डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून का झाला?? आणि खूनी अजून का सापडत नाहीत??

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा खून का झाला?? आणि खूनी अजून का सापडत नाहीत?? 


देव, धर्म आणि श्रद्धा यांच्या विरोधात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी अवाक्षर सुद्धा कधी काढलं नाही. केवळ प्रबोधनाच्या माध्यमातून अंधश्रद्धेचा अंधार दूर करण्याचं काम हा महान सारस्वत करत होता. तरीही त्यांचा खून का झाला? दीड महिना उलटून गेला अजून खूनीही सापडत नाहीत.


 

डॉ. दाभोलकर हे थेट साने गुरूजी परंपरेतले. सौम्य प्रवृत्तीचे. तरीही सनातन्यांना ते सहन झालं नाही. गणेशोत्सवाला विधायक वळण देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. शेकडो गावात त्यांनी एक गाव एक गणपतीचा उपक्रम करायला लावून मंडळामंडळातली व गटागटातली भांडणे मिटवली. गणपती विसर्जन प्रूषणमुक्त व्हावं, नैसर्गिक रंगाचा वापर व्हावा यासाठीसुद्धा ते मोहिम चालवत होते. हे दाभोलकर करू शकत होते कारण श्रद्धांनाही विधायक वळण देता येतं यावर त्यांचा विश्वास होता. सत्य, शिव, सुंदराची प्रार्थना म्हणणार्‍या साने गुरुजी परिवारातले ते होते.


 

ज्या अंधश्रद्धा निर्मूलन बिलाला सनातनीच नव्हे तर राज्यातल्या विरोधी पक्षांनीही जोरदार विरोध केला, त्या विधेयकात 'श्रद्धा' हा शब्दच नाही. इतकचं कशाला 'अंधश्रद्धा' हा शब्दही त्यात नाही. धर्माचा, कोणत्याच धर्माचा तर मागमूस सुद्धा नाही. तरीही ओरड का होते आहे?


 

अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करावा हा मूळ ठराव तर शिवसेना-भाजप युतीचे सरकार होतं त्या काळातला. 18 वर्षांत कायद्याचा मूळ मसुदा पातळ झाला आणि विरोधाची धार मात्र तीव्र. छोट्या निरागस मुलांना पळवून त्यांचा नरबळी द्यायचा. त्यासाठी उद्दुक्त करायचं. मुलींचं आणि स्त्रियांचं लैगिंक शोषण करायचं. म्हणजे फसवून, स्वतः देवपुरूष असल्याचे सांगत थेट बलात्कार करायचा. तंत्र मंत्राच्या नावाखाली अत्यंत विकृत अघोरी प्रथा लादायच्या. हा ज्यांचा धंदा बनला होता, ते कायद्यातील त्रुटींचा फायदा घेत नामानिराळे होत राहिले. मानवत खून खटल्यात मारणारे फासावर गेले, मारायला लावणारे कमी शिक्षेने निसटले. हे सारं रोखण्यासाठी कायदा का नको? दाभोलकर फक्त तर एवढंच मागत होते. तरीही दाभोलकरांचा जीव घेण्यापर्यंत सनातन्यांची मजल गेली....


 

साने गुरूजींच्या वृत्तीचा आणि प्रवृत्तीचा माणूस अधिक प्रभावी असतो. श्रद्धावानांच्या हृयाला हात घालू शकतो. म्हणून सनातन्यांना तो डेंजरस वाटतो. देव, धर्म आणि श्रद्धा हा ज्यांच्यासाठी धंदा असतो, शोषणाचं साधन असतं, आणि त्याहीपेक्षा राजकारणाचं हत्यार असतं त्यांना दाभोलकर अधिक धोकादायक वाटतात.


 

तुकाराम त्यांना अधिक धोकादायक वाटत होते. ज्ञानेश्वरांचा म्हणून तर छळ झाला. जीवंतपणी विवेकानंद त्यांना अडचणीचे होते. महात्मा गांधींना मारणार्‍या नथुरामाची परंपरा नवी नाही. धर्माचं दुकान चालवणार्‍यांना खरा धार्मिक अडचणीचा असतो. इहवादी असूनही दाभोलकरांची वाट खर्‍या धार्मिकासारखी होती.


 

बहुसंख्य हिन्दू समाजाला हे चांगलंच उमजून आहे. तो श्रद्धावान आहे. धर्मपरायण आहे आणि म्हणूनच तो सनातन्यांपासून कायम दूर राहिला आहे. ज्ञानेश्वर, तुकारामांना छळणार्‍यांची वृत्ती त्यांना माहित आहे. त्यांची नावंही लक्षात राहू नयेत, इतका त्यांना त्याचा तिटकारा आहे. ज्ञानोबा माऊली एकनाथ नामदेव तुकाराम असा गजर मात्र वारकर्‍यांच्या हृयात युगानुयुगे सुरु आहे. उदार हिंदू बधत नाही. राजकीय हिंदुत्वाला साथ देत नाही. म्हणून हिंदुंच्या मनात राडा करण्याचा सनातन्यांचा डाव गेल्या दोन अडीच शकांपासून सुरु आहे. बाबरी मशिदिच्या विध्वंसापासून त्याची सुरवात झाली.


 


नथुराम समर्थनाचं नाटक याच काळातलं आहे, जे अजून सुरु आहे. हे नाटक यासाठी सुरु आहे, की माणसाला मारण्याचं समर्थन करता यावं. खुद्द महात्मा गांधींना मारण्याचं समर्थन अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रंगमंचावर गेली अनेक वर्षे होत आहे. केवळ नाटकातूनच नाही अनेक माध्यमातून द्वेषाची होळी पेटवत त्यात उदारता आणि बंधुभावाच्या समिधा टाकल्या जात आहेत. त्यामुळे दाभोलकरांचाही खून पचवता येईल हा त्यामागचा त्यांचा कयास होता.


 

अंथरुणावर पडून मरण्यापेक्षा, दाभोलकरांना गोळ्या लागून मृत्यू आला, ही ईश्वराची कृपाच म्हणायची, असं जयंत आठवले उघडपणे म्हणतात आणि हिंदूंच्या विरोधात विधेयक कशाला अशी ओरड त्यांचं छूपे समर्थन करणारे उजवे पक्ष करतात. वटहुकुम निघाल्यानंतर राज्यात दोन ठिकाणी त्याची अंमलबजावणी करत जादुटोणा करणार्‍या बंगाली बाबांना पोलिसांनी अटक केली, ते हिंदू नाहीत. मुस्लिम धर्मीयांच्या विरोधात असा कायदा करा म्हणणार्‍यांना ही चपराक ठरावी. हे बंगाली बाबा मुस्लिम आहेत. इस्लाम धर्मात चमत्कार आणि जादूटोण्याला मान्यता नाही. माणसाला चमत्कार करता येत नाही आणि मीही त्यामुळे चमत्कार करु शकत नाही, असं खुद्द मोहम्मद पैगंबर (स.अ.) यांनी त्यांच्याकडून चमत्काराची अपेक्षा करणार्‍यांना सुनावलं होतं. तरीही बंगाली बाबा जादूटोण्याच्या नावावर लुटालुट करतात, हे काही लपून नाही. कायद्याला धर्म नसतो. पण खोट्या प्रचाराचा धुरळा लोकांच्या डोळ्यात उडवल्याशिवाय खून करता येत नाही. महात्माजींचा खून 55 कोटींसाठी केल्याचा असाच तद्दन खोटा आणि बेशरम प्रचार नथुरामीवादी आजही करतात. विधेयक कोणत्याच धर्माच्या विरोधात नसताना ते हिंदू विरोधी आहे, असा खोटा प्रचार अजूनही सुरु आहे, तो दाभोलकरांचा खून करणार्‍या मारेकर्‍यांच्या समर्थनासाठीच.


 

तालिबानी असोत किंवा सनातनी दहशतवाद हा दहशतवाद असतो. आणि त्यांची पहिली शिकार ते ज्या धर्मातले असतात त्या धर्मातली माणसंच असतात. सीमेपलिकडच्या दहशतवा़द्द्यानी कश्मिरमध्ये आतंक सुरु केल्यानंतर त्यात जान गेलेले बहुतेक मुस्लिमच होते. शेकडोनी नाही हजारोनी. पाकिस्तानच्या सीमाप्रांतात तालीबान्यांनी गोळ्या घातल्या त्या मलाला युसुफझाईच्या डोक्यात. तीने शाळेत जाऊ नये म्हणून. महात्माजींना मारणारा नथुराम होता. दाभोलकरांच्या डोक्यात गोळ्या घालणारे नथुरामीच आहेत.


 

नथुरामी प्रवृत्ती केवळ गोळ्या घालण्याचं समर्थनच करत नाही, आसारामच्या बाजूनेही उभी असते. नातवंडांपेक्षा लहान मुलींवर अतिप्रसंग करणार्‍या साधुंमधल्या हैवानाना लपवलं जातं, ते परधर्मीयांच्या द्वेषाआड.


 

नथुरामी ते आसारामी हे आव्हान परतवून लावायचं कसं?


 

हा प्रश्न केवळ अंधश्रद्धा निर्मुलनाचा नाही. ढोंगी बाबांच्या अटकावाचा नाही. ज्ञानेश्वर, कबीरांपासून ते तुकारामांपर्यंत सर्वच संतांनी या ढोंगी बाबांच्या विरोधात 'जळो त्यांचे तोंड' अशी जबरस्त आघाडी उघडलेली आहे. 'नवसे कन्या पुत्र होती, तरी का कारणे पती' असा सवाल संत तुकारामांनी कधीच विचारुन ठेवला आहे. शोषणावर उभी राहिलेली ही व्यवस्था उद्धवस्त करावीच लागेल. प्रबोधनाची यात्रा अखंड सुरु ठेवावी लागेल. पण त्यातून नथुरामी ते आसारामी हे आव्हान संपुष्टात येणार नाही. हे आव्हान धार्मिक नाही, राजकीय आहे. त्याला राजकीयच उत्तर द्यावं लागेल.


 

नथुरामी आणि आसारामी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणून आसारामला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु आहेत. आसारामसाठी त्यांनी राम जेठमलानी सारखा नामांकित वकील उभा केला आहे. जेठमलानी काय म्हणाले? त्यांनी दोष त्या निरागस मुलीवरच लावला. तिला म्हणे आजार आहे. Girl has disease which draws her to men. म्हणजे त्या मुलीवर जो अतिप्रसंग झाला त्यात आसारामचा दोष नाही मुलीचाच दोष आहे. इतकं निर्लज्ज विधान राम जेठमलानी कसं करू शकतात? पंतप्रधानाच्या उमेदवारीसाठी भांडणारे भाजपाचे नेते जेठमलानी यांच्या वाढदिवसाला एकत्र येतात. त्यांचा केक कापतात. आणि दुसऱ्या दिवशी जेठमलानी आसरामाचं वकीलपत्र घेतात. याचा अर्थ काय?


 

राज्यातले आणि दिल्लीतीले सत्ताधारी (कॉंग्रेस - राष्ट्रवादीवाले) स्वतःला सेक्युलर म्हणवत असले तरी नथुरामी ते आसारामी या पिलावळीला त्यांनीही जागोजागी सांभाळले आहे. सत्तेला धोका येईल, तेव्हाच नथुरामी शक्तींकडे ते बोट दाखवतात. काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोघांनाही फासिस्ट नथुरामी शक्तींच्या अटकावात रस नाही. अन्यथा हेमंत करकरे यांनी सुरु केलेली मोहिम या सत्ताधार्‍यांनी थांबवली नसती. महिना उलटल्यानंतरही खूनी सापडत नाहीत याचं खरं कारण हे आहे.


 

दाभोलकरांच्या हत्येमुळे राज्यातल्या सगळ्याच विवेकशील, संवेनशील नागरिकांच्या मनात उठाव आहे. नथुरामी फासिस्ट शक्तींच्या विरोधात जे जे डावे पुरोगामी आहेत, फुले, शाहू, आंबेडकरवादी आहेत, गांधीवादी आहेत, उदार वारकरी अन सुफी आहेत. हे सर्वच एकत्र येत आहेत. गांधी जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा महाराष्ट्रभर निर्धार होतो आहे. त्यातून पर्यायी राजकारण उभे राहिले तरच फासिस्ट शक्ती आणि मतलबी सत्ताधारी यांना उत्तर मिळेल.



संदर्भ- http://­kapilpatilmumbai.blog­spot.in/2013/10/­blog-post_2.html


लेखं- आमदार कपिल पाटील(अध्यक्ष, लोक भारती)


संपर्क- kapilhpatil@gmail.co­m

क्रांतीसुर्य ज्योतीबांनी सुरु केलेली सत्यशोधक चळवळ !!

क्रांतीसुर्य ज्योतीबांनी सुरु केलेली सत्यशोधक चळवळ !!


२४ सप्टेंबर १८७३ रोजी क्रांतिबा फुले यांनी सामाजिक समता व समताप्रधान समाजनिर्मितीसाठी १४० वर्षापूर्वी पुणे येथे ''सत्यशोधक समाजाची'' स्थापना केली होती. क्रांतिबा फुले यांनी सत्यशोधक विवाहपध्दती या नावाची एक अभिनव सामाजिक व धार्मिक क्षेत्रात मूलभूत परिवर्तन करणारी क्रांतिकारी पध्दत अमलात आणली. स्वत: जोतिरावांनी ब्राह्मणांच्या गैरहजेरीत सत्यशोधक विवाहपध्दतीने लग्ने लावली. सत्यशोधक समाजाच्या वतीने शूद्रातिशूद्रांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देण्यासाठी महामानव ज्योतिबा फुले यांनी अर्ज मागवून घेतले व दहा विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली.





समाजाच्या आमूलाग मौलिक परिवर्तनाकरिता हिंदू समाजरचनेतील माणसांना उच्चनीच मानणारा, जातिभेद, कर्मकांड, मूर्तिपूजा, स्त्रीदास्य, अंधश्रद्घा यांचे निर्मूलन करुन वैचारिक क्रांती घडविण्याकरिता पुरोहितांकडून होणार्‍या अन्याय, अत्याचारापासून, गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. `निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’ हा विचार फुले यांनी मांडला. देवाविषयी किंवा निसर्गाविषयी निर्मिक हा शब्द वापरला. क्रांतिबा फुलेंनी ही जी सत्यशोधक चळवळ सुरु केली होती, ती अंधश्रध्दा निर्मुलनाचीच चळवळ होती. या चळवळीत फक्त सध्याचे ढोंगी बुवा-बापु, अम्मा- टम्मा, करणी-भानामती याचाच भांडाफोड नसून कल्पनेतील देव सुद्धा सामिल होते. हे करीत असतांना राष्ट्रपिता फुलेंनी लोकद्रोहाची भीती बाळगली नाही... राष्ट्रपिता फुलेच भारतीय अंधश्रध्दा निर्मूलनाचे खरे जनक आहेत.




महामानव जोतिबा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म या ग्रंथात सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांची मांडणी केली आहे. धर्मभेद आणि राष्ट्रभेद यांच्याविरुद्घ महान सत्य कोणते? असा प्रश्न उपस्थित करुन फुल्यांनी म्हटले आहे, ‘‘स्वातंत्र्य, समता व बंधुत्व यांच्या पायावर अवघ्या मनुष्यजातीचे एक कुटुंब निर्माण करणे, हेच मनुष्यतत्त्वाचे सर्वोच्च ध्येय होय. सर्व मानव, स्त्री किंवा पुरुष यांचे हक्क सारखे आहेत. मानव किंवा कोणताही मानवसमुदाय यांना दुसर्‍या मानवावर वा समुदायावर स्वामित्व गाजविण्याचा, जबरदस्ती करण्याचा सर्वाधिकार नाही. राजकीय व धार्मिक मतांमुळे कोणतीही व्यक्ती उच्च वा नीच मानून तिचा छळ करणे, म्हणजे सत्याचा द्रोह करणे होय. प्रत्येकाला स्वत:च्या मताचा प्रसार करण्याचा हक्क व अधिकार आहे. सर्वांना ऐहिक जीवन उपभोगण्याचा सारखाच अधिकार आहे. शेती, कलाकौशल्य, मजुरी आदी कामे माणसास हीनपणा आणीत नसून त्यांच्यायोगे त्यांचे मोठेपणच सिध्द होते. सृष्टीच्या कार्यकारणभावाचा अर्थ ध्यानी घेऊन त्या सृष्टीचा किंवा निसर्गशक्तीचा मनुष्याच्या गरजा भागविण्यासाठी उपयोग करणे, हा मनुष्याचा मूलभूत अधिकार व कर्तव्य होय. या विश्वात जगण्याकरिता आणि उपभोगाकरिता वस्तू उत्पन्न करणे किंवा मिळविणे, हे माणसाचे पहिले कर्तव्य आहे. त्याकरिता परस्परांना साहाय्य करणे, हा मानवाचा श्रेष्ठ धर्म आहे; एवढेच नव्हे, तर ही भगवंताची पूजा आहे. भजन, नामस्मरण, जपजाप्य, प्रार्थना, भक्ती या गोष्टींची ईश्वराला गरज नाही; त्याला माणसाच्या स्तुतीची, भक्तीची मुळीच गरज नाही. ज्योतिबा फुले यांनी विशद केलेले हे सत्य म्हणजे हजारो वर्षांच्या परिश्रमाने संपादन केलेल्या संस्कृतीचे आणि ज्ञानाचे सार आहे. त्यांनी सत्यज्ञानाचे साधन किंवा प्रमाण कोणते, यासंबंधी समग्र चर्चा केली आहे. शुद्घ सत्य हे धर्मग्रंथात किंवा ऋषी, गुरु, अवतार व ईश्वर, प्रेषित या कुणांमध्येही नाही; ते मनुष्याच्या सदसद्विवेकबुध्दीत वास करते. निसर्गातील सत्य व नैतिक सत्य ही दोन्ही प्राप्त करुन देणारी बुध्दी मनुष्यात स्वाभाविकपणे वसत असते. सृष्टिकर्त्यानेच मनुष्यजातीला दिलेली ती नैसर्गिक देणगी आहे. निर्मिकाने मानवाला एकदाच एकच एक ज्ञानाचा दिव्य ठेवा दिला आहे; तो म्हणजे बुद्घी होय’. क्रांतीबा फुले यांची सत्यशोधक समाजाविषयीची ही तात्त्विक बैठक पूर्णतः बुध्दीवादी आहे. त्यांना धर्मसंस्था मान्य नाही; मात्र ‘निर्मिका’ चे म्हणजे निसर्गाचे, सृष्टिनिर्मात्याचे अस्तित्व ते मान्य करतात.



सत्यशोधक समाजातील व्यक्तींनी पुढील काही तत्वे काटेकोरपणे पाळावीत, अशी भूमिका आहे...



(१) निर्मिक एक असून तो सर्वव्यापी, निर्गुण, निर्विकार व सत्यरुप आहे आणि सर्व माणसे त्याची लेकरे आहेत. या निर्मिकाशिवाय, निर्मात्याशिवाय मी इतर कशाचीही पूजा करणार नाही.


(२) निर्मिकाची भक्ती करण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येकाला आहे. त्यासाठी पुरोहित किंवा मध्यस्थाची आवश्यकता नाही.


(३) माणूस जातीने श्रेष्ठ ठरत नसून गुणांनी श्रेष्ठ ठरतो.


(४) निर्मिक सावयव रुपाने अवतरत नाही.


(५) पुनर्जन्म, परलोक, मोक्ष, कर्मकांड, जपतप या गोष्टी अज्ञानमूलक आहेत; त्यांचा अवलंब माझ्याकडून होणार नाही.


(६) जनावरांना मारण्यात मी सहभागी होणार नाही.


(७) दारुच्या व्यसनापासून अलिप्त राहण्याचा मी प्रयत्न करीन आणि...


(८) तसेच समाजाचा खर्च चालावा म्हणून मी माझ्या उत्पन्नातून काही वर्गणी देईन.



हे दुसरे तिसरे काही नसून 'पंचशील' आहे. त्यावेळी आतासारखे बौध्द साहित्य उपलध्द नव्हते तरी त्याकाळी क्रांतिबा फुले यांची सत्यशोधक चळवळ ही बुध्दांचीच धम्म विचार धारा आहे हे आपल्याला दिसून येइल. क्रांतिबा फुले बुध्दीवादी होते. त्यांचे गुरु भगवान बुध्द होते. त्यांनी आपल्या आयुष्यात भगवान बुध्दांपासून समतेचा विचार उचलल्याचे लिहून ठेवले आहे. याचाच अर्थ त्यांनी राबविलेला समतेचा विचार जिथून आला तो स्रोत म्हणजे भगवान बुध्द होते. अन म्हणूनच बाबासाहेबांनी आपल्या आदर्शानी जिथून समतेचा विचार उचलला त्या महामानवाच्या धम्माचा अभ्यास केला. बाबासाहेबांचं जीवन क्रम बघितल्यास आपल्याला हे स्पष्टपणे दिसेल की रामजी पिता कबीर पंथी होते. संत कबीर हे सुध्दा बुध्दीवादी होते. त्यांनी सर्व बुध्दांचे विचार वाराणसी, सारनाथ येथून प्रवचनाच्या माध्यमातुन ऐकले होते. जोतिबा फुले हे रामजी बाबांचे मित्र होते. रामजी सपकाळ आपल्या मुलांना आपले मित्र फुल्यांच्या समाज कार्याची माहिती देत. म्हणून बाबासाहेबांच्या आयुष्यात बुध्दांपेक्षा आधी फुले व कबीर आले होते.




लेखं- श्रीराम पवार सर.

झांसी की वीरांगना झलकारी देवी !!

झांसी की वीरांगना झलकारी देवी !!


आज झांसी की वीरांगना झलकारी देवी इनका (जनमदिन २२ नवंबर, १८३०) विरांगना झलकारीदेवी को अभिवादन !!


वीरांगना झलकारी देवी झांसी की रानी लक्ष्मीबाई की सेना में महिला सेना की सेनापति थी जिसकी शक्ल राणी लक्ष्मीबाई से हुबहू मिलती थी. झलकारी के पति पूरनलाल राणी झांसी की सेना में तोपची थे. सन् १८५७ के प्रभम स्वतंत्रता संग्राम में अग्रेंजी सेना से राणी लक्ष्मीबाई के घिर जाने पर झलकारी ने बड़ी सूझ बुझ स्वामिभक्ति और राष्ट्रीयता का परिचय दिया था. निर्णायक समय में झलकारी ने हम शक्ल होने का फायदा उठाते हुए स्वयं झांसी की राणी लक्ष्मीबाई बन गयी थी और असली राणी लक्ष्मीबाई को सकुशल झांसी की सीमा से बाहर निकाल दिया था और रानी झांसी के रूप में अग्रेंजी सेना से लड़ते - लड़ते शहीद हो गयी थी. झलकारी झांसी की राणी लक्ष्मीबाई की नियमित सेना में, महिला शाखा दुर्गा दल की सेनापति थीं. वे लक्ष्मीबाई की हमशक्ल भी थीं इस कारण शत्रु को धोखा देने के लिए वे रानी के वेश में भी युद्ध करती थीं. अपने अंतिम समय में भी वे रानी के वेश में युद्ध करते हुए वे अंग्रेज़ों के हाथों पकड़ी गयीं और रानी को किले से भाग निकलने का अवसर मिल गया. उन्होंने प्रथम स्वाधीनता संग्राम में झांसी की राणी के साथ ब्रिटिश सेना के विरुद्ध अद्भुत वीरता से लड़ते हुए ब्रिटिश सेना के कई हमलों को विफल किया था. यदि लक्ष्मीबाई के सेनानायकों में से एक ने उनके साथ विश्वासघात न किया होता तो झांसी का किला ब्रिटिश सेना के लिए प्राय: अभेद्य था. झलकारी की गाथा आज भी बुंदेलखंड की लोकगाथाओं और लोकगीतों में सुनी जा सकती है. भारत सरकार ने २२ जुलाई २००१ में झलकारी के सम्मान में एक डाक टिकट जारी किया है, उनकी प्रतिमा और एक स्मारक अजमेर, राजस्थान में निर्माणाधीन है, उत्तर प्रदेश सरकार द्वारा उनकी एक प्रतिमा आगरा में स्थापित की गयी है, साथ ही उनके नाम से लखनऊ मे एक धर्मार्थ चिकित्सालय भी शुरु किया गया है.

 

झांसी की वीरांगना झलकारी देवी का जन्म २२ नवंबर, १८३० ई. को झांसी के बुंदेलखंड के समीप भोजला नामक गांव में हुआ था. एक निर्धन कोली परिवार मेंउनका जन्म हुआ था. वह जात दलित थीं. उनकी  माता का नाम जमुना देवी तथा पिता का नाम सदोवा सिंह था. बाल्यकाल में ही माँ की मृत्यु हो जाने के बाद उनके पिता ने उनका पोषण पुत्र की ही भाँति किया था. उन दिनों की सामाजिक परिस्थितियों और दूरस्थ गाँव में रहने के कारण झलकारी कोई औपचारिक शिक्षा या स्कूली शिक्षा तो प्राप्त नहीं कर सकी लेकिन उन्होनें खुद को एक अच्छे योद्धा के रूप में विकसित किया था. जंगलों में रहने के कारण ही झलकारी के पिता ने उसे घुड़सवारी एवं अस्त्र-शस्त्र संचालन की शिक्षा दिलवाई थी.  झलकारी बचपन से ही बहुत साहसी और दृढ़ प्रतिज्ञ थी. घर के काम के अलावा वह पशुओं के रखरखाव और जंगल से लकड़ी इकट्ठा करने का काम किया करती थी. उनकी बहादुरी का तब पता चला जब वो जंगल में अपने दोस्तों के साथ पशु चराने गई थी. जंगल में उसकी मुठभेड़ एक बाघ के साथ हो गई. जैसा कि अक्सर होता है, उनके सारे साथी भाग खड़े हुए लेकिन झलकरी ने अपनी कुल्हाड़ी से उस जानवर को मार डाला था. ऐसे ही जब एक बार जब डकैतों के एक गिरोह ने गाँव के एक व्यवसायी पर हमला किया तब झलकारी ने अपनी बहादुरी से उन्हें पीछे हटने को मजबूर कर दिया.


उनका विवाह रानी लक्ष्मीबाई की सेना के एक सैनिक पूरन कोरी से हुई. पूरन भी बहुत बहादुर था. वह रानी लक्ष्मीबाई के मुख्य द्वारा का रक्षक था. शादी के बाद गौरी पूजा के अवसर पर झलकारी गाँव की अन्य महिलाओं के साथ महारानी को सम्मान देने झांसी के किले मे गई. वहां राणी लक्ष्मीबाई उन्हें देख कर अवाक रह गई. उन दोनों की शक्लों में बहुत अधिक समानता थी. लक्ष्मीबाई, झलकारी  से खुद की सूरत देखकर प्रभावित तो थी ही लेकिन गांव की अन्य औरतों से झलकारी के किस्से सुनकर उन्होंने झलकारी को अपनी दुर्गा सेना में शामिल कर लिया. झलकारी ने यहां बंदूक चलाना, तोप चलाना और तलवारबाजी का प्रशिक्षण लिया.



झांसी के अनेक राजनैतिक घटनाक्रमों के बाद जब रानी लक्ष्मीबाई का अग्रेंजों के विरूद्ध निर्णायक युद्ध हुआ उस समय रानी की ही सेना का एक विश्वासघाती दूल्हा जू अग्रेंजी सेना से मिल गया था और झांसी के किले का ओरछा गेट का फाटक खोल दिया जब अग्रेंजी सेना झांसी के किले में कब्जा करने के लिए घुस पड़ी थी. उस समय रानी लक्ष्मीबाई को अग्रेंजी सेना से घिरता हुआ देख महिला सेना की सेनापति वीरांगना झलकारी देवी ने बलिदान और राष्ट्रभक्ति की अदभुत मिशाल पेश की थी. झलकारी की शक्ल रानी लक्ष्मीबाई से मिलती थी ही उसी सूझ बुझ और रण कौशल का परिचय देते हुए वह स्वयं रानी लक्ष्मीबाई बन गयी और असली झांसी की रानी लक्ष्मीबाई को सकुशल बाहर निकाल दिया और अग्रेंजी सेना से स्वयं संघर्ष करती रही. बाद में दूल्हा जी के बताने पर पता चला कि यह रानी लक्ष्मीबाई नहीं बल्कि महिला सेना की सेनापति झलकारी है जो अग्रेंजी सेना को धोखा देने के लिए रानी लक्ष्मीबाई बन कर लड़ रही है. बाद में वह शहीद हो गयी.

 


झलकारी देवी का अन्त किस प्रकार हुआ, इस बारे में इतिहासकार मौन हैं. कुछ लोगों का कहना है कि उन्हें अंग्रेजों द्वारा फाँसी दे दी गई. लेकिन कुछ का कहना है कि उनका अंग्रेजों की कैद में जीवन समाप्त हुआ. अखिल भारतीय युवा कोली राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. नरेशचन्द्र कोली के अनुसार ४ अप्रैल १८५७ को झलकारी बाई ने वीरगति प्राप्त की. वृंदावनलाल वर्मा जिन्होने पहली बार झलकारी देवी का उल्लेख उनकी “झांसी की रानी” पुस्तक में किया था उनके अनुसार रानी और झलकारी देवी  के संभ्रम का खुलासा होने के बाद ह्यु रोज़ ने झलकारी देवी  को मुक्त कर दिया था. उनके अनुसार झलकारी देवी का देहांत एक लंबी उम्र जीने के बाद हुआ था (उनके अनुसार उन्होने खुद झलकारीबाई के नाती से जानकारी ली थी). बद्री नारायण अपनी Women heroes and Dalit assertion in north India: culture, identity and politics‎ किताब में वर्मा से सहमत दिखते है.  इस किंवदंती के अनुसार जनरल ह्यूग रोज़ झलकारी का साहस और उसकी नेतृत्व क्षमता से बहुत प्रभावित हुआ, और झलकारी देवी को रिहा कर दिया था पर वो अंग्रेज जिन्होंने लाखों निर्दोष मनुष्यों और अनगिनत क्रांतिकारियों को कूर तरीकों से मारा था उनसे इस काम की आशा की ही नहीं जा सकती अतः यह केवल एक कयास मात्र है. दूसरे पक्ष के कुछ इतिहासकारों का कहना है कि उन्हें अंग्रेजों द्वारा फाँसी दे दी गई. लेकिन कुछ का कहना है कि उनका अंग्रेजों की कैद में जीवन समाप्त हुआ. अंग्रेज न्यायाधीश ने जब झलकारी को उम्रकैद का दंड दिया तो उसने अंग्रेजी न्याय की खिल्ली उड़ाते हुए तुरंत झाँसी से लौट जाने का आदेश दिया. चिढ़े हुए अंग्रेज अफसरों ने बौखलाकर तुरंत उस पर फौजी मानहानि तथा बगावत का आरोप सिद्ध किया और देशभक्त वीरांगना झलकारी देवी को तोप के मुँह से बाँधकर उड़वा दिया गया. इसके विपरीत कुछ इतिहासकार मानते हैं कि झलकारी इस युद्ध के दौरान एक गोला झलकारी को भी लगा और “जय भवानी” कहती हुई वह भूमि पर अपने गिर पड़ी. वह अपना काम कर चुकी थी और अंत में लड़ती हुई वीरगति को प्राप्त हुई. श्रीकृष्ण सरल ने  Indian revolutionaries: a comprehensive study, 1757-1961, Volume 1‎ पुस्तक में उनकी मृत्यू युद्ध के दौरानन हुई थी ऐसा वर्णन किया है. तत्कालीन इतिहासकारों ने लम्बे समय तक झलकारी बाई के योगदान को नजरअन्दाज किया, किन्तु बुन्देलखण्ड के अनेक लेखकों ने उनकी शौर्य गाथा गाई हैं. जिनमें चोखेलाल ने उनके जीवन पर एक वृहद् काव्य लिखा है और भवानी शंकर विशारद ने उनके जीवन परिचय को लिपिबद्ध किया है.
झांसी की रानी का इतिहास जब-जब लोगों के द्वारा पढा जायगा, झलकारी देवी के योगदान को लोग अवश्य याद करेंगे. इस में उत्तर प्रदेश के आगरा शहर में उनकी घोडे पर सवार मूर्ति स्थापित की गई है. लखनऊ में उनके नाम पर धर्मार्थ चिकित्सालय प्रारम्भ किया गया है. जिससे भविष्य की भारतीय समाज की अनेक पीढयाँ उनसे देश धर्म पर मर मिट जाने की प्रेरणा लेती रहेंगी. बाद में भारत सरकार के पारेट एण्ड टेलीग्राफ विभाग ने २२ जुलाई २००१ को झलकारी देवी पर डाक टिकट जारी कर उसके योगदान को स्वीकार किया है. झांसी के इतिहास कारों में अधिकतर ने वीरांगना झलकारी देवी को नियमित स्वतन्त्रता संग्राम के इतिहास में नहीं सम्मलित किया किन्तु बुन्देली के सुप्रसिद्ध गीतकार महाकवि अवधेश ने झलकारी देवी शीर्षक से एक नाटक लिखकर वीरांगना झलकारी देवी की ऐतिहासिकता प्रमाणित की है. कौशलेन्द्र प्रताप यादव ने अपनी पुस्तक आल्हा उदल और बुंदेलखंड में झलकारी देवी के बलिदान को रानी लक्ष्मीबाई के बलिदान से भी उत्कृष्ट मन है.

 


१८५७ के प्रथम स्वतन्त्रता संग्राम और बाद के स्वतन्त्रता आन्दोलनों में देश के अनेक वीरो और वीरांगनाओं ने अपनी कुर्बानी दी है. देश की आजादी के लिए शहीद होने वाले ऐसे अनेक वीरो और वीरांगनाओं का नाम तो स्वर्णक्षरों में अकित है किन्तु बहुत से ऐसे वीर और वीरांगनाये है जिनका नाम इतिहास में दर्ज नहीं है. तो बहुत से ऐसे भी वीर और वीरांगनाएं है जो इतिहास कारों की नजर में तो नहीं आ पाये जिससे वे इतिहास के स्वार्णिम पृष्टों में तो दर्ज होने से वंचित रह गये किन्तु उन्हें लोकमान्यता इतनी अधिक मिली कि उनकी शहादत बहुत दिनों तक गुमनाम नहीं रह सकी. ऐसे अनेक वीरो और वीरांगनाओं का स्वतन्त्रता संग्राम में दिया गया योगदान धीरे-धीरे समाज के सामने आ रहा है. और अपने शासक झांसी की रानी लक्ष्मीबाई के प्राण बचाने के लिए स्वयं वीरांगना बलिदान हो जाने वाली वीरांगना झलकारी देवी ऐसी ही एक अमर शहीद वीरांगना है जिनके योगदान को जानकार लोग बहुत दिन बाद रेखाकित क र पाये है. झलकारी जैसे हजारों बलिदानी अब भी गुमनामी के अधेरे में खोये है जिनकी खोजकर स्वतंत्रता संग्राम के इतिहास की भी वृद्धि करने की पहली आवश्यकता है.
 


झलकारी देवी की गाथा आज भी बुंदेलखंड की लोकगाथाओं और लोकगीतों में सुनी जा सकती है. उनकी प्रतिमा और एक स्मारक अजमेर, राजस्थान में है. उत्तर प्रदेश सरकार द्वारा उनकी एक प्रतिमा आगरा में स्थापित की गई है. सारे पहलू में एक दुखद बाद यह है कि मुख्यधारा के इतिहासकारों द्वारा, झलकारी देवी के योगदान को बहुत विस्तार नहीं दिया गया है, लेकिन आधुनिक स्थानीय लेखकों ने उन्हें गुमनामी से उभारा है. चोखेलाल वर्मा ने उनके जीवन पर एक वृहद काव्य लिखा है. मोहनदास नैमिशराय ने उनकी जीवनी को पुस्तक का रूप दिया है. वीरांगना झलकारी देवी के इस प्रकार झांसी की रानी के प्राण बचाने अपनी मातृभुमि झांसी और राष्ट्र की रक्षा के लिए दिये गये बलिदान को स्वतंत्रता संग्राम का इतिहास भले ही अपनी स्वार्णिम पृष्टों में न समेट सका हो किन्तु झांसी के लोक इतिहासकारो , कवियों , लेखकों , ने वीरांगना झलकारी देवी के स्वतंत्रता संग्राम में दिये गये योगदान को श्रृद्धा के साथ स्वीकार किया है.  भवानी शंकर विषारद ने उनके जीवन परिचय को लिपिबद्ध किया है. राष्ट्रकवि मैथिलीशरण गुप्त ने झलकारी की बहादुरी को निम्न प्रकार पंक्तिबद्ध किया है...




जा कर रण में ललकारी थी, वह तो झाँसी की झलकारी थी...

गोरों से लड़ना सिखा गई, है इतिहास में झलक रही,

वह भारत की ही नारी थी.




त्याग और बलिदान की ऐसी मिशाल देश करने वाली वीरांगना झलकारी देवी के जन्म दिवस के अवसर पर 'प्रबोधन' परिवार की विनम्र श्रद्धान्जलि !!



संदर्भ-


http://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%9D%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88
   
 

बुंदेलखंड के गौरव बुंदेलखंड दर्शन डोट कॉम

 

1.0 1.1 "वीरांगना - झलकारी बाई" (पीएचपी). मधुमती. अभिगमन तिथि: २००९.

 

"डेटाबेस ऑफ इंडियन स्टाम्प्स" (एचटीएम). कामत पॉटपुरी. अभिगमन तिथि: २००९.

 

"ग्रेट वूमेन ऑफ इंडिया" (अँग्रेज़ी में) (एचटीएम). Dakshina Kannada Philatelic and Numismatic Association. अभिगमन तिथि: २००९.

 

"वीरांगना झलकारी बाई" (पीएचपी). भारतीय साहित्य संग्रह. अभिगमन तिथि: २००९.





लेखं संकलन- निलेश रजनी भास्कर कळसकर(प्रबोधन टीम)


दलितांवरील अन्यायाबाबत सर्वत्र उदासीनताच !!

दलितांवरील अन्यायाबाबत सर्वत्र उदासीनताच !!



२६ जानेवारी १९५० रोजी देशात भारतीय राज्य घटना अंमलात आली. घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्य घटना तयार करताना भारतातील दलित व आदिवासी समाज बांधवांचे इतर सवर्ण व्यवस्थेतील लोकांकडून शोषण होऊ नये म्हणून , त्यांच्यावर अन्याय, अत्याचार, बहिष्कार, हत्या करणे, दलित व आदिवासी समाजातील महिलांचे शारीरिक शोषण,विनयभंग यापासून संरक्षण व्हावे म्हणून राज्य घटनेत अस्पृश्यता नष्ट करण्याबाबतच्या कलमाचा अंतर्भाव केला.असेअसले तरी या समाजांच्या सामाजिक व आर्थिक स्थितीमध्ये फारशा सुधारणा झाल्या नाहीत. सरकारने विविध उपाययोजना केल्या असल्या तरी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील समाज बांधव सर्वच बाबींमध्ये आज मागासलेले व दुर्बल राहिलेले दिसत आहेत. हे समाज आजही अनेक नागरी अधिकारांपासून वंचित आहेत, तसेच ते अनेक अपराधांचे बळीही ठरले असून अप्रतिष्ठा,अपमान व गांजवणुकीला त्यांना तोड द्यावे लागत आहे. त्यांना आपल्या जिवाला व मालमत्तेला मुकावे लागल्याच्या अनेक घटना आज पर्यंत घडल्या आहेत. या समाजांची सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व आर्थिक अशी गळचेपी आज पर्यंत होतांना दिसत आहे. शिक्षणाच्या प्रचारामुळे या समाजांच्या मनात त्यांच्या मूलभूत हक्कांविषयी जाणीव निर्माण झाली आहे. त्यामुळे ते आपली मते समाजापुढे मांडण्याचा प्रयत्न करु लागले आहेत. मात्र याकडे अन्य समाजांचा दृष्टिकोन सहानुभूतीचा किंवा सामंजस्याचा राहत नाही. ज्या ज्या वेळी अनुसूचित जाती- जमातीची व्यक्ती आपल्या आत्मसन्मान राखण्याचा अथवा आपल्या स्त्रियांच्या अब्रुचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतात त्या त्या वेळी इतर समाजातील प्रभावी व बलिष्ठ वर्ग दलित व आदिवासी समाज बांधवावर हल्ले करताना दिसतात. त्यामुळे या समाजातील महिलांवरील विनयभंग, बलात्कार, साहुहिक हल्ले वाढलेले दिसत आहेत.


 


भारतीय राज्य घटनेत ठळकपणे नमुद केले आहे की, 'राज्य, जनतेतील दुर्बल घटक आणि विशेषत: अनुसूचित जाती, जमाती यांचे शैक्षणिक, आर्थिक हितसंवर्धन विशेष काळजीपूर्वक करील आणि त्यांच्यावरील सामाजिक अन्याय व सर्व प्रकारचे शोषण यापासून त्यांचे रक्षण करील.' असे असतानाही १९९४ ते १९९६ च्या दरम्यानच्या काळात देशातील विविध राज्यात व केंद्रशासित प्रदेशामध्ये अनुसूचित जाती जमातींच्या समाज बांधवांवर अन्याय, अत्याचार, हत्या, महिलांची विटंबना यांच्या असंख्य घटना घडल्या आहेत. या काळातील गुन्हय़ासंदर्भात पोलिसांकडे ९८३४९ प्रकरणांची नोंद झाली आहे. यापैकी ३८,४८३ प्रकरणे अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीं अंतर्गत आहेत. १६६० प्रकरणे खून व हत्येची, २९१४ प्रकरणे दलित स्त्रियावरील अत्याचार व विनयभंगाची आणि १३६७१ प्रकरणे शारिरीक मारहाण व दुखापतीची होती. देशातील पोलिस यंत्रणेतील काही पोलिस कर्मचार्‍यांच्या असहकारामुळे अन्याय, अत्याचार प्रकरणांची पोलिस मध्ये नोंद होत नाही. अन्यथा ही संख्या आणखी वाढली असती. संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रतिनिधीनी भारतातील ११ राज्यातील ५६५ गावांमध्ये अस्पृश्यते संबंधी केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आणली आहे. मागील पाच वर्षातील पोलिसांच्या आकडेवारी नुसार दररोज तीन दलित महिलांवर बलात्कार होतो. प्रत्येक आठवड्यात पाच दलितांच्या घराची जाळपोळ करण्यात येते. सहा दलित बांधवाचे अपहरण केले जाते. ११ पेक्षा जास्त दलित बांधवांना मारहाण होण्याचे प्रकार घडतात व १३ पेक्षा जास्त लोकांची कुठल्याना कुठल्या कारणावरुन पद्धतशीर हत्या घडविण्यात येते. एकंदरीत दर अठराव्या मिनिटात एक दलित कोणत्या ना कोणत्या रुपातील अन्याय व अत्याचारास बळी पडताना दिसतो. हे भयानक व भीषण वास्तव भारताला स्वातंत्र्य मिळून एवढी वष्रे झाल्यानंतरही दिसत आहे. आजही देशातील बर्‍याच पोलिस ठाण्यांमध्ये दलितांची तक्रार नोंदवून घेतली जात नाही. तर बरेच दलित त्यांच्यावर झालेल्या अन्याय व अत्याचाराची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये नोंदविण्यास धजत नाहीत.


 


देशातील विविध राज्यात व केंद्र शासित प्रदेशामध्ये २००७ च्या काळामध्ये अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा १९८९ अंतर्गत पोलिस स्टेशन मध्ये जे गुन्हे नोंद झाली आहेत ते बघितल्यास भयानक स्थिती नजरेसमोर येते.प्रत्येक राज्याची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे.


 


आंध्रप्रदेश ४७७६, आसाम ३३९, बिहार ५४३१, चंदीगड २, छत्तीसगड २, दादरा व नगर हवेली १, दिल्ली ६७, गोवा ५, गुजरात १११६, हरियाणा २७६, हिमाचल प्रदेश १०१, झारखंड ७४३, कर्नाटक १८२७, केरळ ७११, मध्यप्रदेश ४४०९, महाराष्ट्र १४७८, नागालँड ३, ओडिसा २१३५, पंजाब ३.४, राजस्थान ४४२१, सिक्कीम १४, तामिळनाडू १९३७, त्रिपुरा १२, उत्तरप्रदेश ६९३७, उत्तराखंड ८१, पश्‍चिम बंगाल २१. एकूण दलित व आदिवासी समाज बांधवांवरील अन्याय,अत्याचार,हत्या,बलात्कार, विनयभंग यांच्या ३८०८३ इतक्या घटनांची नोंद झाली आहे. यातील ८५४९ प्रकरणे पोलिस विभागात प्रलंबित अवस्थेत आहेत. ही आकडेवारी केंद्रीय गृह मंत्रालय (नवीदिल्ली) च्या अहवालामधून घेतली आहे.


 



त्याचप्रमाणे नागपूर शहर व नागपूर ग्रामीण जिल्हा या विभागामध्ये २००७ ते २०१३ पर्यंत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती समाज बांधवावर घडलेल्या ज्या घटना आहेत त्यांची संख्याही फार मोठी आहे. ३०ते ३५ प्रकरणे पोलिस स्टेशनच्या रेकॉर्डमध्ये नोंद आली असली तरी अनेक प्रकरणाच्या एफआयआरची नोंदच झाली नाही. अनेक प्रकरणातील आरोपी मोकळे आहेत. प्रशासकीय यंत्रणा, जिल्हाधिकारी कार्यालयातील दक्षता समिती , पोलिस विभाग व सामाजिक न्याय विभागातील वरिष्ठ पातळी वरील अधिकारी वर्ग उदासीन अवस्थेत या घडलेल्या प्रकरणांकडे बघताना दिसतात. कायदे कितीही बळकट असले तरी आजही देशातील विविध राज्यात व केंद्र शासित प्रदेशात दलित बांधवावर अन्याय, अत्याचार, हत्या, खून, विनयभंग, जबरी संभोग अशा घटना घडत आहेत. संसदेत सुद्धा या गंभीर प्रश्नावर चर्चा करताना कुठलाही दलित व आदिवासी खासदार प्रश्न विचारताना दिसत नाही. याच सोबत कुठलाही राजकीय पक्ष या अत्यंत महत्वाच्या प्रश्नावर आपली स्पष्टपणे भूमिका संसदेत किंवा बाहेर मांडताना दिसत नाही. देशातील पुरोगामी विचारांचा आभास उत्पन्न करणार्‍या सामाजिक संघटनाही शांत आहेत. इतर प्रादेशिक पक्षातील पुरोगामी विचारांचे नेते या गंभीर प्रश्नावर उदासीन का आहेत,हेच कळत नाही.

 




धन्यवाद- दै.लोकशाहीवार्ता.



लेखं- विलास मनोहर(०९७३०५६५५९१)


    

खादीच्या आडोशाला दहशतवादी शेंडी !!

खादीच्या आडोशाला दहशतवादी शेंडी !!


मनुवादी प्रवृत्ती दिवसेंदिवस आक्रमक होत असून तथाकथित संस्कृती रक्षणाचा ठेका घेतलेल्या मनुच्या वारसदारांनी समता, बंधुता आणि स्वातंत्र्याला मातीमोल करण्याचा विडा उचललेला दिसतो. धार्मिकतेच्या बुरख्याआड राहून दहशतवादाला खतपाणी घालणाऱया या पवृत्ती दिवसेंदिवस निर्ढावत आहेत ही चिंतेची बाब आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या मारेकऱयांचा शोध लावण्यास सरकार अपयशी ठरल्याने अशा प्रवृत्ती जास्तच मग्रूर झाल्याचे दिसून येत आहे. अशाच प्रवृत्तीपैकी कोणीतरी वारकरी संप्रदायातील ख्यातनाम प्रवचनकार, इतिहास संशोधक डॉ. संदानंद मोरे यांना फोनवरुन जीवे मारण्याची धमकी दिली. 'जास्त शहाणपणा केलात तर तुमचा नरेंद्र दाभोळकर करु' अशा आशयाची ही धमकी असून, डॉ. सदानंद मोरे यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. डॉ. मोरे संत-वारकरी संप्रदायातील विद्वान, लोकशाही मूल्यांना मानणारे साक्षेपी संशोधक आहेत. वारकरी पंथ, या पंथाची विठ्ठलभक्ती,भक्तीमार्गावरील श्रद्धा याबाबत त्यांची स्वत:ची ठाम मते आहेत. यामुळे ते कोणाच्याही श्रद्धेला ठेच पोहचेल अशाप्रकारचे चुकीचे वक्तव्य किंवा लेखन करणार नाहीत असे त्यांच्याबाबतीत ठामपणे म्हणता येऊ शकते. ईश्वर आराधना करताना द्वेष-मत्सराच्या हिशोबात अडकण्यात वारकऱयांना रस नसतो. कारण आयुष्यभर पुजाअर्चा, भजने, वाऱया, उपासतापास याद्वारे निष्ठापूर्वक भक्ती अर्पण केली की, इच्छित फलप्राप्ती होते यावर त्यांचा दृढ विश्वास असतो. डॉ. सदानंद मोरे अशा वारकऱयांचे नेतृत्व करत असल्याने, त्यांच्या ठायी कुणाविषयी द्वेष, मत्सर असणे शक्य नाही. समाजात वावरताना आपण सारी ईश्वराची लेकरं आहोत त्यामुळे एकमेकांविषयी सद्भाव, जिव्हाळा असणे आवश्यक असल्याचे मत मांडणारे डॉ. मोरे इतिहासाचे गाढे अभ्यासक व संशोधकही आहेत हे लक्षात घेतले पाहिजे.
 




स्वातंत्र्योत्तर भारताची सामाजिक रचना व पाया लोकशाहीने प्रस्थापित केलेल्या समता, सामाजिक न्याय व बंधुतेवर आधारित असल्याने जात-सांप्रदाय इ.सारे पवाह गौण ठरतात. डॉ. मोरेंना हा विचार अभिप्रेत असल्याने त्यांनी अंधश्रद्धा, बुवाबाजी, जादूटोणा या प्रकारावर कडाडून टीका करण्यास मागेपुढे पाहिले नाही. प्रा.श्याम मानव व डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्याबरोबर प्रबोधनाचे मिशन चालविताना त्यात झोकून दिलेल्यापैकी ते एक आहेत. धर्माबद्दल कुणाला असूया असू नये. पण धर्माच्या नावाखाली इतरांना भयभीत करणे हा गुन्हा आहे. 


भारतीय राज्यघटनेने व्यक्तीस्वातंत्र्य अर्थात विचार व्यक्त करण्याचे, तद्नुषंगानं विचार प्रसारित करण्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जो अधिकार दिला आहे. त्यानुसार परवा डॉ. मोरे यांनी भूमिका मांडताना नरेंद्र मोदी हे फॅसिस्ट विचारांचे असल्याने मोदीच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले सरकारसुद्धा फॅसिस्ट प्रवृत्तीचे असू शकते, फॅसिस्ट प्रवृत्तीचे सरकार स्थापन होणे म्हणजे देश आणि सर्व स्तरातील समाजाला धोका निर्माण होणे आहे असा इशारा एका वृत्त वाहिनीवर बोलताना दिला होता. या मुलाखतीनंतरच डॉ. मोरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. डॉ. मोरे यांना मिळालेल्या धमकीचे एरवी फारसे गांभीर्य राहिले नसते. परंतु, डॉ. दाभोळकर यांची झालेली हत्या आणि या हत्येच्या सूत्रधारांना हुडकून काढण्यास सरकारला आलेले अपयश या पार्श्वभूमीवर डॉ. मोरे यांना देण्यात आलेल्या धमकीकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. मोदींबाबत डॉ. मोरे यांनी व्यक्त केलेल्या शंकेचा प्रतिवाद करता येऊ शकतो. त्यांची ही मते मान्य नसणारेही अनेक लोक असू शकतात. लोकशाही व्यवस्थेत आपल्याला मान्य नसलेल्या मतांविषयी प्रतिवाद करुन जनमत आपल्या बाजूने उभे करण्याचा सक्षम पर्याय उपलब्ध असतो. डॉ. मोरे यांना धमकी देणाऱयांचा मात्र लोकशाही प्रकियेवर विश्वासच नाही. यामुळेच आपल्याला विरोध करणाऱयाचे जीवनच समाप्त करण्याच्या धमक्या ते देऊ शकतात. ज्यांना तर्काने आणि विवेकाने नामोहरम करणे शक्य नाही त्यांचे जीवनच संपवावे अशी मानसिकता तयार होणे हे राज्यकर्त्याच्या अपयशाचे फलित आहे असे आम्हाला वाटते. संविधानात लोकशाही मान्य करण्यात आली. आहे, लोकशाहीनुसार देशात निवडणुका होत आहेत. परंतु समाजात मात्र लोकशाही रुजविण्यात सरकारने कोणतीही पाऊले उचलेली नाहीत. व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनात लोकशाही मूल्ये रुजण्यासाठी बालवाडीपासून ते उच्चशिक्षणापर्यंतच्या अभ्यासकमातून लोकशाहीचे संस्कार व्यक्तीवर होणे आवश्यक असते. मात्र आमच्या शाळा कॉलेजात माणसा-माणसात भेद मानणाऱया, जन्माच्या आधारावर विशेष लाभ देणाऱया धर्मव्यवस्थेचाच पुरस्कार केला जातो. विरोधकाचे म्हणणे ऐकून घेऊन चर्चेतून मार्ग काढण्याच्या प्रकियेला महत्व देण्याऐवजी धार्मिक पुस्तकात काय लिहिले आहे त्यानुसार वागावे अशी शिकवण दिली जाते. अल्पसंख्य धर्मियांच्या कत्तली करणाऱया लोकांना शिक्षा करण्याचे समर्थन करण्याऐवजी अशा व्यक्तींना नायकत्व बहाल करण्याचे पयत्न पसारमाध्यमातून, नाटक-चित्रपटातून, कथा-कादंबऱयातून काव्य-शाहीरीतून केले जातात. विरोधकांना शिवीगाळ करणारांना, जन्माच्या स्थानावरुन, भाषेच्या स्थानावरुन, धार्मिक श्रद्धांच्या बाबतीतील भिन्नतेवरुन माणसा-माणसात शत्रूत्व वाढीस लावणारांना अमूक-तमूक हृदयसम्राट, जाणते राजे, नवनिर्माणकर्ते, विकासपुरुष अशा सन्मानजनक बिरुदावलीने अलंकृत केले जाते. या स्थितीत लोकशाहीचा आग्रह धरणारांना, विवेकवादाचा पुरस्कार करणारांना, संविधानाच्या अंमलबजावणीची मागणी करणारांना धमक्या मिळणार नाहीत तर काय होणार? डॉ. मोरे यांना देण्यात आलेली धमकी अथवा डॉ. दाभोळकरांचा करण्यात आलेला खून यासाठी धमकी देणारे अथवा खून करणारेच केवळ दोषी नाहीत तर त्यासाठी मुलांवर फॅसिस्ट संस्कार करणारे पालक, विशिष्ठ धर्मियांना तुच्छ लेखण्याची प्रवृत्ती शिकवणारे शिक्षक, संविधानाच्या धर्मातीत दृष्टीकोनाला धाब्यावर बसवून पक्षपाती अभ्यासकम बनविणारे शिक्षणतज्ञ, बहुसंख्यक धर्माची मते मिळावी यासाठी पक्षपाती भूमिका घेणारे राज्यकर्ते, सत्याची बाजू न घेता जातीगत स्वार्थासाठी आणि धार्मिक अहंकारापोटी एकांगी बाजू मांडणारी प्रसारमाध्यमे हे सर्वच जबाबदार आहेत.


डॉ. मोरे यांना जिवे मारण्याची धमकी हा प्रकार तसा नवीन नाही. परिवर्तनासाठी निरलसपणे कार्यरत असलेल्या जीवनदानी कार्यकर्त्यांचा धमकीविना एकही महिना देखील जात नसेल! ही धमकी डॉ. दाभोळकरांच्या खूनाच्या रुपाने प्रत्यक्षात उतरल्यानंतर अशा साध्याशा धमकीकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाही. डॉ. दाभोळकरांचे मारेकरी अद्यापही मोकाट आहेत. आता त्यांनी डॉ. मोरे यांच्याकडे मोर्चा वळविला आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. धमकी मिळाली म्हणून पोलीस संरक्षण देणे हा खंबीर विश्वास निर्माण करण्याचा पर्याय होऊ शकत नाही. ही वरवरची मलमपट्टी आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद सांभाळणाऱया रामचंद्र पाटलाने यापूर्वीही आम्ही यँव करु, त्यँव करु, अमूकाच्या मुसक्या आवळू, तमुकाची पाळेमुळे खणून काढू अशा बकवास बाता आतापर्यंत भरपूर केल्या आहेत. त्यांच्या या उसन्या अवसानाला नाशिकचा जंगलीबाबासुद्धा घाबरला नाही तेव्हा सनातन शेंडीधारी काय घाबरणार? गुन्हेगारांपर्यंत आपण लवकरच पोहचू असा तेंडफटाका फोडणाऱया गृहमंत्र्यांवरील जनतेचा विश्वास केव्हाच उडाला आहे. दाभोळकरांची हत्या पूर्वनियोजित होती हे खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितले आहे. हे पाहता परिवर्तनाचा विचार मांडणाऱया आणि मोदीवेड न लागलेल्या डॉ. मोरेंसारख्या अनेकांच्या बाबतीतही असा पूर्वनियोजित प्लॅन तयार नसेल कशावरुन? स्वतंत्र भारतातील दहशतवादाची सुरुवात करणारा पहिला दहशतवादी नथुराम गोडसे अशाच सनातन शेंडीधाऱयांच्या कळपातील होता. या कळपाचा वेळीच बंदोबस्त तत्कालीन गृहमंत्री वल्लभभाई पटेल यांनी केला असता तर देशाला लागलेली दहशतवादाची किड गर्भातच ठेचली गेली असती. परंतु त्यावेळचे राष्ट्रपती, गृहमंत्री सोमनाथाची घंटा वाजविण्यात दंग राहिल्याने भगव्या दहशतवादाची शेंडी शाबूत राहिली. आजसुद्धा महाराष्ट्रातील रामचंद्र पाटलासारख्या तोंडाच्या फुलबाज्या उडविणाऱया गृहमंत्र्यांमुळे सनातन शेंडी धोकादायकरित्या फुरफुरत आहे. खादीच्या आडोशाला लपून बसलेल्या या शेंडीने भारतातील सहिष्णुतेचे, सौहार्दाचे वातावरण गढूळ केले आहे. या शेंडीला त्वरीत छाटले गेले नाही तर आणखी किती दाभोळकर महाराष्ट्रातील विविध शहराच्या मोक्षधाम घाटावर पोहचतील हे सांगता येणार नाही.



लेखं- सुनील खोब्रागाडे सर 

(लेखंक दैनिक महानायक या वर्तमानपत्राचे संपादक आहेत)

प्रार्थनेसाठी हात जोडण्याची सक्ती नाही.... हायकोर्टाचा निर्णय- नाशिकच्या शिक्षकास मिळाला न्याय !!

प्रार्थनेसाठी हात जोडण्याची सक्ती नाही.... हायकोर्टाचा निर्णय- नाशिकच्या शिक्षकास मिळाला न्याय  !!






शाळेत रोजच्या परिपाठाच्या तासाला म्हटल्या जाणार्‍या प्रार्थना धार्मिक स्वरूपाच्या व स्वत:च्या धार्मिक श्रद्धांच्या विपरीत आहेत, असे एखाद्या शिक्षकाला वाटत असेल तर त्या शिक्षकाला अशा प्रार्थनेच्या वेळी हात जोडून उभे राहण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही, असा पथदर्शक निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

 



मात्र, अशा शिक्षकाने प्रार्थनेच्या वेळी हात जोडले नाहीत तरी त्याने शांतपणे स्तब्ध उभे राहून इतरांच्या भावनांचा आदर करायला हवा, असे न्यायालयाने नमूद केले आहे. राज्य शासनाने प्रत्येक अनुदानित शाळेत प्रत्येक सत्राच्या सुरुवातीस मूल्यशिक्षणाची ३0 मिनिटांची ‘परिपाठ तासिका’ घेणे व त्यात सामुदायिक प्रार्थना म्हणणे सक्तीचे केले असले तरी स्वत:च्या धार्मिक श्रद्धेला पटत नाही म्हणून हात जोडून उभे न राहणे, हे शिक्षकाचे बेशिस्त वर्तन ठरत नाही व केवळ तेवढय़ाच कारणावरून त्याची वेतनवाढही रोखता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

 



महात्मा फुले समाज शिक्षण संस्थेतर्फे नाशिक येथे चालवल्या जाणार्‍या मातोश्री सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील शिक्षक संजय आनंदा साळवे यांनी केलेली रिट याचिका मंजूर करून न्या. अभय ओक व न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

 



या शाळेत रोजच्या परिपाठात साने गुरुजींची ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे..’ ही तसेच ‘नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा, सत्यम्, शिवम्, सुंदरा..’ अशा दोन प्रार्थना म्हटल्या जातात. शिक्षक संजय साळवे नवबौद्ध आहेत तर शाळेतील ५९ टक्के विद्यार्थी मागासवर्गीय, ३५ टक्के मुस्लिम आणि सहा टक्के खुल्या प्रवर्गातील आहेत. साळवेसर प्रार्थनेला हात जोडून उभे राहत नाहीत, यावरून त्यांच्यात व शाळा व्यवस्थापन यांच्यात गेली पाच वर्षे वाद चालला होता. साळवे यांचे हे वर्तन बेशिस्तीचे आहे, असे म्हणून शाळेने त्यांना नियमानुसार देय असलेली उच्च वेतनश्रेणीही दिली नव्हती. हा वाद शिक्षणाधिकार्‍यांकडे गेला तेव्हा त्यांनी शाळेत म्हटल्या जाणार्‍या प्रार्थना हे धार्मिक शिक्षण असल्याने त्या बंद करण्याच्या व साळवेसरांना प्रार्थनेच्या वेळी हात जोडण्याची सक्ती न करण्याचा आदेश शाळेला दिला होता. शिक्षणाधिकार्‍यांचा हा निर्णय पाळण्यास शाळेला भाग पाडावे, यासाठी साळवे यांनी तर तो रद्द करावा, यासाठी शाळा व्यवस्थापनाने परस्परविरोधी याचिका न्यायालयात केल्या होत्या.

 



राज्यघटनेचा अनुच्छेद २८ व राज्य सरकारच्या माध्यमिक शाळा संहितेच्या नियम ४५ नुसार सरकारी व अनुदानित शाळांमध्ये धार्मिक शिक्षण देणे निषिद्ध ठरवलेले आहे. शाळेच्या या प्रार्थना ठरावीक धर्माच्या असल्याने त्या धार्मिक शिक्षणात मोडतात. शिवाय त्या आपल्या वैयक्तिक धार्मिक श्रद्धानुरूप नसल्याने आपण प्रार्थनेच्या वेळी नुसते स्तब्ध उभे राहू, फार तर त्या तोंडाने म्हणू पण हात जोडणार नाही, अशी साळवे यांची भूमिका होती.

 



या उलट शाळेचे म्हणणे असे होते की, शाळा अनुदानित असल्याने सरकारी फतव्यानुसार रोज परिपाठ व त्यात सामुदायिक प्रार्थना घेणे बंधनकारक आहे. शाळेत म्हटल्या जाणार्‍या दोन्ही प्रार्थना बिलकूल धार्मिक स्वरूपाच्या नाहीत तर त्या धमनिरपेक्ष व मुलांमध्ये उदात्त जीवनमूल्ये बाणवणार्‍या आहेत. त्यामुळे या प्रार्थना धार्मिक शिक्षण नसून मूल्यशिक्षण आहे. सरकारी नियमानुसार मूल्यशिक्षण हा अभ्यासक्रमाचा अधिकृत भाग आहे. त्यामुळे कोणीही शिक्षक स्वत:च्या धार्मिक श्रद्धेचे कारण पुढे करून या मूल्यशिक्षणात सहभागी होण्यास नकार देऊ शकत नाही, कारण हा त्याच्या नोकरीच्या सेवानियमांचाच एक भाग आहे.

 


दोन्ही बाजूंचे वाद-मुद्दे ऐकल्यानंतर न्यायालयाने निकालपत्रात म्हटले की, या शाळेत म्हटल्या जाणार्‍या दोन्ही प्रार्थना आम्ही वाचल्या. या प्रार्थना धार्मिक स्वरूपाच्या नाहीत, असे म्हणता येऊ शकते, असे आम्हाला वाटते. खरे तर यातील एक प्रार्थना ज्यांची धर्म निरपेक्षता निरपवाद आहे, असे आदरणीय सुधारणावादी, स्वातंत्र्यसैनिक व थोर समाजवादी नेते साने गुरुजी यांनी लिहिलेली आहे. त्यामुळे परिपाठात या प्रार्थनांचा समावेश करून ही शाळा धार्मिक शिक्षण देते, असे काही म्हणता येत नाही.

 


तरीही राज्यघटनेने याचिकाकर्ते साळवे यांना स्वत:च्या विवेकबुद्धीने वागण्याचे मूलभूत स्वातंत्र्य दिलेले असल्याने या प्रार्थना धार्मिक स्वरूपाच्या असण्याविषयीचे स्वत:चे मत बदलण्याची व प्रार्थनेच्या वेळी हात जोडून उभे राहण्याची सक्ती त्यांच्यावर केली जाऊ शकत नाही.




राष्ट्रगीताचा आधार-

हा निकाल देताना खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाने बिजॉय इमॅन्युएल वि. केरळ सरकार या प्रकरणात राष्ट्रगीतासंदर्भात दिलेल्या निकालाचा आधार घेतला. प्रत्येकाने राष्ट्रगीत म्हटलेच पाहिजे, असा कायदा नाही. तसेच सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रगीत म्हटले जात असता केवळ स्तब्धपणे उभे राहण्याने राष्ट्रगीताचा अपमानही होत नाही, असे त्यात या निकालात म्हटले आहे.



संदर्भ- http://onlinenews1.lokmat.com/staticpages/editions/today/main/DetailedNews-All.php?nid=MainEdition-1-1-02-11-2013-e6226&ndate=2013-11-02&editionname=main



धन्यवाद- दै.लोकमत.


मी आणि माझे सतत बदलणारे फालतू अभिमान !!


मी आणि माझे सतत बदलणारे फालतू अभिमान !!





वाचा आणि बघा पटतंय का...??? खूप दिवस डोक्यात घोळत होता हा विषय... आज धीर करून शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतोय...


 


मी मुंबईत जन्मलो म्हणून मी 'मुंबईकर', मग मला बाकी सगळे उपरे वाटणार... गाव रत्नागिरी म्हणून मी 'रत्नागिरीकर', मग मला खालचे चिपळूणवाले आणि वरचे सिंधुदुर्गवाले पण लांबचे वाटणार..., रत्नागिरी कोकणात म्हणून मग मी 'कोकणी', मग मला कोकणातले सगळे आपले वाटणार आणि पुण्या पासून ते पार नागपूर पर्यंतचे सगळे परके वाटणार... मी त्यांना 'घाटी' म्हणणार..., कोकण महाराष्ट्रात म्हणून मी 'महाराष्ट्रीयन', मग इतर सगळे म्हणजे भय्ये, गुजराती, बंगाली माझे दुश्मन..., आता मी राहतो डोंबिवलीत म्हणून मी 'डोम्बिवलीकर', मग मी डबल फास्ट गाडीत चढल्यावर कल्याण वाल्यांचा आणि ठाणेवाल्यांचा राग करणार... त्यांना नडणार...


 


मी बर्यापैकी सोसायटीत राहतो मग मी चाळीत-झोपडपट्टीत राहणार्याना नाक मुरडणार... मी मराठी लिहितो-वाचतो-बोलतो म्हणून मी 'मराठी' व इतर भाषांचा द्वेष करणार..., मग कधी मला माझ्या निरर्थक 'आडनावाचा' अभिमान वाटणार, आणि इतरांच्या आडनावाकडे संशयाने पाहणार... कधी मी 'मराठा' असल्याचा अभिमान, मग मराठेतर सगळे माझे शत्रू..., कधी ९६ कुळी असल्याचा अभिमान... कधी 'open' मध्ये असल्याचा अभिमान... मग कधी मोठा राडा झाला कि मी 'हिंदू' असतो, अगदी गर्व से कहो... मग वरचे सगळे माझे मित्र आणि फक्त 'ते' माझे शत्रू..., मग कधीतरी, २ महत्वाच्या दिवशी व 'त्यांच्या' बरोबर चेंडू-फळीचा सामना असला कि मग मात्र मी पक्का 'भारतीय'... मेरा भारत महान... :(पण मेंदू माझा लहान


 


इतर असेच अनेक लहान मोठे अभिमान आहेतच... जसे कि आपापल्या विचारसरणीचा अभिमान... आपापल्या राजकीय पक्षांचा अभिमान... पदव्यांचा अभिमान... पेशाचा अभिमान... पदांचा अभिमान... विचारवंत असल्याचा अभिमान... पुरोगामी असल्याचा अभिमान... समाजवादी असल्याचा अभिमान... डावे असल्याचा अभिमान... धार्मिक असल्याचा अभिमान... सनातनी असल्याचा अभिमान... पर्यावरणवादी असल्याचा अभिमान... स्त्रीवादी असल्याचा अभिमान... कवी-लेखक-साहित्यिक असल्याचा अभिमान... मी ज्या पंथाचा साधक असतो त्या पंथाचा आणि माझ्या श्री सद्गुरूंचा अभिमान... हि यादी वाढतच जाईल... ह्याच अभिमानाच रुपांतर इगो मध्ये होउन तू-तू-मै-मै ला सुरुवात होते... ठिणगी पडते... भांडणं होतात... मारामाऱ्या होतात... दंगली होतात... खून-खराबे होतात... माणुसकीचा मुडदा पडतो... हेच तर होत आलय जगात... बघा इतिहास... छे... इतिहास कशाला... FACEBOOK बघा...


 


नाही, अभिमान असावा... पण मग तो आपल्या सत्कृत्याचा असला तर हे जग किती सुंदर होईल... किंवा आपण 'माणूस' असल्याचा अभिमान देखील न बाळगला तर हे जगण किती आनंदी होईल... एक खराखुरा माणूस... कोणताही खोटा मुखवटा न घालणारा... कोणताही भाषेचा, प्रांताचा, अस्मितेचा, जातीचा, धर्माचा अभिमान न बाळगणारा... प्रत्येक माणसाशी माणुसकीने वागणारा माणूस... क्या बात है? आहे का हे शक्य...?


 

BE HUMAN... B+


लेखं- Nilesh BePositive.


जातीव्यवस्था मानणारेच खरे गुन्हेगार !!

जातीव्यवस्था मानणारेच खरे गुन्हेगार !!




ब्राह्मण म्हणून द्वेष, चीड, राग निर्माण करणे, केवळ एखादा व्यक्ती ब्राह्मण आहे म्हणून त्याचा तिरस्कार करणे ह्या घातक प्रवृत्ती आहेत. काही संघटना ह्या फक्त व्यक्तीद्वेषावर उभ्या राहत असतील तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील भारतीय राष्ट्रवाद याला मुठमाती दिल्यासारखे होईल. परंतु जो ब्राह्मण निर्मित 'मनुवाद' जोपासत असेल तोच खरा जातीयवादी आहे मग तर कुठल्याही जाती, धर्माचा असेना. माझे अनेक मित्र, मैत्रिणी ब्राह्मण आहेत तेही बाबासाहेबांचे विचार जोपासतात, आज इतके ब्राह्मण समाजातले लोक आहेत त्यांनी मनुवादाला मूठमाती दिलेली आहे. जेव्हढ बाबासाहेबांचे विचार आपल्या समाजातील लोक वाचत नाहीत त्यापेक्षा अधिक अभ्यास काही प्रबोधनाचा मार्ग स्वीकारलेले ब्राह्मण करीत आहे याचा अर्थ सर्वच ब्राह्मण चांगले किंवा सर्वच ब्राह्मण वाईट असा होत नाही. बाबासाहेबांच्या संकल्पेनेतील धर्मनिरपेक्ष भारत आणि भारतीयत्वाची कल्पना दूर करून काही संघटना आणि लोक केवळ ते जन्माने ब्राह्मण आहे म्हणून जातीय द्वेष निर्माण करून जातीयतेचा हा पेटता निखारा तसाच तेवत ठेवतात. समाज प्रबोधनासाठी ३३ कोटी देवांना लाथ मारणारे अभिनेते ज्येष्ठ समाजसेवक श्रीराम लागू , ब्राह्मणवाद हा चुकीचा आहे अस सांगणारे प्र.के.अत्रे असो कि पु.ल.देशपांडे किवा अंधश्रद्धेविरुद्ध लढताना गोळ्या खाऊन मरणारे नरेंद्र दाभोळकर या सारखे अनेक लोक ब्राह्मणच आहेत. जर नुसता ब्राह्मण नावाने द्वेषसत्र सुरु ठेवले तर जो प्रामाणिक काम करणारा काही ब्राह्मण वर्गाला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवल्यासारख होईल. गांधी, जिना पेक्षाही श्रेष्ठ न्यायमूर्ती रानडे आहेत असे सांगणारे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात मग रानडे सारखी महापुरूषे हे त्यांच्याच ब्राह्मणव्यवस्थेशी झगडत होते. मुळात जो ब्राह्मणवाद पाळणारे कोणीही असो मग तेच खरे देशाचे दुश्मन आहेत असे मला वाटते.


ब्राह्मणापेक्षाही जास्त प्रमाणात जातिवाद आणि ब्राह्मणवाद ब्राह्मणवादाच्या सावलीत वाढणाऱ्या काही जातीत तो अधिक आहे. स्वतःच्या जाती ब्राह्मण व्यवस्थेमध्ये शुद्र असूनही इतर जाती धर्माला कानिष्टतम दाखविणाऱ्या या जाती खरा ब्राह्मणवाद पाळत आहेत आणि अगोदर अनेक हजारो वर्षापासून जातीपातीच्या उतरंडी खाली जगण्यातच धन्यता ह्या काही मानात आलेल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये खासकरून मराठा समाजाकडून अनेक कालखंडापासून इतर मागाससमाजावर अन्याय अत्याचार होत आलेला आहे. याचा अर्थ संपूर्ण मराठा समाज दोषी नाही परंतु अलीकडच्या काळात मराठा समाजामध्ये याचे प्रमाण बहुतांश आहे. समाजप्रबोधनाचा ठेका घेतलेल्या काही संघटना विशेष करून मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांची मानसिकता फक्त ब्राह्मण द्वेष निर्माण करणारी अधिक वाटते. एक नंबर च्या खुर्चीवर असलेला ब्राह्मण समाज केव्हा खाली येउन त्यावर आपला नंबर केव्हा लागतो हेच या संघटनांच्या कृतीतून अधिक भासते. मागासवर्गीयांवर जेव्हा ज्या समाजाकडून अन्याय, अत्याचार होतो तेव्हा त्यांचे नेतृत्व करणाऱ्या संघटना त्यांच्या समाजात जाऊन याच प्रबोधन करतात का ?? मागास समाजावर जेंव्हा अत्याचार, खून , बलात्कार इ. वाईट गोष्टी होतात त्यावर कधी मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड कधी तोंडातून ब्र काढतात का ?? मग रस्त्यावर उतरून न्याय हक्क मिळवून देणे तर दूरची गोष्ट आहे. मूलनिवासी, बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, अम्बस सारख्या संघटना फक्त पैसा गोळा करणे आणि समाजप्रबोधनाच्या नावाखाली भाषणे देणे या व्यतिरिक्त गेल्या २५-३० वर्षापासून काहीही करीत नाहीत. मराठा संघटनाना अन्याय, अत्याचार फक्त आपल्या समाजावर दिसतो, अशा जबाबदार लोकांची जबाबदारी हवी कि समाजाला वाईट गोष्टीपासून परावृत्त करणे. निव्वळ ओबीसी समाजाच्या आरक्षणावर डोळा ठेवून आरक्षणाचे राजकारण करणाऱ्या संघटना आणि विनायक मेटे सारखे लोक फक्त समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करतात. अन्याय अत्याचार जेव्हढे जबाबदार आहेत तेव्हढ्याच ह्या संघटना प्रबोधनाच्या नावाखाली अन्याय, अत्याचारावर मूकपणा बाळगणारे जबाबदार आहेत.



अन्याय, अत्याचार जिथे झाला तिथली परिस्तिथी न जाणता आपणही पेपर, टीव्ही मधून येणाऱ्या बातम्यांना हवा देऊन फक्त संघर्षाचे आणि जातीयतेचे विष पेरत असतो. समाजातील काही लोक फक्त मोठेपणा दाखविण्यासाठी सदर प्रकरणाला हवा देऊन स्वतःच्या राजकीय पोळ्या शेकण्याचे काम करतात. ज्या कुटुंबावर, समूहावर अन्याय अत्याचार झाला त्या कुटुंबाला कायदेशीर साथ देणे, गुन्हेगारांना कडक शिक्षा व्हावी यासाठी झटणे, त्या कुटुंबाला आर्थिक मदतीबरोबरच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे, परत असले अन्याय, अत्याचार होऊ नये म्हणून तशी व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे, जाती ह्या नष्ट झाल्या पाहिजे यासाठी जातीअंताचा लढा सुरु ठेवणे, हि आपली आंबेडकरी समाजाची मोठी जबाबदारी असली पाहिजे. तथागत भगवान बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार स्वातंत्र्य, समता, बंधुता, शांती, अहिंसा, मैत्री, प्रेम या तत्वांचे रुजुनीकरण होण्यासाठी झटणे तेव्हाच अन्यायग्रस्त समाजाला आणि त्यादृष्टीने तशी व्यवस्था निर्माण होण्याला न्याय देण्यासारखे होईल.




लेखं- प्रवीण जाधव.

बाबासाहेब कुणाचे??

बाबासाहेब कुणाचे??

या देशाला एकसंध ठेवण्यासाठी बाबासाहेबांनी मानवमुक्तिचा लढा दिला, हे काम समजून घ्यायला अजून काळ लागेल. मात्र असे बाबासाहेब कुठल्या विशिष्ट समाजाचे वा गटाचे नाहीत. महामानव हा सर्व मानव समाजाला पुढे नेत असतो. आपले बाबासाहेब हा अनेकदा ऐकलेला शब्दप्रयोग आज बाबासाहेबांच्या महापनिरिर्वाणानंतर ५७ वर्षांनी करताना हात थरथरतो आहे. आज आपले बाबासाहेब असं सर्वसमावेशक सर्वनामासह केलेलं विधान कोणाच्या भावना दुखावून जाईल हे सांगता येत नाही. मात्र भारतीय म्हणवून घेणार्या प्रत्येकाला हे म्हणण्याचा अधिकार आहे. हिंदू, बौद्ध, जैन, दिन ए इलाही हे धर्म ज्या भूमीवर निर्माण झाले, महानुभाव, वारकरी पंथासारखे पंथ आपल्या नीतिनियमांसह वृद्धिंगत झाले त्या देशातील प्रत्येक नागरिकासाठी समान हक्काचा कायदा-घटना-धर्म ज्यांनी फार मोठ्या परिशीलनाने निर्माण केला ते बाबासाहेब एका विशिष्ट गटाचे अथवा समूहाचे कसे होऊ शकतात? हा प्रश्न माझ्या मनात सातत्याने येत असतो.

 

डॉ. बाबासाहेबांचं हे फार मोठं योगदान हळूहळू विस्मृतीत चाललं आहे. डॉ. बाबासाहेब हे केव्हाही एका जातीपुरते किंवा धर्मापुरते मर्यादित नव्हते. सर्वधर्मसमावेशक विचार करणारा हा नेता अखंड भारतातील दलित, उपेक्षित, शोषित समाजाच्या उत्थानाचा मार्ग सांगणारा महान द्रष्टा होता. महाडच्या चवदार तळ्याला आज पवित्र स्थान म्हणून महत्त्व आलं आहे. हा समतेचा स्फुल्लींग ज्या ठिकाणी पडला त्या चवदार तळ्याच्या पाण्याने पेट घेऊन एका क्रांतीला जन्म दिला. त्या दिवशी सवर्णांनी पाणी बाटलं म्हणून सुरबानाना टिपणीसांच्या घरावर काठ्या, सोटे घेऊन हल्ला केला. महत्त्वाचं असं की त्यावेळी खोत सवर्ण म्हणून ज्यांचा उल्लेख येईल असे सुरबानाना, भाई अनंतराव चित्रे, बापुसाहेब पोतनीस यांसारखे धडाडीचे पुरोगामी विचारवंत डॉ. बाबासाहेबांच्या बरोबर होते. सुरबानाना टिपणीसांनी तर डॉ. बाबासाहेबांची साथ अखेरच्या क्षणापर्यंत सोडली नाही. डॉ. बाबासाहेबांना जातीय किंवा धार्मिक बंधनात गुंतवून ठेवणार्यांनी याचा विचार करणं अगत्याचं आहे. अर्थात आपल्या कर्तृत्व शून्यतेवर पांघरूण घालण्यासाठी मूळ वैचारिक गाभा आपल्या सोयीने बदलण्याचा अधिकार राजकीय पुढार्यांना आहे हे मान्य करणंही तितकंच गरजेचं आहे.

 

डॉ. बाबासाहेबांचा पी.एच.डी. चा प्रबंध अर्थशास्त्रावरचा होता. त्यांनी शेतीविषयक विचार मांडताना म्हटलं आहे की शेतीचा व्यवसाय हा प्रमुख उद्योग आहे. बाबासाहेबांचं लक्ष श्रमिक शेतकर्यांच्या दुरवस्थेकडे त्यांच्या चळवळीच्या सुरुवातीपासूनच वळलं होतं. महाडच्या १९२७ च्या डिसेंबरच्या दुसर्या परिषदेत केलेल्या भाषणात बाबासाहेबांनी अस्पृश्यता निवारण्यासाठीची ही चळवळ आर्थिक गुलामगिरी तोडण्यासाठी देखील आहे हे आवर्जून मांडलं आहे.

 

 डॉ. बाबासाहेबांनी कुलाबा जिल्ह्यात उभा केलेला खोती विरुद्धचा लढा हा शेतकरी, शेत कसणारे यांचा जमीनदार-सावकार यांच्याविरुद्धचा लढा होता. महात्मा गांधींनी केलेला चंपारण्याचा लढा जमीनदार विरुद्ध सरकार असा होता. म्हणून आमचे वडील म्हणत की, डॉ. बाबासाहेबांनी खर्या अर्थाने या देशात शेतकरी चळवळ प्रथम सुरू केली. त्यावेळी कुलाबा जिल्ह्यात डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या या लढ्यात ज्याप्रमाणे खोत हे सर्व धर्माचे आणि जातीचे होते तसे कुळही विविध जाती धर्माचे होते. चिखलपच्या महार कुळाला एका खोताने चाबुकाने झोडून ठार मारलं. त्या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी माणगाव तालुक्यात चंदोरे या गावी जी सभा घेण्यात आली त्याचं नेतृत्व सुरबानानांनी केलं. त्यात सामील झालेले कुळ हे कुणबी, मराठा, चांभार, महार अशा विविध जातींचे होते. तिथे जातीभेदाला वाव नव्हता. शोषित समाजाचं शोषणकर्त्याविरुद्धचा लढा होता तो. या ठिकाणी एका गोष्टीची आठवण करून द्यावी असं वाटतं. चवदार तळ्याचा सत्याग्रह झाल्यानंतरचं.... मात्र विस्मरणात गेलेली एक गोष्ट इथे नमूद करतो. महाड नगर परिषदेने १९४० साली डॉ. बाबासाहेबांना सन्मानपत्र देऊन गौरवलं. त्याला उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात… मला आज मानपत्र देऊन आपण माझा जो सत्कार केलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अत्यंत ऋणी आहे. कारण गेली दहा-पंधरा वर्षं मी जे काही सार्वजनिक कार्य करत आहे त्याचा उगम महाडातच झाला आहे. तिथेच मला स्फूर्ती मिळाली आणि या शहरात या कार्यात मला सहकारी मिळाले. ते मिळाले नसते तर माझं कार्य यशस्वी झालं नसतं. मागे आम्ही चवदार तळ्याच्या पाण्यासाठी दंगा केला. पण तो विसरून महाडकर मला लोभाने वागवतात. हे विशेष होय. माझं कार्य दिसायला जातीवाचक असलं तरी ते खरं राष्ट्रीय कार्य आहे. देशातील सर्व लोक संघटित होऊन एक राष्ट्र निर्माण व्हावं ही माझी सदिच्छा आपण ओळखली आहे हे आजच्या मानपत्राने सिद्ध झालं आहे.

 

या देशाला एकसंध ठेवण्यासाठी बाबासाहेबांनी मानवमुक्तिचा लढा दिला, हे काम समजून घ्यायला अजून काळ लागेल. मात्र असे बाबासाहेब कुठल्या विशिष्ट समाजाचे वा गटाचे नाहीत. महामानव हा सर्व मानव समाजाला पुढे नेत असतो.

 

लेखं- राजेंद्र पतोडे.

शिवप्रतापदिन !!

शिवप्रतापदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा... पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा !!




जगाच्या इतिहासात अनेक राजे - महाराजे, सुलतान होऊन गेले आहेत. अर्थात यामध्ये मोठ्या प्रमाणात वंश परंपरा किंवा दगाबाजी करून झालेलेही अनेक जण होते. मात्र या सर्व राजे - महाराजे, आणि सुलतानांची आज आठवण ठेवली जाते. कोणत्या राजाची जयंती उत्साहात साजरी केली जाते ? अनेक राजे, सुलतान हे इतिहासात गडप झाले आहेत. मात्र एक जाणता राजा असा आहे की, ज्याची अनेक वर्षांपासून उत्साहात जयंती साजरी केली जाते. आणि तो राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज. कारण शिवाजी महाराज हे काही वंश परंपरेने राजे झाले नव्हते. इतिहास हा त्यांच्या शिवाय अधूरा आहे, कारण स्वत: शिवाजी महाराजांनीच इतिहास घडवलेला आहे.


 



मोघलशाही, आदिलशाहीमुळे खचून गेलेल्या इथल्या रयतेला लढायला शिकवलं ते शिवाजी महाराजांनी. चार शतकांपूर्वी आपल्या देशात खऱ्या अर्थानं जन्म झाला तो लोकशाहीचा. शिवाजी महाराजांचा शिवकाल हीच खरी लोकशाही. मावळ्यांच्या मदतीनं त्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. शिवाजी महाराजांची दूरदृष्टी अफाट होती. स्वराज्य प्रबळ करण्यासाठी किल्ले आणि सागरी किल्ले महत्वाचे आहेत. हे त्यांनी हेरलं होतं. मात्र या सर्वांपेक्षा त्यांच्यातली जिद्द आणि गनिमी कावा आजही प्रेरणा देणारा आहे.


 


संपूर्ण शिवचरित्र हेच विविध पराक्रमांनी भारलेलं आहे. मात्र यात मैलाचा दगड ठरावा तो प्रतापगडच. कारण याच प्रतापगडाच्या पायथ्याशी जगाच्या इतिहासाला कलाटणी देणारा इतिहास घडला. शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य चिरडून टाकण्यासाठी अफजल खान हजारो सैन्य, मोठं घोडदळ, अजस्त्र हत्ती, दारूगोळा घेऊन चालून आला होता. मात्र शिवाजी महाराजांनी युद्ध कलेचं मोठं उदाहरण इथं जगाला दाखवून दिलं. महाराजांनी मोठ्या चातूर्यानं खानाला निरोप पाठवून बोलणीसाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलावलं. अफजल खानाला वाटलं की, शिवाजी महाराज घाबरले. पण त्याच्या हे लक्षात आलं नाही की, तो आता महाराजांनी जो भाग कायम पायदळी तुडवलेला आहे, तिथंच तो चालला होता. एवढंच नव्हे तर हजारोंचे सैन्य घेऊन आलेल्या अफजल खानाला शेवटी दहा जण घेऊन महाराजांबरोबर बोलणी करण्यासाठी यावं लागलं. शिवाजी महाराजही दहा जणांसह खानाच्या भेटीला गेले.


 



राजे शामियान्यात आले बातचीत झाली आणि गळाभेटीसाठी राजे आणि खान पुढे सरसावले. जकडले राजांना आपल्या बाहुत. झाला दगा. मारला खानने खंजीर राजांच्या पाठीत, सदरा फाटला. चिलखत असल्यामुळे राजांना इजा झाली नाही. पुढे राजांनी चाल केली. घातला बिचवा पोटात आणि पापणी लवायच्या आत काढला खानचा कोथळा बाहेर. खान कलंडला. सय्यद बंडा राजांवर चाल करून आला पण जीवाजी महालेने त्याचा अचूक वेध घेतला.

 



खान स्वतःला सावरत शामियान्याच्या बाहेर जाऊन त्याच्या पालखीत पडला. खानाच्या भोयांनी पालखी उचलून पळण्याची लगबग सुरु केली पण... खानाला तोडीस तोड अशा धिप्पाड अंगाचा, एकाच वेळी अर्ध बकरं जागीच बसवणारा, चार पाय धरून घोडा उचलणारा, चिखलात रुतलेली तोफ एकटाच काढणारा, असा संभाजी कावजी समोर ठाकला. ओढले त्याने वार भोयाच्या पायावर, पालखी पडली. पुढचा वार झाला तो खानच्या मानेवर आणि स्वराज्यावर चालून आलेल्या संकटास गर्दीस मिळवले.


 


खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी खानाची तलवार धरून जवळच उभा होता तो शिवरायांवर वार करता झाला. वार राजेंच्या डोक्याला चाटून गेला. महाराज थोडक्यात बचावले. आणि महाराजांनी एकाच वारात त्यालाही गर्दीस मिळविले ही राजेंच्या आयुष्यतील त्यांच्यावर झालेली एकवेम जखम होती.

 



ही घटना म्हणजे महाराजांनी अफजल खानाचा वध केला, मोघलांची सगळी शक्ती शिवाजी महाराजांच्या विरोधात खर्ची पडली. मोघल साम्राज्य भारतातच अडकून पडलं. शिवाजी महाराज नसते तर मोघल साम्राज्याचा श्रीलंका, म्यानमार आणि त्याच्या पुढेही विस्तार झाला असता. मात्र शिवाजी महाराजांच्या शौर्यामुळं ही हिरवळ दूरवर पसरू शकली नाही.

 



वैरी मेला वैर संपले, या न्यायानं महाराजांनी अफजल खानाची प्रतापगडाच्या पायथ्याशी कबर बांधली. मात्र एकदा अफजल खानाचा वध केल्यानंतर त्याची कबर बांधण्याचा दिलदारपणा इतिहासात कुठे सापडणं शक्यच नाही. मात्र ही कबर म्हणजेही एक इशाराच होता. या स्वराज्यावर जर चालून आलात तर तुमचीही अशीच कबर खोदली जाईल, असा इशाराच महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी घालून दिला.

 



शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मुस्लिमांनाही दुय्यम वागणूक नव्हती. सैन्यात आणि महाराजांच्या अंगरक्षकांमध्येही मुस्लिम होते. लढाईच्या वेळी महिला आणि त्यांच्या अब्रूचं रक्षण करण्याचा दंडकच घालून देण्यात आला होता. या मुळंच सर्व रयतेला हे आपलं राज्य वाटत होतं. हा राजा जनतेला जाणून घेणारा होता. जनतेलाही राजाचं प्रेम जाणवत होतं. त्यामुळंच हा राजा ‘जाणता राजा’ म्हटला

 


छञपती शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला पण त्याच बरोबर छञपती शिवरायांवर उभ्या आयुष्यात पहिला वार करणार्या कृष्णा भास्कर कुलकर्णाचा पण शिरच्छेद केला !!

शिवप्रतापदिनाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा... पराक्रमाच्या अखंड परंपरेला मानाचा मुजरा !!





धन्यवाद- राज जाधव सर


संदर्भ- जीवन म्हस्के.

नो मुस्लिम प्लीज..... भारतीय असल्याची लाज वाटावी अशी घटना !!

नो मुस्लिम प्लीज..... भारतीय असल्याची लाज वाटावी अशी घटना !!


 
मोठ्या गृहसंकुलात घर विकत किंवा भाड्यानं घेण म्हणजे मुस्लिमांसाठी तारेवरची कसरतच असते. ऐरवी गृहसंकुलांमधील हा मुस्लिमविरोध चोरीछुपे सुरु असला तरी एका बांधकाम व्यावसायिकाने वेबसाईटवर दिलेल्या जाहिरातीमध्ये मुस्लिमांना प्रवेश नाही असा स्पष्ट उल्लेख केल्याने या मुस्लिमविरोधाला
वाचा फुटली आहे.

 
 
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात मुस्लिमांसाठी घर घेण किती कठीण असतं हे सीएनएन-आयबीएनच्या कोब्रापोस्ट स्टिंग ऑपरेशनमुळे उघड झाले होते. ’उत्कृष्ट नवाकोरा 2BHK फुल्ली फर्निश्ड फ्लॅट, मोकळी हवा, नैसर्गिक प्रकाश, उच्चभ्रू सोसायटी, मुस्लिम नकोत, कार पार्किंगसह तात्काळ विक्री, पाचवा मजला, इच्छुकांनी कृपया कॉल करावा.’ जाहिरातीत उल्लेख असलेल्या दादरमधल्या मध्यवर्ती भागातल्या या सोसायटीला आयबीएन-नेटवर्कच्या टीमनं भेट दिली होती. त्यावेळी सोसायटीत फक्त शाकाहारी लोकच राहतात. त्यामुळे मुस्लिमांना इथले फ्लॅट विकले जात नाहीत असे स्थानिकांनी सांगितले होते .मात्र त्यानंतरही मुंबईतील गृहसंकुलामधील नो मुस्लिम प्लीजचा फलक खाली उतरताना दिसत नाही. सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात आघाडीच्या समजल्या जाणा-या ९९ एकर्स या रिएल्टी वेबपोर्टलवरील एका जाहिरातीमुळे मुस्लिमविरोध पुन्हा एकदा अधोरेखीत झाले.

 
 
या जाहिरातीमध्ये जागा विकायची आहे तसेच घर भाड्याने द्यायचे आहे अशा स्वरुपाची एक जाहिरात आहे. मात्र या जाहिरातीमध्ये मुस्लिमांना प्रवेश नाही असा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. वेबसाईटवर अशा प्रकारची ही पहिलीच जाहिरात नाही. वेबपोर्टलवर नो मुस्लिम्स सर्च केल्यास असे शेकडो जाहिराती पाहायला मिळतात. या जाहिरातींविरोधात अ‍ॅडव्होकेट शेहजाद पूनावाला यांनी केंद्रीय अल्पसंख्यांक आयोगाकडे तक्रार केली आहे.

 
तर 99 एकर्स डॉट कॉमने या जाहिरातीबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलंय, “आमची कंपनी अशा सापत्नभावाच्या वागणुकीच्या पूर्णपणे विरोधात आहे. कोणत्याही वेळी 99 acres.com वर 4 लाखांपेक्षा जास्त जाहिराती असतात. आमच्या सेल्फ-सर्व्हिस ऑनलाईनचा वापर करत जाहिरातदारांकडून या जाहिराती थेट अपलोड केल्या जातात. आमच्या साईटचा असा गैरवापर होत झाल्याचं पाहून आम्हाला खेद वाटतो.’

 
 
नुकतंच राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालात रेहमान समितीनं हा मुद्दा मांडला होता. मुंबई आणि हाऊसिंग सोसायट्यांमध्ये मुस्लिमांना आरक्षण मिळावं, अशी शिफारस त्यांनी केली होती. सरकारनं हा कायदा केलाच तर सोसायट्यांमध्ये कदाचित मुस्लिमांना जागा मिळेल. भारतीय असल्याची लाज वाटावी अशी घटना... पण अशा प्रवृत्तीच्या जाहिरात देणार्‍या लोकांच्या मनात त्यांना कधी स्थान मिळेल, हा खरा प्रश्न आहे.



 
संदर्भ- http://www.ibnlokmat.tv/?p=105018




धन्यवाद- IBN लोकमत.

आधुनिक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची सत्यकथा !!

आधुनिक राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची सत्यकथा !!


एकदा गाडगेबाबा गावातून जात असताना नदीच्या काठावर त्यांना काही भटजी पिंडदानाची पूजा करत असलेले दिसले. बाबा तिकडे जाउन म्हणाले- "भडजीबुवा..भडजीबुवा.. मले लय भूक लागली बाप्पा, मी हा भात खाऊ का..??"

 

गाडगेबाबांचा एकंदर वेश एखाद्या भिकाऱ्या सारखाच..!! अंगावर असलेल्या कपड्यात एकसंध कपडा कुठेच नव्हता, ठिकठिकाणी ठिगळ लाऊन तयार केलेलं ते नेसले होते. त्यांचा तो अवतार बघून भटजी त्वेषाने म्हणाले- "अरे वेड्या, हा भात नाही, याला पिंड म्हणतात पिंड..."

 
"पिंड म्हणजे काय असते बाप्पा..? गाडगेबाबांनी प्रश्न केला.

 
"अरे हे जे गृहस्थ दिसतायत ना त्यांचे वडील मृत्यू पावले आहेत, ते स्वर्गात गेले आहेत, त्यांच्यासाठी आम्ही हे पिंड ठेवले आहे..." बाजूला बसलेल्या डोक्याचा गोटा केलेल्या माणसाकडे बोट दाखवत भटजी म्हणाले.

 
गाडगेबाबांनी चेहरा प्रश्नार्थक केला, म्हणाले- "त्यायले पिताजी तिकडे स्वर्गात, भात इथं, त्यायले कसला पोहोचते..?? मले खूप भूक लागली..मीच खातो तो भात..द्या मले..."

 
"अरे वेड्या, त्यासाठीच तर मी मंत्र म्हणतोय ना..??" भटजी रागाने म्हणाले.

 
"मंत्र बोलून काय होईल बाप्पा..??" गाडगेबाबांनी लग्गेच प्रश्न टाकला.

 
"वेड्या, अरे मंत्र म्हटले कि, हे पिंड त्यांच्या पिताजींना पोहोचणार, तिकडे स्वर्गात, आणि ते संतुष्ट होणार.." भटजी बाबांना टाळण्यासाठी बोलला.

 
"माह्या बाप्पा, काय म्हणता भडजीबुवा..?? मंत्र बोलला कि, भात असा सर्गात जाऊन पोहोचते..?? पण सरग तर लय दूर असेल ना..?? गाडगेबाबा म्हणाले.

 
"होय रे वेड्या स्वर्ग खूप दूर आहे इथून.." इति भटजी.

 
"मबई इतका दूर..?? गाडगेबाबांनी लग्गेच प्रश्न केला.

 
"अरे हो रे वेड्या, मुंबई काय घेऊन बसलास..??  इथून लाखो-करोडो मैल दूर आहे स्वर्ग.." भटजी अत्यंत त्रासिकपणे म्हणाले.

"माह्या बाप्पा.. काय म्हणते हे भडजीबुवा.." असं स्वतःशीच बडबडत गाडगेबाबा नदीच्या पाण्यात उतरले.. चांगल्या कंबरेभर पाण्यात गेल्यावर दोन्ही हात वर आकाशाकडे करून ते जोरात म्हणाले- "मह्या बाप्पा, बाप्पा.. ह्यायने मंत्र म्हटला कि, ह्यायचा भात तिकडे दूर स्वर्गात जाते रे..." असं म्हणत त्यांना काय वाटले कोण जाणे..?? त्यांनी दोन्ही हातांनी भर-भरून पाणी जोरात हवेत उडवायला सुरुवात केली. काठावर पूजेसाठी बसलेली माणसं, भटजी सगळे भिजून गेले. सगळे चिडले बाबांवर. भट रागाने म्हणाला- "अरे ए वेड्या, तुला वेड लागले काय रे..?? अरे मुर्खासारखा पाणी काय उडवतोस आमच्या अंगावर...??"

 

बाबा त्यांच्याकडे बघून हसले आणि म्हणाले- "बाप्पा मी, नाय पाणी उडवत..??

"मग काय करतोयस तू हे..??" भट रागाने म्हणाला.

 

"माह्या बाप्पा, मी माझ्या शेताले पाणी देऊन ऱ्हायलो..."

 

"अरे वेड्या, कुठे आहे तुझं शेत इथे..??" त्रासिक भट.

"ते तिकडे अमरावतीला हाव.. मी त्यालेच पाणी देऊन ऱ्हायलो ना बाप्पा.." गाडगेबाबा पाणी उडवत शांतपणे म्हणाले.


"हाहाहा.. अरे वेड्या तू उडवलेले पाणी फार फार तर फर्लांगभर जाईल रे.. अमरावती इथून ४०० मैल दूर आहे, तिकडे कसे जाईल? एवढे साधे कळत नाही तुला.. वेडा रे वेडा..." भट कुत्सितपणे हसत म्हणाला.
 

गाडगेबाबा तितक्याच शांतपणे म्हणाले- "तुह्या मंत्राने जर हा भात लाखो-करोडो मैल दूर सर्गात जात असेल तर माह्य पानी बी माझ्या शेताले पोचायला हवं ना रे बाप्पा...?"

भट निरुत्तर झाला.


अंगावर चिंध्या पांघरलेल्या वेडगळ दिसणाऱ्या मनुष्याने आज तिथे आपल्या वागण्यातून खूप मोठा संदेश लोकांना दिला होता. एकही इयत्ता न शिकलेल्या गाडगेबाबांना जी गोष्ट कळाली होती ती गोष्ट आज "डिग्र्यांनी" भरलेल्या फाईल्स घेऊन फिरणाऱ्या तुमच्या आमच्या सुशिक्षितांना कळत नाही या पेक्षा मोठे दुर्दैव आणि मानसिक गुलामगिरी ती आणखी काय असावी..??


जेव्हा आज-सारखी नियतकालिके, साप्ताहिके, मासिके किंवा प्रिंट मिडिया नव्हता तेव्हा समाज प्रबोधनाचं अत्यंत जिकरीचं काम महाराष्ट्रात संतांनी लोकांना समजेल अशा भाषेत प्रभावीपणे केले हे आजही त्यांना 'टाळ-कुटे देवभोळे' मानणाऱ्या तथाकथित पुरोगामी महाराष्ट्रीयांना माहित नाही, हे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचे दुर्दैव म्हणावे लागेल..!!


लेखं- गौरव गायकवाड.

खरे समाजसुधारक आई सावित्री आणी बा ज्योतिबा !!

खरे समाजसुधारक आई सावित्री आणी बा ज्योतिबा !! 


शांता रानडे यांनी सावित्रीबाई जोतीबा फुले जीवन कार्य या ग्रथांत सावित्रीमाईचे जीवन व कार्याचे चित्रण समोर मांडले आहे. यातिल काही भाग मी आपणा समोर मांडु इच्छीतो...



इ.स.१८५१ मध्ये त्यांच्या शाळेतल्या मुलीँची परिक्षा झाली त्यावेळी मेजर कँडी यांनी शेरा दिला की "शाळेतल्या मुलीँची बुद्धीमत्ता पाहुन फार समाधान वाटले" नुसत्या शिक्षणाच्या शाळा उघडण्याने सावित्रीमाई आणि तात्यासाहेब (क्रांतीबा फुले) यांना समाधान वाटत नव्हते. समाजातल्या बालविधवांचे जिणे,कुमारीमातांची परिस्थिती त्यांना अस्वस्थ करत होती.




एके दिवशी रात्रीच्यावेळी तात्यासाहेब लाकड पुलावरुन जात असताना पुलाच्या काठावरुन नदित उडी घेण्याचा प्रयत्न कुणीतरी करत असल्याचे दिसले. तात्यांनी घाई करुन त्या व्यक्तीस रोखले. पाहतात तर काय ती एक पुरषाच्या वासनेची शिकार बनुन गरोदर राहिलेली विधवा काशीबाई आहे. तात्यांनी तिची समजुत काढुन तिला घरी आणले आणि सावित्रीमाईच्या हवाली केले माईनी तिची नीट काळजी घेतली आणि काशीबाईचे बाळंतपण ही केले. जन्मलेल्या मुलाची नाळ स्वतःकापुन १२ व्या दिवशी त्याचे नावं यशवंत असे ठेवले. बालविधवांची जी केविलवाणी स्थिती होती त्यावर विचार करुन सावित्रीमाईनी व तात्यांनी २८ जानेवारी.१८५३ रोजी बालहत्या प्रतिबंधक ग्रहाची स्थापना केली. कोणा विधवेचे अज्ञातपणात वाकडे पाऊल पडुन ती गरोदर राहिली तर तिने या गृहात येवुन गुपचुप बाळंत व्हावे अशी जाहीरात करण्याचे धैर्य माई आणि तात्यांसारखे सुधारकच दाखवु शकतात या कार्यासाठी त्यांना घराजवळच्या उस्मान शेख यांची मदत मिळाली. या गृहातिल मुलांची माई खुप काळजी घ्यायच्या.



हे पुढिल उताऱ्‍यावरुन स्पष्ट होते माई त्या गृहातल्या मुलांची अविरत वात्सल्याने सेवा करीत लालन पालन करीत तथापी माईनीँ आपल्या दयाळु, उदार स्वभावाला अनुसरुन त्या अर्भकाचे अत्यंत प्रेमाने वात्सल्याने संगोपन केले. ज्या काशीबाईला वाचवले तिच्या पोटी जन्मलेल्या मुलास दत्तक घेवुन सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालु रहावा म्हणुन त्यास डाँक्टर केले. आपल्या यशवंताचा विवाह जातीबाहेरच्या मुलीशी लावला आणि समाजात नवे पर्व उभारले, संबंधित उतारा हा फुले यांचा जात, पात, धर्म, वर्ण, पंथ, प्रांत पाहत नसून फक्त माणुसकी पाहतो हे सिद्ध करणारा आहे.


 
लेखं- अमोल गायकवाड.

मराठ्यांचीया तो इज्जत वाचणार नाही -छत्रपती शिवराय !!

मराठ्यांचीया तो इज्जत वाचणार नाही -छत्रपती शिवराय !!




"मराठा समाजाने स्वताच्या रक्तातील सरंजामीपणा अगोदर संपवावा, ब्राह्मणशाही तर चुटकी सरशी उडून जाईल- प्रसिद्ध विचारवंत बा.ह.कल्याणकर "


प्रबोधनाची खरी गरज कुठे आहे हे ओळखून आम्ही आमची वाटचाल केली पाहिजे. जग हे खेडे बनलेले असताना आपण ग्लोबल होत आहोत की अजूनही बुरसटलेली मानसिकता जपत आहोत याचा विचार करावा. अन्यथा झपाट्याने बदलणाऱ्या या जगात मराठा कुठेही नसेल. दुसर्यांवर अन्याय अत्याचार करणाऱ्या मराठ्यांना खडसावताना छ.शिवराय म्हणाले होते "अशाने मराठ्यांचीया तो इज्जत वाचणार नाही." पण उठसुठ शिवाजी महाराजांशी थेट संबंध दाखवत इतर जातींवर हल्ले करायचे हा कोणता शिव विचार आहे? शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी ज्या ज्या जाती लढल्या त्या त्या मराठा ही व्याख्या जर आपण मानत असू तर मग आपल्याच गाव वस्तीत राहणारे इतर जातींचे लोक मराठा नव्हेत काय? प्रत्येकाला वाटते परिवर्तन झाले पाहिजे, समाज बदलला पाहिजे परंतु हा बदल स्वताला वगळून कसा काय होईल याचाही विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. चला आपण आपल्या अंगातील सरंजामशाही अगोदर संपवूया मग पहा या देशातील ब्राह्मणवाद कसा चुटकी सरशी संपतो ते.



विचार- डॉ.बालाजी जाधव, औरंगाबाद.

मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना !!

मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना !!





आनंद वा दु:ख किंवा राग, लोभ, मोह, मत्सर या मानवी भावना सर्वांच्या अंत:करणात कमी जास्त प्रमाणात असतीलही... फटाक्यांची आतशबाजीही अशीच... भेदाभेद ओलांडून सार्‍यांना आनंद देणारी...  शनिवारी सायंकाळी शहरातील जळगाव शाहूनगरातील एका मुस्लीम कुटुंबातील मुलांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.



छायाचित्र- सुमित देशमुख.


धन्यवाद - दै.लोकमत.

फटक्यावर जो खर्च करता तो गरिब अनाथ व्यक्तीवर खर्च करा आणि त्याची दिवाळी साजरी करण्यासाठी तुम्ही मदत करा- सत्यशोधक सत्यपाल महाराज !!

फटक्यावर जो खर्च करता तो गरिब अनाथ व्यक्तीवर खर्च करा आणि त्याची दिवाळी साजरी करण्यासाठी तुम्ही मदत करा - सत्यशोधक सत्यपाल महाराज !!




लहानपणी चौथीला असताना दिवाळी च्या सुट्टी मध्ये मी सत्यपाल महाराज यांचे कीर्तन ऐकण्यास गेलो होतो. आज जसे लहान मुले एकदम पुढे जाऊन बसायचा प्रयत्न करतात तसा मी पण महाराजाच्या समोरच जाऊन बसलो. पारंपारिक कीर्तन प्रवचन यांच्या पेक्षा हे कीर्तन खूपच नवीन होते महाराज सात खंजिरी वाजवतात सर्व नवल होते माझ्यासाठी. सत्यपाल महाराज हे तुकडोजी महाराज यांचा प्रबोधनाचा वारसा चालवणारे महाराज.


 



कीर्तन सुरु झाले तुकाराम महाराज गाडगेबाबा तुकडोजी महाराज यांचे प्रबोधनाचे विचार महाराज समोर जमलेल्या तीस चाळीस हजार लोकांना विनोदी पद्धतीने आणि गावरान भाषेत सांगत होते. विषय दिवाळीचा आला मला महाराजांनी उठवले आणि विचारले ये पोऱ्या दिवाळी ला फटाके किती रुपयाचे आणले आहेस?? मी सांगितले २५० रुपयाचे आणले. त्यांनी विचारला फटाके फोडून किती वेळ मज्जा येते?? मी उत्तर दिले फटका फोडला आवाज झाला किंवा रॉकेट वर जाऊन फुटला कि तेव्हढी मज्जा येते. महाराजांनी मला सांगितले दिवाळी मध्ये अनेक घरात खायला अन्न नसत आणि तुम्ही लोक मोठा खर्च फटाक्या वर करता. तुझ्या २५० रुपये मध्ये ४ घराची दिवाळी साजरी झाली असती. या फटाक्याच्या आनंदात आपण आपल्या बाजूच्या गरीब शोषित लोकांच्या कडे लक्ष दिलेच नाही अशी मला तेव्हा भावना झाली. फटक्यावर जो खर्च करता तो गरिब अनाथ व्यक्तीवर खर्च करा आणि त्याची दिवाळी साजरी करण्यासाठी तुम्ही मदत करा... कोणाच्या घरात चूल पेटत नाही आणि बाबानो तुम्ही मोठा खर्च करून फटाके उडवता हा कुठला सण साजरा करतात??


 


मला ती गोष्ट त्या वयात खूप मनाला लागली मी फटके वाजविणे बंद केले....कोणाच्या घरात दिवाळीला गोडधोड बनत नाही कोण उपाशी असते याकडे माझी नजर तेव्हा पासून लागलेली असायची तेव्हा मी काही मोठी मदत करू शकायचो नाही पण आपल्या घरातील जे काही गोडधोड बनायचे त्या माझ्या मित्रासोबत वाटून घ्यायचो... सत्यपाल महाराज यांनी माझा दृष्टीकोन बदलून टाकला गरीब वंचित शोषित लोकांच्या कडे माझ्या मनात आत्मीयता निर्माण झाली.. मुख्य म्हणजे वायफळ खर्च टाळून आपल्या आनंदात या लोकांना सामावून घेण्याची वृत्ती तयार झाली.


 


आज दिवाळी मध्ये हजारो लाखो रुपयाची फटके आणून वाजवल्या जातात हे वाजवणारे लोक कोण आहेत त्यांनी एकदा आपल्या आनंदात दुसर्याला सहभागी करून घेतल्यावर जे काही समाधान आणि आनद भेटतो त्याचा अनुभव घ्यावा... आपल्या अवतीभवती अनेक उपाशी लोक आहेत आणि आपण गोडधोड खाचा खरच पटते का ?? अनावश्यक खर्च टाळून अनाथ गरीब मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या कपड्या साठी खर्च करावा.. नक्कीच खूप वेगळा आनंद आपल्याला मिळेल... त्या वयात मला या गोष्टी ज्यांनी गावरान भाषेत विनोदी शैली आणि खऱ्या तळमळीने सांगितल्या त्या तुकडोजी महाराज यांच्या विचाराच्या वारसास म्हणजे सत्यपाल महाराज यांना मी कधी विसरू शकत नाही... त्यांनी माझ्या मधील माणुसकी अत्यंत लहान वयात जागी केली... महाराज खूप खूप धन्यवाद आज तुम्हाच्या मुळे मला हि दृष्टी आली !!



लेखं- भैया पाटील.

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...