राजकारणात जेव्हा धर्म येतो तेव्हा लोकशाही पंगु होते !!

राजकारणात जेव्हा धर्म येतो तेव्हा लोकशाही पंगु होते !!

  

राजकारणात जेव्हा धर्म येतो तेव्हा लोकशाही पंगु होते. इतिहास आपल्याला हेच सांगतो कि धर्माधिष्ठित राजकारण करणार्यांना लोकशाही मान्य नसते. पण मुळातच लोकशाही ची पर्वा कोण करत ज्याला तिची किंमत ठाऊक असते व ती मान्य असते. कोणत्याही जाती किंवा धर्माचा झेंडा तुम्ही गाडला कि त्या खाली गर्दी गोळा करण्यास फारसे कौशल्य लागत नाही. धर्मांध टाळकी आपोआप जमतात. अशा वेळी पुढार्याचे कौशल्य एवढेच कि काल्पनिक शत्रूचे भय दाखवून जहरी भाषेने समर्थकांचा विखार फुलविणे.


 



नरेंद्र मोदीच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले आहे कि त्यांना कोणत्या प्रकारचे राजकारण या देशात करावयाचे आहे. त्यांनी वापरलेली भाषा हि केवळ त्यांची राजकीय चाल नव्हती तर त्यांनी एक प्रकारची मोठी कीडच या समाज मनात सोडलेली आहे. गुजरात दंगलीत मारले गेलेल्यांना दिलेली उपमा हि त्यांना त्या विशिष्ठ धर्माला कायमची शिवी म्हणून चिकटवण्याचा तो प्रयत्न आहे. जे मेले ते त्याच पात्रतेचे होते हे समाज मनावर ठसवण्याचा तो प्रयत्न आहे. आणि सध्या मोदी समर्थक फेसबुकवर व बाहेर हि मोदींच्या ह्या वक्तव्याचे समर्थन करताना जी भाषा वापरत आहेत त्यावरून ह्या मोदी नीतीची खात्री पटते. असाच उन्माद बाबरी मशिद कांडाच्या वेळी तरुणांच्या मनात पेरला गेला (त्यावेळी माझ्या सारख्यांच्या बालिश वयात असणाऱ्या मुलांच्या मनात सुद्धा ) व आता पण तीच विखारी भाषा नवीन पिढीत ठसवली जात आहे. दोन धर्मांतील तेढ जितकी जास्त वाढेल तितकी मोदीची चाल यशस्वी होईल. आणि मोदी ह्याच अपेक्षेत आहेत.

 



मोदीने वापरलेली हिंदू राष्ट्रवादी हि बिन बुडाची संकल्पना आहे. हा सुद्धा मोदीच्या चक्रव्युहाचा एक पदर आहे. कारण भविष्यात हि संकल्पना पुढे जाऊन हिंदू लोकशाही ते हिंदू भारतीय पर्यंत ताणली जाण्याची शक्यता आहे. मोदी कधीच आपल्या भाषणात या भारताला "भारत" म्हणत नाही... ते नेहमी "हिंदुस्तान" बोलतात... का हा भारत... हा इंडिया काय फक्त हिंदु चा आहे का?? अहो आपल्या भारतीय संविधानात कधीच कोणता धर्म आला नाही... मोदी चे अंतरूप त्यांच्या विचारात दिसते.




मोदी २०१४ पर्यंत हीच नीती अवलंबणार जेणेकरून ते येनकेन प्रकारे चर्चेत राहतील व हिंदू मतांचे ध्रुवीकरण सहज शक्य होईल. राम मंदिराच्या वेळी पण असाच धार्मिक उन्माद त्यावेळी देशात निर्माण करण्यात आला होता व तीच परिस्तिथी मोदी आता आणू पाहत अहेत.

 


त्यामुळे धर्माच्या आधारे मोदींना पंतप्रधान करू इच्छिनारयानो सद्सद विवेक बुद्धीची हाक ऐका आणि अशा विखारी प्रचाराला बळी पडू नका. कारण जे देश धर्माचा आधार घेऊन निर्माण झालेत किंवा ज्यांची सत्ता धार्मिक इशार्यांवर चालते त्यांची अवस्था पहा. आणि ठरवा कि देश महत्वाचा आहे कि असा धार्मिक उन्माद जो देश , समाज व स्व हिताला हि मारक आहे.


आम्ही कुणाचा द्वेष करत नाही... देशाला प्रथम आणि अंती: स्थान द्यावे इतकेच मला म्हणायचे आहे... देशकार्यात धर्म आणू नये आणि कुणी धर्म आणलां तर त्याचे समर्थन देखील करू नये.. धर्म आपल्या घरात ठेवावा.. घराबाहेर आपण फक्त भारतीय आहोत... हे आपले संविधान देखील सांगते... बघा पटलं तर... नाहीतर सोडून दया !!

 लेखं- राहुल जाधव.


No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...