जोतिबांचा मार्ग अनुसरला पाहिजे


जोतिबांचा अनुयायी म्हणवून घेण्यात मला यापूर्वी कधीही लाज वाटली नाही आणि आजही वाटत नाही. मी आत्मविश्वासाने आज असे म्हणू शकतो की मीच जोतिबांचा एकनिष्ठ राहिलो आहे, आणि मला खात्री आहे की या देशात जनतेचे सर्वांगीण हित करणारा असा कोणताही पक्ष पुढे आला त्यांनी कोणतेही नाव धारण केले तरी त्यांना जोतिबांचे धोरण, त्यांचे तत्वज्ञान आणि त्यांचे कार्यक्रम घेऊनच पुढे यावे लागेल. तोच एक खरा लोकशाहीचा मार्ग आहे. 

समाजातील ८० % लोकांस विद्या प्राप्ती करणेस न देणे आणि त्यांना सामाजिक, आर्थिक व राजकीय गुलामगिरीत जखडून ठेवणे हे सर्व दिसत असता स्वराज्य, स्वराज्य म्हणून ओरडण्यात काय फायदा ? स्वराज्याचा फायदा सर्वांना मिळाला पाहिजे मागासालेल्या वर्गाच्या सर्वांगीण उन्नतीचा कार्यक्रम घेऊन पुढे आल्याशिवाय कोणताही पक्ष खऱ्या अर्थाने जनतेचे नेतृत्व करू शकत नाही हे सूर्यप्रकाशा एव्हढे स्पष्ठ आहे. 



संकलन - विवेक घाटविलकर
दि. २८ नोव्हेंबर २०१४ क्रांतीसूर्य राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांच्या १२४ व्या स्मृती दिनानिमीत्त विनम्र अभिवादन.

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ह्युजचे निधन

उसळता चेंडू डोक्याला लागल्याने कोमात गेलेला ऑस्ट्रेलियाचा झुंजार फलंदाज फिलिप ह्युज याचे आज भारतीय वेळेनुसार सकाळी निधन झाले. सिडनी येथील व्हिन्सेंट रुग्णालयात वयाच्या २५व्या वर्षीच त्याने अखेरचा श्वास घेतला. ह्युजच्या अकाली निधनामुळे क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सिडनी क्रिकेट ग्राउंडवर शेफील्ड शील्ड क्रिकेट स्पर्धेदरम्यान गोलंदाजाने टाकलेला उसळता चेंडू डोक्याला लागल्याने मंगळवारी ह्युज मैदानावरच कोसळला होता. ह्युजची प्रकृती परवापासून गंभीरच होती.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे व्यवस्थापकीय कार्यकारी संचालक पॅट होवार्ड यांनी सांगितले, 'आम्ही खेळाडूंशी बोलून त्यांच्या भावना जाणून घेतल्या आहेत. या कठीण स्थितीत खेळाडूंच्या पाठीशी उभे राहण्यासाठी खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांचे काउन्सिलिंग आम्ही सुरूच ठेवणा र आहोत. या कठीण काळात खेळाडू, क्रिकेटशी संबंधित सगळे जण ह्युजच्या कुटुंबियांसोबत आहोत.'

ह्युजला कसोटी सामन्यांसाठी संधी मिळण्याची शक्यता होती. 'न्यू साउथ वेल्स'चा गोलंदाज शॉन अॅबॉटच्या बाउन्सरवर हुक मारण्याच्या प्रयत्नात असताना चेंडू ह्युजच्या डोक्यावर आदळला. हेल्मेट परिधान करूनही त्याला चेंडूचा आघात सहन झाला नाही. तो तत्काळ मैदानावर कोसळला. त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

दरम्यान, शेफील्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धेची फेरी रद्द करण्यात आली आहे. व्हिक्टोरिया आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, क्वीन्सलँड आणि टास्मानिया यांच्यातील सामनेही रद्द करण्यात आले आहेत.

टूू द लास्ट बुलेट....

To The Last Bullet Book Cover
२६/११ च्या घटनेत एकंदर कामा हॉस्पिटल परिसरात नेमके काय घडले याबाबत वृत्तपत्रे, टिव्ही व ईतर मिडीया यात कुठेही ठळक तपशील नाही. किंबहुना अनेक वेळा "ईतक्या अनुभवी अन हुषार अधिकार्‍यांनी एकाच जागी एकत्र जायची चूक केली कशी"? असे निव्वळ संतापजनक अकलेचे तारे लोकांनी तोडलेले आपण ऐकलेले आहेत. नेमकी याचेच ऊत्तर शोधायचा ध्यास या पुस्तकातून समोर येतो.
विनीता कामटे लिहीतात-
"अशोकची साथ आता कायमची संपल्याचं दु:ख्ख आता माझ्या काळजात सलत होतं पण त्याहीपेक्षा ही घटना का घडली याची बोच माझ्या मनात अधिक होती. सात्वनाला येणारे सुध्धा अगदी सहजपणे, नकळत बोलून जात होते, "करकरे, कामटे, आणि साळसकर यांना स्थितीचं गांभीर्य कळलच नाही." या अशा वाक्यांनी मी मनातल्या मनात पेटून ऊठत होते. हे कसं शक्य आहे? हा प्रश्ण माझा पिच्छा सोडत नव्हता. एकीकडे हे तिन्ही अधिकारी एका रात्रीत सगळ्या देशाचे हिरो झाले होते. चौकाचौकात लोक त्यांचे फोटो लावून त्यांना अभिवादन करत होते. माझ्या मनात मात्र विचारांचं रणकंदन चालू होतं. हे तीनही अधिकारी एकाच वाहनात बसले अन अचानक झालेल्या गोळीबारात ठार झाले- असच चित्रं मुंबई पोलिसांकडून माध्यमांपुढे रंगवलं जात होतं.
मला ते मान्य नव्हतं. करकरे- त्यांची अत्यंत काटेकोर कार्यपध्धती आणि दूरदृष्टी यासाठी प्रसिद्ध होते. साळसकर एन्काऊंटर स्पेशालिस्ट होते. तर, तातडीने प्लॅनिंग करणे हा अशोकचा लौकीक होता आणि शस्त्राचा वापर करण्यात तो कमालीचा तरबेज होता असं असताना हे तिन्ही अधिकारी कुठलिही योजना न आखता किंवा थोडाही संघर्ष न करता मृत्त्यू स्विकारायला तयार होतील यावर विश्वास ठेवायला मी तयार नव्हते. मुंबई पोलिसांकडून मात्रं तसच भासवलं जात होतं"..
त्यावेळी मी मनाचा निर्धार केला "मी वाट्टेल ते कष्ट घेईन, पण या प्रकरणातलं सत्त्य शोधून काढीनच". देशासाठी वीरमरण पत्करणार्‍यांच्या बलिदानाचं पावित्र्य कायम राखण्यासाठी हे सत्त्य शोधून काढणं हे आपलं एकमेव कर्तव्य आहे असं माझं मन मला सांगत होतं."
लेखक - वनिता अशोक कामटे
संदर्भ- टूू द लास्ट बुलेट..(BOOK)

छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र Android वर

शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजीने एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले.

रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासात त्यांना महत्त्वपूर्ण स्थान आहे.

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...