आजचा तरूण हे असलेच काही काही पाहत वाढला.

धर्मातीत राज्यातल्या आकाशवाणीवर सकाळच्या वेळी ’देवा तुझ्याशिवाय आम्हाला आधार नाही’ ह्या अर्थाचे टाहो ऎकत आला. त्याच्य ऎन उमेदीच्या वर्षात भाषावार प्रांतरचनेचे वाद त्याने पाहिले. भाषिक द्वेषाची परिसीमा पाहिली. ज्या समाजाला शिक्षणाची दारे बंद होती, त्या समाजातून नवा सुशिक्षित वर्ग जन्माला आला. त्याने आपल्या पददलित समजाचे अंतरंग उघडे करून दाखवायला सूरुवात केली. त्यातुन क्षोभाचे दर्शन घडू लागले. ....

हल्लीच्या पिढीला आदराची भावना नाही हे म्हणतांना ज्याच्याविषयी आदर बाळगावा अशी उभ्या देशातील किती माणसे त्यांना दाखवता येतील ?
आमच्या विज्ञानविभागाचे प्रमूख सत्यसाईबाबांच्या मागून जाताना दिसतात आणि माणसाचे भविष्य माणसनेच घडवायचे आहे हे सांगण्या-या समाजवादी तत्वज्ञानाचा घोष करणारे पुढारी मंत्रिपद मिळावे म्हणून गणपतिबाप्पाला साकडे घालतात.....
एका बाजूला ३५ - ३५ मजल्यांच्या हवेल्या उठत असलेल्या तो पाहातो त्याबरोबर झोपडपट्ट्या वाढतांना त्याला दिसतात. लोकनेत्यांचे उच्चार आणि आचार यात त्याला ताळमेळ दिसत नाही. मग त्याचा संताप उफाळून येतो. तो नविन कवीच्या कवितांमधुन कधी निराशेचा, कधी वैतागाचा सूर घेवून बाहेर पडतो तर कधी विध्वंसाची भाषा करीत येतो.
तरूण मनाच्या ह्या अस्वस्थतेने वडीलपिढी अस्वस्थ न होत, त्यांना बेजबाबदारपणाणे नावे ठेवतांना आढळते. प्रत्येक काळात पिढ्यांतली दरी असते. पण गेल्या काही वर्षात ती अधिकच भयान होवू लागली आहे. हल्लीच्या पिढीला मुल्यांची कदरच नाही हे म्हणणे कोडगेपणाचे आहे. चांगली मूल्ये जतन करण्यासाठी आयुष्याचा होम केलेली माणसेच त्यांना दिसली नाहीत.
- - ' खिल्ली ' मधून साभार

नवरा मेल्यावर..??

अकाली नवरा मेल्यावर
काय करावं त्याच्या वस्तूंचं,
सामाना-सुमानाचं ?
ठेवणीतले कपडे, शर्ट-प्यँट वगैरे
गरिबाला देऊन टाकावं
किंवा घ्यावी भांडी बोवारणीकडून
तरी उरतोच प्रश्न त्याच्या अंडरविअरचा
मोबाईल येईल वापरता
सिमकार्ड बदलून
पण काँटॅक्ट लिस्टमधले
कलीग्जचे, मित्र-मैत्रिणींचे नंबर्रस्
करावे डिलीट की असू द्यावेत ?
गेल्या सात-आठ वर्षांत
डबलबेडवर एकाच बाजूला
लागलेली झोपायची सवय मोडता येईल
त्याची उशी नजरेआड करून ?
वर्षानुवर्ष त्याने लिहिलेल्या डाय-यांना
त्यात नोंदवलेल्या स्वप्नांना,
इच्छांना, आकांक्षांना
रद्दीत असा कितीसा मिळेल भाव ?
तो गेल्या दिवसाच्या आदल्याच रात्री
बंद पडलेलं रिस्ट वॉच
सांभाळावं उराशी
गरज नसलेल्या सहाव्या बोटासारखं ?
त्याच्या चपला द्याव्यात फेकून
की वाट पहावी
मुलाला त्या येतील याची ?
अर्धवट वाचून झालेल्या
कांदबरीच्या कुठल्याशा पानावरून
माझ्याकडे पाहणारा त्याचा चष्मा
ठेवावा मिटून
की सतत अनुभवावी जाणिव
तो पाहत असल्याची ?
हे मंगळसूत्र ठेवावं काढून
की ढाल म्हणून बाळगावं
परपुरूषांविरोधात
ओशटलेल्या नजरांपासून बचावाकरता ?
त्याच्याऐवजी मी जर गेले असते
तर हे शिल्लक राहिलेले काँडम्स
त्यांने दिले असते फेकून ?
कवी- गीतेश गजानन शिंदे
संपर्क - ९८२०२७२६४६

अग्निपुत्र : भाग 2

रुद्रस्वामींचा चेहरा जरा चिंतित होतो.
‘‘म्हणजे? आम्ही समजलो नाही. आमच्यापासून तुम्हाला कोणता धोका आहे? माझ्या माहितीप्रमाणे युध्दसंहाराव्यतिरिक्त आमच्या हस्ते तुमच्यापैकी कुणाचाही वध झालेला नाही. आणि राहिला प्रश्न नामशेष होण्याचा, आमच्या मनात तसा विचार देखील आलेला नव्हता.’’
‘‘आम्ही आपल्या विधानाशी पुर्णतः सहमत आहोत. आपण आमच्या संहाराचा विचार देखील मनात आणला नव्हता. मात्र या सृष्टीचा हा नियमच आहे, तुम्हाला तुमचा कूळ वाचवायचा असेल तर ज्याच्यापासून तुम्हाला धोका आहे त्याचा समूळ नाश करा.’’ सुर्वज्ञ दिर्घ श्वास घेतात. रुद्रस्वामी आपल्या अनुयायांना त्यांचे बांधलेले हात सोडायला सांगतात. अनुयायी सुर्वज्ञचे हात सोडतात. एक अनुयायी त्यांच्यासाठी जल घेऊन येतो. रुद्रस्वामी आपल्या विश्वासू अनुयायांबरोबर त्यांच्यासमोर बसलेले असतात. जलप्राशन केल्यानंतर सुर्वज्ञ पुढे बोलू लागतात.


‘‘आपण ज्या भुतलावर आहात त्याला पृथ्वी असे म्हणतात. ही पृथ्वी गेल्या 350 अब्ज वर्षांपासून अस्तित्वात आहे. आधी हा फक्त एक गोळा होता ज्यावर कोणताही जीव नव्हता. पृथ्वीवरील वातावरण अगदी अस्थिर होतं. ऋतू सतत बदलत असायचे. अशातच पृथ्वीवर पाणी निर्माण झालं आणि त्या अनुशंगाने पृथ्वीवर जीवांची निर्मिती सुरु झाली. आधी किटकरुपात असलेले हे जीव कालांतराने पाण्यात पोहू लागले. त्यांचा शारीरिक विकास चांगला झाला तेव्हा पोहणाऱ्या जीवांनी त्या किटकांचा नाश केला. त्यानंतर जलचरांमध्ये वेगवेगळ्याा हवामानानुसार आणि स्थानानुसार आणखी बदल होऊ लागले. काही जलचर पाण्यातच राहू लागले तर काही जमिनीवर आले. त्याच वेळी काही जलचर सरपटू लागले. सरपटणारे जीव आमचे पूर्वज होते. जसजसे शारीरिक बदल होऊ लागले तसतसे आकाशात उडणारे जीव सुध्दा या पृथ्वीवर दिसू लागले. या सर्व कालावधीमध्ये खुप मोठा काळ लोटला गेला. अनेक जाती निर्माण झाल्या आणि लगेच नष्ट झाल्या तर अनेक जातींनी शेवटपर्यंत तग धरला. सर्वांमध्ये इतके बदल होत होते की पृथ्वीवर शेकडो जाती अस्तित्वात आल्या. आल्या आणि आपापल्या अस्तित्वासाठी एकमेकांना संपवू लागल्या. ज्या वाचल्या त्यांनी आपल्या वंशजांना अधिक विकसित करण्याचं कार्य सुरु ठेवलं. आमचे पुर्वज मात्र या सर्वांपासून खुप दूर उत्तरेकडे (आत्ताचे युरोप) होते. मात्र आमच्यापैकी काही जाती मागे राहिल्या असतील असं त्यांना सतत वाटत होतं. तरीही आमच्या पुर्वजांनी बाहेरच्या जगाशी संपर्क पुर्णतः बंद केला आणि आमचे पुर्वज एका वेगळ्याा विश्वात विकसित होत गेले.’’ आणखी वाचा

गाईचे आत्मकथन

गाईला कुरवाळत कुरवाळत
वैदिकांची ओळख विचारली
तिने डोळे ताणले, कान टवकारले 
अन् शेपूट हालवून धूम ठोकली
हजारो
हजारो वर्षांची कत्तल डोळ्यासमोर येताच चर्मण्यवतीच्या पाण्यापेक्षाही
तिचे डोळे लाल झाले..
"आम्ही शिकारीत कमी
यज्ञात जास्त मारल्यागेलो "
हे तिने आत्मकथनात लिहिले
माणूस करूणामय असतो
प्राणीमात्रांवर दया करतो
हे तिला ठावुकच नव्हते बुद्धापर्यंत
हे यज्ञयागाच्या धर्मशास्त्रा!
मी लिहित आहे तुझ्या कत्तलीची कविता..
धर्मशास्त्रांच्या अमानुष नोंदी हा डॉ. मच्छिंद्र चोरमारे यांचा 4 था कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. त्यातील कविता
धन्यवाद- सुरेखा सोडे

एसटी वर्कशॉपमधील कष्टकरी हिरकणी

कुणी आयटीआय करून डी़एड़ केलंय तर कुणी कृषी पदविका, कुणी पदवी घेत आहे. मात्र कामाची लाज न बाळगता येथील एसटी वर्कशॉपमध्ये सहा हिरकणी पुरुषांच्या बरोबरीने मेकॅनिकची कामे करीत आहेत.
मंदाकिनी सलगर, वंदना निंबर्गीकर, भारती वाघमारे, सविता पुजारी, वंदना कांबळे, अनिता माने सोलापूर बस डेपोमधील वर्कशॉपमध्ये मेकॅनिक म्हणून कार्यरत आहेत़ सहा महिन्यांपूर्वी त्या रुजू झाल्या़ मात्र पुरुष कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने त्या एसटी दुरुस्तीची सर्व कामे कुशलतेने करीत आहेत.
मंदाकिनी सलगरने आयटीआयनंतर कृषी पदविका घेतली आहे. वंदना कांबळे यांचे डी़एड़ झाले आहे़. वंदना निंबर्गीकर पदवीधर आहेत. भारती वाघमारे कला शाखेचे शिक्षण घेत आहे. सविता पुजारीने बी़ए़ पूर्ण केलंय़ अनिता माने हिने आयटीआयनंतर बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे.

डेविल आता अग्निपुत्र स्वरुपात

डेविल ही कादंबरी येत्या १ मे २०१५ पासून अग्निपुत्र या शीर्षकाने मराठीतून आपल्यासमोर येत आहे. मराठी कादंबरीचे लेखन अभिषेक ठमके यांनी केले आहे. मराठी भाषेत साहित्य विभागात साय-फाय विषय खूपच दुर्मिळ आहेत. इंग्रजी भाषेमध्ये साय-फाय विषयांची भलीमोठी यादी पाहता अभिषेक ठमके यांनी मराठी भाषेमध्ये साय-फाय विषय हाताळायला सुरुवात केली आहे. ब्लॉग subscrib करा आणि एका अनोख्या विषयाचा अनुभव घ्या.


ब्लॉग चा पत्ता : www.agneeputra.blogspot.in

अभिषेक ठमके यांची साहित्यकृती :

  • मैत्र जीवांचे (मराठी कादंबरी)
  • महाराष्ट्रातील संत (मराठी पुस्तक)
  • अर्थ मराठी ई-दिवाळी अंक २०१३ आणि २०१४ (संपादक)
  • महाराष्ट्राचे शिल्पकार (Android Application)
  • History of Maharashtra (English Book)
  • The Great Tales of Panchatantra (English Book)
  • She Loves Her (English Book)

टाटांनी घेतला 'अपमाना'चा बदला


काळ कधी, कोणासाठी थांबत नाही असं म्हणतात. अशीच काहीशी घटना रतन टाटांसोबत १९९९ मध्ये घडली. बोलावणं आल्याने रतन टाटा आपल्या चमूसह त्यावेळी अमेरिकेत डेट्रॉइटला गेले होते. मात्र अतिशय वाईट पद्धतीने अपमान झाल्याने त्यांना तिथून परतावे लागले. नंतर २००८ मध्ये म्हणजे नऊ वर्षींनी टाटांनी आपल्या अपमानाचा बदला घेतलाच.

हॅचबॅक इंडिका नावाने टाटा समूहाने १९९८ मध्ये आपली पहिली कार बाजारात आणली. पण त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कंपनीने हा कार उद्योग फोर्ड मोटर्सला विकण्याची तयारी सुरु केली. टाटा समूहाचे मुख्यालय असलेल्या बॉम्बे हाऊसमध्ये येऊन फोर्डच्या अधिकाऱ्यांनीही खरेदीत रुची दाखवली. आणि त्यानंतर डीलसाठी टाटा समूहाला अमेरिकेत डेट्रॉइटमध्ये बोलवण्यात आलं. त्यावेळी रतन टाटा आपल्या प्रमुख अधिकाऱ्यांसह १९९९ मध्ये डेट्रॉइटला गेले. 'तुम्हाला काही माहितीच नव्हती तर कार उद्योगात उतरलेच कशाला? तुमचा हा उद्योग आम्ही खरेदी करतोय याबद्दल तुम्ही आमचे उपकारच मानायला हवेत', असं त्या बैठकीत फोर्डकडून सुनावलं गेलं. त्या बैठकीत सहभागी असलेले टाटा समूहातील प्रमुख अधिकारी प्रवीण कडले हा सर्व घटनाक्रम सांगत होते. या अपमानामुळे टाटा मोटर्सच्या टीमने संध्याकाळी लगेचच मायदेशी रवाना होण्याचा निर्णय घेतला. परतीच्या प्रवासात रतन टाटा खूपच उदास दिसून आले, असं कडलेंनी सांगितलं.


१९९९ मध्ये झालेल्या अपमानाचा बदला अखेर नऊ वर्षांनी म्हणजे २००८ मध्ये टाटा समूहाने फोर्डला चुकता केला. प्रमुख ब्रॅण्ड असलेल्या जॅग्वार आणि लँड रोवरला खरेदी करत टाटा समूहाने फोर्डला सनसणीत चपराक दिली. 'जेएलआर' खरेदीकरुन टाटा समूहाने फोर्डवर खूप मोठे उपकार केले, असं 'जेएलआर' डीलनंतर फोर्डचे अध्यक्ष बिल बोर्ड यांना बोलावं लागलं. अशी माहिती कडलेंनी दिली. टाटा समूहाने २००८ मध्ये २.३ अब्ज डॉलरमध्ये 'जेएलआर'ला खरेदी केलं होतं. जागतिक पातळीवर 'जेएलआर' आता टाटांच्या नावाने धावतेय.

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...