ती लंगडत लंगडत माझ्याकडे आली.मी विचारलं, तायडे काय झालं? पायाला काही लागलयं का? सोफ्यावर बसत ती म्हणाली, अरे भैय्या,पायातले जोडवे आखुड झाल्यामुळे बोटं।ना इजा झालीय.जो-याचा चिमटा बसलाय. जोडवे जरासे सैल करुन दे ना..! मी पाहीलं तर खरचं बोटं सुजली होती.त्यावर मी म्हटलं, तायडे, तूला ञास होतो ना, मग जोडवेच काढुन टाक. नको घालत जावू. ती-वाटतं तसचं करावं पण सासु आणि नव-याला कदाचीत नाही आवडायचं. म्हणुन.. जराशा हळुवारपणे मी तीच्या पायातले जोडवे काढुन तीच्या हाती दिले. तेव्हा कुठे तीनं सुस्कारा सोडला. त्यावर ती म्हणाली, थोडेसे मोठे करते अन पून्हा घालते.
त्यावर मी म्हटलं, त्यापेक्षा एक कर, तूझ्या नव-याला दे. आठ- दहा दिवस घालुन बघ म्हणावं.म्हणजे त्यालाही त्या जोडव्यं। ची महती पटेल. ती-तू पण ना ! काहीही बोलतोस. पण प्रयोग करायला हरकत नाही. मी-खरेच करुन पहा. जोडव्यातुन तूला मूक्ती मिळेल आणि काही दिवस घालुन पाहील्यानंतर नको असलेल्या रुढी, परंपरेचं ओझं वाटुन तो ही स्वत:ची मुक्तता करुन घेईल.. बघ जमेल तेवढं आधी स्वत:हासाठीच कर.उद्या आपसुकचं ते जगाच्या भल्यासाठी होऊन जाईल...!!
Thank u.. ©जावेदाJindagi (25/2/2015)
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!