शिवाजी.. नावासारखे नाव. फक्त तीन अक्षरे. पण तीन शतके उलटून गेल्यावरही हि तीन अक्षरे कानांवर पडल्याबरोबर आपल्या हृदयाची स्पंदने आनंदाने आणि अभिमानाने उत्तेजित होतात. आपल्या नसानसांतून रक्ताचा प्रवाह योध्यांच्या चौखूर उधळलेल्या घोड्यांप्रमाणे वेगाने आणि आवेगाने झेपावू लागतो. कोणती जादू आहे या तीन अक्षरांत? कोणते रसायन आहे या तीन अक्षरांत? खर तर जादू या तीन अक्षरांची नाही. ते रसायन या तीन अक्षरांचे नाही. ती जादू आहे, या तीन अक्षरांचे नाव धारण करणाऱ्या एका उज्वल आणि उदात्त चरित्राची.. ते रसायन आहे एका नैतिक आणि निरामय चरित्राचे.. तो माणसा माणसांना झपाटून टाकणारा प्रभाव आहे, विलक्षण सामर्थ्य आणि सुलक्षण शील यांच्या समन्वयाचा !!
शिवाजी महाराजांनी काय केले ? तर महाराजांनी जे झोपले होते ते जागे केले.. जे जागे होते ते उभे केले.. जे उभे होते ते चालायला लावले.. जे चालत होते ते धावायला लावले आणि जे धावत होते त्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशान दिले आणि स्वराज्य निर्माण केले.
जातीयता मोडण्यासाठी शिवाजी महाराज यांनी आपल्या घोडदल आणि पायदळ तसेच नौदल यात सगळ्या जातीच्या लोकांना स्थान दिले तसेच आपल्या जवळच्या आणि निष्टावान मावळ्यात महार, मांग.. मुसलमान यासह सगळ्याच लोकांची महाराज समानेतेने वागायचे म्हणजे त्यांनी आपल्याला समतेचा पाठ घालून दिला आहे.
आज मात्र शिवाजी महाराज यांचे नाव घेणारे काही जातीवादी लोक भयंकर स्वरुपात जातीयता पाळत आहेत भेदाभेद पाळत आहेत आणि वरून शिवाजी महाराज यांचे नाव घेत आहेत, अशा भामट्या लोकांपासून आज समाजाला खूप मोठा धोका आहे त्यासाठी शिवाजी महाराज यांचे नाव घेणारा माणूस हा जातीयता पाळणारा आणि भेदाभेद पाळणारा शिवाजी महाराज यांचा खरा अनुयायी असूच शकत नाही.
चला तर मग आजपासून शिवाजी महाराज यांची यांची जयंती साजरी करून जातीयता गाढून टाकू आणि महाराज यांनी दिलेला समतेचा संदेश आचरणात आणू या ... (Thank u.. Vinayak Landage)
जय शिवराय… जय जिजाऊ… जय शंभुराजे
छत्रपती शिवाजी महाराज, यांच्या जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा !!
No comments:
Post a Comment
धन्यवाद !!