उस्मानाबाद मध्ये गाडीवर अशोकचक्र चिटकवलेले पाहून आनंद गायकवाड या बौद्ध तरुणाला इतके मारले कि, त्यात त्याचा जीव गेला… हाच का आपला फुले , शाहू आणि आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र ???

उस्मानाबाद मध्ये गाडीवर अशोकचक्र चिटकवलेले पाहून आनंद गायकवाड या बौद्ध तरुणाला इतके मारले कि, त्यात त्याचा जीव गेला… हाच का आपला फुले , शाहू आणि आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र ???

 



आनंद चंद्रकांत गायकवाड हा तरुण आपल्या आई-वडिलांसोबत एका अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमावरून परतत असतांना एका सायकल चालकाला त्याच्या चार चाकी गाडीचा धक्का लागला म्हणून आनंदला गाडीबाहेर काढून कानशीलात मारण्यात आली परंतु जेव्हा त्याच्या गाडीवर अशोकचक्र दिसले तेव्हा व्यंकट नाशिवंत बेडगे या उपसरपंचाने [ शिवसेना ] जमाव गोळा केला आणि ही महाराची गाडी आहे त्याला मारा म्हणून चिथवले.

 


४० लोकांच्या जमावाने आनंद गायकवाड याला अमानुष मारहाण केली त्यात धोतरवाले वयस्क / तरुण आणि लहान मुले जी दहा दहा वर्षाची होती त्यांनी सुद्धा बेदम मारले त्यात या तरुणाचा करून अंत झाला. अशोकचक्र पाहून भडकणारे हे  सवर्ण सनातनी हिंदू केवळ बौद्धांच्या जीवावर उठले आहेत विशेष म्हणजे या सर्व सवर्ण लोकात , बडगे / गगने / जाधव / माने कदम अशी नावे आहेत, हे कोण आहेत ???


 

या घटनेची बातमी फक्त  "टीव्ही ९" या वृत्तवाहिनीवर हि बातमी दाखवण्यात आली होती. नळदुर्ग [ उस्मानाबाद ] पोलिसांनी केवळ सहा आरोपी अटक केलेत. मुख्य आरोपी अद्यापही फरार आहेत… ज्या रामदास आठवले यांनी आज लोकसत्तेला जी मुलाखत दिली त्यात त्यांनी "शिवसेना" बदलली आहे असा ढोंगी दावा केला ते आठवले मात्र चंद्रकांत गायकवाड यांच्या घरी जाउन सांत्वना देवून आलेत... या जातीवादी महाराष्ट्राला कुठून आणि कशी आग लावावी ???


 

या घटनेतून एक वास्तव बाहेर येतंय जे बौद्ध , दलित समाजासाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे. या मारहाणीत म्हातारे सामील होते म्हणजे ज्यांच्यावर चुकणाऱ्या पोरांना समजावण्याची जबाबदारी असते , ते केवळ सामीलच नव्हते तर स्वतः मारहाण करीत होते… लहान मुले ज्यांना मिसरूडही फुटली नव्हती ते सुद्धा मारत होते. ही येणारी नवी पिढी आपल्या वडीलधारी मंडळी कडून हा कोणता पाठ शिकत होती आणि चालू पिढी प्रत्यक्ष नेतृत्व करीत होती म्हणजे वर्तमान धोकादायक आहे हे या घटनेने सिद्ध केलेच पण भविष्यकाळही 'वैऱ्यांचा' आहे हेही दिसून आले… आज आपण देशाचा ६७ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्याच्या तयारीत असताना सगळीकडे जर असेच चित्र असेल तर आता या देशाचे काही खरे नाही. नामांतराच्या आंदोलनात दलितांच्या विशेषतः बौद्धांच्या जीवनाला आग लावण्याचे काम करण्यात मराठा समाज आघाडीवर होता. आज शिवधर्म काढून या समाजाने परिवर्तनाची कास धरली असेल असे वाटत असताना 'आनंद गायकवाड' यांच्या हत्येने त्यांची खरी धर्मांधता दाखवून दिली. संत तुकोबाच्या या लेकरांचे हे असले जातीवादी रिंगण आणि मनुवादी पालखी विठ्ठलाच्या चरणी कोणते साकडे घालणार ???

 


कॉंग्रेसवाले करत होते / भाजपा करते / सपा करते / शिवसेना करते… मुद्दा हा नाही. मुद्दा अत्याचाराचा आहे . शिवसेनावाले आता "जयभीम" म्हणतात असे आठवले यांनी म्हटल्याचे आजच वाचले आणि जयभीम तर सोड अशोकचक्र दिसले म्हणून हि महाराची [ लक्षात घे , इतर दलितांची नव्हे ] गाडी आहे असे म्हणून आनंद ला मारून टाकतात. याचे गांभीर्य वाटत नाही का ??? आठवले किती वर्ष कॉंग्रेस सोबत होते ??? मारणारे सर्व हिंदू ओबीसी दिसतात , अशावेळी आपल्या चळवळीतील ओबीसी बांधवांनी खेड्यापाड्यात जाउन फुले शाहू बाबासाहेब सांगणे गरजेचे आहे , ना की बौद्धांच्याच स्टेजवर....




डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी सम्राट अशोकाचे "अशोकाचक्र" या भारतातील मुळ बुद्धभूमी असलेल्या भारताच्या तिरंगी झेंड्यावर कायमचा कोरला गेला तेव्हांच हा देश समृद्ध झाला. आणि तेच अशोकाचक्र या पूर्ण भारतभर फिरत आहे .



हेच चक्र बुद्ध धम्माचे प्रतिक असल्यामुळेच आज आमच्या रक्ताचा कालकथित बंधू "आनंद गायकवाड" याची निर्घुण हत्या करण्यात आली. याचा आम्ही निषेध करतोच पण या मनुवादी वृत्तीच्या सरकारचा सुद्धा निषेद करतो. यांना जातीपातीच्या गर्दीत भारताला हरवायचे आहे. कारण हि बुद्धंभूमी आहे समानतेची, बुद्धांच्या, बाबासाहेबांच्या विचारांची, या विचारना पायदळी तुडवण्याचा येथील प्रत्येक सनातनी हिंदुवादी, ब्राम्हनवादी माणसाने आणि येतील कर्मठ विरोधी पक्ष आणि सरकार गेली ५६ वर्षापासून विडा उचलेला आहे. हे आम्ही जाणून आहोत .



हा "आमचा "'आनंद" मारला गेला नाही तर तो देशासाठी शहीद झाला असे आम्ही मानतो". तो केवळ तिरंगा मधील "अशोकचक्र" अभिमानाने मिरवण्यासाठी, या देशाचे अस्तित्व जपण्यासाठी स्वता:च्या गाडीवर कोरले त्या एका नव जवानास मारले हे कृत्य म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याचा अपमाना बरोबर, आतंकवादी हल्लाच आहे असे आम्हाला वाटत आहे. हा आतंकवादी हल्ला म्हणजे अंतर्गत जातीजाती मध्ये फैलाव करण्यासाठी उचललेले अघोरी पाऊल आहे . हेच ते देशातील गद्दार ,हेच खरे देशद्रोही आणि देशाच्या प्रगतीआड येणारी बांडगुळे आहेत असे आम्हाला वाटत आहे.



या बांडगुळाचा नाश होणार ते केवळ बुद्धांच्या विचाराने आणि बाबासाहेबांच्या संविधानाने ! मित्रानो-मैत्रिणीनो परिवर्तन आहे ! हि पृथ्वी, येथील जीवन सुद्धा परिवर्तनवादी आहे. दगडावर अनेक वर्ष जर आकाशातून सतत कोसळणारा पाऊस पडला तरी त्याचा आकारात फरक जाणवतोच . अशाच कोसळणाऱ्या पावसाची मी वाट बघत आहे चातका प्रमाणे !



या हिंदू (हीन-दु ) म्हणवणाऱ्या सरकारला परिवर्तनवादी म्हणायचे ? कि जातीवादी म्हणायचे ? जातीवादाचा समूळ नाश करायचा असेल तर साविधनाचा वापर करणे गरजेच आहे. हा जातीवाद येथील कोणत्याही पक्षाचे सरकार जरी आले तरी हे थांबणार नाही. कारण मतांची भिक जातीपातीच्या लोकांकडून मागायची असते ना ! कारण त्या मूर्खाचे भवितव्य आमच्या एका " बोटात" असते याची त्याला जाण असते. पण आता आम्ही" एकलव्य" राहिलो नाही . आम्ही आता एकमय, बुद्धमय, भीममय झालो आहोत .


 

हा सल्ला मनुवादी आणि स्वता:ला हिंदू राष्ट्रवादी समजणाऱ्या हिंदुस्थानातील लोकांना देत आहोत. आम्ही बुद्धाचे आणि बाबासाहेबांच्या विचाराने म्हणजेच शांततेच्या मार्गाने जाणारे आहोत. हे जगमान्य आहे हे नाकारू शकत नाही.




आज पुन्हा महाराष्ट्राच्या तथाकथित पुरोगामित्वाचे पितळ उघडे पडले. आनंद चंद्रकांत गायकवाड च्या हत्येच्या निमित्ताने जातीय द्वेषाच्या बाबतीत महाराष्ट्र हि यु. पी.,बिहारपेक्षा कमी नाही हे महाराष्ट्राने दाखवून दिले. पोचीराम कांबळे पासून खैरलांजी पर्यंतच्या जखम आजही आम्हाला अस्वस्थ करतात. आपण इथल्या बहुजनांना कितीही कुरवाळले, त्यांचे कितीही मुके घेतले तरी ते आपल्याला स्वीकारत नाही हा इतिहास सर्वज्ञात आहे.केवळ राजकारणासाठी जाती जोडणं आणि जाती-जातीतला द्वेष कायम ठेवण हे सोशियल इंजीनिआरिंग हि धांदात खोटी गोष्ट आहे. इथल्या बहुजनवादी, मुलनिवासीवादी चळवळी कश्या चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत हे पुन्हा लक्षात आले. ब्राम्हणाला शिव्या हासडल्याशिवाय ज्यांचा सुर्यच उगवत नाही, त्या लोकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. पण ते तसे करणार नाहीत कारण आपापसात पराकोटीचा द्वेष पाळत असलेल्या, जातीय अहंकारात आकंठ बुडालेल्या जाती जोडणे त्यांचे ध्येय आहे. आनंद गायकवाड यांना निर्घुणपणे मारणारी हि पिलावळ बहुजन, मुलनीवासीच होती.

 



अशोकचक्राचा द्वेष करणारी हि बांडगुळ एका निरपराध माणसाला मारतात याचा अर्थ आपण नाकर्ते आहोत, आपला सामाजिक दरारा आता अजिबातच राहिला नाही असा त्याचा अर्थ होतो. मारेकरी नराधमांना वाचवण्यासाठी स्थानिक मूलनिवासी जातीयवादी नेते आकाश-पाताळ एक करतील हे नव्याने सांगण्याची गरज नाही जातीयवादी मानसिकता जोपासणार्यांना वठणीवर आणण्यासाठी आपण कोणती कृती करतो, हे पाहणे येणाऱ्या काळात महत्वपूर्ण असणार आहे.


 

अरे....! जातीभेद करणाऱ्यांनो असे कृत्य करतांना तुम्हाला थोडी सुद्धा लाज वाटली नाही का...?  कुठून उत्पन्न झाली पशुतुल्य विकृती ? का निर्माण केली तुम्ही निर्दयी मानसिकता जी आपल्या रक्ताला ओळखत नाही....! कसे विसरले तुम्ही आपल्या महापुरुषांचा इतिहास ज्यांनी जातीभेद नष्ट करण्यासाठी आपल्या रक्ताचे पाणी केले. ज्यांनी स्वातंत्र, समता, न्याय, बंधुभाव निर्माण केला... त्या जिवंत विचारांना तुम्ही तुमच्या घाण वृत्तीने इतक्या सहज पायदळी कसे तुडवता...!

 


हि घटना पुर्ण महाराष्ट्रा करिताच नव्हे तर देशाकरीता लाजिरवाणी आहे. अशोकचक्राकडे सन्मानाने पाहायच्या ऐवजी त्याचा विरोध करुन जातीयवाद निर्माण करणाऱ्या ४६ जणांना जन्मठेपेची च शिक्षा व्हायला हवी... यामुळे समतावादी आंबेडकरी जनतेत संतापाची प्रचंड प्रमाणावर लाट उसळलेली आहे... या हत्येशी संबंधीत असणाऱ्या गुन्हेगार खुन्यांवर कलम ३०२ अन्वये व अॅट्रोसिटी अॅक्टखाली त्वरित कारवाई करून त्यांच्या मुसक्या विना विलंब आवळल्या गेल्या पाहिजेत... केवळ सहा लोकांवर गुन्हा दाखल करणे म्हणजे इतर गुन्हेगारांना मोकाट सोडून त्यांना अभय दिल्यासारखे होईल... सदर हत्येची गांभीर्याने दखल घेवून या गुन्हेगारांना पळवाटा मिळणार नाहीत व कसल्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत याची संबंधित पोलिस तपास यंत्रणेने खबरदारी घेवून गुन्हे दाखल करावेत... व केवळ गाडीवरील अशोकचक्र पाहून हत्या केल्याने देशद्रोहाचा देखील गंभीर गुन्हा दाखल करावा...

 


गाडगेबाबा आपल्या कीर्तनात नेहमी सांगायचे "माणुस हां... माणुस झाला पाहिजे..." खरचं आपण माणुस आहोत का... आपण मानवता पाळतो का??? हीच का आपली भारतीय संस्कृती???  भारतीयानो आता तरी जागृत व्हा... आज जर गप्प राहिलात तर अजुन खुप अन्याय सहन करावे लागतील... आणि असेच निष्पाप तरुणांचे विनाकारण बळी पडत राहतील. या घटनेचा जाहिर निषेध.

 


लेखं -  प्रशांत वंजारे, आनंद गायकवाड, प्रशांत एम गायकवाड, अमोल गायकवाड, अक्षय साळवे, वर्षा ओहळ, दत्तराज मुन्तोडे, निरंजन लांडगे , राजेश सावंत.


संदर्भ-


१  http://www.bharatchannels.com/tv9-maharashtra-news/youth-murdered-over-chakra-stamp-in-car-in-solapur-tv9part1-video_8e0f41768.html

 

२ http://www.youtube.com/watch?v=wPoHoCF00kU
 


३ http://www.youtube.com/watch?v=0IF9xnV7lUw


लेखं संपादन-  प्रबोधन टीम

No comments:

Post a Comment

धन्यवाद !!

छत्रपती शिवाजी महाराज

ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं , त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्...