाचाला सामोरं जावं लागतं. वरपक्षाच्या अपेक्षाही मग वाढत जातात. कुठं नवीन व्यवसाय सुरू करायचा, नवी नोकरी शोधायची, घर घ्यायचंय, गाडी घ्यायची म्हणून माहेरच्यांकडून पैसे आण असे म्हणत आजही मुलींना सासरी जाच सहन करावा लागतोय आणि मुलीच्या सासरच्यांच्या मारुतीच्या शेपटासारख्या वाढणार्‍या मागण्या पूर्ण करता येत नाहीत, सासरी जाच सहन होत नाही म्हणून आजही हुंडाबळी जात आहेत.

 



कौटुंबिक हिंसाचार आणि हुंडाबळी रोखण्यासाठी कितीही कठोर कायदे केले तरी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे 'मुलगी म्हणजे बापाच्या जिवाला घोर' ही आपली मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हुंडाबळी थांबणार नाहीत हेही खरंच! मागच्याच आठवड्यात लग्नात राहिलेल्या हुंड्याचे दोन लाख रुपये आणि पाच तोळे सोनं दिलं नाही म्हणून सासरी होणार्‍या त्रासाला कंटाळून स्नेहल क्षीरसागर या २१ वर्षीय नवविवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली. ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. मुळात सध्याच्या प्रगत, पुढारलेल्या जगात हुंडाबळी जात नाही असं अनेकांचं मत आहे; पण अशा काही घटना समोर आल्या की, जग बदललं असलं तरी आपली मानसिकता बदलत नाही, हे स्पष्ट होतं. आपल्या बारावीपर्यंत शिकलेल्या मुलीला सिव्हिल इंजिनीअर असणार्‍या मुलाचं स्थळ आलं. मग काय ते मागतील ती रक्कम देऊ अन् लग्न लावून देऊ असं स्नेहलच्या आई-वडिलांना वाटलं खरं. त्यांना हे वाटणं चुकीचं नव्हतंच. कारण कोणत्याही आई-वडिलांना आपल्या मुलीचं वाईट व्हावं असं कधीच वाटत नाही. त्यांनी मुलाकडच्यांच्या मागणीप्रमाणे हुंडा द्यायचं कबूल केलं. मात्र, हुंड्याची पूर्ण रक्कम देता न आल्यानं सासरी स्नेहलला त्रास होऊ लागला अन् केवळ लग्नानंतर सहाच महिन्यांनी तिनं या त्रासाला कंटाळून आपला जीवनप्रवास संपवला. या घटनेत आता सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय. त्यांना शिक्षा होईल वगैरे कायदेशीर भाग आहे. मात्र, आपल्या सुरेख, आनंदी आयुष्याची स्वप्नं पाहणार्‍या एका तरुणीचा बळी हा 'हुंडा' नावाच्या व्यवस्थेच्या प्रकारानं घेतला आहे.

 


खरं तर हुंडाबळी जाणं ही आपल्या समाजव्यवस्थेतील नवी घटना नाही. तर, तो या व्यवस्थेचा भाग बनला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एकीकडं सगळं वातावरण बदलत असताना अनेक बाबी आजही आपली मानसिकता बदलायला तयार नाहीत. आपलं जुनाट वळण सोडायला आपण तयार नाही. वर्षानुवर्षं समाजात रुजलेल्या रूढीपरंपरांचा पगडा आपल्यावर आजही खोलवर आहे. राहणीमानात आधुनिकता आली असली तरी जुनाट परंपरा अन् त्यातही सोयिस्कर परंपरा आजही आपण सोडायला तयार नाही आहोत.वयात आलेल्या मुलीला तिच्या दृष्टीनं चांगलं नाही, पण घरच्यांच्या दृष्टीनं चांगलं स्थळ आलं की, ते स्थळ हातचं जाऊ नये यासाठी वरपक्षाने केलेल्या अवास्तव मागण्या पूर्ण करण्याचं मान्य केलं जातं. पण, मुळातच लग्न ठरवताना बाजारात जाऊन आपल्याला आवडलेल्या वस्तूची आपण बोली लावतो, तशीच मुलीची बोली लावली जाते. यातून समोरच्यांच्या मागण्या मारुतीच्या शेपटापर्यंत वाढतच जाणार्‍या असतात अन् त्या पूर्ण करताना मात्र मुलीचा बाप कोलमडून जातो. बरं इतकं करूनही मुलगी सुखात राहील याची खात्री त्याला नसते. सतत एका दडपणाखाली त्याचं वावरणं सुरू असतं.या सगळय़ा गोष्टी टाळायच्या असतील तर लग्न जमवतानाच मुलीच्या बापानं हुंडा देणार नाही, हे ठणकावून सांगायची आवश्यकता आहे. पण, जेव्हा 'वयात आलेली पोर अन् बापाच्या जिवाला घोर' ही आमची मानसिकता बदलेल तेव्हाच ते शक्य होईल.


 


धन्यवाद- दै.पुण्यनगरी.


 


लेखं- अश्विनी सातव/डोके.  (लेखिका पत्रकार आहेत.)

छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीख : एक ऐतिहासिक संशोधन !!

छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मतारीख : एक ऐतिहासिक संशोधन !!

१९ फेब्रुवारी १६३० ला महाराष्ट्रात सूर्य उगवला .... एका युगपुरुषाच्या जन्माची पहाट महाराष्ट्रात आली .... शिवजन्म विषयीचे ऐतिहासिक पुरावे पाहूयात-


 

कवी परमानन्द तो दिवस नमूद करतो शालिवाहन शके १५५१ शुक्ल्नाम सवत्सरे उत्तराणायनात शिशिर रुतु मधे फाल्गुन वदय तृतीयेस रात्रि शुद्ध लग्नावर...( म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० )... अलौकिक पुत्ररत्नास ( शिवरायास ) जन्म दिला .(२१) शिवनेरी किल्ल्यावर ह्या श्रेष्ठ पुरुशाचा जन्म म्हणून त्याचे नाव " शिव" असे प्रसिद्द झाले (संदर्भ- शिवभारत , कविन्द्र परमानंद कृत , अध्याय ६ , पृ ५१-५९)

 


कविन्द्र परमानंद हा शिवाजी महाराजांच्या सान्निध्यात इ.स. १६३६ पुर्विपासुनाच कवी आणि पंडित म्हणून असल्याने तो सहाजिकच प्रत्यक्ष साक्षीदार आहे. कारण त्यांस जिजाई व इतरांकडुन या घरान्याची बारकाईची सत्य माहिती मीळने शक्य होते . तो पुर्विपासुनाच कवी म्हणून प्रसिद्ध होता . त्यामुळे त्यांनी चरित्रलेखनाच्या दृष्टीने या घरान्याची माहिती मिळवने क्रमप्राप्तच होते. त्याने आपल्या "अनुपुरान" अथवा "शिवभारत" यामधे हे तारीख नमूद केलेली आहे .



 


जेधे शकावालिची नोंद पाहू - "शके १५५१ शुक्ल सवत्सर , फाल्गुन वाद्य तृतीया शुक्रवार ( १९ फेब्रुवारि १६३० ) नक्षत्र हस्त घटी 18 पले 31 गड़ 5 पले ये दिवसी राजश्री शिवाजी राजे शिवानेरिस उपजले" (संदर्भ- जेधे शकावली , शिवचरित्र प्रदीप , पृ १६)

 


आता आपण शिवापुर देशपांडे वहितिल शकावली तील नोंद पाहू - " शके १५५१ शुक्लनाम सवत्सरि फाल्गुन वद्य ३ शुक्रवार ये दिवसी राजे उपजले " याचीही तारीख १९ फेब्रुवारी १६३० हीच येते (संदर्भ- शिवचरित्र प्रदीप पृ ५४)

 



तसेच इथे मी जोधपुरकरांचे अनुवांशिक ज्योतिष शिवराम पुरोहित यांच्या स्वहस्ते बनवलेली हि शिवरायांची जन्मपत्रिकेची प्रतही देत आहे यातील उल्लेख "
फाल्गुन वद्य तृतीया, रात्री, शके १५५१" , ( १९ फेब १६३०).

 



हि पत्रिका प्रथम रावबहादूर गौरीशंकर यांनी प्रसिद्ध केली. पत्रिका ज्योतिषाने जसवंतसिंघा सोबत तो पुण्याला आल्यावेळी बनवली असावी. (संदर्भ- ग. ह. खरे (मराठ्यांचा इतिहास)

 



वरील चार ऐतिहासिक अव्वल पुरावे सिद्ध करतात कि शिवराय यांचा जन्म दिनांक १९ फेब्रुवारी १६३० तारखेला शिवनेरीला झालाया सर्व साधनात एकमत आहे.

 



इतिहास संशोधक संजय सोनवणी म्हणतात " जयंत्या-पुण्यस्मरणे तिथ्यांनीच साजरी करायचे खूळ काही लोकांत का भरले आहे हे समजत नाही.(त्यांना तिथ्या-पंचांगे वैदिक वाटत असतील म्हनून ते असा आग्रह धरत असतील तर तेही चूक आहे...वैदिक पंचांग मुळात अस्तित्वात नाही. राशी भारतियांनी उधार घेतलेल्या आहेत तर तिथ्या अशास्त्रीय चांद्र-मासांवर अवलंबून आहेत!.) तेंव्हा शिवजयंती तारखेनुसारच साजरी करा...कारण ते जागतिक क्यलेंडर आहे" सोनवणी यांचे विचार महत्वपूर्ण आहेत. आपण जागतिक दिनदर्शिकेनुसार शिवजयंती साजरी करावी आणि शिवरायांना विश्ववंदनीय स्वरूप मोठे करावे असे त्यांचे मत आहे. उलट तिथीचा आग्रह करणारे शिवरायांना संकुचित ठरवू पाहत आहेत असे दिसते. म्हणून ऐतिहासिक पुराव्यांना ते फाटा देत आहेत हे स्पष्ट दिसते.- शंकर माने

 


संदर्भ- http://shankarmane03.blogspot.in/2014/02/blog-post.html

 


धन्यवाद- शंकर माने सर.
-

विश्वभुषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 384 व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

विश्वभुषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 384 व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
 



शिवरायांच्या मावळ्यानां एक सांगावेसे वाटते. शिवरायांची जयंती आली म्हटल की सगळे कसे अंनदाने मिरवत असतात. आमचा रुबाब हा वेगळाच असतो. मिरवणुकीत नाचने असे अनेक प्रकार होत असतात. पण कधी शिवचरीत्र समजुन घेतले आहे का?? त्या प्रमाणे वागण्याचा प्रयत्न केला आहे का?? नुसती जयंती करुन काही होत नाही.

 



शिवचरित्र म्हणजे केवळ ढाल तलवारीची लढाई नाही. शिवचरित्र म्हणजे एक विचार आहे. माणसाला माणुस म्हणुन जगण्यास प्रेरित करणारा एक संस्कार आहे. तो संस्कार आपण जपला पाहिजे. शिवरायानी उभ्या आयुष्यात कधी माणसामाणसात भेदभाव केला नाही. जात, धर्म, प्रांत, भाषा या गोष्टीवरून माणसानां वेगळे केले नाही. उलट सर्वांना स्वराज्याच्या एका धाग्यात गुंफुन यशश्वी वाटचाल केली. स्वराज्याला विरोध करणारा माणुस कोणत्याही जातीचा धर्मातील असला तरी तो स्वराज्याचा शत्रु आहे. असेच शिवरायानी मानले. त्यामुळे स्वराज्याचे विरोधक जावळीचे चंद्रराव मोरे आथवा मोघलाना सामील झालेले संभाजी कावजी यांनाही शिवरायानी माफ केले नाही. जातीचा तथाकथित वर्चस्वाद बाजुला ठेवून शिवरायांच्या विचाराणे सर्व समावेशक समाज निर्मितीसाठी आपण प्रयत्न केले पाहीजे.

 



शिवरायांच्या आयुष्यात त्यानी स्त्रियाना मोठा सन्मान दिला. ज्या काळात स्त्रियांवर धर्मव्यवस्थेने अन्यायकारक बंधने लादली होती. त्या काळात ही स्त्रिला अतिशय सन्मानाची वागणुक देणारा हे राजे होते. म्हणुनच गरिब मुलीवर अत्याचार करणा~या रांझ्याच्या पाटलाचे हात तोडण्यात आले.

 



शिवरायांच्या चरित्र्यातुन आपण हा गुण घेतला पाहिजे. आपण नक्की काय शिकले पाहिजे. या दृष्टीने आपणास विचार करणे गरजेचे आहे. स्वःताला मावळे आणि शिवभक्त समजणा~यानों जेंव्हा हे गुण स्विकारुन त्या मार्गाने चालायला सुरुवात करताल तेंव्हाच खरे मावळे असाल.



(विचार- अमोल सावंत.)

 


प्रत्येकाने आपल्या सोयीनुसार शिवाजी महाराजांना वापरले आहे, त्यामुळे कुणासाठी शिवाजी महाराज हिंदुत्ववादी असतात, कुणासाठी मराठी, कुणासाठी मराठा तर एखाद्याला राजपूत आहे म्हणून मिरवून घेण्यात कौतुक वाटते. आजच्या पिढीमध्ये शिवाजी महाराजांचे विचार रुजवायचे असतील तर अगोदर शिवाजि महाराजाविषयीचे लोकामध्ये असलेले गैरसमज दूर करायला हवेत. ते देवाचा अवतार नव्हते तर ते एक तुमच्या आमच्यासारखेच हाडामासाचा माणूस होते व स्वकष्टातून आणि जिजाऊ-शहाजी राजांच्या मार्गदर्शनातून त्यांनी स्वराज्य निर्मिती केली होती. त्यांचे राज्य हे कुणा धर्माच्या विरोधात नाही तर ते स्वकीयांचे राज्य होते, अफझल खानाला मारणे हा त्यांचा धर्म होता कारण तो स्वराज्यावरचे संकट होता पण त्याची कबर प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधणे हा सुद्धा महाराजांचा धर्म त्यांनी पाळला होता. सतराव्या शतकामध्ये जातीपातीची उतरंड असताना त्यांनी सर्व जातीच्या आणि धर्माच्या लोकांना आपल्या सैन्यात आणि प्रशासनात स्थान देवून समतेच्या राज्याची स्थापना करताना आपण धोरणी आणि दूरदृष्टी असलेले राजे आहोत हे दाखवून दिले होते.




 



आज शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आजच्या पिढीमध्ये शिवाजी महाराजांचे एवढे गुण जरी आपण रुजवू शकलो तरी पुढे शिवाजी महाराजांचा वापर कुणी जातीय, धार्मिक व राजकारणातील दंगली साठी करायचा प्रयत्न करताना हजार वेळा विचार करील.

 



(विचार- Vaibhav Kokat.)

 



आज शिवराय असते तर...
आज शिवराय असते तर
निवडणुक लढवून आजमावले असते लोक'मत ।

आज शिवराय असते तर
वापरले असते घोड्या ऐवजी हेलीकॉप्टर ।

आज शिवराय असते तर
दिली असती तलवारी ऐवजी लेखनी हातात ।

आज शिवराय असते तर
बांधली असती मंदिरा ऐवजी ज्ञानाची केन्द्रे ।

आज शिवराय असते तर..........


 


(कवि- Jayant Nikam)

 



शिवजयंती च्या सर्व भारतीयांना हार्दिक सदिच्छा !

 



जय जिजाऊ ! जय शिवराय!

 



विचार- अमोल सावंत, Vaibhav Kokat.

समतावादी गुरु रोहिदास महाराज

आज समतावादी गुरु रोहिदास महाराज यांची ५६४ वी जयंती... (१४ फेब्रुवारी) त्यानिमित्त सर्व भारतीय बांधवांना हार्दिक शुभेच्छा !!
 


जातीवादी, विषमतावादी, अमानवी, अविचारी, अंधश्रध्दाळू तसेच वर्गद्वेश, वर्णद्वेष मानणाऱ्या भारतीय समाजात माघ पौर्णिमा शके १४३३ रोजी रविवारी अस्पृश्य गणल्या गेलेल्या चांभार समाजात संत रविदास यांचा जन्म झाला.



उच्च - नीचतेच्या नावाखाली होणाऱ्या त्रासाला आपला समाज हा त्रासाला होता. ब्राम्हणांनी लादून दिलेल्या प्रथा यांनी सामाज्याची दैना झाली होती.
आणि अशा परिस्थितीत क्रांतिकारी संत रोहिदास यांनी त्यांच्या दोह्यांमार्फात आणि विचाराने
ब्राम्हणी व्यवस्थेवर प्रहार केला होता. जसे कि,




* एकै माटी के सभी भांडे , क्या शुद्र क्या पांडे ....!



अर्थ- गुरु रोहिदास उच्चवर्णिय पंड्याना म्हणतात कि, अरे माणसा शुद्र आणि पंडित या दोघांमध्ये काहीच अंतर नाही आहे . कारण आपण सर्वच एकाच मातीचे सर्व भांडे आहोत . आपण सर्वांनी मातेच्या पोटीच जन्म घेतला आहे . दोघांचे शरीरही रक्ता मासाचे बनले आहे. मग या मध्ये शुद्र आणि पांडे कुठून झालो.



* बता रे पंडित ज्ञानी कोन चाम से न्यारा, चाम का ब्रम्हा ....
चाम का विष्णु चाम का सकल पसारा ...
चाम का अम्बर, चाम की धरणी चाम का है जग सारा ...
छम का योगी चाम का भोगी , चाम का गुरु तुम्हारा ...
जहाँ वहाँ चाम ही चाम, चाम के मंदिर बोलत राम ...
चाम की गऊ चाम का बाछडा, चाम ही धुन ? छम ही ठांडा ...
चाम का हाती , चाम का रजा , चाम के उंट पर चाम का बाजा ...
कतह " रविदास" सुनो रे पंडित ज्ञानी चाम का गुरु नहीं हमारा ...
चाम बिना देह किसकी बनाई ...?


अर्थ- गुरु रोहिदास म्हणतात, सर्वच मानव जात, पशु, प्राणी , वादय येव्हडच नाही तर हे या सर्व जगात सर्वत्र चामड पसरल आहे … मग पंडित सांग चामड्याशिवाय देह कोणाच बर बनवलं आहे ?


* चाम के हम भी , चाम के तुम भी ….!
चामका है जग सारा , चाम बिगर कऊन जीव ही …!!
कहे रविदास चमारा …!!!



अर्थ- गुरु रोहिदास म्हणतात की , अरे मुर्ख मनसा चामड्याचा संबंध चांभार जातीशीच नाही आहे. जगातल्या प्रत्येक जीवाचा चामाड्याशी संबंध असून सर्व जगच चामड्याने व्यापले आहे .)



त्यांनी अस्पृशते विषयी बंड पुकारून आपल्या समाजासाठी प्रबोधनाचे काम केल.



आणि म्हनुनच ब्राम्हणांनी त्यांची संस्कृती वाचवण्यासाठी क्रांतिकारी रविदास महाराज यांना चमत्कारी घोषित करून टाकले. आणि त्यांच्या क्रांतीकारी व विज्ञानवादी विचारांना दाबण्याचा प्रयत्न केला. जसे कि कटौती मधुन सोन्याचे कंगन निघाले, त्यांनी त्यांचे शरीर चिरून जान्हवे दाखवले इत्यादी.



संत रविदास महाराज त्यांच्या दोह्यामार्फत बोलतात कि ,



ऐसा चांहू राज में जहां मिलै सबन को अन्न ...!
छोटो बड़ो सब सम बसै 'रविदास' रहे प्रसन्न ...!!




अर्थ- संत रोहिदास म्हणतात कि, मला समाज्यामध्ये अशी शाशनव्यवस्था हवि आहे जिथे सर्वाना अन्न मिळेल. कोणीही उपाशी राहणार नाही. आणि जिथे लहान-थोर, उच्च-निच, स्पृश्य-अस्पृश्य, सवर्ण - दलित अशी कोणतीही तुच्छ भावना कोणाच्या मनात राहणार नाही. यातच रोहिदास प्रसन्न राहतील.



 

वरील दोह्यावरून आपल्याला समजून कि संत रोहिदास हे फक्त चांभारांचेच गुरु मार्गदर्शक हितदक्षक महापुरुष नसून ते सर्व बहुजन सामाज्याचे हितचिंतक होते.



 

संत शिरोमणी रोहिदास महाराज यांना कोटी कोटी प्रणाम....


 



धन्यवाद- Sant Rohidas Vichar Prabodhan पेज , Vikas Dipak Kadam

 


https://www.facebook.com/pages/Sant-Rohidas-Vichar-Prabodhan/565237973494750



जय रोहिदास... जय भीम !!

दारुच्या नशेत जय भिम काय समजनार..???

दारुच्या नशेत जय भिम काय समजनार..???
 


मागे २ महिण्यापुर्वी माझ्या आईने तिच्या मुळ गाव अमरावती जिल्ह्यातील वरखेड (तुकडोजी महाराजांचे गाव) येथे ज्योतीबा फुले यांची पुर्णाक्रुती दान दिली.तिथल्या बौद्ध बांधवांची ईछा होती की माझ्या हातून त्याचे अनावरण व्हावे.

 


 मी वरखेडला गेलो. माझ बरचसं बालपण तिकडे गेल्यामुळे मला गावातले लोक ओळखतच होते. बालपणीचे मित्र जमा झालेत. म्हाताऱ्या बाया माणस यायचे आणि गाल ओढायचे.... किती मोठा झाला रे.. किती मोठा झाला रे म्हणून लाड ही करायचे.हे सर्व होत असताना माझा मुलगा मात्र माझ्याकडे पाहत होता. त्याला वाटत असेल.. 'लहान मी आहे ! की बाबा..!'

 


मुर्ती अनावरन होण्याच्या अगोदर आम्ही सर्व बसलो होतो.तेव्ढ्यात खुप दारु पिवुन एक माझ्यापेक्षा मोठा मुलगा तिथे आला.त्याचा जीव त्याला सांभाळता येत नव्हता.

 


तो - ' जय भिम '

 


मी - नमस्कार

 


तो - जय भिम राव

 


मी - नमस्कार ..राव !

 


(तो अजूनही सापासारखा डोलत होता)

 

थोडावेळ शांत राहून त्याने बाबासाहेब मला सांगण्याची सुरवात केली.. सर्वजन संवाद एकत होते.

 


तो - बाबासाहेब आंबेडकर असे... त्यांनी असे केले.. त्यांनी तसे केले.

 


मी - कोण आहे आंबेडकर .?

 


तो - राव तुम्ही आंबेडकराना नाही ओळखत.

 


मी - नाही राव ! कोण आहेत हे ? मी तर महादेवाचा भक्त आहे.

 


तो - तुम्ही बाबासाहेबाना नाही ओळखत... काय जमाना आहे ! आता चालतो मी. तुमच्याशी बोलुन काही अर्थ नाही. असे म्हणुन तो उठायला गेला आणि खाली पडला.. पुन्हा उठला आणि.. गर्दीत जावून उभा राहीला.

 


कार्यक्रमात माझे भाषण सुरु झाले... मी ' बाबासाहेबांचे उपकार आणि दलितांची परत फेड' हा विषय मांडला. भाषण भावनात्मक असल्यामुळे लोकांच्या डोळ्यातून पाणी आले. स्टेज वरुन उतरल्यावर मघानचा तोच तरुण माझ्याजवळ आला.. आणि रडायला लगला..

 


तो - साहेब.. मला माफ करा.. आजपासुन दारु कधीच पिणार नाही.

 



मी - दादा ! तुझा आंबेडकर हा कदाचीत दारुड्या असेल... माझा बाबासाहेब स्वाभिमान.. आहे हे समजन्यासाठी प्रद्न्या लागते.. म्हणुन तुम्ही मला दारु पिवुन जय भिम म्हटले तेव्हा मी तुम्हाला नमस्कार म्हटले होते... दारुच्या नशेत जय भिम काय समजनार..
कालच पुन्हा मी वरखेड या गावावरुन आलो.मला निरोप द्यायला आलेल्या त्या सर्व मानसात तो... तरुणही होता... माझ्या कारजवळ येवून तो म्हणाला ..

 



तो - दादा जय भिम ..

 


मी - दादा जय भिम ....( आता त्याने दारु कायमची सोडली आहे.)

 



मित्रानो ही पोस्ट नसुन एक संदेश आहे. नुसत फेस बुक वर लिहुन चालनार नाही.आमचा समाज अतिशय मागासल्या स्थीतीत आहे. त्यातल्या त्यात दारुच्या नशेत... काय करु शकतो आम्ही यासाठी हा प्रश्न नक्की पडू द्या !

 



(लेखंक डॉ. बाबासाहेब आंबेडकरांणवर पी.एच.डी करत आहेत)




 


लेखं- हर्षवर्धन ढोके.

४ फेब्रुवारीला `वर्ल्ड कॅन्सर डे` ... पाहा कोणी-कोणी हरवलं कॅन्सरला !!

४ फेब्रुवारीला `वर्ल्ड कॅन्सर डे`... पाहा कोणी-कोणी हरवलं कॅन्सरला !!
 


`कॅन्सर`बाबत जागृती करण्यासाठी त्याच्या कारणांची आणि उपचारांची माहिती देण्यासाठी दरवर्षी ४ फेब्रुवारीला `वर्ल्ड कॅन्सर डे` साजरा करण्यात येतो. किमोथेरपी सारख्या उपायाचा विज्ञानानं शोध लावलाय. पण तरीही या असाध्य आजारानं अनेकांना आपल्या विळख्यात घेतलंय. असं म्हणतात, कॅन्सर झाल्यानंतर आजारापेक्षा मानसिकरित्या रुग्ण लवकर खचतो, हार मानतो त्यामुळं त्याचा लवकर मृत्यू होतो. मात्र जे व्यक्ती या कॅन्सर सोबत लढतात ते कँसरला हरवतात सुद्धा. जगभरात कॅन्सरनं मृत्यू होणारे अनेक व्यक्ती आहेत. मात्र कॅन्सर सोबत झगडत आजही आपलं आयुष्य जगणारे अनेक लोक आहेत.


चला एक नजर टाकूया अशा सेलिब्रेटींवर की ज्यांनी कँसरला हरवलं...



मनीषा कोईराला, अभिनेत्री-
 


९०च्या दशकात आपल्या सौंदर्यानं सर्वांच्या हृदयात बसलेली अभिनेत्री मनीषा कोईराला. अनेक वर्षांपासून ती बॉलिवूडपासून दूर झालीय. मात्र २०१२मध्ये ती चर्चेत आली जेव्हा ति हॉस्पिटलमध्ये भर्ती असल्याची बातमी आली. डॉक्टरांनी तिला ओवेरियन कॅन्सर असल्याचं निदान केलं. मात्र तिनं खचून न जाता कॅन्सरसोबत लढा दिला. उपचारासाठी ती अमेरिकेत गेली. डिसेंबर २०१२मध्ये तिनं शस्त्रक्रिया करवली, जी यशस्वी झाली. उपचारांनंतर परतल्यानंतरचे मनीषाचे फोटो सोशल मीडियावर झळकले. त्यात तिच्या डोक्यावर केस नव्हते. मात्र तिचं हास्य हे सांगत होतं की "पाहा मी कॅन्सरला हरवलं".



युवराज सिंग खेळाडू -


`जब तक बल्ला चल रहा हे तब तक थाट हे`, असं एका जाहीरातीत अभिनय करताना युवराज सिंग म्हणाला होता. मानवी जीवनाचा फोलपणा सांगणार वाक्य युवी जगलाय. त्याला कॅन्सर झाला होता. तमाम क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत असणाऱ्या युवराजच्या आयुष्यासाठी जगभरातील चाहत्यानी प्रार्थना केली होती. आता युवी बरा झालाय. युवी मैदानावर परतलाय. कॅन्सर त्याला बरचं काही शिकवून गेलाय, असं युवी म्हणतोय.




लीसा रे, अभिनेत्री-



`वाटर`, `कसूर` आणि `बॉलिवूड-हॉलिवूड` सारख्या चित्रपटांमधून आपल्या अभिनयानं आणि सौंदर्यानं सगळ्यांचं मन जिंकणारी कॅनेडियन अभिनेत्री लीसा रे... २००९मध्ये मल्टिपल मायलोमा म्हणजेच अस्थिमज्जा कॅन्सर तिला झाल्याचं पुढं आलं. १०-११ महिने ती या आजारासोबत लढत होती. कॅन्सरसोबत यशस्वी लढा देत तिनं त्यावर विजय मिळवला. त्यासाठी तिनं टोरंटोतील प्रिंसेस मार्गारेट हॉस्पिटलमध्ये आपला उपचार केला आणि स्टेम सेल ट्रांसप्लांट करवलेत.



बारबरा मोरी, अभिनेत्री-



बारबरा मोरी ही मेक्सिकन मॉडेल अभिनेता हृतिक रोशन सोबतच्या `काईट` या चित्रपटामुळं ती बॉलिवूडशी जोडली गेली. भारतात तिची खूप चर्चा झाली असली तरी बारबरानंही कॅन्सरला हरवलंय, हे कुणाला माहित नाही. आपल्याला कॅन्सर आहे हे कळल्यानंतर तिनं न खचता त्याच्यासोबत लढा दिला. २०१०मध्ये पूर्णपणे बरी झाली.


क्रिस्टीना अप्पलगेट, अभिनेत्री-
 


क्रिस्टीना अमेरिकेतल्या छोट्यापडद्यावरील चर्चित अभिनेत्री आहे. २००८मध्ये क्रिस्टीनाला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचं कळलं. तिच्या आईला कॅन्सर होता. जेनेटिक्स कारणामुळं तिलाही हा आजार झाला. मात्र तिनं हिम्मत न हरत आपल्यावर पूर्ण उपचार करून घेतले आणि कॅन्सरला हरवलं. आता ती प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करते.


 

लान्स आर्मस्ट्राँग, खेळाडू-



`लान्स आर्मस्ट्राँग` फ्रान्सचा सायकलिंगचा मास्टर कधीही हार न मानणारा खेळाडू, टेस्टीक्युलर कॅन्सर झालेला तेव्हा त्यातून बरा होण्याची शक्यता केवळ ४० टक्केच होती. आजाराचं निदान होता-होता याला तिसऱ्या स्टेजचा कॅन्सर झाला होता. लान्स आर्मस्ट्राँगने याही परिस्थितीत आपल्या खिळाडूवृत्तीनं कॅन्सरशी झुंज दिली. कॅन्सरमधून बरा झाल्यावर त्याने आपल्या लिव्हस्ट्राँग या संस्थेच्या माध्यमातून कॅन्सर पिडीत व्यक्तीनां मदतीचा हात दिला. कॅन्सरसोबत त्याची झुंज संपली पण गेली २५ वर्ष इतरांसाठी लान्स आर्मस्ट्राँग कॅन्सरशी लढा सुरू आहे.




अँजेलीना जोली, हॉलिवूड अभिनेत्री-

हॉलीवूडमधील सुंदर अभिनेत्री एंजेलीना जोलीच्या आईचा ब्रेस्ट कॅन्सरने बळी घेतला होता. त्यामुळे अँजेलीनाला ब्रेस्ट कॅन्सर होण्याची शक्यता होती. अँजेलीना वेळोवेळी काळजी घेत होती. डबल मॉस्टेकॉटॉमी करून अँजेलीनाने आपल्या या दुर्धर आजारापासून स्वतःचे संरक्षण केले. या आजाराबद्दल महिलांमध्ये जागृती करण्यावर अँजेलीना लक्ष देत आहे. सुंदरतेसह आरोग्य हा अँजेलीनाचा जीवनाबद्दल दृष्टीकोन आहे.



 

संदर्भ- http://zeenews.india.com/marathi/slideshow/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE_307.html



धन्यवाद- झी २४ तास.


छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...