हिंदूंनो बाबासाहेब आपले आहेत... लेख काळजीपूर्वक वाचा !!

ते नाहीत एका जातीचे.. ते नाहीत एका धर्माचे 
ते भारत देशाचे पुञ आहेत.. हिंदूंनो बाबासाहेब आपले आहेत...


एखाद्या सभेत बाबासाहेबांच नाव घेऊन कोणीतरी हिंदू समाजावर टिका करतो आणि हिंदूंचा समज होतो की बाबासाहेब आपल्या विरोधी आहेत पण तस नाही...


देशाचा ध्वज भगवा असावा यासाठी प्रयत्न करणारे बाबासाहेब... त्यांनी राज्यघटना लिहिली ती प्रत्येक नागरिकांसाठी... प्रत्येक भारतीयांच्या साठी...

कोलंबिया विद्यपिठाने जाहिर केल. शेकडो वर्षात असा बुद्धिमान विद्यार्थी झाला नाही.. तो भारतीय विद्यार्थी म्हणजे बाबासाहेब...
शेतकऱ्यांनो जाती पाती सोडून शेतकरी म्हणून एक व्हा... हे सांगणारा शेतकऱ्यांचा नेता म्हणजे बाबासाहेब...

गरोदर स्त्रीयांना बाळंतपणात पगारी रजा मिळावी याचा आग्रह धरणारे बाबासाहेब...

शिकलेल्या आदीवासीचा शिक्षणाचा पुरावा सर्व ग्राह्य धरला जावा असे सांगणारे बाबासाहेब...
शिक्षक देशाचा कणा आहेत त्यांना जास्त पगार मिळावा हे मांडणारे बाबासाहेब...
कोळश्याची विज देशाला परवडणार नाही. जल विद्युत प्रकल्प राबवा. सौरउर्जेचा वापर करा हे सांगणारे बाबासाहेब...
भाक्रा नांगर धरण, हिराकुड प्रकल्प पुर्ण करणारे बाबासाहेब...
कोसी नदीवर धरण बांधा... बिहार मधे कधी पुर येणार नाही. हे कळकळून सांगणारे बाबासाहेब...
पुस्तकासाठी घर बांधणारे विद्या प्रेमी बाबासाहेब...
संस्कृत भाषेचा आग्रह धरणारे संस्कृत प्रेमी बाबासाहेब...
मुलीच्या गर्भ पात करू नका हे सांगणारे द्रष्टे बाबासाहेब...
देशाला उपराजधानी असावी हे सांगणारे बाबासाहेब...
मला कायदेमंञीपद नको.. कृषी मंत्री व्हायचे आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून शेतकऱ्यांच राज्य आणायचय अशी तळमळ असणारे शेतकऱ्यांचा राजा बाबासाहेब...
कोकणात खोतीच आंदोलन करणारे बाबासाहेब...
लोकमान्य टिळकांच्या मुलाने (श्रीधरपंत टिळक) २५मे १९२८ ला शिवाजी नगर येथे पुजा मेल खाली आत्महत्या केली..त्या वेळी भावपुर्ण लेख लिहून भविष्यात कोणी आत्महत्या करू नका हे सांगणारे बाबासाहेब...
रघुनाथ कर्वे यांच्या पाठीशी भावाप्रमाणे उभे राहणारे बाबासाहेब...
भारतीय सैन्यात तीन लष्करी प्रमुखांनी एकत्र भेटू नये. हे लोकशाहीला घातक आहे हे सांगणारे बाबासाहेब...
भारतीय लोक शाहीला जीवंत ठेवणारी संजीवनी म्हणजे बाबासाहेब...
हिंदू कोडबिल आणणारे बाबासाहेब...
कामगार.. शेतकरी.. महिला.. तरूण.. बालक या सर्वांचे बाबासाहेब...
माझ्या हिंदूंनो बाबासाहेब समजून घ्या. कुणी बाबासाहेबांच्या नावाने जातीयवाद धर्म वाद करत असेल या गोष्टींना बळी पडू नका. आपण सर्व भारतीय आहोत एकमेकांचे भाऊ आहोत. भावाप्रमाणे राहू. जाती पाती सोडून भारत देशासाठी एक होऊ.
सर्व भारतीयांना आपल्या बाबासाहेबांच्या जयंतीच्या हार्दीक शुभेच्छा ।
धन्यवाद-दत्ता सोनवणे देशमुख.

कधीतरी कुणीतरी शेणाचे आणि दगडाचे वार सहन केले आहेत हे विसरू नका

स्त्यावरुन जर कोणी मुली जात असल्या तर मी त्यांना नेहमी सांगतो... अर्थात ओळखीच्या असतील तर,...... कि मुलीँनो आज जरी तुम्हि मुक्त पणे फिरत असाल, काँलेजला जात असाल पण या साठी कधीतरी कुणी शेणाचे आणि दगडाचे वार सहन केले आहेत हे विसरु नका.
- पु.लं.देशपांडे.
संदर्भ - पुलं यांनी school of indian music चे संचालक देवधर यांच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या भाषणातिल अंश आहे.

बाबासाहेब आंबेडकर आणि जातीयवादी आडनावे !!

आडनाव ही संस्था उदबोधक अदभूत आणि संस्मरणीय आहे. प्रचलित समयी आपल्या वर्तमान नाव किवा आडनावावरून ती व्यक्ती समाजामध्ये ओळखली जाते. आडनावामुळे आपण जीवनाच्या सातत्याचा अविभाज्य घटक आहोत, याचे प्रत्यंतर येते. भारतात आणि महाराष्ट्रामध्ये व्यक्तीला स्वत:ची ओळख सिद्ध करण्यासाठी प्रथम नाव आणि आडनावाची अत्यंत आवश्यकता असते. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे स्वरूप व्यापक करण्यासाठी नाव आणि आडनाव वापरले जाते. आडनावातून व्यक्तीचा आविष्कार प्रकट होतो. दोन व्यक्ती किवा कुटुंबीयांमध्ये आडनावांचे साधर्म्य असेल तर त्यांच्यामध्ये त्वरित ऋणानुबंध प्रस्थापित होतो; एवढे सामर्थ्य आडनावामध्ये समाविष्ट आहे.
समाजामध्ये एकाच नावाच्या अनेक व्यक्ती वावरत असतात. त्या व्यक्तींचा निर्देश अधिक निश्चितपणे करता यावा म्हणून आडनावांची उत्पत्ती फार वर्षांपूर्वी झाली असावी, असे आडनावांचे वर्णन ज्ञानकोषकार डॉ. श्रीधर केतकर यांच्या 'महाराष्ट्रीय आडनावांची उपयुक्तता' या ज्ञानकोशात वाचावयास मिळते. याशिवाय पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या भारतीय संस्कृती कोशात अनेक आडनावांची माहिती उपलब्ध आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील आंबावडे या गावी सकपाळ घराण्यामध्ये १४ एप्रिल, १८९१ रोजी एका बालकाचा जन्म अस्पृश्य कुटुंबात झाला. मुलाच्या शिक्षणासाठी रामजी सकपाळ यांनी महू येथून सातारा येथे स्थलांतर केले. रामजी यांनी भीमराव यांना सातारा येथील प्राथमिक शाळेत भीमराव रामजी सकपाळ या नावाने दाखल केले. जातीयवादाचे आणि गरिबीचे चटके सहन करीत भीमराव शाळेतील ओसरीवर बसून शिक्षण घेत होते. भीमराव शिकत असलेल्या वर्गामध्ये आंबेडकर नावाचे पुरोगामी विचार असलेले ब्राम्हण शाळामास्तर होते. भीमराव बालपणापासून हुशार आणि आणि तल्लख बुद्धीचे होते. आंबेडकर मास्तर भीमरावाच्या अभ्यासावर लक्ष देत असत आणि त्यांच्यावर त्याचे खूप प्रेम होते. भीमराव सकपाळ या बुद्धिमान विद्यार्थ्याला संकपाळ या नावाने संबोधणे आंबेडकर मास्तरांना संकोचल्यासारखे वाटत होते. म्हणून त्यांनी रामजी यांची संमती घेऊन स्वत:चे आडनाव भीमरावला प्रदान केले. तेव्हापासून भीमराव रामजी आंबेडकर या नावाने ते सर्वांना परिचित झाले.
प्रखर बुद्धिमत्ता आणि अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची जिद्द यामुळे डॉ. आंबेडकर अस्पृश्य समाजाचे नेते म्हणून सर्वांना ज्ञात झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य समाजाच्या जागृतीसाठी विदर्भ, कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र वगैरे ठिकाणी अनेक दौरे केले. प्रस्तुत विभागामध्ये दौरे करताना एक गोष्ट त्यांच्या प्रकर्षाने निदर्शनास आली की, अनेक अस्पृश्य समाजातील व्यक्तींची आडनावे जातीवाचक स्वरूपाची आहेत. उदाहरणार्थ दगडू धोंडिबा महार, पिराजी भैरू मांग, कचरू चिमाजी चांभार अशा स्वरूपाची जातीवाचक आडनावे असलेल्या व्यक्तींची नावे श्रवण करताना ते दु:खी, व्यथित आणि अस्वस्थ होत असत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाजजागृतीच्या संबंधाने नागपूर येथे २/४/१९३४ रोजी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. आंबेडकर म्हणाले, मनू हा अत्यंत निष्कृष्ट आणि हीन वृत्तीने ग्रासलेला पुरुष होता. त्याने माणसामध्ये विषमतेच्या, जातीभेदाच्या आणि वर्णव्यवस्थेच्या भिती निर्माण केल्याच; तथापि उच्चवर्णीय ब्राम्हण समाज आणि बहुजन समाजामध्ये आडनावांचे वर्गीकरणसुद्धा मोठ्या चाणाक्षपणे केले आहे. सन्माननीय आणि प्रतिष्ठित स्वरूपाची अनेक आडनावे ब्राम्हण समाजामध्येच निदर्शनास येतात. आडनावामुळेच प्रस्थापित समाजव्यवस्थेतील जातीयतेचे ओंगळ, हिडीस दर्शन प्रकर्षाने प्रत्ययास येते. अस्पृश्य समाजामध्ये ज्या व्यक्तींना आडनावे नाहीत किवा ज्यांची आडनावे जातीयवादी स्वरूपाची आहेत, त्यांनी स्वत:ची आडनावे बदलावीत आणि ब्राम्हण समाजामध्ये सन्माननीय आणि प्रतिष्ठित संबोधिली जाणारी आडनावे धारण करावित.
डॉ. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनपर भाषणामुळे विदर्भातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूर्वाश्रमीच्या महार मंडळींनी आपल्या आडनावांमध्ये परिवर्तन केले आहे. ब्राम्हण समाजामध्ये सन्माननीय असलेली पटवर्धन, वैशंपायन, गोडबोले, गोखले, टिळक, अभ्यंकर, साने, परांजपे वगैरे स्वरूपाची प्रतिष्ठित आडनावे अस्पृश्य मंडळींनी धारण केल्यामुळे त्यांची प्रतिष्ठा आणि अस्मिता वृद्धिगंत झाली असून जातीवाचक आडनावांमुळे हीनत्वाची आणि न्यूनगंडाची भावना संपुष्टात आली आहे.
धन्यवाद- लक्ष्मण वाघ/पुणे

सत्यशोधक विवाह कसे करावे?

मित्रांनो..मैत्रिणिनो या देशातील पहिला सत्यशोधक विवाह म.फुलेंनी घडवुन आणला. पुरोहिताशिवाय लावलेला हा विवाह २५ डिसेंबर १८७३ रोजी पार पडला. वराचे नाव सीताराम जबाजी आल्हाट तर वधु राधा ही बजुबाई निंबणकरांची कन्या या विवाहाचा खर्च स्वत: सावित्रीमाईंनी केला. त्याकाळी त्यांना किती विरोध झाला असेल याची कल्पना न केलेलीच बरी. त्यांच्यावर खटला सुद्धा भरण्यात आला. मात्र जोती-सावित्री जराही डगमगले नाहीत. क्रांतीसुर्य व क्रांतीज्योतिच ते!

आजही सत्यशोधक विवाह ही काळाची गरज आहे. अतिशय साधी, सरळ व सोपी विवाह पद्धत आम्हाला म.फुलेंनी १९ व्या शतकातच दाखवुन दिली. आम्हा बहुजनांना ती आजही माहीती नाही, कळली नाही; वळली नाही... माहीती होऊ दिली नाही.

म. फुले म्हणतात,
''वधु-वराचे जातीस नीच, हलकट मानना-या धुर्त, कपटी आर्य-भटाची या कामी सावली सुद्धा पडु देऊ नये. म्हणजेच बामन, पुरोहित अर्थात, कर्मकांड गायब. म्हणजे देवकुंडी नको, मारोती नको.[पटत असेल तर]
आपल्या गावातील म.फुले, सावित्रीमाई फुलेंच्या पुतळयास अभिवादन करावे. अक्षदा धान्याऐवजी फुलांच्या पाकळ्या कराव्या. कारण मित्रांनो आपल्या देशात दरवर्षी जवळपास २५ कोटी लग्न होतात.प्रत्येक लग्नात सरसरी १० किलो धान्य आम्ही फेकतो.[करा हिशोब] एकीकडे अद्यापही काही लोक असे आहेत की, जे एक सांजी उपासी पोटी झोपतात.[करा विचार] मंगलष्टके म. फुलेंनी लिहिलेलीच म्हणावे. आर्थिक बळ असेल तर ती छापावी सोबत म.फुलेंचे विचार सुद्धा टाकता येतात.

वरमुलगा वधु मंडपात आल्यावर वर-वधुं सोबत त्यांचे आई वडील घेऊन सावित्रीमाई व म.फुलेंच्या फोटो प्रतिमांचे अभिवादन करावे. उपस्थितांना थोडावेळ म.फुलेंचे विचार सांगुन प्रबोधीत करावे. या नंतर वधु-वरांच्या मध्ये अंतरपाट धरुन म. फुलेंनी लिहिलेल्या सुंदर मंगलाष्टकांचे गायन करावे. म.फुलेंनी लिहीलेली शपथ वर-वधुस द्यावी. वर-वधुंनी एकमेकांच्या गळ्यात पुष्पमाळा घातल्यानंतर त्यांच्या वस्त्राची महासत्यगाठ बांधावी. सर्व उपस्थितांनी सत्यलग्न लावावे.

भोजनाचा सगे-सोयरे, मित्र परीवारांनी आनंद घ्यावा. दुसरे दिवशी वराकडे वरात पंगत [रिसेप्शन] देण्याची पद्धत आहे. त्यावेळी सुद्धा आपण फुले दांम्पत्यांच्या फोटो प्रतिमांचे अभिवादन करुन त्यांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात मार्गदर्शन केले तर अधिक उत्तम होईल. बाकी सर्व आनंद ईतर लग्नाप्रमाणे साजरा करावा.

मित्रांनो..मैत्रिणिनो, म.फुलेंचे विचार सांगायलाच कोणाची फारशी हिंम्मत होत नाही. त्यांच्या विचारावर प्रत्यक्ष कृती करणे किती कठीण आहे हे आपण समजु शकतो. तरी करु या सुरुवात होऊ या सत्यशोधक !!

Thank u.. Umesh Ghogale

स्त्रियांना मिळाला जगण्याचा अधिकार!

आपल्याकडे पूर्वी महिलांना विचार करण्याचं स्वातंत्र्य नव्हतंच, परंतु जगण्याचाही अधिकार ख-या अर्थाने नव्हता. प्रजासत्ताकाने स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला. त्यांच्यातील योग्यतेनुसार ग्रामपंचायत सदस्यापासून ते राष्ट्रपती पदापर्यंतचा मान मिळवून दिला. विधवांनाही समाजात कोणतेही अधिकार आणि स्थान नव्हतं. परंतु आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेनं कोणताही भेदाभेद न मानता, इंदिरा गांधींना पंतप्रधानपद दिलं. याद्वारे जगण्याविषयीचा विस्तृत दृष्टिकोनच घटनेनं आपल्या सर्वाना दिला. काहींना प्रजासत्ताकाचा अर्थही कळत नाही, उलट त्याचा गैरवापर होताना दिसतो. मग अण्णाभाऊ साठेंनी जे म्हटलं होतं, ‘ये आजादी झुठी हैं, देश की सत्ता भुखी हैं!’ ही परिस्थिती आजही तशीच आहे. दारूचे दुष्परिणाम, प्रेमप्रकरणांमधून समोर येणारी हिंसक वृत्ती, तरुणांमधली निष्क्रियता अशा समाजविघातक गोष्टींनी अंत:करण दुखावतं. म्हणून देशभर काही प्रासंगिक विषयांवरही सप्त खंजिरी वादन, गाणी या माध्यमातून माझं प्रबोधन सुरू असतं. क्रिकेटच्या विरोधात मी प्रबोधनाची मोहीमच सुरू केली आहे. क्रिकेटचे सामने भरवण्यापेक्षा, खरी गरज ही वर्षानुर्वष अर्धवट राहिलेले प्रश्न, समस्या, नसलेल्या सेवासुविधा पूर्ण करण्याची, असं मला वाटतं. कायदा कडकच आहे, त्याचा चुकीच्या पद्धतीनं वापर करून घेणारे नालायक आहेत. कायदा आहे म्हणून आसाराम बापू, तरुण तेजपाल आज न्यायालयीन कोठडीत आहेत. धर्माचा किंवा कुठल्याही प्रकारचा धाक आज न उरल्यामुळे बळावत चाललेल्या वाईट वृत्तीतून ही कृत्य घडतात. म्हणूनच घरच्यांचा, मोठ्यांचा धाक हा हवाच!
- सत्यपाल महाराज (सप्तखंजिरी वादक)

अग्निपुत्र : भाग ३

आपल्या सर्व अनुयायांना जगभरातील विविध ठिकाणी पाठविल्यावर रुद्रस्वामी पूर्वेच्या दिशेने जातात. प्रचंड अंतर पादांक्रांत केल्यानंतर रुद्रस्वामी आपल्या विश्वसु अनुयायी आणि काही विद्वानांसह  समुद्रमार्गे पूर्वेला पोहोचतात. ​बोटीतून किनाऱ्यावर उतरताच त्यांना तिथले लोकजीवन दिसते. अर्ध-भटकी जीवनशैली, शिकार करून जगणे, पाण्यावरील लाकडीघरे व अविकसित शेती ही तिथली जीवनपद्धत त्यांना स्पष्टपणे दिसत होती. बारीक डोळे असलेले आणि चेहऱ्यावर सतत आनंद असलेले मनुष्य पाहून सोबत असेलेले सार्वजन आनंदी झाले.

"स्वामी, आता आपल्याला काय करावयाचे आहे?" एक अनुयायी प्रश्न विचारतो.

स्वामी वर आकाशाकडे बघतात, पक्षी मोठमोठे थवे करून समुद्राहुन जमिनीच्या दिशेने उड़त होते. स्वामींना नैसर्गिक आपत्तीची कल्पना आधीपासूनच होती. ते आपल्या बरोबर असलेल्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करतात. सर्वजण एका उंच ठिकाणी जातात आणि काही क्षणातच त्या भागाला त्सुनामिची मोठी धड़क बसते. अनेक पशु, वनस्पती आणि मनुष्य आणि त्यांची घरे वाहून जातात. क्षणात होत्याचं नव्हतं होतं. सर्व अनुयायी हा प्रकार आपल्या डोळ्यांनी बघत असतात. थोड्या वेळापूर्वी आनंदाने आपली कामे करणारे आता मृतावस्थेत पडलेले होते.

"स्वामी, हे काय आहे? निसर्गाचं इतकं रौद्र रूप आम्ही कधी पाहिलं नव्हतं. आपल्याला याची कल्पना होती का?" एक विद्वान विचारतात.

"होय, आम्हाला या आपत्तीची पूर्ण कल्पना होती." रुद्रस्वामी त्याच्याकडे न बघतच उत्तर देतात.

"स्वामी, मग आपण त्या निष्पाप मनुष्यांना का नाही वाचवले? आपण त्या सर्वांना वाचवू शकला असता."

"आपण ज्या ठिकाणी आलो आहोत ते ठिकाण म्हणजे मृत्यूचे माहेरच आहे.इथे पावलापावलावर तुम्हाला मृत्यू दिसेल. इथल्या मनुष्यांना मृत्यूची सवय आहे. भूकंप, त्सुनामी, चक्रीवादळ, हिंस्त्र पशुचा हल्ला अशी अनेक कारणे आहेत की जरी ह्या प्रदेशावर सर्वप्रथम सूर्यकिरणे पडत तरी सर्वात हिंस्त्र भूमी फक्त हीच आहे." स्वामी खाली बघतात तेव्हा त्यांना सर्व शांत झालेले दिसते. ते पुढे म्हणतात, "आता प्रत्येकाने कमीत कमी दोन व्यक्तींचे शव आपल्याबरोबर घेऊन चला. मला १०० मृत माणसे हवी आहेत."

विद्वानाला स्वामींच्या मनातील समजते. ते सर्व वाटेने मिळतील तितके शव घेऊन ज्वालामुखी पर्वताच्या दिशेने निघतात. आणखी वाचा

भाषावार प्रांतरचना आणि बाबासाहेब !!

आंध्र प्रदेशामधून तेलंगणा हे वेगळे राज्य झाले. भारतात लहान राज्ये व त्यांच्या विकासाचे प्रश्न नव्याने ऐरणीवर येतच आहेत. त्याअनुषंगाने आजच्या परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषावार प्रांतरचनेबाबत व भारताची एकात्मता आणि सुरक्षेबाबत काय विचार होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरावे.
भारत सरकारने आंध्र प्रदेश राज्यातून तेलंगणा वेगळे राज्य केले आहे. त्याचबरोबर भारतातील लहान राज्ये व त्यांच्या विकासाचे प्रश्न, प्रांतीय व भाषीक अस्मितेच्या प्रश्नांची नव्याने मांडणी होणे आवश्यक झाले आहे. पुढील काळात बर्‍याच राज्यांतून लहान राज्यांची स्वतंत्र मागणी होणार आहे. त्यापार्श्‍वभूमीवर आजच्या परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषावार प्रांत रचनेबाबत व भारताची एकात्मता व सुरक्षेबाबत काय विचार होते व ते आज कसे महत्त्वाचे आहेत, यांचा ऊहापोह होणे गरजेचे आहे.
गेल्या दशकापासून भारतात भाषा, प्रांतीय प्रश्न, विभागीय असमतोल, सांस्कृतिक भेदभावाचे प्रश्न जटिल होत आहेत व यापुढेही तो गुंता वाढणार आहे, हे आपल्याला तेलंगणा, विदर्भ व इतर ठिकाणी लहान राज्यांची मागणी व भाषेवर आधारित प्रश्नांमुळे लक्षात येत आहे. भारतात भाषा आणि प्रांताचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्वत:ची अस्मिता जपण्यासाठी, किंबहुना त्या अस्मितेचा वापर राजकीय फायद्यासाठी भारतातील सर्वच राजकीय पक्ष कमी अधिक प्रमाणात करीत आहेत. त्यामुळे भारतातील भाषावार प्रांतरचनेचे मूळ प्रश्न काय आहेत व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवाने या विषयाकडे कसे पाहिले, याचे त्यांच्या जन्मदिनी स्मरण करणे औचित्यपूर्ण आहे व त्यांच्या विचारांचे आजच्या संदर्भात काय महत्त्व आहे, याबाबतचा ऊहापोह होणे गरजेचे आहे.
भाषावार प्रांतरचनेच्या प्रश्नावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दोन पुस्तके प्रकाशित आहेत. भाषावार प्रांतरचना या विषयावर ‘जनता’मध्ये बाबासाहेबांनी दोन लेख लिहिलेले आहेत. १९४८ आणि १९५५मध्ये लिहिलेल्या पुस्तकांत काही विधानांबाबत विसंगती जाणवते; परंतु याच पुस्तिकेत ‘जबाबदार व्यक्तीला चुकीची दुरुस्ती करता आली पाहिजे, पुनर्विचार करण्याचे आणि तद्नुसार मतांतर करण्याचे धाडसही त्याच्या अंगी असावे लागते,’ असे स्पष्टीकरण बाबासाहेबांनी दिले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षिततेचा आणि अखंडतेचा विचार करताना राज्यघटनेच्या निर्मितीच्या प्रक्रियेत अनेक महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. त्यांपैकी काही सूचना घटना परिषदेने मान्य केल्या; परंतु काही सूचनांची जबाबदारी स्वातंत्र्यानंतर प्रस्थापित होणार्‍या नव्या सरकारवर सोपवली. जगातील सर्वच घटनाकारांसमोर आपापल्या देशाला एकसंध कसे ठेवायचे आणि राष्ट्राचे विघटन कसे होणार नाही, यासंबंधी घटनात्मक विनिमयाद्वारे काही खंबीर तरतुदी कशा करायच्या, हा एक जटिल प्रश्न असतो. भारतासारख्या देशात या प्रश्नाने अतिशय गंभीर आणि उग्र रूप धारण केले होते. एक तर भारतात अनेक संस्थानिकांची राज्ये होती आणि त्यांपैकी अनेक स्वत:ला सार्वभौम समजत होती. त्यामुळे ती सतत त्यांच्या स्वतंत्र अस्तित्वाची मागणी करीत होती. काश्मिरचा राजा हरिसिंह आणि हैदराबादचा निजाम ही त्यांची ठळक उदाहरणे आहेत. हे सर्व प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने डॉ. आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेद्वारे जे संघराज्य स्थापन केले, त्याचे स्वरूप परंपरागत संघराज्याच्या कल्पनेपेक्षा पूर्णपणे वेगळे होते.
ज्या काळात भारतीय राज्यघटनेची निर्मिती चालू होती, त्या काळात अमेरिकन संघराज्य हे एक आदर्श संघराज्य मानले जात होते. अमेरिकेच्या राज्यघटनेत तेथे असलेल्या राज्यांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य केलेले होते आणि अशा स्वतंत्र राज्याचे एक संघराज्य बनविले गेले होते. म्हणूनच आपण अमेरिकन राज्यघटनेत राज्यांना अधिक अधिकार आणि स्वातंत्र्य दिलेले पाहतो. याउलट भारतात एक तर उत्तर भारत आणि दक्षिण भारत यांत सांस्कृतिक दरी मोठी होती आणि दक्षिणेकडील राज्यांना उत्तरेकडील राज्यांच्या राजकीय आणि सांस्कृतिक वर्चस्वाची सतत भीती वाटत होती. उत्तरेकडील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार आणि राजस्थान यांसारख्या विस्तीर्ण भूप्रदेश आणि मोठी लोकसंख्या असलेल्या राज्यांची भाषा एक तर हिंदी होती किंवा हिंदीला जवळ असलेली अन्य भाषा होती. याउलट, दक्षिण भारतातील प्रमुख राज्ये म्हणजे कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू ही आकाराने लहान आणि संख्येने कमी होती. त्यामुळे दक्षिण भारताच्या मनातील भीती अगदीच निराधार नव्हती. त्यामुळे बाबासाहेबांनी राज्यघटनेत संघराज्य Federation असा शब्द न वापरता Union of the states असा शब्द वापरला आहे. याचा अर्थ भारत हा मुळातच एकसंध देश आहे आणि त्यातील राज्यांची निर्मिती ही प्रशासकीय सोयीसाठी केलेली आहे. त्यामुळे भारतीय राज्यघटनेत आपण केंद्र आणि राज्य यांच्यात झालेल्या अधिकार विभागणीत केंद्राला जास्त अधिकार मिळाल्याचे पाहतो. भविष्यकाळात घटकराज्यांनी या ‘राज्यांच्या’ संघातून, Union of the statesमधून फुटून निघू नये म्हणून केलेली ही तरतूद आहे. राज्यघटनेत ‘संघराज्य’ या शब्दाऐवजी ‘राज्याचा संघ’ ही शब्दरचना जाणीवपूर्वक केली आहे; परंतु त्यामुळे अनेकांनी आंबेडकरांना टीकेचे लक्ष्य बनवले. घटना समितीचे एक सदस्य तर भारतीय संघराज्याबद्दल बोलताना असे म्हणाले होते, की ‘डॉ. आंबेडकरांनी राज्यघटनेत राज्यांना नगरपालिकांच्या दर्जावर आणून ठेवले आहे.’ या टीकेत काहीप्रमाणात तथ्यांश असला, तरी स्वातंत्र्योत्तर भारतात राज्याच्या अस्मितेचा पुरस्कार करणार्‍या अनेक चळवळी झाल्या; परंतु कोणत्याही राज्याला भारतातून फुटून आपले स्वतंत्र अस्तित्व, स्वतंत्र देश म्हणून प्रस्थापित करता आले नाही.
भारताच्या सुरक्षिततेसाठी आणि एकात्मतेसाठी भारताची दक्षिण आणि उत्तर अशी जी विभागणी झाली, तिला डॉ. आंबेडकरांचा विरोध होता. त्यांच्या मतानुसार, भारताची एकता आणि अखंडता अधिक प्रभावी करण्यासाठी जोपर्यंत प्रत्येक भारतीयाने प्रांतीय, विभागीय व भावनात्मक गोष्टी आहेत, त्या दूर केल्या पाहिजेत व त्यासाठी भारताच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यांची पुनर्रचना करणे गरजेचे आहे. केवळ एकच भाषा जास्त बोलणार्‍या लोकसंख्येसाठी एक स्वतंत्र राज्याची संकल्पना बाबासाहेबांना मान्य नव्हती. एकभाषीय लोकसंख्येमुळे वांशिक, भाषिक असे स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व ते निर्माण करतील व त्यातून विभागीय असमतोल व भाषीय, प्रांतीयवाद निर्माण होईल. भारताच्या विकासावर त्याचा विपरीत परिणाम होईल व त्यातून अंतर्गत सुरक्षा निवारण आणि व्यवस्थापनाबाबतीतही विविध प्रश्न निर्माण होतील. आजही बिहारमधून आलेल्या लोकांना किंवा युवकांना महाराष्ट्रात किंवा आसाममध्ये विरोध होतो, याचे मूळ कारण विकासाचा असमतोल हे माहीत असूनसुद्धा आमची राजकारणी मंडळी प्रांतीय आणि भाषिक वादावरच अधिक चर्चा करतात व मूळ प्रश्न बाजूला ठेवतात. बाबासाहेबांच्या मते, एकच भाषा बोलणार्‍यांची जर विविध प्रांतांत विभागणी केली, तर त्यांच्यात प्रांतीय व भाषीय अशी एकभावना निर्माण होणार नाही. परिणामी, त्यामुळे राष्ट्राचा विकास चांगला होऊ शकतो. शिवाय, जी मोठी राज्ये पुनर्रचना आयोगाद्वारे निर्माण केली आहेत, त्या राज्यांचीही लहान राज्यांत निर्मिती करावी म्हणजे प्रशासकीय कामे सोपी होतील. शिवाय, त्यांच्या मनामध्ये राष्ट्राच्या एकात्मतेची भावना अधिक निर्माण झाल्यामुळे ती लहान राज्ये केंद्र सरकारला आव्हान देऊ शकणार नाहीत. म्हणून बाबासाहेबांनी लहान राज्ये निर्माण करावीत, अशी सूचना राज्य पुनर्रचना आयोगास केली होती.
राज्यांचा आकार आणि विभागणी : ब्रिटिश सरकारने आपल्या राज्यकारभारासाठी त्यांना उपयुक्त ठरतील, अशा पद्धतीने प्रांतीय विभागणी केली. त्यात बिहार, सिंध, आसाम, ओरिसा यांचा सहभाग आहे. ज्या वेळेस भारताला स्वातंत्र्य मिळाले, त्या वेळेस जवळजवळ ५00 संस्थाने होती व त्यांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणणे व राष्ट्राची एकात्मता टिकवणे हे फार कठीण काम होते. शिवाय ५00 संस्थानांच्या विलीनीकरणाबरोबरच नवीन राज्ये निर्माण करणे व त्यांच्या सीमा निश्‍चित करणे हे मोठे जिकिरीचे काम होते. त्यामुळे भारताची प्रशासकीय दृष्टीने विविध झोनची निर्मिती करणे किंवा प्रशासकीय बाबींसाठी भारताची विविध प्रांतीय भागांत विभागणी करणे, आवश्यक होते. ती भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय फायद्यासाठी उपयुक्त ठरेल व दुसरे म्हणजे भारत हा बहुभाषिक, बहुप्रांतीय, बहुसंस्कृती देश असल्याकारणाने भाषावार प्रांताची रचना करावी, अशी भूमिका घेण्यात आली.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते १९२१-२२पासून भाषावार प्रांताची रचना करावी, अशी मागणी करत होते; पण नंतर काँग्रेसने आपली भूमिका बदलली व भारतीय नागरिकत्वाची भूमिका घेतली; पण त्याचवेळी मुस्लीम नेत्यांनी फुटीरतावादी भूमिका घेऊन द्विराष्ट्रवादाची संकल्पना मांडली. त्यानंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने तो मुद्दा व स्वातंत्र्याच्या वेळी भाषावार प्रांताची भूमिका हे दोन्हीही बाजूला ठेवण्यात आले. पण, त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९२८ ते १९५६ या कालावधीत भारताच्या राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेसाठी जे विविध क्रांतिकारी बदल सुचविले होते, ब्रिटिश कालावधीत बाबासाहेबांनी १९२८मध्ये सायमन कमिशनपुढे साक्ष देताना भाषावार प्रांताची भूमिका फेटाळून लावली होती. त्याचबरोबर त्यांनी भीती व्यक्त केली, ती म्हणजे भाषावार प्रांतामुळे स्थानिक राष्ट्रवाद प्रांतीय किंवा विभागीय वाद व स्थानिक लोकांमध्ये स्वत:चे जे अस्तित्व आहे, ते जोपासण्यासाठी चढाओढ लागेल व त्यामुळे भारताच्या स्थैर्याला आणि विकासाला खीळ बसेल व त्यामुळे आपण सर्व भारतीय एक आहोत, अशी एकतेची भावना आपल्यामध्ये निर्माण होणार नाही.
बाबासाहेबांनी भाषावार प्रांतरचनेला दोन कारणांसाठी विरोध केला होता, एक म्हणजे विभागीय जागरूकता निर्माण होऊन राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो व दुसरे म्हणजे एका जातीच्या लोकांकडे राज्याची सत्ता किंवा सरकारे हस्तांतरित होऊ शकतात, बाबासाहेबांनी राष्ट्रहिताच्या दृष्टिकोनाचा विचार करून मांडले होते, तेच आजही आपल्याला प्रेरणादायी आहे हे चिार ती कारण आजही भारताच्या अंतर्गत सुरक्षेचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा प्रांतीय व भाषावादामुळे किंवा राज्या-राज्यांमधील सीमा प्रश्न, पाणीवाटप व केंद्र सरकारद्वारे दिली जाणारी आर्थिक मदत यांवर विविध विरोधाभासी भूमिका आपल्याकडे आढळते. आजही काही राज्यांची सरकारे एका विशिष्ट जातीच्या गटाच्या लोकांकडेच आहेत. त्यामुळे लोकशाहीच्या प्रक्रियेत सामान्य माणसाच्या मूल्याचे जातीपातीच्या राजकारणात पतन होत आहे. स्वातंत्र्यानंतरही बाबासाहेबांनी या विषयाबाबत चिंतन, मनन करून भाषावार प्रांतरचनेबाबत आपले मत प्रदर्शित केले होते. बाबासाहेबांचे या संदर्भातील विचार. आजही चिंतन करावेत असेच आहेत.
लेखक- डॉ. विजय खरे. (लेखक पुणे विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक आहेत.)
धन्यवाद- दै. लोकमत.

आजचा तरूण हे असलेच काही काही पाहत वाढला.

धर्मातीत राज्यातल्या आकाशवाणीवर सकाळच्या वेळी ’देवा तुझ्याशिवाय आम्हाला आधार नाही’ ह्या अर्थाचे टाहो ऎकत आला. त्याच्य ऎन उमेदीच्या वर्षात भाषावार प्रांतरचनेचे वाद त्याने पाहिले. भाषिक द्वेषाची परिसीमा पाहिली. ज्या समाजाला शिक्षणाची दारे बंद होती, त्या समाजातून नवा सुशिक्षित वर्ग जन्माला आला. त्याने आपल्या पददलित समजाचे अंतरंग उघडे करून दाखवायला सूरुवात केली. त्यातुन क्षोभाचे दर्शन घडू लागले. ....

हल्लीच्या पिढीला आदराची भावना नाही हे म्हणतांना ज्याच्याविषयी आदर बाळगावा अशी उभ्या देशातील किती माणसे त्यांना दाखवता येतील ?
आमच्या विज्ञानविभागाचे प्रमूख सत्यसाईबाबांच्या मागून जाताना दिसतात आणि माणसाचे भविष्य माणसनेच घडवायचे आहे हे सांगण्या-या समाजवादी तत्वज्ञानाचा घोष करणारे पुढारी मंत्रिपद मिळावे म्हणून गणपतिबाप्पाला साकडे घालतात.....
एका बाजूला ३५ - ३५ मजल्यांच्या हवेल्या उठत असलेल्या तो पाहातो त्याबरोबर झोपडपट्ट्या वाढतांना त्याला दिसतात. लोकनेत्यांचे उच्चार आणि आचार यात त्याला ताळमेळ दिसत नाही. मग त्याचा संताप उफाळून येतो. तो नविन कवीच्या कवितांमधुन कधी निराशेचा, कधी वैतागाचा सूर घेवून बाहेर पडतो तर कधी विध्वंसाची भाषा करीत येतो.
तरूण मनाच्या ह्या अस्वस्थतेने वडीलपिढी अस्वस्थ न होत, त्यांना बेजबाबदारपणाणे नावे ठेवतांना आढळते. प्रत्येक काळात पिढ्यांतली दरी असते. पण गेल्या काही वर्षात ती अधिकच भयान होवू लागली आहे. हल्लीच्या पिढीला मुल्यांची कदरच नाही हे म्हणणे कोडगेपणाचे आहे. चांगली मूल्ये जतन करण्यासाठी आयुष्याचा होम केलेली माणसेच त्यांना दिसली नाहीत.
- - ' खिल्ली ' मधून साभार

नवरा मेल्यावर..??

अकाली नवरा मेल्यावर
काय करावं त्याच्या वस्तूंचं,
सामाना-सुमानाचं ?
ठेवणीतले कपडे, शर्ट-प्यँट वगैरे
गरिबाला देऊन टाकावं
किंवा घ्यावी भांडी बोवारणीकडून
तरी उरतोच प्रश्न त्याच्या अंडरविअरचा
मोबाईल येईल वापरता
सिमकार्ड बदलून
पण काँटॅक्ट लिस्टमधले
कलीग्जचे, मित्र-मैत्रिणींचे नंबर्रस्
करावे डिलीट की असू द्यावेत ?
गेल्या सात-आठ वर्षांत
डबलबेडवर एकाच बाजूला
लागलेली झोपायची सवय मोडता येईल
त्याची उशी नजरेआड करून ?
वर्षानुवर्ष त्याने लिहिलेल्या डाय-यांना
त्यात नोंदवलेल्या स्वप्नांना,
इच्छांना, आकांक्षांना
रद्दीत असा कितीसा मिळेल भाव ?
तो गेल्या दिवसाच्या आदल्याच रात्री
बंद पडलेलं रिस्ट वॉच
सांभाळावं उराशी
गरज नसलेल्या सहाव्या बोटासारखं ?
त्याच्या चपला द्याव्यात फेकून
की वाट पहावी
मुलाला त्या येतील याची ?
अर्धवट वाचून झालेल्या
कांदबरीच्या कुठल्याशा पानावरून
माझ्याकडे पाहणारा त्याचा चष्मा
ठेवावा मिटून
की सतत अनुभवावी जाणिव
तो पाहत असल्याची ?
हे मंगळसूत्र ठेवावं काढून
की ढाल म्हणून बाळगावं
परपुरूषांविरोधात
ओशटलेल्या नजरांपासून बचावाकरता ?
त्याच्याऐवजी मी जर गेले असते
तर हे शिल्लक राहिलेले काँडम्स
त्यांने दिले असते फेकून ?
कवी- गीतेश गजानन शिंदे
संपर्क - ९८२०२७२६४६

अग्निपुत्र : भाग 2

रुद्रस्वामींचा चेहरा जरा चिंतित होतो.
‘‘म्हणजे? आम्ही समजलो नाही. आमच्यापासून तुम्हाला कोणता धोका आहे? माझ्या माहितीप्रमाणे युध्दसंहाराव्यतिरिक्त आमच्या हस्ते तुमच्यापैकी कुणाचाही वध झालेला नाही. आणि राहिला प्रश्न नामशेष होण्याचा, आमच्या मनात तसा विचार देखील आलेला नव्हता.’’
‘‘आम्ही आपल्या विधानाशी पुर्णतः सहमत आहोत. आपण आमच्या संहाराचा विचार देखील मनात आणला नव्हता. मात्र या सृष्टीचा हा नियमच आहे, तुम्हाला तुमचा कूळ वाचवायचा असेल तर ज्याच्यापासून तुम्हाला धोका आहे त्याचा समूळ नाश करा.’’ सुर्वज्ञ दिर्घ श्वास घेतात. रुद्रस्वामी आपल्या अनुयायांना त्यांचे बांधलेले हात सोडायला सांगतात. अनुयायी सुर्वज्ञचे हात सोडतात. एक अनुयायी त्यांच्यासाठी जल घेऊन येतो. रुद्रस्वामी आपल्या विश्वासू अनुयायांबरोबर त्यांच्यासमोर बसलेले असतात. जलप्राशन केल्यानंतर सुर्वज्ञ पुढे बोलू लागतात.


‘‘आपण ज्या भुतलावर आहात त्याला पृथ्वी असे म्हणतात. ही पृथ्वी गेल्या 350 अब्ज वर्षांपासून अस्तित्वात आहे. आधी हा फक्त एक गोळा होता ज्यावर कोणताही जीव नव्हता. पृथ्वीवरील वातावरण अगदी अस्थिर होतं. ऋतू सतत बदलत असायचे. अशातच पृथ्वीवर पाणी निर्माण झालं आणि त्या अनुशंगाने पृथ्वीवर जीवांची निर्मिती सुरु झाली. आधी किटकरुपात असलेले हे जीव कालांतराने पाण्यात पोहू लागले. त्यांचा शारीरिक विकास चांगला झाला तेव्हा पोहणाऱ्या जीवांनी त्या किटकांचा नाश केला. त्यानंतर जलचरांमध्ये वेगवेगळ्याा हवामानानुसार आणि स्थानानुसार आणखी बदल होऊ लागले. काही जलचर पाण्यातच राहू लागले तर काही जमिनीवर आले. त्याच वेळी काही जलचर सरपटू लागले. सरपटणारे जीव आमचे पूर्वज होते. जसजसे शारीरिक बदल होऊ लागले तसतसे आकाशात उडणारे जीव सुध्दा या पृथ्वीवर दिसू लागले. या सर्व कालावधीमध्ये खुप मोठा काळ लोटला गेला. अनेक जाती निर्माण झाल्या आणि लगेच नष्ट झाल्या तर अनेक जातींनी शेवटपर्यंत तग धरला. सर्वांमध्ये इतके बदल होत होते की पृथ्वीवर शेकडो जाती अस्तित्वात आल्या. आल्या आणि आपापल्या अस्तित्वासाठी एकमेकांना संपवू लागल्या. ज्या वाचल्या त्यांनी आपल्या वंशजांना अधिक विकसित करण्याचं कार्य सुरु ठेवलं. आमचे पुर्वज मात्र या सर्वांपासून खुप दूर उत्तरेकडे (आत्ताचे युरोप) होते. मात्र आमच्यापैकी काही जाती मागे राहिल्या असतील असं त्यांना सतत वाटत होतं. तरीही आमच्या पुर्वजांनी बाहेरच्या जगाशी संपर्क पुर्णतः बंद केला आणि आमचे पुर्वज एका वेगळ्याा विश्वात विकसित होत गेले.’’ आणखी वाचा

गाईचे आत्मकथन

गाईला कुरवाळत कुरवाळत
वैदिकांची ओळख विचारली
तिने डोळे ताणले, कान टवकारले 
अन् शेपूट हालवून धूम ठोकली
हजारो
हजारो वर्षांची कत्तल डोळ्यासमोर येताच चर्मण्यवतीच्या पाण्यापेक्षाही
तिचे डोळे लाल झाले..
"आम्ही शिकारीत कमी
यज्ञात जास्त मारल्यागेलो "
हे तिने आत्मकथनात लिहिले
माणूस करूणामय असतो
प्राणीमात्रांवर दया करतो
हे तिला ठावुकच नव्हते बुद्धापर्यंत
हे यज्ञयागाच्या धर्मशास्त्रा!
मी लिहित आहे तुझ्या कत्तलीची कविता..
धर्मशास्त्रांच्या अमानुष नोंदी हा डॉ. मच्छिंद्र चोरमारे यांचा 4 था कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. त्यातील कविता
धन्यवाद- सुरेखा सोडे

एसटी वर्कशॉपमधील कष्टकरी हिरकणी

कुणी आयटीआय करून डी़एड़ केलंय तर कुणी कृषी पदविका, कुणी पदवी घेत आहे. मात्र कामाची लाज न बाळगता येथील एसटी वर्कशॉपमध्ये सहा हिरकणी पुरुषांच्या बरोबरीने मेकॅनिकची कामे करीत आहेत.
मंदाकिनी सलगर, वंदना निंबर्गीकर, भारती वाघमारे, सविता पुजारी, वंदना कांबळे, अनिता माने सोलापूर बस डेपोमधील वर्कशॉपमध्ये मेकॅनिक म्हणून कार्यरत आहेत़ सहा महिन्यांपूर्वी त्या रुजू झाल्या़ मात्र पुरुष कर्मचाऱ्यांच्या बरोबरीने त्या एसटी दुरुस्तीची सर्व कामे कुशलतेने करीत आहेत.
मंदाकिनी सलगरने आयटीआयनंतर कृषी पदविका घेतली आहे. वंदना कांबळे यांचे डी़एड़ झाले आहे़. वंदना निंबर्गीकर पदवीधर आहेत. भारती वाघमारे कला शाखेचे शिक्षण घेत आहे. सविता पुजारीने बी़ए़ पूर्ण केलंय़ अनिता माने हिने आयटीआयनंतर बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...